विषमुक्त जीवनशैलीकडे एक पाऊल

विवेक मराठी    03-Jun-2026
Total Views |
@माधुरी जोशी, सांगली
2018मध्ये मुलीच्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने, घरातील केमिकल्स कशाप्रकारे पर्यावरण विषारी करत आहेत हे धक्कादायक सत्य समोर आले. याच जाणिवेतून सुरू झालेल्या ‘विषमुक्त जीवनशैली’च्या वाटचालीत बायो-एंझाइम (Bio-Enzym) सारखे सुंदर, नैसर्गिक पर्याय मिळत गेले. घरापासून आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघरापासूनच पर्यावरण रक्षणाची सुरुवात करणार्‍या एका प्रेरणादायी प्रवासाची ही गोष्ट...
 

Environment
 
साधारणपणे 2018-2019चा कालावधी असेल, मुलीच्या ’होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धे’च्या प्रोजेक्टसाठी अभ्यास करताना एक सत्य समोर आले, घरात रोज वापरले जाणारे केमिकलयुक्त क्लिनर्स आणि डिटर्जंट्स नकळत नद्या, माती आणि पर्यावरण विषारी करत आहेत. घरात वापरल्या जाणार्‍या केमिकलयुक्त क्लिनर्स आणि डिटर्जंट्स यांसाठी पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचा विचार मनात आला आणि तिथून माझा विषमुक्त जीवनशैलीकडे प्रवास सुरू झाला.
 
 
व्हिनेगर, रिठे, शिकेकाई, बेकिंग सोडा अशा नैसर्गिक गोष्टी वापरून अनेक प्रयोग केले; पण तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी सोपा पर्याय सापडत नव्हता. एकदा सहज केस धुण्यासाठी शिकेकाई आणि रिठ्याचे मिश्रण वापरून पाहिले. काही महिन्यांनंतर लक्षात आले की केस अधिक मऊ झाले आहेत, केसगळती कमी झाली आहे अशा प्रकारे Shampoo नैसर्गिक पर्याय मिळाला.
 
 
यामुळे माझा उत्साह अजूनच वाढला. वेगवेगळे प्रयोग सुरूच होते आणि सापडले... BIO ENZYME.. फळांच्या विशेषतः लिंबूवर्गीय फळांच्या सालींपासून तयार होणारे हे नैसर्गिक क्लिनर पर्यावरणपूरक असल्याचे समजले. गूळ, संत्र्याच्या साली आणि पाणी हे सर्व घटक 1:3:10 या प्रमाणात मिसळून बाटलीत भरले आणि नव्वद दिवसांसाठी ठेवले. रोज बाटली हलवणे आणि तयार होणारा गॅस बाहेर सोडणे, या प्रक्रिया नियमितपणे केल्या. तीन महिन्यांनंतर बाटलीत सुंदर सोनेरी रंगाचे Bio Enzyme तयार झाले होते.
 
 
यानंतर त्याचा वापर करून Dishwashing Liquid तयार केले. रिठ्याचे द्रव, त्यात Bio Enzymeआणि Almond Gum वापरून छान घट्ट आणि परिणामकारक Dishwashing Liquid तयार झाले. Bio-enzymeच्या रूपाने डिटर्जेन्टसाठीही पर्याय मिळाला. गुलाब, संत्रे, लिंबू इळे-Bio-enzyme,च्या रूपाने  Floor Cleaner, Toilet Cleaner यांचेही पर्यावरणपूरक पर्याय तयार झाले. याचा अजून फायदा झाला आणि तो म्हणजे घरामध्ये येणारे प्लास्टिक कमी झाले.
 
 
या संपूर्ण प्रवासात मला एक महत्त्वाची गोष्ट जाणवली-‘पर्यावरण रक्षणाची सुरुवात अशी स्वतःच्या घरापासून आणि स्वयंपाकघरापासून झाली पाहिजे.’