टकले बंधू सराफ - नातं विश्वासाचं

विवेक मराठी    28-Aug-2025
Total Views |
 
takale
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले गणराज. त्याच्या आगमनापूर्वीच जय्यत तयारी सुरू होते. केवळ सजावटीपुरती ती राहत नाही तर गणरायाला सजवण्यासाठी सराफांच्या दुकानांत आभूषणे आणि पूजेच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू होते. ही खरेदी करताना पारदर्शकता, शुद्धता आणि प्रामाणिक व्यवहार असलेल्या सराफांकडे जाणे ग्राहक पसंत करतो. नाशिकचे टकले सराफ हे त्यापैकी एक.
सराफीचा व्यवसाय म्हणजे विश्वास आणि परंपरा. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत आणि अग्रगण्य सराफी पेढी म्हणजे टकले बंधू सराफ. 1913मध्ये स्व. वामनशास्त्री टकले यांनी या व्यवसायाची सुरूवात केली. पुढे 1936पासून नाशिकच्या सराफ बाजारात टकले बंधूंचे भव्य दुकान दिमाखात उभे आहे. 100 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेले टकले बंधू हे नाशिककरांच्या विश्वास आणि परंपरेचे प्रतीक आहे. अथक परिश्रम, भविष्यकाळाचा अचूक वेध घेण्याची शक्ती यामुळे टकले बंधू पेढी ही नाशिककरांची पहिली पसंती आहे. या शंभर वर्षात टकले बंधूंनी अनेक ग्राहक जोडले आहेत. आज रघुराज टकले आणि गिरीश टकले ही तिसरी पिढी सराफी व्यवसायाचा वारसा त्याच विश्वासाने पुढे नेत आहे.
 
 
takale bandhu
 
दरवर्षी टकले बंधू गौरी गणपतीसाठी सोन्याचांदीची वेगवेगळी आभूषणे घडवतात. यात गणपतीसाठी पूजेच्या साहित्यामध्ये चांदीचा मोदक, जास्वंदाचे फूल, केळ्यांचा घड, दुर्वा, कलश, जानवं, नारळ, सुपारी, केवड्याचे पान, विड्याचे पान या परंपरागत गोष्टी असतातच. यासोबतच मोदकांचा, दुर्वांचा हार, जास्वंदाच्या फुलांचा हार, 5 केळ्यांचा घड, चांदीचे बदाम, खारीक या गोष्टींनाही मागणी असते. गणपतीच्या दागिन्यांमध्ये सोंडपट्टी, भिकबाळी, झालर, चांदीचा मुकुट याला ग्राहकांची विशेष मागणी असते. अनेक ग्राहक दरवर्षी गणपतीसाठी एक दागिना करतात. यंदा दुर्वांचा हार, मोदकांचा हार, जास्वंदाची फुलं यातही सिल्व्हर, गोल्डन, लाल, पिवळी अशा रंगात उपलब्ध आहेत यांना विशेष मागणी आहे. गणपतीसोबत गौरींच्या दागिन्यांनासुद्धा मागणी असते. गौरींच्या दागिन्यांमध्ये मोत्याचे हार, चांदीचे कंबरपट्टे, पोत, वेणी, मुकुट, 1 ग्रॅमचे दागिने मागणीनुसार तयार केले जातात. यंदा फुलं, पानं, मोराची कलाकुसर असलेल्या कंबरपट्ट्यांना चांगली मागणी आहे. काही ग्राहक गौरीचे चांदीचे मुखवटेही तयार करून घेतात. दोन महिने आधीच मुखवट्यांची तयारी सुरू होते.
 
 
श्रावण महिन्यात नागपंचमीपासून दागिने बनवायला सुरूवात होते. दरवर्षी मार्केट ट्रेंडनुसार काही बदल केले जातात. सोन्या-चांदीचे भाव वाढले असले तरी सर्वसामान्यांना परवडेल अशा भावात दागिने उपलब्ध आहेत. अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा अतूट विश्वास यावरच टकले बंधूंची तिसरी पिढी हा वारसा पुढे चालवत आहे.
 
संकलन ः बागेश्री पारनेरकर