@ मिलिंद पोतनीस
मुसलमानांसाठी एखाद्या भौगोलिक क्षेत्रात त्यांची लोकसंख्या 30% व्हायची खोटी की ते क्षेत्र त्यांचा स्वतंत्र सुभा झालाच समजा! तेथील स्थानिक मुसलमान त्याला ‘हमारा एरिया’ समजतात. त्या वस्त्यांमध्ये मुसलमानांनी अक्षरशः शरिया कानून लागू केलेला असतो. त्यांच्या दृष्टीने हमारा एरिया म्हणजे असे क्षेत्र जिथे पोलिसांना देखील जाण्यास मनाई असते. मग हे काफीर (हिंदू) तरुण तरुणी तिथे येऊच कसे शकतात?... एवढा हा साधासोपा सरळ हिशोब आहे. ‘आप हमारे एरिया में क्यूं आए?’ हा प्रश्न, ‘सर तन से जुदा’ची रंगीत तालीम आहे. मग याला टाईम बॉम्ब न म्हणावे तर काय म्हणावे?...
मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मार्केट सिटी मॉलजवळील प्रमोद महाजन बागेत शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4.30च्या सुमारास एका हिंदू तरुण-तरुणीला (सौरभ आणि नेहा) जिहादी मानसिकतेच्या काही अल्पवयीन व काही सज्ञान मुस्लीम धर्मांध मुलांकडून बेदम मारहाण केल्याची संतापजनक व गंभीर भयानक घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेने केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर सबंध भारतातील सकल हिंदू समाजाला हादरवून सोडले आहे.विशेषतः त्या घटनेतील दोन गोष्टी सकल हिंदू समाजाला अंतर्मुख करायला लावणार्या आहेत. पहिली म्हणजे त्या हल्लेखोर मुलांनी विचारलेला प्रश्न... आप हमारे एरिया में क्यूं आए?...
आणि दुसरी म्हणजे... त्यांनी सौरभ आणि नेहाला केलेली बेदम मारहाण हा उघड उघड मॉब लिंचिंगचाच प्रकार होता...
आप हमारे एरिया में क्यूं आए?...
प्यू रिसर्च सेंटर (Pew Research Center) ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार इ. स. 2070पर्यंत भारतातील मुस्लीम लोकसंख्या बहुमतात येईल असे भाकीत केले आहे. जगाच्या आकडेमोडीत 51% म्हणजे बहुमत असले तरी मुसलमानांसाठी एखाद्या भौगोलिक क्षेत्रात त्यांची लोकसंख्या 30% व्हायची खोटी की, ते क्षेत्र त्यांचा स्वतंत्र सुभा झालाच समजा! सुसंस्कृत भाषेत त्याला ’नो-गो एरिया’ (No-Go Area) म्हणतात आणि तेथील स्थानिक मुसलमान त्याला ‘हमारा एरिया’ समजतात... हे ’नो-गो एरिया’ मुसलमानांची लक्षणीय संख्या असलेल्या ग्रेट ब्रिटनपासून सबंध युरोपमधल्या जवळपास प्रत्येक प्रमुख देशात आढळतात... त्या वस्त्यांमध्ये मुसलमानांनी अक्षरशः शरिया कानून लागू केलेला असतो. त्यांच्या दृष्टीने हमारा एरिया म्हणजे असे क्षेत्र जिथे पोलिसांना देखील जाण्यास मनाई असते. मग हे काफीर (हिंदू) तरुण-तरुणी तिथे येऊच कसे शकतात?... एवढा हा साधासोपा सरळ हिशोब आहे.
मारहाण करताना ती अल्पवयीन मुले ज्या त्वेषाने मारहाण करत होती, त्यावेळच्या त्यांच्या हावभावांवरून...त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काफीर (हिंदू) द्वेष ठासून भरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. इतक्या लहान वयात हा द्वेष कुठून भरला असेल?... धर्माच्या संस्कारातून?...की कुटुंबाच्या संस्कारातून?...की ते शिक्षण घेत असलेल्या मदरशातून?... याचा छडा लावलाच पाहिजे... अन्यथा त्यांना अल्पवयीन म्हणण्यापेक्षा टाईम बॉम्ब म्हणणे जास्त तर्कसंगत ठरेल.
कारण 14 ऑगस्ट 1947रोजी आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर विभाजन झाले व ’इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ नावाचा एक देश आमच्याच भूमीत निर्माण झाला. एकेकाळी जुळी मुंबई म्हणून ओळखलं गेलेलं कराची, सरदार भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिलेलं लाहोर, राजा जयपाल आणि आनंदपाल यांनी शासन केलेलं ’पुरुषपूर’ अर्थात् ’पेशावर’, ढाकेश्वरीचं मंदिर असलेलं ’ढाका’ ही अखंड भारतातील आमची शहरे...रावीपार आणि गंगापार ’इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’मध्ये राहिली.
एकेकाळी हिंदुबहुल असलेल्या या कराची, लाहोर, पेशावर आणि ढाक्याच्या इस्लामीकरणाची सुरुवात कधीतरी याच प्रश्नाने झाली असणार ना?... आप हमारे एरिया में क्यूं आए?...
या प्रश्नाचे गांभीर्य सकल हिंदू समाजाच्या त्यावेळी लक्षात आले नाही. अशीच अल्पवयीन मुले आहेत म्हणून कदाचित आमच्या पूर्वजांनी कानाडोळा केला असावा आणि पुढे हाच,‘आप हमारे एरिया में क्यूं आए?’ हा प्रश्न प्राणप्रिय मातृभूमीचा जवळपास पाव हिस्सा घेऊन गेला. तिकडचा हिंदू समाज आपला वडिलोपार्जित जमीनजुमला, शेतीवाडी, स्थावर जंगम मालमत्ता सोडून नेसत्या वस्त्रानिशी हिंदुबहुल भारतात आला...
आप हमारे एरिया में क्यूं आए? हा प्रश्न, ‘सर तन से जुदा’ची रंगीत तालीम आहे. मग याला टाईम बॉम्ब न म्हणावे तर काय म्हणावे?...
हा प्रश्न विचारणार्या त्या जिहादी मुलांना काफिरांचा गरबा खेळायला मात्र हक्काने यायचं असतं, हे वास्तव हिंदू लक्षात घेणार आहेत का? त्यांना काफिरांच्या देवळाबाहेर... जत्रेत... कुंभमेळ्यात स्टॉल लावायचे असतात...
या प्रश्नाच्या उत्तरातच पुलवामाला RDX कसं पोचलं?... या न सुटलेल्या कोड्याचं उत्तर आहे...या प्रश्नातच पहेलगामचे क्रूरकर्मा जिहादी भारताच्या सीमा पार करून कसे आले...आणि नृशंस काफीर (हिंदू) पर्यटकांचा नरसंहार करून कसे गडप झाले?... या रहस्याचा उलगडा आहे. एकदा ‘हमारा एरिया’ म्हटलं की, त्या एरियामध्ये काय चालू आहे याचा थांगपत्ता बाहेरच्या जगाला लागत नाही... आणि तिथेच विभाजनाचे बीज पेरले जाते...मुंबईकर सकल हिंदू समाजाने मुंबईचे इस्लामीकरण आणि पर्यायाने हमारा एरिया, तुम्हारा एरिया या धर्तीवर विभाजन सुरू झाले आहे असे समजावे का?...
हल्ला नव्हे, मॉब लिंचिंग
इस्लामचा आतंक हा लिखाणाचा...चर्चेचा...किंवा भाषणाचा विषय नाही...तो अनुभवाचा विषय आहे. इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येते की, इस्लामी आतंकाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे-झुंडशाही. त्याचाच प्रत्यय कुर्ल्याच्या या जिहादी घटनेत देखील आला आहे.
12/15 जणांच्या जिहादी गँगने या काफीर (हिंदू) सौरभ आणि नेहाला दुपारच्या सामसूम वेळेला आणि बागेत सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेऊन गाठले. नेहाशी शारीरिक झोंबाझोंबी केली. सौरभला नुसत्या हातांनी, हातातल्या फळकुटाने बेदम मारहाण केली. अगदी डोळ्यावर वर्मी बसणारा ठोसादेखील मारला. या सगळ्या मारहाणीत त्या टोळक्याच्या त्वेष आणि द्वेषपूर्ण हावभावांरून आणि अश्लील भाषेवरून काफिरां (हिंदूं) विषयीचा त्यांच्या मनातील विखार स्पष्ट दिसतो...
सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे... सौरभ आणि नेहा आपली सुटका करून घेण्यासाठी या जिहादी टोळक्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असताना जंगलातील हिंस्र श्वापदे ज्याप्रमाणे झुंडीने आपल्या सावजाचा पाठलाग करत त्याचे लचके तोडतात, अगदी तसेच त्या दोन्ही काफिरांची अवस्था करताना ही जिहादी झुंड दिसत होती... याला ’मॉब लिंचिंग’ म्हणू नये तर दुसरे काय म्हणावे?...
समजा सौरभने नेहा आणि स्वतःच्या रक्षणासाठी त्या अल्पवयीन झुंडीवर हात उचलला असता तर?... एव्हाना त्यालाच ’मॉब लिंचिंग’च्या आरोपावरून अटक करायला भाग पाडले गेले असते. इस्लामी मॉब लिंचिंगच्या आतंकवादाचा अनुभव सकल हिंदू समाजाने आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनापासून...गोध्राच्या हिंदू नरसंहारापासून ते कालपरवाच्या कुर्ल्यातील घटनेपर्यंत अनेक वेळा घेतलेला आहे...
आता या जिहादी पिलावळीला वाचवण्यासाठी त्यांची इकोसिस्टीम कार्यरत होईल. ‘मुले अल्पवयीन आहेत...अजाण आहेत...मोलमजुरी करून पोट भरणार्या गरीब आईवडलांच्या पोटी जन्माला आलेली आहेत...कोणाला डॉक्टर व्हायचं आहे... कुणाला इंजिनियर व्हायचं आहे...’, अशी सहानुभूती उभी करणारी कथानकं सांगितली जातील.
नेहाच्या कपड्यांवरून...सौरभने केलेल्या काल्पनिक दमदाटीवरून... किंवा त्यांच्या कपोलकल्पित अश्लीलपणावरून त्या दोघांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे प्रयत्न केले जातील...जेणेकरून ते जिहादी कसे निर्दोष आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या जिहादी कांडातील बरीचशी मुले अल्पवयीन असल्यामुळे बाल सुधारगृहात रवानगी करून काही दिवसांनी त्यांची सुटका होईल. सज्ञान जिहादी आरोपींसाठी वकिलांची फौज उभी केली जाईल. त्यांना लवकरात लवकर जामीन मिळवून देण्याचे तसेच कायद्यातल्या पळवाटा शोधून त्यांची सुटका करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातील. फक्त यातील कोणी बांगलादेशी अथवा रोहिंग्या नागरिक आहेत का? हे पोलिसांनी शोधून काढावे, जेणेकरून कडक कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल...
10 ऑगस्ट 2012पर्यंत मुंबईमध्ये मुंबई पोलिसांचा प्रचंड धाक होता. 11 ऑगस्ट 2012 रोजी रजा अकादमीने आझाद मैदानावर मोर्चा काढून नंगा नाच घातला. गणवेशातल्या सशस्त्र महिला पोलीस अधिकार्यांच्या अब्रूला हात घातला गेला...आणि तरीही एकाही पोलिस अधिकार्याच्या बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्याच दिवशी मुंबई पोलिसांचा एकेकाळचा तो रुबाब...तो धाक...मुंबईच्या अरबी समुद्रात विसर्जित झाला...
अर्थात् फक्त कायद्याचा धाक किंवा न्यायालयीन कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही. शिवाय कुर्ला हे काही मुंबईतील असे एकच संवेदनशील ठिकाण नाही. आज मुंबईत असे अनेक ‘हमारा एरिया’ तयार झाले आहेत. कोणताही गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी परिणामांचा विचार करतो. कुर्ल्याच्या सदर घटनेतील त्या श्वापदांना घरच्यांचा धाक असण्याचे काही कारणच नाही. उलट मिळाले तर प्रोत्साहनच मिळेल. ते शिकत असलेली एखादी शाळा असण्यापेक्षा मदरसा असण्याची शक्यताच जास्त आहे आणि मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे व दर्जाचे शिक्षण मिळते याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. ’मदरसा’ ही भारताला लागलेली ’हिरवी वाळवी’ आहे असे म्हणायला हरकत नाही.
कायद्याचा धाक कितपत असेल त्याची मीमांसा वरती केलीच आहे. काही राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी व आपली अपनेवालों की सबंध इकोसिस्टीम आपल्या पाठिशी उभे राहील. आपल्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनमधून घरी नेतील. अल्पवयीन असली तरीही भारताच्या घटनेने दिलेले हक्क त्यांना पुरेपूर ठाऊक आहेत. त्यामुळेच ते हे धाडस करू शकले.
हिंदुत्वाचा कैवार घेतलेले सरकार असल्यामुळे योग्य ती कडक कायदेशीर कारवाई होईलच; मात्र सगळी जबाबदारी सरकारवर ढकलून आपण निष्क्रिय राहणे हा आत्मघात ठरेल. त्यामुळे आता मुंबईकर सकल हिंदू समाजाला कंबर कसून संघटितपणे उभे रहाण्याशिवाय पर्यायच नाही.
हिंदू समाजाच्या हातात सर्वात मोठे अस्त्र आहे ते म्हणजे आर्थिक बहिष्कार. जोपर्यंत जिहादी मानसिकतेला आर्थिक फटका बसत नाही, पोटाला चिमटा बसत नाही तोपर्यंत यांची बुद्धी ताळ्यावर येणार नाही.
दुसरा मार्ग म्हणजे हिंदू समाजातली युवाशक्ती विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बजरंग दलासारख्या विधायक कार्य करणार्या संघटनेच्या माध्यमातून संघटित करावी लागेल. हिंदू तरुणांनी आत्मरक्षणाचे शिक्षण घेतले तर अशा आणीबाणीच्या प्रसंगात ते खूप उपयोगी पडेल.
हिंदू तरुणींना असेच प्रशिक्षण ’दुर्गा वाहिनी’च्या माध्यमात देऊन संघटित करता येईल. ’आत्मरक्षा’ हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षाकरिता कणखर शरीर व खंबीर मन आवश्यक असते. याचेच प्रशिक्षण ’बजरंग दल’ व ’दुर्गा वाहिनी’ यांच्याकडून दिले जाते.
त्याचप्रमाणे तातडीची मदत मिळण्यासाठी एखादी हेल्पलाईनदेखील सुरू करता येईल. 2022 साली स्वधर्माचे पालन करण्यावरून धमक्या मिळणार्या हिंदूंना कायदेशीर आणि सामाजिक मदत देण्यासाठी ’विहिंप’ आणि ’बजरंग’ दलाने देशातील विविध विभागांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले होते. तर अगदी अलीकडच्या काळात राजस्थान (मार्च 2026) आणि दिल्ली (एप्रिल 2026) यांसारख्या ठिकाणी स्थानिक पातळीवरील समस्या, छळ किंवा वादांच्या तक्रारींसाठी विहिंपच्या राज्य शाखांनी स्वतंत्र व्हॉट्सअॅप आणि कॉल हेल्पलाईन सेवा सुरू केल्या आहेत.
याच धर्तीवर मुंबईतील सकल हिंदू समाजासाठी एखादी हेल्पलाईन सुरू करता येईल का याचा ’विश्व हिंदू परिषद’, ’बजरंग दल’ व ’दुर्गा वाहिनी’ यांसारख्या संघटनांनी विचार करण्याची आवश्यकता आहे...
सकल हिंदू समाजातील एकटेपणाची भावना ही सगळ्यात घातक गोष्ट आहे. या मुंबापुरीत आपण 80 टक्क्यांहून अधिक आहोत आणि समाजाच्या संघटित शक्तीचे बल अलौकिक असते. मग कसलं आलंय एकटेपण? ही भावना मुंबईकर हिंदू समाजात जागृत करावी लागेल. शिवाय अशा घटनांमध्ये शारीरिक संघर्ष झाला तर पीडित हिंदू समाजाला मानसिक व कायदेशीर आधार देण्यासाठी एखादी इकोसिस्टीम उभी करावी लागेल.
त्यासाठी घटनास्थळी तात्काळ धावून जाणार्या आणि पोलीस ठाण्यावर चांगला संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांची फौज व निष्णात वकील लागतील. तसेच अशी एखादी घटना घडत असताना आजूबाजूच्या हिंदू समाजाने केवळ बघ्याची भूमिका घेणे म्हणजे कसायाला गाय धार्जिणी असला आत्मघातकी प्रकार होईल. ...आणि एकदा का आपल्या पाठीशी सकल हिंदू समाजाची संघटित शक्ती उभी आहे याची जाणीव झाली की, मग असल्या हल्ल्यांचे भय ते कसले?...
या निमित्ताने मुंबईतील अवैध घुसखोरी करून वसलेले बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या यांची पाळेमुळे खणून काढता येतील; मात्र जनमताचा जबरदस्त रेटा असेल तरच सरकारला अशी मोहीम तातडीने हाती घेण्यासाठी भाग पाडू शकतो. कारण देशाच्या सुरक्षेला घुसखोर बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या हाच सगळ्यात मोठा धोका आहे. त्याच्या मुळावरच घाव घालावा लागेल. मात्र सकल हिंदू समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय यातील काहीच शक्य होणार नाही ...आणि तहान लागल्यावर विहीर खणण्यात काहीच अर्थ नाही...