नुकताच केरला स्टोरी 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. लव्ह जिहादमध्ये अडकल्यानंतर हिंदू मुलींची काय अवस्था होते याचे वास्तवदर्शी चित्रण त्यात पाहायला मिळते. देशभरात लव्ह जिहादच्या घटनांचा विळखा वाढत आहे. लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने होणार्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने धर्मस्वातंत्र्य विधेयक, 2026 च्या मसुद्याला मान्यता दिली आहे. असा कायदा करावा लागलेले हे 13 वे राज्य आहे. आजही अनेक डाव्या विचारसरणीचे तसेच काही राजकारणी लव्ह जिहाद घडते असे मानत नाहीत. हा निव्वळ राजकीय अजेंडा असल्याचे म्हणतात. लव्ह जिहादचे भयानक वास्तव लेखक समीर दरेकर यांनी उदाहरणांसह ’पणतीला जपताना’ या पुस्तकात मांडले आहे. अलीकडेच या विषयावर समीर दरेकर यांची सा. विवेकच्या युट्यूब चॅनेलसाठी विस्तृत मुलाखत घेण्यात आली. त्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचे शब्दांकन.
संपर्क - पणतीला जपताना या पुस्तकासाठी संपर्क क्रमांक - 9226629866
सलमान मुलांची लव्ह जिहादमागची मानसिकता नेमकी काय असते आणि लव्ह जिहादच्या पद्धती नेमक्या काय आहेत?
लव्ह जिहाद हा एक ट्रॅप आहे. काहीजण लव्ह जिहादचा अर्थ खूप बाळबोध, वरवरचा लावतात. लव्ह जिहाद समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इस्लामची शिकवण, त्यांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. जिहाद हा शब्द जुहद या अरबी शब्दापासून आला आहे. जिहादचा अर्थ आहे अल्लाहच्या कार्यासाठी केलेला संघर्ष. अल्लाहचे काम काय तर संपूर्ण जगावर इस्लामची सत्ता आणणे. अल्लाहचे काम करणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. सत्ता आणायची असेल तर धर्मप्रसार करावा लागेल. धर्मप्रसार करण्याचे हिंसा, प्रबोधन, धर्माचे मार्केटिंग, आंतरधर्मीय विवाह असे अनेक मार्ग आहेत. यात बळी पडलेल्या मुलींचा वापर नंतर जिहादी कामासाठी केला जातो. हा एक भाग झाला पण फसव्या प्रेमातून तिच्याशी लग्न करून एका गैर मुस्लिम मुलीचे धर्मांतर करणे हासुद्धा एक जिहादच आहे. दर वेळी दहशतवादी कारवायांसाठी ती मुलगी वापरली गेलीच पाहिजे असे नाही.
दुसरा गैरसमज हा आहे की यात फक्त मुलींनाच फसवले जाते. असे नाही तर अनेक केसेसमध्ये मुलांना सुद्धा फसवले आहे. प्रणय पिल्लेचा जावेद झाला, जोसेफचा मोहम्मद यास्मिन झाला, लंडनमधल्या सिद्धार्थचा जिहादी सिद झाला जो आता सीरियामध्ये आतंकवादी संघटनेत सामील झाला आहे. एका हातात एके 47 आणि दुसर्या हातात बाळ असा फोटो त्याने सोशल मीडियावर टाकला होता. अजून एक समज म्हणजे कुठल्यातरी रॅकेट किंवा संघटनेचा सदस्य असलेल्या मुस्लिम मुलांना पैसे मिळतात, ते गाड्या फिरवतात आणि मुलींना फसवतात. आम्ही ज्या केसेस पाहिल्या त्यातली सगळीच मुस्लिम मुले कुठल्या संघटनेचे सदस्य नव्हती. अनेक तर सामान्य धर्मपरायण मुसलमान होते. इस्लामचा अभ्यास नसल्याने आपण असा अर्थ काढतो की लव्ह जिहाद हा संस्था किंवा संघटनांमधूनच होतो. तसेच लव्ह जिहाद घडवण्यासाठी तो एखाद्या संघटनेचा किंवा रॅकेटचा भाग पाहिजे असे काही नाही. सर्वसामान्य मुसलमानाला लहानपणापासून गैर मुस्लिमांशी कसे वागायचे, काफ़िरांशी कसे वागायचे, आपला धर्मप्रसार कसा करायचा, काफिर कसे मारण्याजोगे आणि धर्मांतर करण्याजोगे आहेत हे त्यांच्या कुराणात लिहिले आहे (हे दरेकर यांच्या पुस्तकात विस्ताराने दिले आहे). हीच शिकवण मिळत असल्याने त्यांना वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसते. लहानपणापासून त्यांची मानसिकता अशीच तयार होत जाते. त्यामुळे लव्ह जिहाद हा त्यांच्यासाठी गुन्हा नाही तर अल्लाहसाठीचे काम आहे. आजकाल अनेक संघटना किंवा रॅकेट असल्याने काही मुले त्यात सामील होतात.
केरळच्या लता नायर केसचे उदाहरण पुस्तकात आहे. लता नायरने केरळ उच्च न्यायालयात अपील केले तेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी. शंकरन यांनी केरळ, कर्नाटक पोलीस आणि सीबीआयला तपासाचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी 18 अहवाल सादर केले. त्यात कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, इंडिया फ्रॅटर्निटी फोरम, शाहीन फोर्स, सत्यसारिणी सभा अशा संघटनांची नावे पुढे आली. स्कॉलरशिप, धार्मिक कार्यक्रम, दावतच्या नावाखाली या संस्थांना पैसे येतात. या पैशाचा वापर लव्ह जिहाद, धर्मांतर यासाठी केला जातो.
केरळची मरियम नावाची ख्रिश्चन मुलगी मुंबईत आली. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या संपर्कात आली. तिला सांगण्यात आले की तुझा धर्म तुला मुक्ती देणार नाही, मुक्ती देणारा धर्म इस्लाम आहे, मुक्ती देणारा देव अल्लाह आहे. कुराणच्या अभ्यासवर्गात ती दोन महिने सामील झाली. दोन महिन्यात तिचा पूर्ण धार्मिक ब्रेनवॉश करण्यात आला. या संस्था ऑनलाईन, ऑफलाईन सिस्टीम पद्धतीने कार्यरत आहेत. झाकीर नाईकसारखे लोकं भाषणे देतात. युट्युबवर त्यांची चॅनेल आहेत, त्या माध्यमातून ते धर्मप्रसार करतात. तुमच्या घर, गल्ली, कॉलेज ते अगदी ऑफिसपासून सुरुवात करा, पण धर्मांतराची एकही संधी सोडू नका अशा आशयाची त्यांची युट्युबवर भाषणे आहेत.
जिहाद जो करेल त्याला वरचा दर्जा मिळेल असे कुराणात लिहिले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद ही मुसलमानांची धार्मिक प्रेरणा आहे.
अनेक राजकारणी आणि डाव्या विचारसरणीचे लव्ह जिहादला मानत नाहीत. याकडे केवळ आंतरधर्मीय लग्न म्हणून का पाहत नाही असा प्रश्न विचारतात. त्याविषयी काय म्हणाल?
आंतरधर्मीय दृष्टीकोनातून तुम्ही पाहणे याला मुसलमानांच्या दृष्टीने काही किंमत नाही, तुमचा दृष्टीकोन इथे महत्त्वाचा नाही. त्यांचा दृष्टीकोन काय आहे याला महत्त्व आहे. दहशतवादी हल्ला झाल्यावर अजमल कसाब म्हणाला होता, मी हल्ला माझ्या धर्मासाठी केला, जिहाद म्हणून केला. मला जन्नत मिळणार आहे, हे त्याचे स्टेटमेंट होते. पण ज्यांनी मेणबत्त्या लावल्या ते म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो. म्हणून तुमच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. ज्याने तो केला त्याच्या म्हणण्याला अर्थ आहे. लव्ह जिहादमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी ठरवू नये हे प्रेम आहे की जिहाद. ती मुसलमान व्यक्ती आणि लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदू मुलीला विचारा. उलट हिंदुंची मानसिकता अशी आहे की प्रेमाच्या मध्ये धर्म आणू नका. मुस्लिमांची संकुचित वृत्ती आहे. आंतरधर्मीय लग्नासाठी भारतीय राज्यघटनेने स्पेशल मॅरेज अॅक्टच्या माध्यमातून सोय करून ठेवली आहे. या कायद्यानुसार कोणीही धर्म बदलायचा नाही, एकमेकांच्या धर्माचा आदर करून लग्न करायचे. पण मुसलमानांना चालत नाही. कारण कुराणानुसार गैर इस्लामिक व्यक्ती जोपर्यंत धर्म बदलत नाही तोपर्यंत ते लग्न मान्य करत नाहीत. धर्मांतराची अट कुराणातच आहे.
केरला स्टोरी 2 चित्रपटात एक वाक्य आहे-मुसलमान कधीच नास्तिक किंवा सेक्युलर नसतात. हे वाक्य आपण डोक्यात पक्के कोरून ठेवले पाहिजे. हिंदू धर्मात आस्तिक, नास्तिक, सेक्युलर लोकं आहेत. मुसलमान अल्लाहला न मानता मुसलमान राहूच शकत नाही. अल्लाहवर श्रद्धा ठेवणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे असतो. त्यामुळे सेक्युलरवादाचे भूत आपल्या डोक्यात आहे इस्लाममध्ये नाही.
लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडत असतानाही हिंदू मुली त्याला बळी पडतात. त्यामुळे आपल्याकडे एक ओरड कायम असते, हिंदू म्हणून आपण आपले संस्कार, संस्कृती शिकवण्यात कमी पडतो. खरंच आपण कुठे कमी पडतो?
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदू संस्कार देण्यात कमी पडतात का, तर याचे उत्तर हो असे आहे. एकदा मी छत्रपती संभाजीनगरला व्याख्यान द्यायला गेलो होतो. तिथे माझ्या आधीचे जे वक्ते होते त्यांनी संस्कारांचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की आपल्या मुलींचे संस्कार कमी पडतात. तेव्हा प्रेक्षकातून एक पालक पुढे आले आणि म्हणाले तुम्ही म्हणता, संस्कार कमी पडतात पण माझी मुलगी नवरात्रात नऊ दिवस उपवास करायची. तरीसुद्धा पळून गेली. सांगायचा मुद्दा हा की आस्तिक, देवदेव करणारी, उपवास करणारी मुलगीही लव्ह जिहादमध्ये अडकते. त्याचे पहिले कारण म्हणजे आपला धर्म काय आहे हे सांगणे हा 50 टक्के संस्कार झाला. पण शत्रूचा धर्म काय आहे, ते सांगण्याचा 50 टक्के संस्कार आपण करतच नाही. म्हणूनच पूजा पाठ करणार्या, जय श्रीराम म्हणणार्या मुली पळून गेलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. कारण शत्रूचा धर्म सांगणारा संस्कार आपण करत नाही.
तसंच संस्कार हा शब्दही वापरून गुळगुळीत झाला आहे. आपल्याकडे संस्करांचा अर्थ काय घेतला जातो तर पाया पडणे, कुंकू लावणे, देवपूजा करणे किंवा कपड्यांवरून संस्काराचा अंदाज बांधणे. इथपर्यंत संस्कार मर्यादित नाहीत. आपण व्यापक अर्थाने हिंदू मुलामुलींना संस्कारित केले पाहिजे. धर्माचा अभ्यास करताना मूलभूत गोष्टी सांगितल्या पाहिजे. मूर्तिपूजा का करतात? नैवेद्य का दाखवतात? सगुण निर्गुण रूप म्हणजे काय? धर्मातील प्रथा परंपरांमागे काय शास्त्र आहे हे समजावणे गरजेचे आहे. आपली मुले तेजस्वी झाली पाहिजेत, आपला धर्म काय स्वातंत्र्य देतो, आज मी जे काही आहे ते माझ्या धर्मामुळे, इतिहासात अनेकांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानामुळे याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. हिंदू म्हणून जगत आहे हा अभिमानाचा संस्कार आज बाकी आहे. हिंदू धर्मातील कर्मकांडाचा संस्कार वेगळा आणि हिंदुत्वाचा संस्कार वेगळा. हिंदुत्वाचा संस्कार होणे ही काळाची गरज आहे. पूजा पाठ, होम हवन करण्याला फक्त संस्कार म्हणू नका. आपला इतिहास, धर्मासाठी कोणी बलिदान दिले, इस्लामिक राज्यकर्त्यांनी आपली मंदिरे कशी पाडली, हिंदू महिलांवर कसे अत्याचार केले याचा संस्कारही झाला पाहिजे.
दुसरी गोष्ट वर्तमानात आपला धर्म आपल्याला काय देतोय याची जाणीव. एक मुस्लिम मुलगी मला एकदा म्हणाली की नवरात्रात रात्री आम्ही दांडिया गरबा खेळतोय असा विचारच आम्ही करू शकत नाही. या गोष्टी त्यांना किती मोठ्या वाटतात. इराणमध्ये महिलांना ड्रायव्हिंग, मतदानाच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत आहे. या तुलनेत हिंदू महिलांचा विचार केला तर आपण किती प्रगतीपथावर आहोत, आपल्याला किती स्वातंत्र्य आहे हा संस्कार होणे गरजेचे आहे. हिंदू म्हणून जगताना हे स्वातंत्र्य आहे! मुसलमान होणे म्हणजे स्वातंत्र्य गमावणे याची जाणीव प्रत्येक हिंदू मुलीला करून दिली पाहिजे.
‘पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पान क्र. 226 वर असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे की,‘मुसलमान स्त्री ही जगातला सगळ्यात केविलवाणा प्राणी आहे.’ हे लिहिण्यामागे वर उल्लेख केलेली कारणमीमांसा आहे. त्यामुळे संस्कार देताना धर्मग्रंथांसोबत इतिहास आणि शत्रूच्या धर्माबद्दल माहिती दिली पाहिजे.
सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...