@डॉ. विवेक राजे
9881242224
कॉर्पोरेट क्षेत्रात काही ठिकाणी नियोजित पद्धतीने धर्मांतरण घडवून आणले जात असल्याच्या चर्चा पुढे येत आहेत. नाशिकमधील आय.टी. कंपनीत उघडकीस आलेले प्रकरण हे याचाच भाग असून ते हिमनगाचे टोक असल्याचे सूचित करते; त्यामुळे या मुद्द्याकडे केवळ वैयक्तिक किंवा मर्यादित दृष्टीने न पाहता व्यापक पातळीवर विचार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कर्मचार्यांनी जागरूक राहून परस्परांना आधार देत सावधपणे वागणे हीच आजची खरी गरज बनली आहे.

नव्वदच्या दशकात सगळ्या जगाने डीप स्टेट प्रणित जागतिकीकरणाच्या संकल्पनेचा अंगीकार केला. भारतातील उद्योग क्षेत्रानेदेखील त्याचा स्वीकार केला आणि स्वतःला जागतिक वातावरणाशी अनुरूप करण्यासाठी अनेक बदल केले. भारतीय उद्योग क्षेत्रातील सगळे वातावरण अवघ्या दहा-बारा वर्षांत बदलले आहे. भारतातील आय.टी. या नव्या उद्योग क्षेत्राने स्थापीत होतानाच जागतिक पातळीवर आघाडी देखील घेतली. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याच्या उद्देशाने मग व्यवस्थापन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले गेले. संघटनात्मक बदलांबरोबरच प्रत्येक कर्मचार्याला निश्चित अशी टार्गेट्स, लवचिक कामाचे तास, रात्रपाळी, आधुनिक तंत्रज्ञान, प्रसिद्धीचे नवे तंत्र या सगळ्या गोष्टी उद्योगांमध्ये आवश्यक झाल्या. मग प्रत्येकच क्षेत्रात वाढता पगार आणि त्यासाठी वाढती कार्यक्षमता असे एक दुष्टचक्र सुरू झाले. मग वाढती स्पर्धा, वाढते टार्गेटस, वाढते कामाचे तास, व त्यामागोमाग येणारी नोकरीची असुरक्षितता, हा उद्योग क्षेत्राचा स्थायीभाव झाला. या सगळ्या गोष्टींना अमेरिकन जीवन शैली आणि तेथे सुस्थापित झालेला वोकिझम, यांच्या आधारे एक विशिष्ट आकार दिला गेला. हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशात आता हिंदू सणांना असणार्या सुट्ट्यांमध्ये कपात झाली. अनेक ठिकाणी हिंदू सणांच्या दिवशी काम केल्यास भरीव प्रोत्साहन भत्ता देण्यात येऊ लागला. एकूणच हिंदू देशात हिंदू सण, हिंदू चालीरिती, ड्रेस कोडच्या नावाखाली हिंदू पेहराव यांचे महत्त्व संपविण्यात आले. हे वातावरण सतत विस्तार साधणार्या भारतातील इस्लामिक कारस्थानांसाठी अत्यंत सुयोग्य असेच होते.
धुंद : प्रेम की गुलामी?
लव्ह जिहादच्या सापळ्यात सापडूनही सुखरूप बाहेर येणाऱ्या रणरागिनीची ही कहाणी.
प्रत्येक भारतीयाच्या घरात असलीच पाहिजे अशी कादंबरी.
आजच नोंदणी करा…
https://www.vivekprakashan.in/product/slavery-of-love/
टाकले जाणारे जाळे
हळूहळू शिक्षीत मुस्लीम वर्गातील लोक काही ठरावीक आणि विशेषत्वाने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर दिसू लागले. अर्थातच नोकर भरतीतदेखील त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले. मग कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने या क्षेत्रात मुसलमानांचा टक्का वाढवला जाऊ लागला. अर्थातच मुस्लीम कर्मचार्यांना बढती आणि पगारवाढ देताना झुकते माप दिले जाऊ लागले. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करताना हे अधिकारी पक्षपाती होताना दिसू लागले. नेहमीच गाफील असलेल्या काफिरांच्या प्रत्येक व्यवस्थेत, इस्लामचे अनुयायी शिरकाव करून घेतात. हळूहळू आपली संख्या त्या व्यवस्थांमध्ये वाढवतात. त्यांचे एक अनौपचारिक संघटन निर्माण करतात. मग ते टोळके इतर कर्मचार्यांना दमदाटी करू लागते. धर्म, प्रथा, परंपरा या वरून इतर धर्मियांना टोमणे मारले जाऊ लागतात. हिंदू आपल्याच धर्माची पुरेशी माहिती नसल्याने, पुरेसा धर्माभिमान अंगी बाणवला नसल्याने, तसेच नोकरी आणि जिवाच्या भीतीने गप्प बसतात. आणि मग त्या व्यवस्थेमधील काफिरांना किंवा इतर धर्मियांना दोनच पर्याय उरतात, एक तर धर्मांतरीत होणे किंवा ती व्यवस्था सोडून निघून जाणे. काहीही घडले तरी फायदा इस्लामचाच होतो.
दुसरीकडे एखाद्या स्त्री किंवा पुरूष कर्मचार्यांशी मुस्लीम कर्मचारी विशेष आदराची आणि ममत्वाची वागणूक देऊ लागतात. त्या कर्मचार्याच्या मनात मुस्लीम कौम, मुस्लीम रितीरिवाज आणि धार्मिक तत्त्वज्ञान कसे आणि किती श्रेष्ठ आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यातच स्त्री मनाला जात्याच पडणारी भेटवस्तूंची भुरळ आणि आदर मिश्रित कौतुकाची ओढ लक्षात घेऊन, काहीशा अस्थिर मन व कमजोर कौटुंबिक स्थिती असलेल्या महिला कर्मचार्यांना हेरले जाते. शहरांच्या झालेल्या विस्ताराने आणि नोकरीच्या वाढलेल्या जबाबदार्या व मागणी यांच्याआड मग काही जणींना विरंगुळा म्हणून व्यसनाला लावले जाते. यातून शरीरसंबंध बनवण्याचा मार्ग प्रशस्त केला जातो. एका पेक्षा जास्त पुरूषांशी शरीरसंबंध राखण्यास बाध्य केले जाते. मग धर्म परिवर्तन तसेच मुस्लीम माणसाशी निकाह यासाठी दबाव टाकला जातो. न ऐकल्यास मग धमकी दिली जाते, ब्लॅकमेल केले जाते. अनेकदा यासाठी शाळेतील किंवा महाविद्यालयात असताना ओळख झालेली किंवा मैत्री असलेल्या मुली हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात येते. कारण या मुलींची कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक स्थिती ही माहितीची असल्याने फसवणुकीच्या जाळ्यात ओढणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे असते. ही कार्पोरेट जिहादसाठी वापरली जाणारी पद्धती होय. हे सगळे, अनेक उद्योग संघटनांच्या शक्य त्या विभागांमध्ये जबाबदार व संभावितपणाच्या पडद्याआड घडत असते. थोड्याशा त्रयस्थ निरीक्षणातून अनुभवी हिंदू कर्मचार्यांना हे सहज लक्षात येऊ शकते. पण ’जॉब सिक्युरिटीच्या’ भीतीपोटी याचा उल्लेख अगदी मित्रमंडळीतदेखील करण्यास हिंदू कर्मचारी धजावत नाही. तसेच अपमान होण्याच्या शक्यतेच्या भीतीने याला अटकाव करण्यास हिंदू कर्मचारी पुढाकार देखील घेत नाहीत. इंग्लंडमध्ये घडलेल्या ’ग्रुमिंग गँग्ज’ प्रकरणांमध्येदेखील याच्याशी मिळती जुळती कार्य पद्धती वापरात होती, हे इथे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
अनावश्यक सहिष्णुता
नाशिकमध्ये एका आय.टी. कंपनीत घडलेल्या प्रकारात हीच कार्य पद्धती वापरली गेली आहे, हे सहजपणे लक्षात येते. नाशिकमध्ये उघडकीस आलेले प्रकरण हे हिमनगाचे टोक आहे हे वेगळे सांगायला नको. याला फक्त धर्मांतराचे किंवा लव्ह जिहादचे एक कारस्थान एवढ्या मर्यादित दृष्टीने बघता कामा नये. या प्रकरणात फॉरीन फंडींग, मनी लाँन्ड्रीगचे धागेदोरेदेखील बाहेर येऊ शकतात. एखाद्या वेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा गोष्टीदेखील याच प्रकरणी बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे प्रकार अत्यंत संघटीतपणे मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई येथे याहूनही मोठ्या प्रमाणात चालले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या प्रकरणाचा एका उद्योग क्षेत्राच्या एका कंपनीत घडलेला प्रकार म्हणून विचार करणे चुकीचे ठरणारे असेल. कारण संपूर्ण उद्योग जगात आज हे असेच चाललेले आढळते. अगदी नामांकित कंपन्यांमध्ये मुस्लीम धर्माचे लोक शुक्रवारी त्यांच्या पारंपरिक पोशाखात कामावर येतात तेव्हा ड्रेस कोडची सक्ती केली जात नाही, हे सर्वश्रुत आहे. हीच प्रथा बहुतेक कॉल सेंटर्समध्येही चालू आहे. शुक्रवारच्या नमाजासाठी मुस्लीम कर्मचारी एक तासाचा ब्रेक घेतात. मुस्लीम स्त्रियांसाठी कंपनीतच एखादा स्वतंत्र हॉल नमाज पढण्यासाठी म्हणून दिला जातो. काही ठिकाणी मुस्लिम कर्मचार्यांना नमाजासाठी ने-आण करण्यासाठी मुद्दाम वेगळी बस सेवादेखील ठेवली गेल्याचे कळते. एक प्रकारे मुस्लीम धर्मप्रसारासाठी उपयुक्त असे वातावरण, धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत, म्हणून केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे किंवा उदारतेच्या पडद्याआड असलेल्या नेभळट वृत्तीमुळे तयार होते.
हिंदू अनभिज्ञता आणि कचखाऊ वृत्ती
आय.टी. कंपन्यांमध्ये आज भारतभर कर्मचारी संघटना बाधता येत नाहीत. त्यात दमछाक करणारी टार्गेट्स, आणि कोणत्याही प्रकारचे नसलेले संरक्षण यामुळे येथील प्रत्येकच माणसाला कुणीतरी विश्वासाचा, आपल्याला समजून घेणारा, धीर देणारा सहकारी हवा असतो. त्यातही स्त्री मनाची चंचलता असुरक्षितता आणि आपण उपेक्षित / दुर्लक्षित असल्याची सततची भावना, यामुळे कामाच्या जागेवर अशा सहकार्याची त्यांची गरज आधिकच टोकदार असते. मग अशी गरज भागविणारा सहकारी, जे सांगेल त्यावर विश्वास ठेवला जातो. तो म्हणेल तसे वागण्याचा, तसे राहाण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक जणी त्याच्या शब्दाखातर नमाज पढतात, रोजे ठेवू लागतात. फॅशनच्या नावाखाली किंवा तुला छान दिसतो म्हणून, हिजाब घालू लागतात. काही ठिकाणी काही जणी गोमांसदेखील भक्षण करतात. ज्या महिला कर्मचार्यांची या गोष्टी करण्याची तयारी असते किंवा ज्या या गोष्टींना फशी पडतात, त्यांच्या कुटुंबातील कौटुंबिक बंध आणि कौटुंबिक संवाद क्षीणच असतो अथवा होत जातो. पण त्याच वेळी प्रत्येक कर्मचार्याच्या मनात एकटेपणाची आणि असुरक्षिततेची भावना मात्र तशीच ठाण मांडून बसलेली असते. चटकदार उधळी जीवनशैली, आणि खोटा डामडौल कायम ठेवण्याचे आव्हान कुटुंब आणि नातेवाईकांच्या प्रति कर्मचार्यांना बेपर्वा करते. अशा सगळ्या बाजूंनी एकट्या पडलेल्या स्त्री-पुरूषांचे सर्व प्रकारचे शोषण आणि धर्मांतरण मग सहजपणे घडवून आणता येते. आमचा समाज अधिक संघटित आहे. आमच्याबरोबर आमचे होऊन राहिलात तर आम्ही आणि आमचा समाज तुम्हाला संरक्षण देईल हे अशा व्यक्तीच्या मनात ठसवले जाते. एकदा हे ठसवले गेले की बाकीचे सगळेच सोपे असते.
कृतिशील हिंदूत्व
एखादा उद्योग समूह बदनाम करणे, एखादे उद्योग क्षेत्र बंद करा म्हणून आंदोलन करणे, किंवा पोलिसांवर सर्व जबाबदारी टाकून बाजूला होणे, हे या प्रश्नावरील उत्तर नक्कीच नाही. आजही तथाकथित पुरोगामी विचारांचे लोक व हिंदू समाजाचा एक मोठा समूह या व्यापक षड्यंत्राबाबत अनभिज्ञ आहे. अनेक लोक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पण संवेदनशील आणि जागृत हिंदू कर्मचार्यांनी या दृष्टीने सावध होत असल्या कारस्थानांवर उपाययोजना करण्याची हीच वेळ आहे. आय.टी. इंडस्ट्रीमधील जागृत आणि जबाबदार कर्मचार्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये हिंदूचे छोटे छोटे अनौपचारिक गट स्थापन करणे आवश्यक आहे. या गटांना कर्मचारी संघटनेचे स्वरूप येणार नाही याची काळजी घेत दोन महत्त्वाची कामं आपल्या औपचारिक जबाबदार्या पार पाडताना या गटांनी अंगीकारायला हवी. एक, या गटांनी आपल्या कंपनीतील स्त्री पुरुष कर्मचार्यांना आपण एकटे नाही हा विश्वास दिला पाहिजे. अनौपचारिक रीतीने या कर्मचार्यांना मानसिक आधार दिला पाहिजे. आपल्या धर्माची, धर्म ग्रंथांची , प्रथा परंपराची माहिती आणि वैज्ञानिकता हिंदू कर्मचार्यांना सांगितली पाहिजे. (कारण अनेक हिंदू कुटुंबाना हिंदू धर्माविषयी माहितीच नाही.) वेळ प्रसंगी धर्माभिमान आणि आत्मसन्मान यासाठी आक्रमक व्हायला शिकवले पाहिजे. कुणी जर असा आक्रमक झाला तर अशा कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. दुसरे म्हणजे आपल्या कंपनीत धर्मांतरणाच्या तसेच लव्ह जिहादच्या घटना घडू नयेत म्हणून दक्षतेने कार्यस्थळी लक्ष ठेवले पाहिजे. तसेच ड्रेस कोड व त्यातून मिळणार्या विकल्पांचा अभ्यास करून कंपनीच्या मानव संसाधन विभागाशी (HR) सतत संपर्क ठेवत बहुसंख्य असलेल्या हिंदू कर्मचार्यांच्या प्रथा परंपरांना उचित महत्त्व मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. येणार्या काळात, ’मी फक्त माझ्या पुरते पाहीन’, असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही हे लक्षात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून मुस्लीम कारस्थानांना पायबंद घालावा लागेल. आजच्या हिंदू सामाजिक व कौटुंबिक वातावरणात, तरूण पिढी त्यांच्या भोवताली असलेल्या अनेक आयामांविषयी उदासीन आणि अजाण असल्याने, आपल्या सामाजिक व सांस्कृतिक सुरक्षिततेसाठी, कामाच्या ठिकाणी अनौपचारिक गट तयार करणे हाच परिणामकारक उपाय ठरेल. कंपनीच्या ’स्टॅण्डींग ऑर्डर्स’, किंवा ’कोड ऑफ कंडक्ट’ म्हणजे ब्रह्म वाक्य नाही हे आपल्या उपस्थितीने दाखवून देण्याची हीच वेळ आहे.