‘विवेक पुस्तक प्रकाशन’ आणि ‘मुंबई बुक फेअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशांत पोळ यांच्या ‘इंडिया ते भारत : एक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठ, कलिना येथे गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2026ला झालेे. इंडियाकडून भारताकडे होणार्या परिवर्तनाच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. या पुस्तकातील काही भाग वाचकांसाठी देत आहोत. खर्या भारताची ओळख करून घेण्यासाठी
आजच आपली प्रत नोंदवा.
पुस्तकाची मूळ किंमत केवळ 300/- रु.
नोंदणीसाठी संपर्क : 7506732905 आणि स्थानिक प्रतिनिधी.
भारत असा नव्हता. प्राचीन भारत असा कधीच हीन-दीन-लाचार नव्हता. एकेकाळी भारत जगात सगळ्यात संपन्न देश होता. सर्वात शक्तिशाली होता. सर्वश्रेष्ठ होता. प्रोफेसर अंगस मेडिसन हे जगातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्राच्या इतिहासाच्या संदर्भात अनेक वर्षे संशोधनकार्य केले. अथक मेहनतीने आणि परिश्रमांनी जगाचा आर्थिक इतिहास लिहिला. त्यांचे ’द वर्ल्ड इकॉनॉमी : हिस्टोरिकल स्टॅटिस्टिक्स’ हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. या पुस्तकात त्यांनी आकडेवारीसहित जागतिक अर्थव्यवस्थेत आणि जागतिक व्यापारात, कोणत्या कालखंडात कोणते देश पुढे होते आणि कोणते देश मागे होते, याचे सविस्तर वर्णन केले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 33 टक्क्यांपेक्षा जास्त होता. म्हणजेच, पूर्ण जागतिक जीडीपीपैकी एक तृतीयांश जीडीपी भारताचा होता. पुढील हजार-दीड हजार वर्षं जागतिक अर्थव्यवस्थेत आणि व्यापारात आपले सर्वोच्च स्थान अबाधित होते; परंतु मुस्लीम आक्रमणकर्ते आल्यानंतर स्थिती बदलत गेली. आपलं अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्थान राहू शकलं नाही. आपला जागतिक व्यापार कमी झाला.
पुस्तक खरेदी करा..
अर्थात ही नंतरची गोष्ट...
प्रोफेसर अंगस मेडिसनने इसवी सनानंतरचे आकडे दिलेले आहेत; परंतु त्याच्याही आधी जागतिक संदर्भात आपले स्थान सर्वोच्च होते. इसवी सनपूर्वसुद्धा आपली जहाजं जगाच्या कानाकोपर्यात जात होती, व्यापार करत होती. भारतात तयार झालेल्या वस्तू निर्यात होत होत्या. निर्यातीच्या बदल्यात अपार धनसंपत्ती, सोने-चांदी भारतात येत होते. अनेक देशांमध्ये सर्वात पहिल्यांदा जाणारे भारतीय व्यापारी आणि नाविकच होते.
हे तुमचं-आमचं दुर्दैव, आपण शाळेत पाठ्यपुस्तकांमध्ये शिकलो की, भारताचा शोध सन 1498मध्ये वास्को-द-गामाने लावला. हजारो वर्षांपूर्वी, नौकानयनच्या क्षेत्रात आपण अत्यंत प्रगत होतो. त्या काळात अत्याधुनिक जहाजबांधणी आपल्या देशात होत होती. इथे जहाजनिर्मिती करून आपण दुसर्या देशांना जहाजाची विक्री करत होतो. आपल्या नाविकांचे समुद्राचे दिशा ज्ञान, समुद्राची समज खूपच चांगली होती. समुद्र प्रवासाची मूलभूत आवश्यकता असलेला ’मरिन कंपास’, आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी तयार केला होता. समुद्र प्रवासात दिशेची अचूकता आणि यथार्थता आवश्यक असते. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानात डशुींरपींसारख्या उपकरणांचा उपयोग केला जातो. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अशाच उपकरणाचा उपयोग केला होता. त्याला ’वृत्तशंख भाग’ म्हटले जायचे. काही संशोधकांनी या उपकरणाला ’प्राचीन जीपीएस’ असे म्हटले आहे. हे मच्छयंत्र आणि वृत्तशंख भाग, आजही संग्रहालयात बघण्यासाठी उपलब्ध आहेत.
भारतातून आयात होणार्या मालावर लावलेला कर हा रोमन साम्राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. भारतीय मालावर आकारलेल्या कराने रोमन साम्राज्याला, त्याच्या एकूण तिजोरीच्या, अर्थात रोमन साम्राज्याच्या एकूण कमाईच्या, एक तृतीयांश हिस्सा मिळत असे. एकट्या दक्षिण भारतात, दीड-दोन हजार वर्षं जुनी, रोमन साम्राज्याची 6000 पेक्षा जास्त नाणी मिळाली आहेत. गंमत म्हणजे, इटलीचा अपवाद वगळता जगात सर्वात जास्त प्राचीन रोमन नाणी भारतातच मिळाली आहेत. त्या काळातील अव्वल तंत्रज्ञान भारताजवळ होते आणि अशा तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण जगाच्या खूप पुढे होतो.
धातुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, आजसुद्धा जगाला जे रहस्य शोधून काढणे जमले नाही, असे शुद्ध आणि परिष्कृत धातू आपण तयार करत होतो. दिल्लीच्या महरोलीत, कुतुब मिनारच्या बाजूला जो लोहस्तंभ उभा आहे, तो या गोष्टीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. चौथ्या शतकात बनलेल्या या स्तंभात 98% लोखंड आहे. गेली किमान 1600 वर्षे हा स्तंभ खुल्या आकाशाखाली हवा, पाणी, धूळ सगळे सहन करत उभा आहे; परंतु या स्तंभाला आजपर्यंत कणभरसुद्धा गंज लागलेला नाही. आजच्या वैज्ञानिकांच्या दृष्टीने हे एक मोठे आश्चर्य आहे.
जसे धातुशास्त्र, तसेच रसायनशास्त्र! संपूर्ण जग पार्याला विषारी मानतं. गमतीची गोष्ट म्हणजे, विषारी समजला जाणारा हा पारा, इसवी सनाच्या अडीच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीय ऋषी आणि चिकित्सक, विविध क्षेत्रांत उपयोगात आणत होते. इसवी सनापूर्वी 500 वर्षे याचा उपयोग आयुर्वेदात केला जात होता. रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले पूर्वज अग्रेसर होते. हजारो वर्षांपूर्वी कणाद ऋषींनी अणू-परमाणूंची संकल्पना सर्वांसमोर स्पष्ट रूपाने ठेवली होती.
स्थापत्यशास्त्रात आपण खूप पुढे होतो. 5,000 वर्षांपेक्षाही प्राचीन अशा हडप्पा, मोहेंजोदारो, धोलावीरा, राखीगढीसारख्या जागी याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाले आहेत. तिथे वापरात आणलेल्या विटा, घरांची रचना, नगररचना हे सर्व आपल्या उन्नत तांत्रिक गोष्टींचे द्योतक आहेत.
हंपीमध्येच एक मंदिर आहे, वीरुपाक्ष मंदिर. आजपासून सहाशे वर्षांपूर्वी, पिन होल कॅमेराची कल्पना येथे प्रत्यक्ष साकार केलेली आहे. या मंदिरात एक खोली आहे, त्यात एक गवाक्ष (झरोका) आहे. या गवाक्षातून, 600 फूट दूर असलेल्या मंदिराच्या गोपुराची उलटी प्रतिकृती भिंतीवर दिसते. पिन होल कॅमेराच्या संकल्पनेतून निर्माण झालेले जगातील हे पहिले स्थापत्य! अशी अनेक मंदिरं, अनेक स्थानं, अनेक उदाहरणं! मुस्लीम आक्रमकांनी इथल्या मंदिरांना आणि महालांना नष्ट करूनसुद्धा जे काही थोडेफार शिल्लक उरले, ते आश्चर्यजनक आहे, अद्भुत आहे. स्थापत्यशास्त्रात आपण किती पुढारलेले होतो, याची ही उदाहरणं आहेत.
प्राचीन भारत सुजलाम् सुफलाम् होता; कारण भारताचे जलव्यवस्थापन अत्यंत उच्च दर्जाचे होते. जगातील सर्वात प्राचीन आणि आजही चालू स्थितीत असलेला बांध भारतात आहे. दुसर्या शतकात चोल राजा करीकलनने बांधलेला अनईकट्टू बांध तिरुचिरापल्लीजवळ आहे. गेल्या 1900 वर्षांपासून निरंतर याचा उपयोग केला जात आहे. गंमत म्हणजे हा अनईकट्टू बांध हा केवळ बांध नसून, तो जगातील सगळ्यात प्राचीन, सगळ्यात पहिला वॉटर सेपरेटर/रेग्युलेटरसुद्धा आहे. अर्थात फक्त कालव्यांच्या रूपात नाही, तर हा बांध कावेरी नदीच्या पाण्याची, त्या पूर्ण परीक्षेत्रात वाटणी करतो. याच व्यवस्थापनामुळे या क्षेत्रात आजपर्यंत कधीही दुष्काळ पडलेला नाही.
1900वर्षांपूर्वी भारताने जलव्यवस्थापनाचे असे अनुपम उदाहरण जगासमोर ठेवले होते आणि केवळ बांधच नव्हे, तर प्राचीन भारतात जवळपास प्रत्येक गावामध्ये तलाव, तळी, बावड्या, विहिरी मोठ्या प्रमाणात होत्या. नदी, तलावांचे पाणी तर उपयोगात आणले जातच असे; पण त्याचसोबत भूमिगत पाण्याचाही अत्यंत व्यवस्थित, जलस्रोताच्या रूपात उपयोग केला जात असे. गुजरातच्या पाटणमध्ये अकराव्या शतकात तयार केलेली रानी का वाव ही प्रचंड बावडी याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
आपल्याकडे परिपूर्ण चिकित्सा प्रणाली आयुर्वेदाच्या रूपाने अस्तित्वात होती, जी पूर्णपणे नैसर्गिक होती. आजही आयुर्वेद फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जगातील अनेक देशांनी आयुर्वेदाचा उपयोग करणे सुरू केले आहे. आपल्या शाळांमधून आजही शिकवलं जातं की, निकोलस कोपर्निकस (1473 ते 1543) नावाच्या पोलंडच्या खगोलशास्त्रज्ञाने जगाला सर्वप्रथम सांगितले की, सूर्य आपल्या अवकाशातला आणि ग्रह परिवाराचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूंनी फिरते.
कोपर्निकसच्या जवळपास अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी, पराशर ऋषींनी विष्णुपुराणाच्या आठव्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात स्पष्टपणे म्हटले आहे की, सूर्य सतत एकाच स्थानावर स्थिर आहे. सूर्योदय-सूर्यास्त हे सूर्याच्या येण्या-जाण्यामुळे होत नाहीत. पराशर ऋषींनंतरही अनेक ऋषीमुनींनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. आर्यभट्टाने पाचव्या शतकात याच सिद्धांताला अधिक सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. त्यांनी तर पृथ्वीचा व्यास, पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतरसुद्धा सांगितले आहे. ते इतके अचूक आहे, की त्यात आजच्या अत्याधुनिक पद्धतीने काढलेल्या अंतरापेक्षा, एक टक्क्यांपेक्षाही कमी फरक पडला आहे.
1676मध्ये डेन्मार्कच्या ओले रोमरने प्रकाशाच्या गतीचा शोध लावला असे आपण शाळेत शिकलो; परंतु विजयनगरच्या सायणाचार्यने ओले रोमरच्या तीनशे वर्षांआधी ऋग्वेदाच्या श्लोकांवर भाष्य करताना प्रकाशाच्या गतीचे अचूक आकलन केले आहे. खगोलशास्त्र ही तर भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आजपासून हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींना आकाशातील ग्रहतार्यांचे ज्ञान होते. वेली, प्लेफेअर, बेंटलेसारखे पाश्चिमात्य विद्वान आणि खगोलशास्त्रज्ञसुद्धा ही गोष्ट मान्य करतात. वेली आणि प्लेफेअर लिहितात की, ’हजारो वर्षांपूर्वी भारतातील लोकांना आकाशीय ग्रहतार्यांचे उत्तम ज्ञान होते. प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांना चिन्हित करण्याची पद्धती त्या काळी उपलब्ध होती.’
केवळ ज्ञान-विज्ञानाच्याच नव्हे, तर कलाक्षेत्रातसुद्धा आपण तेवढेच पुढारलेले होतो. जगातील पहिले नाट्यगृह (थिएटर) छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यात आढळून आले आहे. सीता बेंगारा गुफा आणि जोगीमार गुफा या गुहांमध्ये नाट्यविधी-संबंधित चित्रे भिंतींवर काढली आहेत. कार्बन डेटिंग पद्धतीने या गुहांमध्ये भिंतीवर लिहिले गेलेले हस्तलेख, 2600 वर्षं प्राचीन आहेत हे सिद्ध झाले आहे.
थोडक्यात सांगायचं तर, हजारो वर्षांपासून कला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. प्राचीन भारतात आपण विविध कलांमध्ये पारंगत होतो. कलेच्या माध्यमातून परिपूर्ण जीवनाचा आनंद घेत होतो.
आजपासून 2000 वर्षांपूर्वीपर्यंत आपण जगातील सर्वात समृद्ध, सर्वात श्रेष्ठ राष्ट्र होतो कारण आपली शिक्षणपद्धती अत्यंत सुव्यवस्थित आणि सर्वश्रेष्ठ होती. मोठ्या प्रमाणात स्त्रिया/मुली शिक्षण घेत होत्या. प्राथमिक शिक्षण घेणार्या स्त्रियांना ऋषिका आणि उच्चशिक्षित स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत असत. मुलींसाठी वसतिगृहे (होस्टेल) होती. या वसतिगृहांसाठी पाणिनीने छत्रीशाला शब्दाचा उपयोग केला आहे. तक्षशिलामध्ये एका वेळी दहा हजार पाचशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होती. जगातील वेगवेगळ्या भागांतून विद्यार्थी इथे शिकायला येत असत.
तक्षशीला जेव्हा बंद झाले, तेव्हा मगध (बिहार)मध्ये नालंदा विद्यापीठाची सुरुवात झाली. इसवी सन 1197मध्ये बख्तियार खिलजीने या विद्यापीठाला जाळून नष्ट करेपर्यंत हे विद्यापीठ जगातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून गणले जात होते. या विद्यापीठात दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिकण्याची व्यवस्था होती. या विद्यापीठाचे ग्रंथालय विशाल आणि समृद्ध होते.
भारत समृद्ध देश होता. संपन्न देश होता. म्हणून त्याच्यावर आक्रमणं होत राहिली; परंतु हिंदू सम्राटांच्या एकजुटीमुळे आणि संघटित शक्तीमुळे प्रत्येक आक्रमणाचे तेवढेच प्रखरतेने उत्तर दिले गेले. हा पूर्ण विजयाचा इतिहास आहे आणि म्हणूनच भारत त्या काळात जगातला सर्वात शक्तिशाली देश समजला जायचा. शक्तिशाली राष्ट्राचे इतर देश अनुकरण करत असतात. ही सामान्य प्रक्रिया आहे. हेच भारतासोबतही घडले.
सात-आठशे वर्षांपूर्वीपर्यंत इथली जनता हिंदुत्वाचे गुणगान करत होती. हिंदू जीवनपद्धतीचे पालन करत होती. त्या सर्व देशांमध्ये भव्य आणि कलात्मक मंदिरांची निर्मिती होत होती. यज्ञयाग होत होते. हिंदू देव-देवतांचे स्मरण केले जात होते. अंगकोर वाटसारखे जगातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ उभारले जात होते. गीता, वेद, उपनिषद आणि पुराणांच्या ऋचांमुळे आसमंत दणाणून जात होता. संपूर्ण जगाला शांतीचे संस्कार देणारी हिंदू आणि बौद्ध संस्कृती या सर्व देशांमध्ये लोकांना सुख, समाधान आणि शांतीने जीवन जगणे शिकवत होती. कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड... हे सारे देश हिंदू-बौद्ध संस्कृतीत रंगून गेले होते.
हे प्राचीन भारताचे वास्तविक चित्र आहे. ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य, सामाजिक जीवनात, सैन्यशक्तीत आपण जगात सर्वश्रेष्ठ होतो.
- प्रशांत पोळ