2022 सालची घटना ही ’शिवसेनेतील फूट’ असे म्हणता येईल, तर 2026ची घटना मूळ शिवसेनेत घरवापसी झाल्याची घटना असे म्हणायला पाहिजे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे 2022 साली बाहेर पडले. तेव्हा चर्चा सुरू झाली, शिवसेना फुटली. उद्धव यांच्याविषयी प्रचंड नाराजी असणारा समाजातील एक मोठा वर्ग होताच; परंतु त्यातील बहुतेकांना शिवसेनाफुटीचा आनंद झाला नाही. याचे कारण असे की,’लोकांच्या मनातन शिवसेनेची प्रतिमा ’राष्ट्रवादी काँग्रेस’, ’समाजवादी दल’, किंवा ’काँग्रेस पक्ष’ अशी नव्हती, तर शिवसेना म्हणजे ‘हिंदू अस्मितेचा हुंकार’ होता. ’हिंदूंमध्ये फाटाफूट होणे’ हा हिंदूंना मिळालेला शाप आहे. त्याचे दुःख अनेकांना झाले.
मात्र,‘शिंदेंची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना’, यावर तसे कायदेशीर शिक्कामोर्तब झाले. पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाणही त्यांना मिळाले. त्यामुळे फाटाफुटीचे अनेकांना झालेले दु:ख कमी झाले. मूळ शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंचा लोकांनी स्वीकार केला.
सर्वसामान्य माणसाला याचे काहीही दुःख झालेे नाही. उलट,'नरेंद्र मोदी या कडव्या हिंदुत्ववादी पंतप्रधानाचे हात अधिक बळकट झाले,’ अशी भावना सर्वांची झाली.
यानंतर आत्ता 2026 साली उद्धवसेनेचे सहा खासदार फुटले आणि ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. यावेळी मात्र सर्वसामान्य माणसाला याचे काहीही दुःख झालेे नाही. उलट,'नरेंद्र मोदी या कडव्या हिंदुत्ववादी पंतप्रधानाचे हात अधिक बळकट झाले,’ अशी भावना सर्वांची झाली. 2022 सालची घटना ही ’शिवसेनेतील फूट’ असे म्हणता येईल, तर 2026ची घटना मूळ शिवसेनेत घरवापसी झाल्याची घटना असे म्हणायला पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना संपता कामा नये, तिचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, या अस्तित्वअस्मितेचे नेतृत्व कुणी करायचे? नेतृत्व कुणाची नेमणूक करून निर्माण होत नाही. राजकीय नेतृत्व तर अशा नेमणुकीने अजिबात निर्माण होत नाही. वारसा हक्कानेदेखील ते निर्माण होत नाही. श्रीमती इंदिरा गांधी या स्वकर्तृत्वाने मोठ्या झालेल्या नेत्या आहेत. नेहरूंची कन्या असल्याचा लाभ त्यांना जरूर मिळाला, परंतु त्यांचे सर्व राजकीय कर्तृत्व हे त्यांचे स्वतःचे कर्तृत्व आहे. त्यांनी पं. नेहरूंची सर्वच बाबतीत नक्कल केली नाही आणि चुकूनही ‘माझा बाप... माझा बाप’ अशी भाषणे केली नाहीत.
आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे आदर्श आहेत. आणि आनंद दिघे यांचा जाज्ज्वल्य हिंदुत्वाचा प्रवास त्यांच्यावरील चित्रपटातून फार प्रभावीपणे मांडला गेलेला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील मराठी माणसातील हिंदुत्व जागे केले. मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न त्यांनी हिंदुत्वाशी नेऊन भिडवला, हे त्यांचे योगदान न पुसता येणारे आहे.
एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे एकमुखी नेते आहेत. आमदार आणि खासदारांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. या सर्वांनी शिवसेनेचा वैचारिक वारसा अंगीकारला आहे. हा वारसा ते सोडणार नाहीत. आणि वारशाशी प्रतारणादेखील करणार नाहीत. दुर्दैवाने तसा जर दिवस आला तर खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना संपण्याचा प्रवास सुरू होईल. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे आदर्श आहेत. आणि आनंद दिघे यांचा जाज्ज्वल्य हिंदुत्वाचा प्रवास त्यांच्यावरील चित्रपटातून फार प्रभावीपणे मांडला गेलेला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील मराठी माणसातील हिंदुत्व जागे केले. मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न त्यांनी हिंदुत्वाशी नेऊन भिडवला, हे त्यांचे योगदान न पुसता येणारे आहे.
आता महाराष्ट्रात शिवसेना एकच. जोपर्यंत ’उबाठा’चे काही खासदार, काही आमदार आणि काही नगरसेवक आहेत, तोपर्यंत उबाठाचे अस्तित्व राहील. पुढील काही महिन्यांत किती आमदार, किती खासदार, किती नगरसेवक ’उबाठा’त राहतील हे आपण बघणार आहोत. मुळाकडे जाण्याचा जो ओघ आहे, तो असाच चालू राहील. ज्या कारणासाठी शिवसेना अस्तित्वात आली, ते कारण ही शिवसेनेची संजीवनी आहे. प्रामाणिक शिवसैनिक येणार्या काळात तिचा अंगीकार करीत जातील.
इतिहासात मागे डोकावून पाहिले असता असे दिसेल की, 1967 साली काँग्रेसचे दोन तुकडे झाले. एका तुकड्याचे नाव पडले, ’संघटन काँग्रेस’ आणि दुसर्या तुकड्याचे नाव पडले, ’इंदिरा काँग्रेस’. काँग्रेसचे पक्षचिन्ह ’बैलाची जोडी’ हे ’संघटन काँग्रेस’कडे गेले. इंदिरा काँग्रेसने ’गाय-वासरू’ हे चिन्ह घेतले आणि त्यानंतर याच काँग्रेसचे ’हाताचा पंजा’ हे पक्षचिन्ह झाले. आजच्या पिढीला काँग्रेस अशी दुंभगली होती, हे माहीत असण्याचे कारण नाही. ‘हाताचा पंजा’ असणारी काँगे्रस हीच ’काँग्रेस’ आहे,’ हेच आजच्या पिढीने स्वीकारले आहे.
तीच अवस्था ’धनुष्यबाण’ हे चिन्ह असणार्या शिवसेनेची होणार आहे. शिवसेना एकच राहील. विचारांशी तडजोड करणारे, असंगाशी संग करणारे, सार्वजनिक जीवनात शिव्यांचा वापर करणारे, वसुलीसाठी सत्ता राबविणारे, त्यांच्या कर्मानेच मागे पडत जातील. त्याचे दुःख करण्याचे कारण नाही. राजकीय संग्रामात तोच विजयी होतो, जो जनतेच्या इच्छा-आकांक्षांशी समरस झालेला आहे, तत्त्वनिष्ठ आहे आणि जनतेच्या आशा-आकांक्षाविषयी संवेदनशील आहे. आजतरी ’शिवसेना’ नेते एकनाथ शिंदे यांचे पारडे जड झालेले आहे आणि त्यांचे राजकीय वजन कमी करण्याचे सामर्थ्य बाजूस पडत चाललेल्या वाचाळांमध्ये अजिबात नाही, हे एक कटू सत्य आहे.