बांगलादेशातील हिंदूंचा हुंकार

विवेक मराठी    25-Jun-2026   
Total Views |

'Jai Shri Ram' Chants In Dhaka As Thousands Protest '

vivek
 
कालपर्यंत बांगलादेशात मार सहन करणारा हिंदू आज आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला होता. आपल्या आराध्य देवतेच्या विटंबनेचा तो निषेध करत नव्हता. बांगलादेश सरकारला निर्वाणीचा इशारा देत होता. पण पश्चिम बंगालच्या निवडणुकांनी बरंच काही बदललं आहे. आता पश्चिम बंगालबरोबरच बांगलादेशातील हिंदू आत्मविश्वासानं, संघटितपणे उभे राहत आहेत. ते ‘हिंदू महाजोट’ या संघटनेच्या माध्यमातून भगवान श्रीरामांच्या अवमानाच्या निषेधार्थ आंदोलन करीत होते. हा मोर्चा पाहून संपूर्ण ढाका थक्क झाला होता..! हे नक्की का घडले याबद्दल माहिती सांगणारा लेख..
'Jai Shri Ram' Chants In Dhaka As Thousands Protest ' ...
सध्या बंगालमध्ये जे घडतंय, ते अभूतपूर्व आहे. अद्भुत आहे. इथे बंगाल म्हणजे संपूर्ण बंगाल, बांगलादेश आणि पश्चिम बंगाल.
बंगालचा हिंदू पूर्वी असा नव्हता. तो सळसळत्या रक्ताचा होता. तो क्रांतिकारी होता. देशासाठी आपल्या आयुष्याचा होम करणं हा त्याला परम सन्मान वाटत होता. पण ’मुस्लीम-हिंदू’ मुद्दा समोर आला, की त्याची गात्रं थंड व्हायची. मुसलमानी आक्रमकते पुढे त्याच्यातील ’भद्र पुरुष’ वर यायचा आणि त्याची पावलं मागे वळायची. तो मुसलमानांकडून मार खात होता आणि गप्प बसत होता. त्यानं ’डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’ पुढे मान तुकवून बंगालची फाळणीही सहन केली, जी कधीकाळी त्यानं इंग्रजांना नमवून रद्द करवली होती. वाटलं होतं, स्वातंत्र्य मिळालं. मुसलमानांना त्यांचा देश मिळाला. आता तरी बंगालचा हिंदू शांतपणे जगू शकेल. पण तसं व्हायचं नव्हतं, झालंही नाही. स्वतंत्र भारताला बंगालचा जो एक तुकडा मिळालेला होता, त्या पश्चिम बंगालमध्ये, हिंदू मुसलमानांकडून मारच खात राहिला. त्यांच्या इच्छेनं आणि संमतीनं ’दुर्गा पूजा’ उत्सव साजरा करत राहिला.
 
 
दरम्यान काँग्रेसचं शासन आलं आणि गेलं. डाव्यांनी तर चांगलं 34 वर्षं शासन केलं आणि तेही गेले. मग ममता बॅनर्जी आल्या. ’हृदये काबा, नयने मदिना’ म्हणणार्‍या त्यांच्या राज्यात, मुसलमानांची दहशत वाढली आणि हिंदूंचं मार खाणं चालूच राहिलं.
 
 
तीच, किंबहुना अधिक कठीण, अधिक दुर्दैवी परिस्थिती बांगलादेशातील हिंदूंची होती. ते तर सरळ मुसलमानांच्या देशातले अल्पसंख्याक होते. सुरुवातीला 18 ते 20 टक्के असणारे हिंदू, आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत खाली घसरले.
त्यामुळे पूर्व आणि पश्चिम बंगालचा हिंदू म्हणजे मार खाणारा, अशीच प्रतिमा लोकांसमोर होती.
 
'हिंदू महाजोट’ आणि ’बांगलादेश पूजा उद्यापन परिषद’ यांनी संयुक्तपणे पुकारलेलं हे आंदोलन पूर्ण बांगलादेशात पसरत चाललंय. 'जर श्रीरामाच्या मूर्तीचं बांधकाम सुरू करायला परवानगी दिली नाही आणि मूर्तीच्या सुरक्षेची हमी दिली नाही, तर आम्ही बांगलादेशाच्या सर्व 64 जिल्ह्यांमध्ये श्रीरामाचे मंदिर बांधू’, असं या संघटनांनी जाहीर केलं आहे. 
 
मात्र गेल्या महिन्यांत दोन्ही बंगालमध्ये जे काही झालं, ते सर्वार्थानं अद्भुत होतं. विस्मयकारक होतं. जगाला आश्चर्यानं थक्क व्हायला लावणारं होतं.
 
शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी बांगलादेशात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं. ढाक्यातील ’नॅशनल प्रेस क्लब’समोर एक विशाल मानवी साखळी उभारण्यात आली. त्यानंतर दुपारपर्यंत ढाक्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी, शाहबाग परिसरात एकत्र जमले. त्यांची संख्या इतकी मोठी होती की, संपूर्ण शाहबाग परिसर ठप्प झाला. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. या विद्यार्थ्यांनी भव्य आणि प्रभावी मशाल मोर्चा काढला. हा मोर्चा पाहून संपूर्ण ढाका थक्क झाला होता..!
 
 
ढाक्यासाठी आंदोलनाची अशी दृश्यं काही नवीन नाहीत. मग 19 जूनच्या या आंदोलनात असं काय विशेष होेतं, की केवळ ढाकाच नाही, तर संपूर्ण बांगलादेशच चकित होऊन बघत राहिला?
 
 
कारण, हे सर्व विद्यार्थी हिंदू होते. मानवी साखळी उभारणारे सर्व कार्यकर्ते हिंदू होते. ते ‘हिंदू महाजोट’ (Bangladesh National Hindu Grand Alliance) या संघटनेच्या माध्यमातून भगवान श्रीरामांच्या अवमानाच्या निषेधार्थ आंदोलन करीत होते.
 
vivek 
 
हा खूप मोठा फरक होता. कालपर्यंत मार सहन करणारा हिंदू आज आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेला होता. आपल्या आराध्य देवतेच्या विटंबनेचा तो निषेध करत नव्हता. बांगलादेश सरकारला निर्वाणीचा इशारा देत होता.
 
पण हे सर्व इथवरच थांबलं नाही. हिंदूंनी या आधीही बांगलादेशात आंदोलनं केली आहेत. पण ती शांततापूर्ण आणि निषेध करण्यापुरतीच असायची. यावेळी मात्र असं झालं नाही.
 
ढाक्यातील हिंदूंच्या आंदोलनाचं हे लोण सार्‍या बांगलादेशात पसरलंय. 20 ते 22 जूनपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिलं. 20 जूनला बांगलादेशाच्या दक्षिणेस असणार्‍या बारिसाल जिल्ह्यात हिंदू समुदाय रस्त्यावर उतरला. मुशीगंज आणि सतखिरा येथेही हिंदूंचे विशाल आणि आक्रमक मोर्चे निघाले. रंगपूरला हिंदू संघटनांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या मोर्चाला रोखल्यावर हिंदू समुदाय आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली.
 
 
'हिंदू महाजोट’ आणि ’बांगलादेश पूजा उद्यापन परिषद’ यांनी संयुक्तपणे पुकारलेलं हे आंदोलन पूर्ण बांगलादेशात पसरत चाललंय. ’जर श्रीरामाच्या मूर्तीचं बांधकाम सुरू करायला परवानगी दिली नाही आणि मूर्तीच्या सुरक्षेची हमी दिली नाही, तर आम्ही बांगलादेशाच्या सर्व 64 जिल्ह्यांमध्ये श्रीरामाचे मंदिर बांधू’, असं या संघटनांनी जाहीर केलं आहे. बांगलादेशाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला (Ministry of Religious Affairs ) या आशयाचं पत्र देण्यात आलं आहे.
 
 
बांगलादेशच्या नकाशाकडे जर ’आपण कुर्ता घातलेल्या व्यक्तीच्या’ रूपात पाहिलं, तर त्या व्यक्तीच्या गळ्याच्या जागी ’गायबांधा’ हा जिल्हा येतो. या गायबांधा जिल्ह्यातील पलाशबाडी हे गाव सध्या संपूर्ण बांगलादेशात चर्चेचा विषय बनलं आहे.
 
 
या पलाशबाडी येथे हिंदू समाजाकडून भगवान श्रीरामांची 81 फूट उंच मूर्ती उभारली जात आहे. श्री श्री राधा गोविंद आणि काली मंदिराच्या आवारात उभारल्या जाणार्‍या या मूर्तीचं सुमारे 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. राधा गोविंद मंदिर समितीचे अध्यक्ष हरिदास चंद्रदास यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य सुरू आहे.
 
 
(गायबांधाबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, महाभारत काळात येथे विराट राजाचं राज्य होतं. त्यानं शेकडो गायी पाळल्या होत्या. ज्या ठिकाणी आज हे शहर आहे, त्या ठिकाणी त्या गायी बांधल्या जात असत. म्हणून या स्थानाला ‘गायबांधा’ असं नाव पडलं आहे.)
 
 
गेल्या काही दिवसांपासून इमाम-उलेमा परिषद तसंच इतर कट्टर इस्लामी संघटनांच्या विरोधामुळे या मूर्तीचं काम पूर्णपणे थांबलं आहे. कट्टरपंथीयांनी ही मूर्ती ध्वस्त करून टाकण्याची धमकी दिली आहे. त्याच अनुषंगानं, या आठवड्यात काही उपद्रवी लोकांनी बांधकाम सुरू असलेल्या मूर्तीवर जोडे-चपलांचा ढीग टाकला.
 
 
या धार्मिक विटंबनेच्या निषेधार्थ बांगलादेशातील हिंदू आक्रमक झाले. ढाक्याच्या दक्षिण भागातील जगन्नाथ विद्यापीठातील हिंदू विद्यार्थी सर्वप्रथम रस्त्यावर उतरले. या आंदोलनातून जी ठिणगी पडली, तिनं बांगलादेशातील हिंदूंना जागृत केलं. त्याच मालिकेत काल ढाक्यात हिंदू विद्यार्थ्यांचं अभूतपूर्व आंदोलन झालं.
 
 
बांगलादेशात सध्या केवळ नऊ ते दहा टक्के हिंदू उरले आहेत. गायबांधामध्ये तर हिंदूंचं प्रमाण अवघं सात टक्के आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे हिंदूंचं दमन होत आलं आहे. बांगलादेशात अनेक वेळा हिंदू मंदिरे तोडली गेली. आराध्य देवतांच्या मूर्तींचा विध्वंस करण्यात आला. कधी हिंदूंनी किरकोळ विरोध केला, तर बहुतांश वेळा मनातल्या मनात दुःख सहन करून ते गप्प राहिले.
 
मग यावेळी बांगलादेशातील हिंदूंमध्ये हे धैर्य कुठून आलं?
 
याचं उत्तर आहे - पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल!
 
होय. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या निकालातून निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या लाटेमुळे बांग्लादेशातील हिंदूंना धैर्य मिळालं. त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला आणि आताचं हे अभूतपूर्व आंदोलन घडून आलं.
 
आपण नेहमी ऐकत आलो आहोत की, पाकिस्तानात हिंदूंवर अत्यंत क्रूर अत्याचार झाले. त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं. अनेक हिंदू मुलींचं अपहरण करण्यात आलं... अशाच बातम्या बांगलादेशातूनही वारंवार येत असतात.
 
1947 ते 1975 या काळात पूर्व पाकिस्तानात, आणि 1975पासून आजपर्यंत बांगलादेशात, अनेक हिंदू मंदिरे वेळोवेळी तोडली गेली. 1971मध्ये पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार (Genocide) केला. 2024च्या अराजक वातावरणातही अशाच घटना घडल्या. शेकडो हिंदू मारले गेले. जमावाकडून मारहाण करून (Mob Lynching) अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली.
 
या सर्व प्रसंगी मानवाधिकारांच्या गप्पा मारणारे, मानवतेचे धडे देणारे, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान सांगणारे लोक कायम चूपचाप बसले.
 
असं का?
 
भारतातही सुमारे 10 ते 12 टक्के मुस्लीम समाज आहे; परंतु येथे एखादी अपवादात्मक छोटी घटना घडली तरी हेच मानवाधिकारवादी जगभर गदारोळ करतात. अनेकदा काही घडलेले नसतानाही ’भारतात मुस्लीम असुरक्षित आहेत’ असा प्रचार केला जातो; जसा कोरोना काळात झाला होता.
 
 
मग पुन्हा तोच प्रश्न. बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचारांची तीव्रता कितीतरी अधिक असतानासुद्धा भारतातील लहानमोठ्या घटनांना जागतिक माध्यमांत मोठी प्रसिद्धी मिळते; पण बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या नरसंहाराची साधी बातमीही फारशी ठळकपणे प्रसिद्ध होत नाही.
 
फाळणीपूर्वी हिंदूंचा एकमेव राजकीय पक्ष 'हिंदू महासभा’ होता. दुर्दैवाने भारतातील हिंदूंनी त्याला आपला पक्ष मानले नाही. इंग्रज आणि मुस्लीम मात्र काँग्रेसला हिंदूंचा पक्ष मानत होते; पण काँग्रेस स्वतःला हिंदूंचा पक्ष मानत नव्हती. तिची धोरणे मुस्लीमधार्जिणी होती.
 
 
 
असं का?
 
याचं कारण आहे-संघटन. भारतातील मुस्लीम समाज संघटित आहे. तो विविध संघटनांत विभागलेला असला तरी संघटित आहे.
 
दुर्दैवानं पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंविषयी असं म्हणता येत नाही. 1947 पूर्वी मुस्लिमांचा राजकीय पक्ष मुस्लीम लीग होता. फाळणीनंतर भारतात मुस्लीम लीगचं महत्त्व संपलं. तरीही ती जिवंत राहिली. तिनं ’इंडियन युनियन मुस्लीम लीग’ या नावानं कार्य सुरू ठेवलं. केरळमध्ये आपली ताकद वाढवली. त्यांचे खासदार निवडून येत राहिले. यूपीए आघाडीचा तो घटक राहिला. यूपीएच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचा मंत्री काँग्रेसबरोबर केंद्र सरकारमध्ये होता. आजही केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री या ’मुस्लीम लीग’च्या पाठिंब्यावर आणि दयेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. एमआयएमसारख्या इतर संघटनाही मुस्लीम राजकारण प्रभावीपणे करत आहेत.
 
 
फाळणीपूर्वी हिंदूंचा एकमेव राजकीय पक्ष 'हिंदू महासभा’ होता. दुर्दैवाने भारतातील हिंदूंनी त्याला आपला पक्ष मानले नाही. इंग्रज आणि मुस्लीम मात्र काँग्रेसला हिंदूंचा पक्ष मानत होते; पण काँग्रेस स्वतःला हिंदूंचा पक्ष मानत नव्हती. तिची धोरणे मुस्लीमधार्जिणी होती.
 
 
फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानात हिंदू महासभेचं थोडंफार कार्य होतं. तिचे अनेक कार्यकर्ते भारतात आले. जे तिथे राहिले, त्यांचे मनोबल खचले होते. त्यामुळे 1950पर्यंत पश्चिम पाकिस्तानातील हिंदू महासभेचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं.
 
 
त्याच्या तुलनेत पूर्व पाकिस्तानात हिंदू महासभा काहीशी मजबूत होती. अविभाजित बंगालमध्ये तिच्याकडे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि निर्मलचंद्र चटर्जी यांसारखे प्रभावी नेते होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रयत्नांमुळेच बंगालचं विभाजन होऊन पश्चिम बंगाल भारतात राहिला; अन्यथा संपूर्ण बंगाल पाकिस्तानात विलीन करण्याची मागणी होत होती.
 
 
मात्र पूर्व पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर तेथे हिंदू महासभेचं विशेष अस्तित्व राहिलं नाही. 1950मध्ये ढाका, बरिसाल, खुलना आणि इतर भागांत हिंदूविरोधी दंगली झाल्या. त्यातून हिंदू समाजाचं स्थलांतर झालं किंवा तो दबून गेला.
 
म्हणजेच पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात चांगली संख्या असूनही हिंदू समाज राजकीय शक्ती म्हणून उभा राहू शकला नाही. जगात शक्तीलाच मान मिळतो. हिंदू समाज राजकीय किंवा सामाजिक शक्ती म्हणून उभा राहिला नाही, त्यामुळे त्यांच्यावरचे अत्याचार वाढत गेले.
 
23 जूनला पश्चिम बंगाल सरकारने ’सुहरावर्दी एव्हेन्यू’चं नाव बदलून 'गोपाल मुखर्जी रोड’ केलं आहे. गोपाल मुखर्जी म्हणजेच गोपाल पाठा. 1946च्या ’डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’च्या दिवशी कोलकाताच्या हिंदूंना वाचवणारा हाच तो मर्द गडी..! दुर्दैवानं काँग्रेस, कम्युनिस्ट आणि ममता या सार्‍यांनी गोपाल पाठाचं नाव जणू प्रतिबंधित केलं होतं. नवीन पिढीला तर ’गोपाल पाठा’ माहीतच नव्हता. शेकडो हिंदूंना वाचवणारा हा शूरवीर, सन 2005 मध्ये एकाकी, उपेक्षित आयुष्य जगत मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींनी हा छोटासा प्रयत्न केला आहे. 4 मे 2026च्या आधी, असं काही होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. 
 
आज बांगलादेशात हिंदूंच्या काही सामाजिक संघटना आहेत. 2006मध्ये काही हिंदू संघटनांनी मिळून 'हिंदू महाजोट’ स्थापन केले. परंतु त्यांची कार्यक्षमता मर्यादित होती. राजकीय ताकद नव्हती. बहुतांश हिंदू शेख हसिना यांच्या ’अवामी लीग’ला पाठिंबा देत होते. 2024मध्ये ’अवामी लीग’ची सत्ता उलथवली गेल्यानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. मात्र हिंदू महाजोटनं सुरुवातीला त्याकडे राजकीय सूड म्हणून पाहिलं. त्यामुळे हिंदू समाजाकडून अपेक्षित प्रतिकार उभा राहिला नाही.
 
 
मात्र आता झालेलं आंदोलन अपवादात्मक होतं. बांगलादेशातील हिंदू आता जागृत झाले आहेत, याचा तो प्रत्यक्ष पुरावा होता.
 
बांगलदेशाबरोबरच पश्चिम बंगालचा हिंदूही आता आत्मविश्वासानं उभा राहतोय. 23 जूनला पश्चिम बंगाल सरकारने ’सुहरावर्दी एव्हेन्यू’चं नाव बदलून 'गोपाल मुखर्जी रोड’ केलं आहे. गोपाल मुखर्जी म्हणजेच गोपाल पाठा. 1946च्या ’डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’च्या दिवशी कोलकाताच्या हिंदूंना वाचवणारा हाच तो मर्द गडी..! दुर्दैवानं काँग्रेस, कम्युनिस्ट आणि ममता या सार्‍यांनी गोपाल पाठाचं नाव जणू प्रतिबंधित केलं होतं. नवीन पिढीला तर ’गोपाल पाठा’ माहीतच नव्हता. शेकडो हिंदूंना वाचवणारा हा शूरवीर, सन 2005 मध्ये एकाकी, उपेक्षित आयुष्य जगत मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींनी हा छोटासा प्रयत्न केला आहे. 4 मे 2026च्या आधी, असं काही होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल.
 
 
पश्चिम बंगालच्या निवडणुकांनी बरंच काही बदललं आहे. आता पश्चिम बंगालबरोबरच बांगलादेशातील हिंदू आत्मविश्वासानं, संघटितपणे उभे राहत आहेत. हिंदू समाजासाठी हे अत्यंत सकारात्मक दृश्य आहे.