खाडकन् डोळे उघडणारा ग्रंथ

विवेक मराठी    11-Jun-2026
Total Views |
@सुनीला सोवनी
 
 
book
ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माची सखोल आणि तौलनिक मांडणी करणारा An illustrated primer Christianity- Islam-Hindu religions with special reference to Bharatहा ग्रंथ भाबड्या हिंदूंच्या डोळ्यांवरची झापडे ओढून काढणारा आहे. मिलिंद ओक यांच्या अडीच तपांच्या प्रदीर्घ अभ्यासातून साकारलेले हे संशोधन, देशविघातक जाळ्यांविषयी आणि विदारक भविष्याविषयी आपल्याला खडबडून जागे करते.
पुस्तकाचे नाव - An illustrated primer Christianity- Islam-Hindu religions with special reference to Bharat

लेखक - मिलिंद ओक

पुस्तक किंमत -150 /- (हिंदी, इंग्लिश )
 
प्रकाशक - अ.भा. संस्कृती समन्वय संस्था, जयपूर

पुस्तकासाठी संपर्क
 
नितिन अकोलकर, धर्म जागरण ट्रस्ट : 9881250616
 
राजू पुरुलिया - 8749867777

नाही म्हटले तरी सुमारे 17 ते 18 वर्षांपूर्वीपासून ख्रिश्चन व इस्लामच्या कार्यपद्धतीशी माझा संबंध आलाय. निव्वळ प्रलोभने व फसव्या दाव्यांच्या साहाय्याने सुरू असलेल्या शेकडोंच्या संख्येतील ख्रिस्ती प्रार्थना सभा मी अनुभवल्या आहेत. ’वर्ल्ड व्हिजन’सारख्या संस्थेच्या साम, दाम, दंड भेद या नीतींमुळे वस्त्याच्या वस्त्या धर्मांतरित झालेल्या आणि मंदिराऐवजी चमचणारे चर्च उभे राहिलेले मी स्वतः पाहिले आहे. अशा संस्थांची गडगंज कार्यालये, ग्रंथालये यामधून मी गेले आहे. तिथले धर्म प्रचारक-प्रचारिका यांच्याशी मी बोलले आहे. त्यांच्या प्रशिक्षण वर्गांशी माझा संपर्क आला आहे. त्यात गोर्‍या कातडीचे तसे कोणीच नव्हते. होते ते एतद्देशीय. प्रत्येक वेळी मला प्रश्न पडायचा ही मंडळी चर्चचा प्रचार का करतात? चर्चला एवढे मनुष्यबळ कसे काय उपलब्ध होते? एवढा पैसा कुठून येतो? मनुष्यबळाने पैशाचे नियंत्रण कोणाकडे असते? एवढ्या प्रचंड संस्था चालवतात कोण? ते आपल्या कामात यशस्वी कसे काय होतात?
 
 
महाराष्ट्रातले टीसीएस प्रकरण ’कॉर्पोरेट जिहाद’ या नावाने गाजले. कार्यपद्धती बाहेर आली. मला त्यात आश्चर्य मुळीच वाटले नाही. ’भूमी जिहाद’, ’स्कूल जिहाद’, ’लव्ह जिहाद’, ’जीम जिहाद’ ही तर फक्त लेबले आहेत. येन केन प्रकारेन धर्मांतरितांची संख्या वाढवायची, त्यांना इस्लामच्या दावणीला बांधायचे असे केले की प्रत्येक यश हे धर्म कृत्याचा भाग बनते. त्यातून उडवायला पैसा मिळतो, ’जिहाद’चे समाधान मिळते. स्वर्गाचा रस्ता मोकळा होतो. तिथे असतात ’बहात्तर अस्पर्श सुंदर पर्‍या, मद्याचे पेले!’
’लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलींशी बोलायला गेलो तर पोटात कालवते. फसवणार्‍यांच्या घट्ट जाळ्यापर्यंत पोहोचलो की अंग थरारते. पुन्हा प्रश्न पडतो अशा कामांसाठी मनुष्यबळ येते कुठून? मुली पटवायला तरुण तयार होतातच कसे? स्वत:च्या आया-बहिणी यांना दिसत कशा नाहीत? पैशांचा पुरवठा कोण करते? कोणत्या यंत्रणेसाठी ही तरुण मुले काम करतात? शेकडोंच्या संख्येत विवाहबाह्य संबंधास मुली आनंदाने कशा तयार होतात?
 
धर्मांतर का करतात? हिजाब समर्थनार्थ शेकडो मुली रस्त्यावर कशा उतरतात?
 
बरे हे एवढेच विषय इस्लाम-ख्रिश्चन यांच्याशी संलग्न नाहीत.दहशतवादाने गल्लीबोळ पोखरून काढलेत. लोकसंख्येचे असंतुलन इतके बदलत चालले आहे की, 75 ते 100 वर्षांनंतर ही भारत भूमी हिंदूंची राहणार का, याचाच प्रश्न पडावा.
 
आपण बघतो, अनुभवतो ते तर फक्त तरंग आहेत. त्यामागे देश विघातक कार्यात गुंतलेले जगद्व्यापी जाळे आहे. त्यांचे प्रचंड मोठे अर्थतंत्र आहे. संघटनात्मक रचना आहे. जबरदस्त ताकदीची परस्पर संबंधी यंत्रणा आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्मप्रचारी कार्याला प्रेरणा देणार्‍या मूलभूत धारणा अत्यंत प्रबळ आहेत.
 
जगभरात हिंदू बहुल असे फक्त दोन देश आहेत. पैकी एक भारत आणि दुसरा नेपाळ. इतर 146 देशांमध्ये हिंदू राहतात पण संख्याबळ नगण्य. 110 देशांमध्ये त्यांचे बळ एक टक्क्यांपेक्षा कमी आहे तर फक्त 15 देश असे आहेत की जिथे हिंदूंचे बळ पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आता हेच ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत बघूयात. 122 देशांत ख्रिस्ती बहुसंख्येने आहेत; तर 50 देशांत इस्लामी बहुसंख्येत आहेत.
 
 
आणि सर्वच्या सर्व देश ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मप्रचाराला सर्वतोपरी सहाय्य करीत असतात. त्यात शासन असते, धार्मिक संस्था असतात, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक संस्था ही सहभागी होत असतात. कसे ते समजून घेण्यासाठी मजबूत संदर्भासहित प्रचंड माहितीने युक्त आणि तितक्याच ताकदीच्या आकडेवारीने समृद्ध असा An illustrated primer Christianity-Islam-Hindu religions with special reference to Bharat हा ग्रंथ मुळातून वाचायला हवा. अभ्यासायला हवा.
 
 
ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माच्या ही संदर्भात वर्षानुवर्षे पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा ग्रंथ सर्वार्थाने समर्थ आहे. प्रत्येक प्रकरण वाचत जातो तसे मूलभूत सैद्धांतिक भूमिकेपासून कार्यपद्धती, अर्थतंत्र आदि मुद्द्यांवर संपूर्ण स्पष्टता येत जाते. हिंदू खडबडून जागा झाला नाही तर भविष्य किती विदारक असू शकते याची भयावह जाणीव अत्यंत अस्वस्थ करते.
 
 
इस्लाम आणि स्त्री हे विषय कुठल्याही सभ्यतेतून लिहिणे अशक्यच असते. स्त्री ही उपभोगण्यासाठीच आहे, असा मूलभूत सिद्धांत असल्यावर तिचे काय व्हावे? आपल्याला हिजाब माहिती असतो. रोजे-पाळतात हेही माहिती असते. गेला बाजार एका पुरुषाला चार बायका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या स्त्रीची मानसिकता कशी असू शकेल हे आपण समजून घेऊ शकतो. परंतु लैंगिकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी, शुद्धता टिकवण्यासाठी ’खतना’ किंवा ’खफ्ज’ या धार्मिक प्रथेविषयी आपल्याला काय माहिती आहे? पुस्तक जागतिक स्तरावरील माहिती देत असताना जेव्हा भारताच्या संदर्भातून चर्चा करू लागते, तेव्हा डोके बधीर होते. हिंदूंच्या चिंतनातून स्त्री ही जगन्माता आहे. एकाच एका ब्रह्मशक्तीपासून स्त्री व पुरुष दोघांची निर्मिती झाली असल्याची श्रद्धा आहे. या पेक्षा सर्वस्वी विपरीत मूलभूत चिंतन ’ख्रिश्चन’ व ’इस्लाम’चे आहे. ’स्त्रीची निर्मिती ही पुरुषाच्या बरगडीपासून झाली असल्याचे’ दोन्ही धर्म मानतात. ख्रिश्चनांमध्ये ती ’आद्य पापिणी’, पुरुषांच्या रंजनासाठी निर्माण झालेली आहे, म्हणून तिने आज्ञाकारी असले पाहिजे, असे ’बायबल’मधून व्यक्त होणारे सैद्धांतिक विचार आहेत!
 
 
स्त्री आणि धर्म या अनुषंगाने पुस्तकात दिली गेलेली माहिती भाबड्या हिंदूंच्या डोळ्यांवरची झापडे तटातटा तोडून टाकते.
 
 
हा ग्रंथ कुठल्याही धर्माच्या अभिनिवेशातून किंवा धर्मांधतेतून अजिबात लिहिला गेलेला नाही. हे आहे, भारताच्या संदर्भात प्रचंड अभ्यासातून साकारलेले व्यापक आणि सखोल संशोधन. हा ग्रंथ 240 पृष्ठांचा आहे. एकाच वेळी हिंदी, इंग्रजीतून प्रकाशित झाला असला तरी मूळ लेखन इंग्रजीतून आहे. ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्म यांच्या नावाच्या उत्पत्ती पासून त्यांचे पवित्र ग्रंथ, महत्त्वपूर्ण अवधारणा, राष्ट्र-राज्य प्रभाव, संस्थागत ढाचा अशी स्वतंत्र व तौलनिक माहिती देत एकूण 15 प्रकरणांमधून रचना केली आहे. धर्मांच्या संस्थागत रचना, वैश्विक संघटना, वित्तीय संसाधने अशा प्रत्येक आयामांमधून बारीक-सारीक तपशीलांसह माहिती व आकडेवारी अधोरेखित केली गेली आहे. प्रत्येक प्रकरणात तौलनिक उपप्रकरणे, तसेच विशेष माहितीने युक्त संकल्पना बद्ध करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ जकात, वक्त, हिंदू धार्मिक अर्थव्यवस्था इत्यादी प्रत्येक मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ लक्षवेधक चित्रे, नकाशे, तुलनात्मक चौकटी ग्रंथाला परिपूर्णता देतात.
 
 
ख्रिश्चन, इस्लाम धर्माची एवढी विस्तृत माहिती आपल्यासाठी डोळे विस्फारणारी ठरू शकते. परंतु जर आपण हिंदू, हिंदू धर्माची माहिती माझ्या एवढी अन्य कुणाला कशी काय असू शकेल? अशा भ्रमात असू तर आपला अंदाज साफ कोसळण्याची शक्यता आहे.
 
 
शाखोपशाखांमध्ये पसरलेल्या हिंदू धर्माला थोडक्या शब्दांत नेमकेपणाने बद्ध करणे खरोखरच कठीण. परंतु आगम ग्रंथातील मंदिर परंपरा, संन्यास परंपरा यांचा वेध घेत जैन, बौद्ध आदि पंथ, संप्रदायांचे अंतरंग प्रत्येकाच्या समान मूलभूत धारणा, कार्यप्रणालीचा समावेश करीत अत्यंत तयारीने मांडले गेले आहेत. जनगणनेतील बदलांचे नकाशे तर अक्षरशः धडकी भरवतात. माहिती, आकडेवारी नि चित्रे अशा प्रत्येक आयामांतून विचार केल्यास हा ग्रंथ वाचनीय, दर्शनीय आणि संग्रहणीय बनतो.
 
 
ग्रंथ संशोधनात्मक आहे. क्यूआर कोडचा वापर करून आपल्याला हवी ती माहिती, आकडेवारी अगदी सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. उदा-’आवेस्ता’ ग्रंथात पहिल्यांदा ’हिन्दू’ शब्द वापरला गेला तर ’क्यूआर कोड’द्वारे मूळ ग्रंथाचा फोटोच आपल्याला पहायला मिळतो.
 
 
या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखन 1982 पासूनचे संघ प्रचारक, विचारवंत मिलिंद ओक यांनी अवघ्या सहा महिन्यांत केले आहे; मात्र त्या पूर्वी सुमारे अडीच तपांहून अधिक काळ केलेली साधना, घेतलेले परिश्रम जागोजागी लक्षात येतात. दीर्घ व्यासंगातून केलेली मांडणी प्रभावी-प्रवाही शैलीमुळे वाचकाला खिळवून ठेवते. या निर्माण कार्यासाठी लेखकाचे कौतुक नि मन:पूर्वक अभिनंदन!
अस्सल संदर्भाच्या आधारे ख्रिश्चन, इस्लाम, आणि हिंदू धर्माची तौलनिक माहिती देणारा बहुदा हा पहिलाच ग्रंथ असावा.