गुजरातमधील वनवासी विभागात स्वाध्याय परिवाराचा ’वृक्षमंदिर’ अनावरण सोहळा

गुजरात : पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवारातर्फे परम पूजनीय निर्मलाताई आठवले यांच्या जन्मशताब्दीपूर्ति निमित्त त्यांच्या जन्मदिनी म्हणजे सोमवार दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झाला. गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यात कृतिभक्ति आणि दैवी संबंध यांवर आधारलेले दोन भव्य ऐतिहासिक कार्यक्रम एकाच दिवशी साजरे झाले. प्रथम चरणात कैडावांट या आदिवासी गावात आसपासच्या 20 वनवासी विस्तारात गावांतील स्वाध्यायींनी शेकडो ’बालतरूंची’ प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यानंतर क्वांट येथे 2.5 लाख पेक्षा जास्त वनवासी बंधु-भगिनींनी एकत्र येऊन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख आदरणीय धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या सान्निध्यात भाववंदना केली. कैडावांट येथे निर्मित वृक्षमंदिरात दीदींचे आगमन होताच, 20 गावांतील वृक्षमंदिराच्या दंपतीस्वरूपातील पुजार्यांनी पारंपरिक ’टीमली’ या नृत्याद्वारे दीदींचे अत्यंत ऊष्मापूर्ण स्वागत केले. त्यानंतर 2000 पुजारी दंपतींनी वैदिक मंत्रोच्चार, गणपती अथर्वशीर्ष, नारायणोपनिषद आणि श्रीसूक्तम्च्या पारायणाच्या घोषात शेकडो ’बालतरूंची’ प्राणप्रतिष्ठा करून भगवंताला तेथे स्थिर केले.
स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांची मुलाखत
यंदा या पाठशाळेने शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले आहे. पाठशाळेची शंभर वर्षे आणि दादांच्या जीवनाचा आधारस्तंभ दादांची पत्नी पूजनीय निर्मलाताईंचे जन्मशताब्दी वर्ष एकत्र यावे, हा जगभरात विखुरलेल्या स्वाध्यायींसाठी एक दुर्मीळ आणि भाग्याचा योग आहे. त्यानिमित्ताने पांडुरंगशास्त्री आठवले आणि निर्मलाताई यांच्या सुपुत्री तसेच स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
दीदींनी या पावन समयी म्हटले की,”तुम्ही ज्या वृक्षमंदिराच्या महान प्रयोगाचा संकल्प केला होतात त्याची पूर्णाहुति मी आज पूजा आणि प्राणप्रतिष्ठेने करते आहे.” तदनंतर त्याच दिवशी क्वांट मध्ये तापी ते दाहोद या परिसरातील 2.5 लाख पेक्षा जास्त वनवासी स्वाध्यायी कृतिशील एकत्रित झाले होते. या उत्सवात 20,000 पेक्षा जास्त युवक, दंपती आणि बालकांनी वनवासी बोलीभाषेतील ’आवे रे मुंबईथी दीदी मोर बोल्यो रे’ या गीतावर सामूहिक नृत्य करून वातावरण हर्षोल्लासाने भारून टाकले आणि अत्यंत उत्साहात भाववंदना केली. यावेळी संबोधित करताना पूजनीय दीदींनी अत्यंत आत्मीयतेने म्हटले की, ”तुम्ही आपल्या वैश्विक स्वाध्याय परिवारातील परम पूजनीय दादांचे अत्यंत लाडके आणि आवडते असे विशेष पुत्र आहात. माझ्यासाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे की ताईंच्या जन्मदिनानिमित्त माझ्या भावा-बहिणींना मी आज भेटते आहे. मी तुम्हांला divinity (मुख्य प्रवाह) पासून वेगळे करू इच्छित नाही. तुम्ही कुठे राहाता? कसे राहाता? त्याची मला माहिती नाही पण मला हे नेमके माहीत आहे की तुम्ही परम पूजनीय दादांचे आहात, आणि माझे भाऊ-बहीण आहात.”
पुढे वृक्षमंदिर आणि कृषि संस्कृतीची मूळ संकल्पना स्पष्ट करताना दीदी म्हणाल्या, ”हा काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, हे आमचे ’वृक्षमंदिर’ आहे. ''हा काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, हे आमचे 'वृक्षमंदिर' आहे. भगवंता! आम्ही तुला इथे वृक्षाच्या स्वरूपात निरखतो. कृषि संस्कृति म्हणजे भगवंतावरचे प्रेम आणि भगवंतावर १००% विश्वास. भगवान पेरलेल्या २ दाण्यांचे २०० दाणे करून देणार याचा शेतकऱ्याला विश्वास आहे.'' दीदी पुढे म्हणाल्या, ''२० घरांमुळे गावात ऐक्य येते, या प्रयोगामुळे २० गावांत भावनिक ऐक्य येते, २० गावांमुळे प्रांतात ऐक्य येते आणि प्रांतांच्या ऐक्याने राष्ट्रनिर्माण होते. त्यामुळे २० गावांचा 'वृक्षमंदिर' हा भक्तीच्या माध्यमातून ऐक्य निर्माण करण्याचा प्रयोग आहे.''.” मानवीय संबंधांच्या वर्तमान स्थितीवर मार्मिक भाष्य करताना दीदी म्हणाल्या, ”आज माणूस फायदा, मनोरंजन, उपयुक्तता किंवा तात्त्विक दृष्टीने संबंध बांधणे पसंत करतो, परंतु भक्तीच्या दृष्टीने संबंध बांधून सर्वांमध्ये एकच connect (दैवी तत्त्व) आहे या विचाराने आपण एकत्र होऊ शकतो. आज माणसा-माणसात ’Network Connectivity च राहिली नाही. त्यात भगवंताचे नेटवर्क टाकाल तर मग सर्वच कनेक्ट होऊन जाईल.” स्वाध्यायाच्या विचारांच्या शक्तीबद्दल दीदी म्हणाल्या, ”विश्वभरात जीवन परिवर्तनाची क्रांती करण्यासाठी मूठभर लोकच पुरेशी आहेत. ज्याप्रमाणे पाच लिटर दुधाचे दही करायला पाच किलो दही-ताक नाही लागत! एक वाटीच पुरते. वृक्षमंदिरात शक्ति आणि निपुणता अर्पण करून आपल्यासमोर जे उत्पन्न येते त्याला ’महालक्ष्मी’ म्हणतात. या अपौरुषेय लक्ष्मीची (Impersonal wealth) संकल्पना बघण्यासाठी विश्वाला तुमच्याकडे यावे लागेल. अर्थशास्त्रात अपौरुषेय लक्ष्मीचा चॅप्टर घालावा लागेल. अखेरीस दीदींनी या नूतन वृक्षमंदिराचे नामकरण केले : ’अंगीरा वृक्षमंदिर’. अंगीरा ऋषि यांचा वैदिक इतिहास सांगताना दीदी म्हणाल्या की पहिल्या मन्वंतरात सप्तर्षींमध्ये त्यांचे अग्रस्थान होते. ते ब्रह्म्याचे मानसपुत्र होते. ते दिव्य ज्ञानाचे शिक्षक आहेत. ते Humanity आणि Divinity यांमधील दुवा आहेत. त्यांचे विचार घेऊन विश्वात घेऊन जाणारे शिष्य ’अंगिरस’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे नाव आपल्याला सांभाळायचे आहे आणि त्यासाठी आपण ’अंगीरा वृक्षमंदिर’ हे नाव ठेवतो आहोत.
कार्यक्रमातील उल्लेखनीय बाब म्हणजे दीदींच्या मार्गदर्शनाने स्वाध्याय परिवाराच्या कृतिशीलांनी अत्यंत सूक्ष्मपणे केलेले पार्किंग, यातायात, बैठक व्यवस्था यांचे सुंदर आयोजन. याबरोबरच स्वाध्याय परिवाराच्या शिस्तीची क्वांट गावातील रहिवाशांनी पण विशेष नोंद घेतली.