प. पू. डॉ. हेडगेवार भारतबदलाच्या कोंदणातील हिरा

विवेक मराठी    18-Jun-2026
Total Views |
 rashtriya swayamsevak sangh
 
@सुनील देशपांडे
 9420495132
 
एका धगधगत्या क्रांतिकारकाने तो लखलखत्या विद्युल्लतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग.. त्यागून, मिणमिणत्या शांत पणतीचा प्रकाश बनण्याचे ध्येय वयाच्या 35व्या वर्षी निवडले, ती व्यक्ती म्हणजे प. पू. डॉ. हेडगेवार व तो मार्ग म्हणजे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’! डॉ. हेडगेवारांनी स्वत:ला बदलले म्हणून जगाला आश्चर्यचकीत करणारी संघटना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ उभा राहिला आणि म्हणूनच आज डॉ. हेडगेवार हे ‘भारतबदलाच्या कोंदणातील हिरा’ ठरतात. पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहणारा लेख...
 
 
rss
 
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्माला 137 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 1889 पाडव्याचा. सामान्यपणे कोणतीही कर्तबगार व्यक्ती ह्या कालावधीत विस्मृतीच्या पडद्याआड गेलेली असते; पण डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे काही वेगळेच अजब असे रसायन आहे. त्यांच्या मृत्यूलासुद्धा 86हून अधिक वर्षे झाली आहेत. मी लहान बाळ असताना डॉ. केशव बळीराम हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar यांना पाहिले होते, असे म्हणू शकणारी एखाद-दुसरी व्यक्तीसुद्धा आज नव्वदीच्या पुढे पाहिजे; असे असूनही आजसुद्धा डॉ. हेडगेवार यांचे नाव, चरित्र, आठवणी व मार्गदर्शन कोट्यवधी जनतेला माहिती आहे. त्या मार्गाने चालणारी अशीच लाखोंच्या संख्येत कार्यकर्ते मंडळी आहेत. ज्यांना जग स्वयंसेवक म्हणून ओळखते व फक्त भारतच नाही तर जगभराच्या कानाकोपर्‍यांत कुणी ना कुणी तरी हे पाथेय अभिमानाने मिरवत आहे.
 
 
 
अशा डॉ.केशव बळीराम हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar यांचे स्मरण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे की, आज जे ’डॉ. हेडगेवार’ हे नाव सर्वदूर आदराने परिचित आहे; त्यांच्या मृत्यूसमयी काही फार थोड्या लोकांना ते परिचित होते. मग असे काय घडले की, प्रत्यक्ष कार्यरत देह असतानाचे डॉ. हेडगेवार अपरिचित होते व आज मृत्यूनंतर 86 वर्षांनी ते सर्वदूर परिचित आहेत. या कोड्याची उकल म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणविशेषांचा परिचय होय.
 
सामान्यपणे चांगल्या व्यक्तींमध्ये जे गुण असतात, ते सर्व डॉ. केशव बळीराम हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar यांच्यात होतेच; पण म्हणून ते डॉ. हेडगेवार झाले नाहीत. तर ते डॉ. हेडगेवार ज्या गुणांमुळे झाले ते गुण अभ्यासणे आवश्यक आहे. समाज संघटन हे अर्वाचीन भारतात फारसे आढळत नाही व त्यामुळे या कार्यासाठी कोणते गुण लागतात व ते कसे अंगीकारले जातात, हे समाजाला माहितीही नव्हते त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी ते गुण प्रत्यक्षात उतरवून दाखवले.
 
 
काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात होते व लोकमान्य टिळक अध्यक्ष होते; पण लो. टिळकांचे देहावसान झाले व अधिवेशनासाठी नवीन अध्यक्ष निवडणे गरजेचे झाले. ’जहाल गटा’चे अध्यक्ष व्हावेत म्हणून डॉ. हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar हे डॉ. मुंजे यांच्याबरोबर पाँडेचरीला योगी अरविंद यांना विनंती करण्यासाठी गेले की, त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे; पण योगी अरविंद यांनी नकार दिल्याने ते प्रयत्न थांबले. हा प्रसंग संपला. पण डॉ. हेडगेवार यांची जी वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता आपण पाहत आहोत, त्याचा पैलू येथे दिसला. या अधिवेशनाचे डॉ. हेडगेवार हे ’कार्यकर्ता दला’चे प्रमुख होते. व ते अधिवेशन हे व्यवस्था म्हणून उत्कृष्ट ठरले. डॉ. हेडगेवार यांच्या मनासारखे अध्यक्षनिवडीत घडले नव्हते; तरीही त्याचा परिणाम डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar यांनी कामावर होऊ दिला नाही. तर माझा अहंकार नाही तर माझे ध्येय महत्त्वाचे म्हणून अधिवेशन यशस्वी करूनच डॉ. हेडगेवार थांबले. ’संघटन’ करायचे असेल तर ’मी, माझे याला मुरड घालावी लागेल’ व डॉ. हेडगेवार यांनी ती घालून दाखवली. म्हणून डॉ. हेडगेवार हे आजही जनसामान्यांना परिचित राहिले.
 
 
डॉ. हेडगेवार हे क्रांतिकारक होते व 180 अंशात बदल करणारा, संघटक बनण्याचा मार्ग त्यांनी निवडला होता. विद्युतशलाकेऐवजी नंदादीप बनण्याचा मार्ग निवडला होता. अशा वेळी त्यांच्या बारीकशा कृतीकडे मी लक्ष वेधणार आहे. क्रांतिमार्गातील सर्व पुरावे नष्ट केले होते व संघ स्थापना चालू होती. अशा वेळी एक पूर्व क्रांतिकारी आजारी झाला. तेव्हा डॉ. हेडगेवारांनी आपली पूर्वसुकृताने आलेली जबाबदारी झटकली नाही, तर गुपचूप त्याचा औषधोपचार केला व मृत्यूनंतर जंगलात नेऊन अंत्यसंस्कारही पार पाडले. नेतृत्व करायचे असेल, समाज जबाबदार बनवायचा असेल तर नेत्याने जबाबदारी स्वीकारून आदर्श निर्माण करावयाचा असतो. म्हणून डॉ. हेडगेवार हे आजही पथदर्शक आहेत.
 
 
’संघटक’ ही अशी तारेवरची कसरत आहे की त्यात व्यक्तिमत्त्व विलय ही पूर्वअट असते. डॉ. हेडगेवार यांनी ती अट लीलया स्वीकारली होती. नागपुरासह सर्वत्र त्यांची यथेच्छ निंदानालस्ती होत असे. पण त्यांनी प्रत्युत्तर कधीही केले नाहीच. त्यांना ’गवारों के हेड’ म्हटले गेले. पुण्यातील एक मोठे नेते तर डॉ. हेडगेवार भेटायला गेले तर बसासुद्धा म्हणत नसत. पण डॉ. हेडगेवार तरुणांना, ’चला देवदर्शनाला जाऊ.’ असे म्हणून या नेत्याकडे घेऊन जात. त्यावेळी तरुण म्हणत,’हा कसला देव?’ त्यावेळी डॉ. हेडगेवार सांगत ’अरे, देव दगडाचा असतो.’
 
 
डॉ. हेडगेवारांनी स्वतःला बदलले म्हणून जगाला आश्चर्यचकीत करणारी संघटना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ rashtriya swayamsevak sangh उभा राहिला.
 
संघटकाला अजून एका तरल गुणाची आवश्यकता असते. ती म्हणजे उद्दिष्ट काय आहे? हे पक्के माहीत असावे लागते. कारण ते उद्दिष्ट सहज दिसणारे नसते व लोकांना पहिल्याच दिवशी ते स्पष्ट करता येत नसते. त्यामुळे प्रमुखाला ते नीट माहिती असावे लागते. येथे डॉ. हेडगेवार हे समजून घेणे फार गरजेचे आहे.
 
 
डॉ. हेडगेवार यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ rashtriya swayamsevak sangh स्थापन केला. व त्याचे उद्दिष्ट होते, ’हिंदू समाज संघटित करून हिंदू राष्ट्र स्वतंत्र करावयाचे.’ हिंदू समाज संघटित करणे हे उद्दिष्ट. पण हिंदू समाज तर सतराशेसाठ दोषांनी लिप्त. मग एक अवघड परिस्थिती आली की, आपण समाज संघटक आहोत की समाज सुधारक? त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी अतिशय कौशल्याने स्वतःचे स्थान स्पष्ट केले म्हणून आज हा संघटित हिंदू समाज ’संघटित समाज’ म्हणून दिसत आहे. ’सर्व हिंदू एक; मग मी अन्न स्वतंत्र शिजवीन हे कसे चालणार?’ असा विचार रुजवणार्‍या डॉ. हेडगेवार यांनी बच्छराजजी व्यास लहान असताना त्यांना मात्र एका शिबिरात स्वतःचे अन्न वेगळे शिजवायची परवानगी दिली व हेच व्यास पुढे स्वतःचे वेगळेपण विरघळून संघात मिसळून गेले.
 
 
’माझे काम समाज संघटित करून ध्येयधुंद बनवणे आहे. मी बदनाम होईन, ते चालेल; पण संघटकाच्या मर्यादेत राहीन’, हे डॉ. हेडगेवार यांनी कृतीतून सिद्ध केले. ते संघटक राहिले, सुधारक बनले नाहीत. असा 1925 ते 1940 प्रवास केला व ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हा राष्ट्रव्यापी बनवला. पुढे त्या संघाने मग समाजातील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली. डॉ. हेडगेवार हे लोकांच्या स्मरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ध्येयरूपात राहिले.
 
 
डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar यांच्या वैयक्तिक गुणांविषयी पानेच्या पाने लिहिता येेईल; पण ’संघटक’ या शब्दाला कोणते विशेष गुण लागतात व ते डॉ. हेडगेवार यांनी कसे आत्मसात केले होते व समाजात संघरूपाने उतरवले हे त्यांचे जगावेगळे वैशिष्ट्य आज आपण पाहिले.
 
 
संघटन निर्मितीसाठीची वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता
 
भाबडे भगतगण नसलेला; पण संपूर्ण दोन शतकांवर संपूर्ण भारतावर प्रभाव टाकलेला एकमेव नेता म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
 
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा एक विचार करणे आवश्यक आहे. हिंदू समाज जागरण व दिशादर्शन यासाठी मैलाचा दगड ठरलेला गुढीपाडवा हा दिवस हाच डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस असावा, यालाच कदाचित नियतीचा संकेत म्हणत असावेत. शककर्ता शालिवाहन यांनी मातीच्या सैन्यात प्राण फुंकले व डॉ. हेडगेवार यांनी विस्मृतिग्रस्त हिंदू समाजाला ’हिंदू’ या त्याच्या परिचित नावाने हाक मारली. ’नवयुग निर्मिती’ करून दाखवली.
 
डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar हे समाज संघटक असले तरी त्यामागे हिंदू शब्द जोडलेला असल्याने व हिंदू समाज व धर्म हे दोघेही अत्यंत क्रूर व विकृत अशा ’इस्लाम’ आणि धूर्त, कपटी चर्च या नव्याने ओळख झालेल्या ’अब्राहामिक’ पंथांशी बावचळून जाऊन संघर्षात अडकले असल्याने डॉ. हेडगेवार यांचे ’समाज चिंतन’ हे ’हिंदू धर्मरक्षण चिंतन’ही मानले गेले व त्या अर्थाने डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar हे हिंदू अथवा सनातन धर्मरक्षक कार्यकर्तेही मानले गेले. असे असतानाही, धर्म संकल्पनेजवळ असतानाही त्यांच्याभोवती भक्त नाही तर कार्यकर्ते उभे राहिले हे त्यांचे महानपण आहे व शतकातील म्हणून ते एकमेवाद्वितीय भारतीय नेते आहेत. कारण धर्म कार्य करतानाही भक्त उभे राहू न देता, कार्यप्रवण स्वयंसिद्ध कार्यकर्ते उभे केले असे ते एकमेव नेते भारतीय इतिहासात आहेत.
 
 
हीच गोष्ट संघटन उभारण्यासाठी व ते संघटन कालोचित लवचीक राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. संघ यशाची कारणमीमांसा एका वाक्यात करायची झाली तर ती हीच असेल की, ’या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माण डॉ. हेडगेवार या ध्येयानेच केले होते न की ’डॉ. हेडगेवार’ या देहाने.’
 
 
डॉ. हेडगेवार यांनी व्यक्तिनिरपेक्ष संघटन स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विलोपाने उभारले असल्याने नेतृत्व बदलाने संघटनेमध्ये काही खळबळ वा खळखळ झाली नाही. अशी गोष्ट त्या काळी दुरापास्त होती. त्यांचे दुसरे महान कार्य म्हणजे संघटनाभिनिवेष निर्माण न होण्यासाठी संघटना निर्माण करतानाच तिची तात्कालिकता सांगितली व संघटनेच्या समाजविलयाचे सूतोवाच करून ठेवले होते. ते प्रसिद्ध वाक्य होते, ’हे कार्य याची देही याची डोळा पूर्ण करायचे आहे.’ तसेच,’संघाला ज्युबिली साजरी करायची नाही.’
या दोन कृतींमुळे डॉ. हेडगेवार हे शतकातील एकमेवाद्वितीय नेते ठरतात.
 
 
वास्तविक त्यांची प्रत्येक कृती ही विश्लेषण केली पाहिजे एवढी महान आहे; पण ते इतरत्रही येईल. म्हणून अनुयायी नाही तर कार्यकर्ते उभे केले व संघटना उभारूनही अभिनिवेश येऊ दिला नाही. या अन्य कोणत्याही नेत्यांत न दिसलेल्या दोन दिशादर्शक गुणांचाच उल्लेख आवर्जून करायला हवा.
 
 
डॉ. हेडगेवार-भारतबदलाच्या कोंदणातील हिरा
 
एका धगधगत्या क्रांतिकारकाने तो लखलखत्या विद्युल्लतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग त्यागून, मिणमिणत्या शांत पणतीचा प्रकाश बनण्याचे ध्येय वयाच्या 35व्या वर्षी निवडले, ती व्यक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार व तो मार्ग म्हणजे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’. या डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar यांच्यातील बदलाची व दीर्घदृष्टीची तुलना कदाचित योगी अरविंद यांच्या प्रवास वळणाशी होऊ शकेल.
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय? किंवा स्वातंत्र्यप्राप्ती कशासाठी? या प्रश्नांनी पछाडलेल्या सर्व महापुरुषांना तत्कालीन स्वाभाविक जनभावनेपेक्षा वेगळ्या वाटेने जावे लागले; पण आजमितीला त्या महापुरुषांनी स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी स्वीकारलेली थोडी वेगळी वाट किती आवश्यक होती, हे लक्षात येते. स्वामी विवेकानंद हे ’वंदे मातरम्’ने भारावले होते. बद्रिसहाय टुलधरिया यांना सांस्कृतिक राष्ट्र संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहित केले; पण स्वतः मात्र हिंदू चिंतन वैश्विक चिंतन आहे हे सांगण्यासाठी शिकागोला गेले. योगी अरविंद तर प्रत्यक्ष सरकारविरोधात सशस्त्र क्रांतिकार्यात होते, ’वंदे मातरम्’ काव्याने प्रेरित होते; पण तरीही भारतावर असलेल्या विश्व जननीची जबाबदारी म्हणून हिंदू आध्यात्मिक चिंतन आधुनिक परिभाषेत सांगण्याचा मार्ग निवडला. तसेच तिसरे व अत्यंत वेगळेपणाने भारतीय जनजीवनाच्या भविष्यावर प्रभाव टाकलेले महापुरुष म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
 
 
डॉ. हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar हे क्रांतिकार्यात होते, काँग्रेसच्या आंदोलनात होते, देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचायचे म्हणून अविवाहित राहिले होते तरी स्वातंत्र्याची पूर्वअट हिंदू संघटन आहे हे कळल्यावर सर्व मार्ग सोडून ’एषा पंन्था’ म्हणून शाखा सुरू केली. देशभक्ती सिद्ध करण्याचा धोपटमार्ग सोडून हिंदू संघटन हे आडवळणाचे काम सुरू केले.
 
 
’संघटनेसाठी संघटना’ असे म्हणून अन्य सर्व तत्कालीन वादळांपासून संघटनेला दूर ठेवले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात माझे योगदान असलेच पाहिजे, हे प्रथमपुरुषी एकवचनी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आंदोलनकाळात संघाची जबाबदारी सोडली; पण स्वातंत्र्य प्रयत्नातील स्वतःचा सहभाग सोडला नाही. पण संघटनेला मूळ उद्दिष्टापासून इतरत्र भटकू दिले नाही.
 
 
1940 साल हे डॉ. हेडगेवार Dr. Keshav Baliram Hedgewar यांच्या आयुष्यातील, संघाच्या आयुष्यातील व देशाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरले. या वर्षी डॉ. हेडगेवारांचे निधन झाले. पण त्या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गात समारोप करताना त्यांनी जे सांगितले ते डॉ. हेडगेवार यांच्या जीवन उद्दिष्ट पूर्तीसाठी फार महत्त्वाचे होते. त्यांनी म्हटले की, ’आज समोर मी हिंदूराष्ट्राचे छोटेसे स्वरूप पाहत आहे.’ त्यांच्या जीवनोद्देशाप्रमाणे संघटना चालत होती. स्वयंसेवक व संघासाठी उद्दिष्ट स्पष्ट केले की, ’हे हिंदू राष्ट्र आहे व ते हिंदू राष्ट्र स्वतंत्र करायचे आहे.’ व भारतीय नरनारींना व भारतमातेला हा विश्वास दिला की इंग्रज हाकलणे म्हणून फक्त नाही तर हिंदू मूल्यांवर आधारित हिंदू राष्ट्र स्वातंत्र्य ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे.
 
 
आज 2014 सालापासून भारत बदलत आहे. हा बदल समाजाला जाणवू लागला आहे. त्याला स्वतःचे भान आले आहे. हे घडले आहे ते प्रामुख्याने डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनाने व त्यासाठी त्यांनी उभारलेल्या व्यक्ती निर्माण करणार्‍या कार्यपद्धतीमुळे. 1925 साली बीज रोवले, 1940पर्यंत स्वतः जोपासले व आगामी 100 ते 200 वर्षे पुरेल असे नेमके पाथेय दिले. परिस्थिती बदलली तरी नवीन आव्हानाला समजून घेणारी पिढीमागून पिढी घडवली.
 
 
आज ’हिंदू’ हा शब्द सर्व अर्थाने व सर्व अंगांनी पुष्ट बनत आहे व वैश्विक मार्गदर्शक बनत आहे. कारण जग पाहत आहे की भारताने कोणतीही गोष्ट ठरवली तर पूर्वी ती सरकारची योजना असायची; पण आता मात्र ती सर्व भारतीय नागरिकांची असते. एवढाच फरक 2014 पूर्वी व नंतर यामध्ये पडला आहे व तो फरक म्हणजे प्रत्येक भारतीयाने स्वयंप्रेरणेने देश, समाजासाठी काम करावे ही भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सततच्या 100 वर्षांच्या प्रयत्नांतून देशाच्या कानाकोपर्‍यात सामान्य नागरिकांत कृतीने उत्पन्न केली. म्हणून आज हिंदुस्थान जगभर प्रभावी राष्ट्र म्हणून उभे राहत आहे.
 
'हिंदुस्थान सर्वोपरि’ हे कृतीने कसे शिकवले?
 
उत्तर हेच आहे की, डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar यांनी प्रथम कृती करून देशाचे स्वातंत्र्य सर्वतोपरी आहे हे शिकवले होते.
 
काँग्रसेच्या लाहोर अधिवेशनातील संपूर्ण स्वातंत्र्य ठरावाचे प्रत्येक शाखेतून अभिनंदन करण्यात आले. ’ठराव कोणीही करो; पण तो देशहिताचा आहे तर संघ त्यामागे उभा आहे’ हे डॉ. हेडगेवार  Dr. Keshav Baliram Hedgewar यांनी 1930 सालीच स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवले होते. मग 1948चे पाकिस्तान आक्रमण असो, चीनचे आक्रमण वा बांगलादेश युद्ध. संघ सरकारला सहकार्य करत आला, तात्कालिक हानिलाभ न पाहता.
 
हे संघाच्या यशाचे मर्म आहे. समाज कृतिशील बनला म्हणून आजचा बदलता भारत आपण पाहत आहोत. आणि म्हणूनच डॉ. हेडगेवार हे भारतबदलाच्या कोंदणातील हिरा ठरतात.