पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047साली भारत विकसति देश होईल हे स्वप्न पाहिले आहे. ‘विकासपर्व’ हे मिहाना पब्लिशचे पुस्तक विकसित भारताच्या वाटचालीचा उहापोह मांडणारे उत्तम पुस्तक आहे.
नागपूरच्या सेवासदन माध्यमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका पद्मजा मराठे यांच्या हस्ते हा ग्रंथ 28 मे 2025 रोजी मालगुडी टिफीन पुणे येथे प्रकाशन मिहाना पब्लिश विकासपर्व हे पुस्तक लोकार्पित झाला. या ग्रंथात प्रा.नारायण गुणे व त्यांच्या पत्नी सुनीता गुणे यांच्या प्रकाशित 36 लेखांचे संकलन 434 पृष्ठांत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची 1647ची रायरेश्वर शपथ ते 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प या 400 वर्षातील विचार मंथन व अभूतपूर्व घटना हा या सर्व लेखांचा विषय आहे.
आजच्या 20 ते 30 या वयोगटात असलेल्या तरुण वर्गाने 2047 पर्यंत भारतास विकसित राष्ट्र बनवायचे आहे. 30 ते 60 या वयोगटातील नागरिक विकसित राष्ट्राचा पाया मजबूत करत आहेत. 60 ते 80 अधिक वयोगटातील ज्ञानवृद्ध नागरिक सहाय्यभूत काम करीत आहेत. कुटुंबातील वय वर्षे 20 ते 80+ सर्वांना विकास पर्वातील दीपस्तंभांचे विचार भावणारे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना 1674 साली केली. पण हिंदू साम्राज्य यावश्चंद्र दिवाकरौ वर्धिष्णू राहिले पाहिजे हा महाराजांचा संकल्प ‘एकविसावे शतक भारताचे आहे’ हे सिद्ध करून प्रत्यक्षात आणला पाहिजे या विचाराने संकलनाची सुरवात आहे.
पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पराभवानंतर गळीतगात्र झालेल्या जनमानसात नवसंजीवनी कशी फुलविली, ज्यांनी फुलविली त्या स्वामी विवेकानंद याचे जीवनकार्य दुसर्या लेखात आहे.
स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावरून 1893 साली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन्सच्या आमसभेस 2019 साली ‘विश्वगुरु भारत’संकल्पना मांडली.
राष्ट्रधर्माचा उद्घोष केला अशा आद्य शंकराचार्य, लाल, बाल, पाल, रानडे, गोखले, गांधी, डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, आदी धुरीणांचा परिचय स्वरूप लेख नवतरूण वाचकांना उद्बोधक वाटेल. भारताची सामायिक राष्ट्रीय विचारधारेच्या प्रभावाचे महत्त्व सांगणारे तीन लेख आहेत.
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे संघ व्यासपीठावरून केलेले समान राष्ट्रीय विचाराबाबत केलेले संबोधन व त्या अनुषंगाने संघ करत असलेले कार्य याचे विवेचनदेखील आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी समर्थांच्या दासबोधाने समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणला आणि अठरावे शतक भारताचे ठरले. युगानुकूल दासबोध पुढील काही शतके क्रांती करेल. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचा आठ स्थानांचा जीवनक्रम,संगीत अष्टविनायक या सांगीतिक कार्यक्रमातून समजावून देता येणार्या संहितेचा अंतर्भाव हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे हिंदू चिंतन समाजास ‘स्व’चा बोध घेण्यास उपयुक्त आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ हे मानवी समाजास समग्र आनंद देवू शकणारा विचारप्रवाह मांडला. पंडितजींच्या विचारांचे जागतिक स्तरावरील महत्व सांगणार्या डॉ. संतीश्री धुलीपुडी पंडित, कुलगुरू गछण यांच्या खपींशसीरश्र र्कीारपळीा षेी उेपींशािेीरीू इहरीरीं या इंग्लिश लेखाचा मराठी अनुवाद व मूळ इंग्लिश लेख उद्बोधक आहेत.
नवनिर्माण पावन पर्वात व्यक्तीचरित्र निर्माण व वसुधा कल्याण या दोन्हीुचे महत्त्व विशद करणार्या व्यावसायिक नितिमत्ता प्रतिष्ठानच्या प्रार्थना गीताचा परामर्श मन हेलावणारा आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या 5 जुलै 2023 च्या पुणे येथील भाषणानंतरच्या प्रतिसाद लेखात सुचविले आहे की ‘भारताच्या विचार ग्रंथांचा युगानुकूल अभ्यास भारतीय विद्यापीठांमधून होवू शकतो. देशात 10 ते 15 कोटी अनुभवी व अभ्यासू ज्येष्ठ नागरिकांकडून विविध विषयावर अभ्यास करवून घेण्याची यंत्रणा विद्यापीठांनी निर्माण करावी’.
‘जागतिक समस्यांची उत्तरे संतसाहित्यातून गवसतील’ असे या माधव किल्लेदार यांच्या ‘समर्थकृत व्यवस्थापन’ या पुस्तकाच्या प्रकाशन अध्यक्षीय भाषणात मांडले आहेत.
संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश सोनी यांच्या खछऊखअ’ड ॠङजठखजणड डउखछढखऋखउ ढठठ-ऊखढखजछ’ या इंग्रजी पुस्तकाचे इंग्लिश परीक्षण प्राचीन भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची ओळख करून देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 पासूनच्या विदेश प्रवासामागची पंचसूत्रीधोरण निदर्शक आहे. पहिली लोकसभेची निवडणूक 1952 साली झाली. विविध पक्षांच्या यशस्वी उमेदवार संख्येत चढउतार होत गेला पण 2019 पर्यंत झालेला ‘णटर्न’हा लेख अभ्यासपूर्ण आहे.
प्रभावी विरोधी पक्ष-सामायिक राष्ट्रीय विचारधारेतूनच शक्य आहे हे खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेले निवेदन राजकारणी नेत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. विकसित भारत/महाराष्ट्र 2047 या परवलीच्या शब्दांवरचे लेख हे आर्थिक प्रगतीचे निदर्शक व भविष्यवेधी संकल्प सूचित करणारे आहेत. तसेच अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांच्या विचारांच्या आधारे त्यांच्याकरिता लिहिलेला भारताची आध्यात्मिक आर्थिक व्यवस्थापन संकल्पना विशद करणारा लेख अर्थतज्ज्ञांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.
आर्थिक मानकाप्रमाणे जीडीपीच्या परिभाषेत भारताने मे 2025 मध्ये जपानला मागे टाकले आहे. पण महाराष्ट्राच्या एवढे क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या जपानने 1995 सालीच 5 ट्रीलीयन जीडीपीला पोहोचून जगाला अचंबित केले होते. जपानवरचे लेख मार्गदर्शक आहेत.
व्यावसायिक नैतिकतेसाठी हिंदू संकल्पना, ‘टेक्नो-सोशल उद्योजिकता’ हा अनोखा प्रयोग, परदेशस्थ राष्ट्रभक्त तंत्रविशारदाची जीवन कहाणी सुनीता गुणे यांचे एकपात्री संगीतनाट्याचा प्रवास व स्वरनाट्य रसरंग पुस्तकाचे परीक्षण नाट्यरसिक वाचकांना आनंद देणारे आहेत.कुलसंमेलने हे कुटुंबप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे हे मे 2024 मधील ‘अखिल भारतीय गुणे संमेलनातील’अध्यक्षीय भाषणात स्पष्ट झालेले दिसते.
पुस्तकाच्या अखेरीस तीन परिशिष्टे राष्ट्रीय विचारांची उपयुक्तता, उद्देशपूर्ती ग्रंथ अनुक्रम, व प्राचार्य प्रभाकर नानकर, डॉ. अशोक मोडक यांचे समवेत लिहिलेल्या, संकलित केलेल्या, अनुवादित केलेल्या अशा 24 ग्रंथांची संक्षिप्त ओळख वाचकांना उपयुक्त माहिती देतात.
संकलन- जनार्दन (प्रकाश) प्रभाकर विदार