तीन रूपांतर् दशन देणारी कोराडीची जगदंबा

विवेक मराठी    18-Oct-2015
Total Views |


****पूजा अरुण लोहे****

कोराडीच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. विदर्भाची कुलदेवता असणाऱ्या या जगदंबेचे हे ठिकाण नागपूरपासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर आहे. दर वर्षी होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी देवीसमवेत हे गावही नटले आहे. अतिशय प्राचीन असणाऱ्या आणि कोराडी तलावाच्या काठावर असणाऱ्या या मंदिरात नऊ  दिवस अतिशय भार्वपूण आणि धार्मिक वातावरणात सोहळा साजरा करण्यात येतो.

नुकताच नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवासाठी विदर्भातील शक्तिपीठे सजली आहेत. अंबाबाईच्यार् दशनासाठी दूरवरून भाविक येत आहेत. अशीच गर्दी उसळत आहे ती कोराडीच्या जगदंबा देवीसाठी. विदर्भाची कुलदेवता असणाऱ्या या जगदंबेचे हे ठिकाण नागपूरपासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर आहे. दर वर्षी होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी देवीसमवेत हे गावही नटले आहे.

अतिशय प्राचीन असणाऱ्या आणि कोराडी तलावाच्या काठावर असणाऱ्या या मंदिरात नऊ  दिवस अतिशय भार्वपूण आणि धार्मिक वातावरणात सोहळा साजरा करण्यात येतो.

रौप्य मखरात विराजमान, हातामध्ये खड्ग, त्रिशूल, डमरू  आणि तलवार असणारी जगत्जननी प्रसन्न मुखाने भक्तांनार् दशन देते. मोहक आणि रेखीव असणाऱ्या देवीचे सूर्योदयाच्या वेळी आनंदी, हसरे - एखाद्या लहान बाळाचे रूप, मध्यान्ही तरुणीचे, तर सूर्यास्ताच्या वेळी प्रौढ महिलेच्या स्वरूपातील अशी तीन रूपे पाहावयास मिळतात. नवसाला पावणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या देवीच्या या तीन रूपांबद्दलची प्रचिती अनेक भाविकांना आली आहे. हातात शस्त्रे असली, तरी संकटात धावून येणारी माता जगदंबा म्हणून भाविकांमध्ये विश्वास आहे.

कोराडी हे गाव जगदंबेच्या मंदिरासाठी आधीपासूनच प्रसिध्द आहे. परंतु नंतर ते राज्यातील सर्वाधिक वीजनिर्मिती केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. औष्ण्ािक विद्युत निर्मिती केंद्रामुळे या लहानशा गावाचा कायापालट झाला असला, तरी कोराडीची जगदंबा देवी आजही भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.


देवीच्यार् दशनासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविक मोठया प्रमाणात येतात. नवरात्रात दर दिवशी सुमारे लाख भाविक देवीच्यार् दशनाने समाधानी होतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता भाविकर् दशन रांगेत उभे असतात.

घटस्थापनेपासून पुढे नऊ  दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये मंदिर परिसरात अखंड ज्योत तेवत असते. नवरात्रीच्या काळात 50 हजार तेलदिव्यांची आरास केली जाते. या वर्षी दिव्यांची संख्या 50 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. या वर्षी केवळ अखंड ज्योतींसाठी स्वतंत्र दीपमंडप उभारण्यात आला आहे. शाश्वत पूजेसाठी देण्यात येणाऱ्या देणग्यांमधून देणगीदाराच्या नावे नवरात्रात पूजा व अखंड ज्योत लावण्यात येते.

दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मंदिर परिसरात अन्नछत्र व भक्तनिवासाची निर्मिती करण्यात आली आहे, तर वाढत्या उन्हामुळेर् दशनसमयी होणारा त्रास वाचविण्यासाठी, महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनीच्या वतीने प्रत्येक र्मागावर भाविकांसाठी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या वर्षी नवरात्राच्या काळात 20 लाख भाविकर् दशनाला येतील अशी अपेक्षा विश्वस्तांनी व्यक्त केली असून त्यासाठीच्या सर्व सोयी परिसरात करण्यात आल्या आहेत.


कोराडी गावात जाण्यासाठी आणि भाविकांच्या सोईसाठी रस्त्यांची व्यवस्थादेखील उत्तम करण्यात आली आहे. देवीचेर् दशन व्हावे म्हणून अहोरात्र रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांसाठी 24 तासर् दशन खुले करण्यात आले असून 24 तासांपैकी आरतीसमयी केवळ 15 मिनिटे मंदिर बंद ठेवण्यात येते.

सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह मेटल डिटेक्टर व सीसीटीव्ही कॅमेरे यांची सोय करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव थाटात आणि सुरक्षित पार पडावा यासाठी त्यांनी विशेष व्यवस्था केली आहे.

कोराडी हे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असून त्यांचे सहकार्य देवस्थानला नेहमीच मिळत असते. जिल्हा परिषद सदस्य ते आज राज्याचे ऊर्जामंत्री हा उत्कर्षाचा प्रवास या जगदंबेच्या कृपेनेच झाला, अशी नामदार बावनकुळे यांची श्रध्दा आहे.

दु:खनिवारण करणाऱ्या, अडचणीत भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या आणि भक्तांच्या सदैव पाठीशी उभ्या राहणाऱ्या आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन भाविक कृतार्थ होऊन माघारी जातात. सर्ंपूण विश्वाची आई असलेली जगदंबा भाविकांच्या  प्रत्येक कामना निःस्वार्थीपणेर् पूण करते. या मातेच्या ॠणात आपण कायम राहावे, अशी भावना मनात ठेवून दर वर्षी अडचणींवर आणि संकटांवर मात करत भक्तर् दशनाला येतात. 

9766434242