हिंदू संस्कारांचे वेगळेपण

विवेक मराठी    16-May-2026   
Total Views |
 
hindu
हिंदू संस्कार म्हणजे केवळ कर्मकांड नसून ती गर्भाधानापासून अंत्यविधीपर्यंत मानवी जीवन उन्नत करणारी एक सुसंगत जीवनप्रक्रिया आहे. इतर धर्मांतील विधींच्या तुलनेत हिंदू संस्कारांचे वेगळेपण नेमके कशात आहे आणि ते व्यक्तीची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक घडण कशी करतात, याचा सखोल आढावा या लेखात घेतला आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार्‍या या संस्कारमालेचे सार हा लेख मांडतो.
संस्कारमाला या लेखमालेत आपण आतापर्यंत हिंदू धर्मातील आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातील संस्कार पाहिले.
* जन्मपूर्व संस्कार

* बालपणातील संस्कार

* शैक्षणिक संस्कार

* विवाह आणि विवाहानंतरचे संस्कार
 
* वृद्धपणातील संस्कार

* मृत्यूनंतरचे संस्कार

आता इतर धर्मातील संस्कारसदृश जे विधी आहेत त्यावर एक नजर टाकू. मुख्यत्वे ख्रिश्चन आणि इस्लाम रिलीजन मधील संस्कार पाहू.
 
ख्रिश्चन धर्मात सात सॅक्रामेन्ट ( sacrament) सांगितल्या आहेत. सॅक्रामेन्ट म्हणजे काही धार्मिक विधी आहेत. हे आपल्या व्याख्येनुसार ‘संस्कार’ नव्हेत. पण संस्कारांच्या जवळ जाणारे हे विधी आहेत.
1.बाप्तिस्मा (Baptism) - चर्चमध्ये अधिकृत प्रवेश देणारा संस्कार.
2.युकरिस्ट / मास (Eucharist / Mass) - जमलेल्या सश्रद्ध लोकांना ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचे प्रतीक म्हणून लीशरव आणि ुळपश देण्याचा विधी.
 
3.कन्फर्मेशन (Confirmation) - बाप्तिस्माच्या वेळी घेतलेल्या वचनांची पुन्हा उजळणी करणे, दृढ करणे.
4.पेनन्स (Penance) - केलेल्या पापांची कबुली देणे
5.अनॉइंटिंग ऑफ द सिक (Anointing the Sick) - मृत्यूशय्येवरील व्यक्तीला पाद्रीकडून दिला जाणारा धार्मिक संस्कार.
 
6.Marriage(विवाह)
 
7.होली ऑर्डर्स (Holy Orders) -पाद्रीपदाची (priesthood) दीक्षा किंवा नियुक्ती.

यामध्ये एक विवाह वगळता सगळे धार्मिक विधी आहेत. कॅथलिक ख्रिश्चन धर्मात divorce ची सोय नव्हती. त्यामुळे केवळ विवाह हा संस्कार आहे, divorce नाही. इतर सर्व sacramentsधार्मिक आहेत. त्यांचा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्याशी, वयाशी, कर्तव्याशी, चारित्र्याशी-संबंध नाही.
 
इस्लाम धर्मात संस्कार/सॅक्रामेन्ट म्हणून कुठले विधी येत नाहीत. काही जणांच्या मते इस्लामचे जे पाच स्तंभ आहेत.
* शहादत (इस्लाम कबूल करणे)
 
* सलात (प्रार्थना)

* जकात (गरीब मुसलमानांसाठी दान करणे)

* रोजा (उपास करणे) आणि

* हाज (हाज यात्रा करणे)

हे पाच संस्कार आहेत. तर काहींच्या मते खालील विधी संस्कार /sacrament म्हणून विचार करू शकतो.
1.अकीका (Aqiqah) - मुलाच्या जन्मानंतर प्राण्याचे बळी देण्याची प्रथा.
2.खितान (Khitan) - मुलांचे सुंता (circumcision) करण्याची प्रथा.
 
3.खतना (Khatna) - स्त्रियांच्या जननेंद्रियांवरील छेदन (काही इस्लामी पंथांमध्ये आढळणारी प्रथा).
4.निकाह (Nikah) - मियाँ आणि बिबी यांच्यातील वैवाहिक करार. या करारात मियाँने बिबीला तलाक दिल्यास तो तिला ‘मेहेर’ म्हणून किती रक्कम देईल ते लिहितो. बिबीला जर ती रक्कम मंजूर असेल तर ती ‘कबूल’ म्हणते. तीनदा कबूल म्हटले की निकाह झाला. दोघांनी समोरासमोर असले पाहिजे अशी गरज नसते. बिबी कुठेतरी आत असली तर तिच्याकडून केवळ सही आणली जाते.
 
 
अ. निकाहाचे इतरही प्रकार आहेत. जसे ठरावीक काळाकरिता, अगदी तीन दिवसांसाठी सुद्धा, केला जाणारा निकाह.
 
ब. तलाक (Talaq)ं -घटस्फोट. पतीने निकाहमध्ये ठरलेली ‘मेहर’ची रक्कम दिली तर त्याला ‘मेहेरबान’ म्हटले जाते.
 
 
क. हलाला (Halala)- तलाक दिलेल्या बिबीशी पुन्हा निकाह करायचा असल्यास-तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह करून,त्याच्याकडून तलाक घ्यावा आणि इद्दत काळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा पूर्व पतीशी निकाह करण्याची प्रक्रिया.
 
 
5. जनाझा (Burial Rituals) - दफन विधी
 
ह्या दोन्ही धर्मातील ‘संस्कार’ पाहून आपल्या संस्कारांचे वेगळेपण लक्षात येते.
 
 
हिंदू संस्कार हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी निगडित असून गर्भाधानापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत चालणारी एक सुसंगत जीवनप्रक्रिया आहे. हिंदू संस्कार व्यक्तीची शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक घडण करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा विकास साधतात. व्यक्तीच्या विकासाचा इतका विचार इतर धर्मात दिसत नाही.
 
 
योग्य प्रकारे, अर्थ समजून संस्कार केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत, जसे -
 
* प्रत्येक संस्काराच्या वेळी कुटुंबातील सर्वांचे लक्ष त्या मुलावर केंद्रित होते. त्यामुळे ज्येष्ठांना मुलाच्या विकासावर लक्ष ठेवणे शक्य होते.
 
 
* संस्कार समारंभात मूल केंद्रस्थानी असल्याने त्याच्यामध्ये / तिच्यामध्ये आपण कुटुंबासाठी महत्त्वाचे आहोत ही भावना निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो.
 
 
* प्रत्येक संस्कारात कुटुंबातील सर्वांचा सहभाग असल्यामुळे परस्परांमधील प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे बंध अधिक दृढ होतात.
 
 
* संस्कार जीवनातील नव्या टप्प्याची सुरुवात दर्शवतात. पुढील टप्प्यासाठी ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळते.
 
 
* संस्कार व्यक्तीला पुढील टप्प्यात अधिक जबाबदार्‍या स्वीकारण्यासाठी तयार करतात.
 
 
* संस्कार जीवनाच्या पुढील प्रवासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वृत्ती निर्माण करतात.
 
 
* संस्कार जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास देतात.
 
 
* संस्कार शरीर आणि मनाला ऊर्जा देतात. ते शारीरिक ताकद आणि दीर्घकाळ कार्य करण्याची क्षमता वाढवतात.
 
* संस्कार एकाग्रता वाढवतात आणि बुद्धीची क्षमता वाढवतात.
 
* आपलेपणाची भावना, संस्कृतीची जाणीव आणि सुसंस्कृत विचारसरणी निर्माण करतात.
 
* संस्कार चांगले चारित्र्य घडवण्यास मदत करतात.
 
* संस्कार मनुष्याला आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करतात.
 
* संस्कार शारीरिक आणि आध्यात्मिक प्रवासाला दिशा देतात.दोष आणि विकार दूर करून अंतःशुद्धी साधतात.
 
* संस्कार व्यक्तीला समाजात एकोप्याने, सहयोगाने, सहकार्याने राहायला शिकवतात.
असे अनेक फायदे देणारे संस्कार जतन केले पाहिजेत आणि नवीन पिढीवर समजून उमजून हे संस्कार रूजविलेे पाहिजेत.

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com