@डॉ.अद्वैत पाध्ये
‘मी अष्टपैलू : सबसे काबिल कौन?’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना स्वतःची ओळख करून देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अभिनव उपक्रम आहे. जे विद्यार्थी यामध्ये भाग घेतात त्यांना खूप मजा येते. विविध विषयांवरचे आपले विचार आपण कसे छान प्रकारे मांडू शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळतो, दुसर्याला ऐकणे व मग स्वत:चे मत मांडणे हे शिकायला मिळते, अंतिम फेरीत हजरजबाबीपणा शिकायला मिळतो. या उपक्रमाविषयी माहिती देणारा लेख..
आठ वर्षांपूर्वी एका शाळेतली काही मुलं जी अभ्यासात हुशार होती ती, ऑलिंपियाड की अशाच स्वरूपाच्या स्पर्धेसाठी त्यांचा संघ जाणार होता. त्या दृष्टीने मानसिक/भावनिक हुशारी संदर्भात मार्गदर्शनासाठी त्यांच्या शाळेतून आमच्याकडे पाठवले होते. मुले अगदी बुद्धिमान होती; पण स्पर्धेदरम्यान भावनिक हुशारी टिकवून ठेवणे गरजेचे होते, त्यासाठी मी व माझ्या समुपदेशक टीमने त्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांना छान यश मिळाले. ‘तुम्ही दिलेल्या टिप्सचा खूप फायदा झाला’, असे त्यांनी आवर्जून सांगितले. तेव्हाच मनात विचार आला होता की, असंच काहीतरी सगळ्याच मुलांसाठी करायला पाहिजे. कारण भावनिक हुशारीची गरज सर्वांनाच आहे.
त्याच दरम्यान काही दुसर्या संदर्भात हॉवर्ड गार्डनर यांच्या ‘मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी’बद्दल वाचले होते. यात भावनिक हुशारी वाढवणे अभिप्रेत होते. त्यामुळे या दृष्टीने काही उपक्रम करावा जो त्यांना सामावून घेत, बुद्धिमत्तेच्या पैलूंचा कस पारखत समृद्ध करणारा असा असावा. म्हणून मग आमच्या ’मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’ व ’मनोदय ट्रस्ट’च्या टीमसमोर ही कल्पना ठेवली. त्यांनापण ती आवडली. बुद्धिमत्तेचे आठ पैलू (भाषिक, गणिती व तार्किक, निसर्गविषयक, कल्पनाशक्ती, शरीरसंतुलन, सांगीतिक, स्वओळख, आंतरव्यक्तीविषयक) असल्यामुळे त्या उपक्रमाचे नाव ‘अष्टपैलू’ ठेवावे असे ठरले.
उपक्रमाची टॅगलाईन काय ठेवावी यावर विचार करताना सुचले की, या सर्व पैलूंतून एखाद्याच्या प्रतिभेचा, वाणीचा, वैचारिक व भावनिक संतुलनाचा, संश्लेषक व विश्लेषक (डूपींहशीळी अपरश्रूीळी) बुद्धीचा व या सर्वांतून स्वत:ला, इतरांना पुढे नेण्याच्या क्षमतेचा कस त्यांना समजणार आहे. म्हणून त्याच्याच इंग्लिश शब्दाची आद्याक्षऱे घेऊन अर्थपूर्ण असा ’काबिल’ शब्द तयार केला (उीशरींर्ळींळीूं, ईींळर्लीश्ररींळेप, इरश्ररपलश, खपींशश्रश्रळसशपलश, ङशरवशीीहळि : उअइखङ) आणि जन्म झाला, ‘मी अष्टपैलू: सबसे काबिल कौन?’ या नावाचा.
आता हा उपक्रम कसा असावा, यावर विचार करता तो 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी असावा, जेणेकरून प्रगतीला वाव राहिल, शाळांनी मुलांची निवड करावी, ती करताना फक्त अभ्यासातली हुशारी न बघता इतर क्षेत्रातले प्रावीण्य पण बघावे, अध्ययनात अक्षम असलेलेसुद्धा यात भाग घेऊ शकतात असे निकष ठरवले. स्वरूप स्पर्धेचे ठेवले, तरी त्यासाठी वेगळी तयारी करावी लागणार नाही यावर कटाक्ष ठेवायचे ठरले. स्पर्धेच्या तीन फेर्या घेण्याचे ठरले. निवड फेरीत त्यांना आयत्या वेळी तीन विषय देऊन त्यापैकी एका विषयावर 20 मिनिटांत जेवढे लिहिता येईल तेवढे लिहा असे सांगितले. त्यावरून मग काहींची पहिल्या फेरीसाठी निवड झाली.
पहिल्या फेरीत एक अंतर्गत व एक बाह्य परीक्षक यांनी त्यांच्या प्रतिभेचा, वाणीचा कस पाहणारे प्रश्न विचारले वा कृती करायला सांगितल्या. उदाहरणार्थ-चिठ्ठीतल्या शब्दांवरून आठवणी/भाषण/कविता/गाणे, कला सादरीकरण आदी.
दुसर्या फेरीसाठी त्यातली काही मुले निवडली गेली, जी फेरी गटचर्चा व क्विझची होती. 15 मिनिटे आधी गटाने चिठ्ठी उचलून त्यातील विषयावर परीक्षकांसमोर आपसात चर्चा करायची, व निष्कर्षाला पोचायचे, अशी गटचर्चेची फेरी व त्याच गटासाठी क्विझ यातून अंतिम फेरीसाठी निवड होणार.
अंतिम फेरी ही जाहीर मुलाखतीची-ज्यात सर्वांसमोर मी प्रश्न विचारणार. ते प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक विषयांबाबत व त्यावरून पुढे तीन किंवा चार बाह्य परीक्षकही त्यांचे प्रश्न विचारणार व त्यातून तीन जणांची निवड करणार, असा पूर्ण गोषवारा ठरला. हे सर्व ठरवताना मला या सर्व सूत्रावर गीत सुचले,
बुद्धीला माझ्या कितीतरी पैलू
मी काबिल, मी अष्टपैलू
हिरा अभ्यासातला कौतुक मिळे त्याला
दाद जेव्हा सृजनाला आनंद भिडे गगनाला
अवीट अमोघ वाणी बोलू,मनमंदिरांना उजळी देऊ
मी काबिल, मी अष्टपैलू
विचारांच्या सूरतालाला, भावसरगमाच्या भवताला
नवोन्मेष प्रतिभेतून नेतृत्वाचा हुंकार भरू
पराजयातून जयाकडे जाऊ, पुनश्च हरिओम करू
मी काबिल,मी अष्टपैलू
लिहिता-लिहिता चालही सुचली व गाणे तयार झाले जे विद्यार्थ्यांना/स्पर्धकांना स्पर्धेच्या मूळ हेतूविषयी माहिती देत, स्फूर्ती देणारे होते. शाळांना संपर्क करण्यात आला. यासाठी व जागेसाठी कर्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे सहकार्य लाभले. 80 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यातून 60 पहिल्या फेरीसाठी, 35 दुसर्या फेरीसाठी तर 10 अंतिम फेरीसाठी निवडले गेलेे. पहिल्या फेरीसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक व रंगकर्मी प्रसाद भिडे, दुसर्या फेरीसाठी प्रा.शिवराज भोसले व अंतिम फेरीसाठी रूपारेलच्या उपप्राचार्य व मानसतज्ज्ञ डॉ.नीता ताटके मॅडम, सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक, गायिका व अभिनेत्री स्वरांगी मराठे, पत्रकार अमित भिडे हे मान्यवर परीक्षक होते.
सगळ्या फेर्यांमधून मुलांमध्ये किती छान क्षमता असतात, त्यांना वाव मिळाला तर ते आपली मते आपापसात व जाहीर मंचावर किती छान मांडू शकतात, हेपण दिसून आले! ’वैचारिक व भावनिक हुशारी वाढवण्यासाठी शालेय स्तरावर गटचर्चा वगैरे किती आवश्यक आहे,’ ते नीता ताटके मॅडमनी छान विशद केले!!
त्यानंतर कोविडमुळे पुढे दोन वर्षे काही करता आले नाही! 2022साली सगळे सुरळीत झाल्यावर पुन्हा मे-जून या महिन्यांपासून शाळांना संपर्क करणे, विद्यार्थी निवडीचे निकष सांगणे वगैरे सुरू केले. मे महिन्यामध्येच बैठकीत ठरल्याप्रमाणे स्वरूपात थोडा बदल केला. प्रवेशासाठी गुगल फॉर्म बनवून त्यात त्यांच्या माहितीबरोबरच त्या वेळच्या सामाजिक, शैक्षणिक, त्यांच्या वयाच्या समस्यांवर प्रश्न विचारले. ज्याची उत्तरे मुलांनी स्वत: कोणाची मदत न घेता भरायची. ती तपासून मग त्यावरून पहिल्या फेरीसाठी निवड करायची.
पहिल्या फेरीमध्येही बदल केले. आठही पैलूंवर आधारित अशी ती बनवली. स्वओळख(ळपीींरशिीीेपरश्र), सांगितिक र्(ाीीळलरश्र), शरीरसंतुलन (लेवू ज्ञळपशीींहशींळल) यावर फक्त मुलाखती व बाकीच्यांवर लेखी चाचणी घ्यायची. दुसरी फेरी फक्त गटचर्चेची, तर तिसरी आणि अंतिम जाहीर मुलाखतीची असे बदल केले. गुगल फेरी, पहिल्या फेरीचे प्रश्न आमची कोअर टीम काढणार असे ठरले. मी त्यात वाटले तर काही बदल किंवा सूचना करून ते अंतिम करणार. ही तयारी जून-जुलै महिन्यांपासून सुरू केली. या वेळी ’रोटरी क्लब ऑफ डोंबिवली-पूर्व’ची मदत घेतली होती, ज्यामुळे शाळांना संपर्क करणे व जागा या सोयी मिळाल्या!
या सर्व तयारीच्या उत्साहातून मुलांना उत्साहित करायला नवीन सूत्रगीत लिहिले, ज्याला मकरंद वैशंपायन यांनी चाल लावली. विद्यार्थ्यांनी ते अंतिम फेरीच्या वेळी सादर केले. यावर्षी 70 जणांनी गुगल फेरीत नावे दिली. त्यातून पुढे निवड वगैरे होऊन उत्साहात फेरी पार पडली. तिसर्या वर्षीपासून यामध्ये मार्गदर्शन सत्राची भर घातली, जे 2023-2024मध्ये स्पर्धा झाल्यावर काही दिवसांनी घेत होतो; पण आता ते गुगलफेरी ते पहिल्या फेरी दरम्यान घेतो, ज्यात या आठही पैलूंबाबत विद्यार्थी पालक यांना माहिती देण्यात येते व ते कसे विकसित करायचे याचे कृतीसत्रातून मार्गदर्शन करण्यात येते. बाकी दरवर्षी नवीन सूत्रगीत मी लिहिले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याला संगीतकार सुखदा भावे-दाबके संगीतबद्ध करत आहेत. या वर्षी हिंदीत लिहिले होते. ते असे-
सफलता की राहे है मुश्किल
हुनर ही तो मिलाता है मंझिल
मै अष्टपैलू, मै सबसे काबिल!!
कोई है स्वरों का मसिहा,
लब्जो का कोई बादशहा
गीत गाता सूर का फनकार
मै अष्टपैलू, मै सबसे काबिल!!
हिसाब किताब जीवन की
जताती किंमत रिश्तों की
अपनी खुद की गरिमा की
मै अष्टपैलू,मै सबसे काबिल!!
कठिनाई से जुझना आता हमे
भाव खयाल संतुलन है मन मे
रिश्ता प्रकृतीसे जुटाना है हमे
मै अष्टपैलू, मै सबसे काबिल!!
या वर्षीपासून दुसर्या फेरीपासूनच्या विद्यार्थ्यांना ते कोणत्या पैलूत अग्रेसर आहेत व कोणत्या पैलूंत सुधारणा आवश्यक आहे, त्यासाठी काय उपाय करायचे तो रिपोर्ट वैयक्तिकरीत्या देणे सुरू केले आहे.
जे विद्यार्थी भाग घेतात त्यांना खूप मजा येते. विविध विषयांवरचे आपले विचार आपण कसे छान प्रकारे मांडू शकतो हा आत्मविश्वास मिळतो, दुसर्याला ऐकणे व मग स्वत:चे मत मांडणे हे शिकायला मिळते, अंतिम फेरीत हजरजबाबीपणा शिकायला मिळतो. इतर शाळांतल्या मुलांशी जवळून ओळख वा मैत्री होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्वत:ची एक वेगळी ओळख मुलांना होते.
आत्तापर्यंत पालकांचा पण अभिप्राय असाच आहे की, ’आमचा मुलगा/मुलगी एवढा विचार करू शकतो/ते हे पहिल्यांदाच कळते आहे. अभ्यासात हुशार आहे; पण अचानक विचारलेल्या प्रश्नांना इतकी विचारपूर्वक उत्तरे न दडपण घेता देऊ शकतात, असा शोध पहिल्यांदाच लागतो आहे.’ ’तीन फेर्या होईपर्यंत कधीच कसले दडपण मुलांना जाणवत नाही,’ असेही पालकांनी सांगितले. ’इतकी सहज व खेळीमेळीत स्पर्धा होते की ती स्पर्धा वाटतच नाही,’ असेही पालक म्हणाले आहेत.
सहभागी विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह कायमच छान राहिला आहे. पण आधीच्या फेरीत बाद झालेले विद्यार्थी अंतिम फेरी बघायला येत नाहीत ना त्यांचे पालक येतात (तरी आम्ही सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन अंतिम फेरीत गौरव करणार हे सांगतो तरीही!!) त्याहीपेक्षा कटू अनुभव काही शाळाचालक देतात. गुगलफॉर्म भरण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी मिळत असूनही चाचणी परीक्षेचे कारण देऊन किंवा तत्सम कारण देऊन विद्यार्थ्यांना पाठवत नाहीत. नावाला स्पर्धा असली तरी भावनिक हुशारी वाढवण्याच्या या अनुभवाला ते विद्यार्थी मुकतात याची खंत वाटते.
अर्थात कुठच्याही वेगळ्या उपक्रमाला हळूहळूच प्रतिसाद वाढत असतो, नवीन शाळांनी भाग घेण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच रहातील, कारवा हळूहळू बनत जाईल! मुलांना भावनिक हुशार बनवण्याचे आमचे प्रयत्न चालूच राहतील.
लेखक मनोदय ट्रस्टचे अध्यक्ष असून मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर, डोंबिवली या संस्थेचे संचालक आहेत.