आज आपण जागतिक स्तरावर घडत असेलल्या घडामोडींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, जगातील प्रमुख देशात सत्ता संघर्ष सुरू आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते आहे. ही लढाई सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी आहे, त्याचप्रमाणे आपली विचारधारा लादण्यासाठीही आहे.
या पार्श्वभूमीवर भारत म्हणून आपली काय भूमिका असायला हवी? सामर्थ्य संपन्नता हे त्यांचे एकमात्र उत्तर आहे. असे असले तरी आपल्या देशातील विविधता आणि विकासाचा आलेखही आपण लक्षात घ्यायला हवा.
लोकसंख्या, संसाधने, पर्यावरण, अन्नधान्य उत्पादन इत्यादी आवश्यक गोष्टींबरोबरच जागतिक पातळीवर सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी आहेत.
समर्थ भारत, विकसित भारत (भविष्यवेध ) २०४७ ग्रंथ नोंदणीसाठी येथे क्लिक करा...
सामाजिक सुसज्जता, तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगती व संशोधन, शिक्षण क्षेत्रातील बदल, आरोग्य सुविधा इत्यादी गोष्टींवर अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी निश्चित कालखंड नक्की करून त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. त्यासाठी आगामी वीस वर्षे भारताला सर्वश्रेष्ठ सामर्थ्ययुक्त आणि विकसित व्हावे लागले. या वाटचालीचा आराखडा म्हणजे
समर्थ भारत, विकसित भारत हा ग्रंथ होय.२०४७ साली आपला देश कसा असावा यांचे चिंतन प्रत्येक भारतीय नागरिकाने कर्तव्य म्हणून करणे आवश्यक आहे. त्या चिंतनाचा आरंभ बिंदू म्हणजे हा ग्रंथ. भारताच्या काल आणि आज इतकाच उद्याची सघन चर्चा, आपली बलस्थाने अधोरेखित करत तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आणि उद्याच्या नेतृत्वाची भविष्यातील स्वप्न शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न. सा. विवेकच्या आजवरच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारा भविष्यवेधी वैचारिक दस्तऐवज तरी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्या संग्रही असावा व भविष्याची वाटचाल त्याच्या सोबतीने व्हावी म्हणून आजच आपण ग्रंथाची नोंदणी करून सहकार्य करावे हि विनंती.
आपला
रवींद्र गोळे, ग्रंथ संपादक
ग्रंथ नोंदणी अभियान
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२६
ग्रंथ प्रकाशन : फेब्रुवारी २०२७
• ग्रंथ पृष्ठ संख्या: अंदाजे ३५०
• मराठी व हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित होणार