लोकसखा विठ्ठल

11 Jul 2016 18:06:00

विद्याधर मा. ताठे

संस्कृत पुराण, ग्रंथ, स्थळमाहात्म्यपर पोथ्या, देवता माहात्म्यपर पोथ्या, श्ािलापट, ताम्रपट, संतांचे अभंग साहित्य, चतर्ुर्वग चिंतामणीसारखे महाकोश, 'विठ्ठल भूषण'सारखे लघुग्रंथ, आद्य शंकराचार्यांच्या 'पांडुरंग अष्टक'सारख्या साहित्यरचना, धनगरी लोकगीते, लोकमानसात रुजलेल्या कहाण्या, लोककथा आणि लोकगीते, ओव्या अशा विविध प्रकारच्या साधनांमधून वेगवेगळया काळातील विठ्ठलरूपाचेर् दशन आपणास घडते.

विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापि स्वरूपिणे।

विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नम:॥


स्कंदपुराणातील 'श्रीविठ्ठलस्तवराज'मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विश्वरूपाचे, विश्वव्यापकत्वाचे वरीलप्रमाणेर् वणन केलेले आहे. पंढरपूरनिवासी श्रीविठ्ठल देवता विलक्षण आगळीवेगळी आणि वैशिष्टर्यपूण अशी देवता आहे. 'श्रीविठ्ठल', 'पंढरीनाथ' आणि 'पांडुरंग' अशा विविध नावांनी या देवतेचा महिमा प्रसिध्द आहे. अनाथांचा नाथ, भक्तांचा प्राण, साधकांचा मायबाप, योग्यांचे निजधन, दीनाचा दयाळू, कृपेचा सागर, लावण्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, वारकऱ्यांची माउली आणि संतांच्या जीवीचा जिवलग संतसखा अशा अनंत वैश्ािष्टर्यपूण भावविशेषणांतून संतसाहित्यात पंढरीच्या विठ्ठलाचे आपणासर् दशन घडते. हिंदूंच्या बहुतेक देव-देवता या शस्त्रधारी, खङ्गसंपन्न आहेत. पण पंढरीचा विठ्ठल त्यास अपवाद आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचेच एक रूप मानल्या जाणाऱ्या 'विठ्ठल' देवतेच्या हातात ना चक्र आहे, ना गदा, ना धनुष्यबाण. श्रीविठ्ठलाचे आणखी एक वैश्ािष्टय म्हणजे तो द्विभुज आहे, चतुर्भुज नाही. त्याच्या कटीवर ठेवलेल्या दोन हातांपैकी डाव्या हातात ज्ञानाचे प्रतीक असलेला शंख आहे, तर उजव्या हातात पावित्र्याचे प्रतीकरूप कमळ (पद्म) आहे. भगवान विष्णूच्या चोवीस मूर्तींपेक्षा ही विठ्ठलमूर्ती वेगळीच व एकमेव असल्याने 'चोविसा वेगळा पंचविसावा' अशा शब्दात संतांनी विठ्ठलाचा गौरव केलेला आढळतो. 'श्रीविठ्ठल' हे नाव भगवान विष्णूच्या कोणत्याही अवतारात नाही. चोवीस प्रमुख नावांत नाही. तसेच विष्णुसहस्रनामातही नाही. म्हणूनच पंढरीचा श्रीविठ्ठल ही खरोखरीच आगळीवेगळी वैश्ािष्टर्यपूण देवता आहे. विश्वविख्यात मूर्तिविज्ञान तज्ज्ञ-संशोधक डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या मते - ''मूर्तींमध्ये भोगमूर्ती, वीरमूर्ती आणि योगमूर्ती असे प्रमुख प्रकार असतात व त्या मूर्ती स्थानक (उभी), शयन (पहुडलेली), आणि आसन (बसलेली) अशापैकी एका रूपात असतात. विठ्ठलाच्या हाती शस्त्र नाही म्हणून ती वीरमूर्ती नाही, विठ्ठलमूर्तीजवळ पत्नी नाही, त्यामुळे ती भोगमूर्ती नाही, म्हणून ती योगमूर्ती आहे आणि ती उभी असल्याने त्यास 'योगस्थानक' स्वरूपाची मूर्ती म्हटले जाते.'' अशा प्रकारे श्रीविठ्ठल ही एकमेवाद्वितीय अशीच देवता आहे.

विठ्ठलाच्या विविधरूपर् दशनाची साधने

पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीचा आरंभ नेमका केव्हा झाला? हे पुराव्याधारे सिध्द करणे फारच अवघड आहे. संत नामदेवांनी 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।' आणि 'जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर॥' अशा अभंगचरणातून 'पंढरी क्षेत्र' व 'विठ्ठल देवता' प्राचीन असल्याचे अतिशयोक्ती अलंकारयुक्त भावात्मकर् वणन केलेले आहे. यावरून पंढरपूर वा विठ्ठल हे फक्त फार जुने उपासना केंद्र असल्याचे स्पष्ट होते. पण किती जुने ते सिध्द होत नाही. संस्कृत पुराण, ग्रंथ, स्थळमाहात्म्यपर पोथ्या, देवता माहात्म्यपर पोथ्या, श्ािलापट, ताम्रपट, संतांचे अभंग साहित्य, चतर्ुर्वग चिंतामणीसारखे महाकोश, 'विठ्ठल भूषण'सारखे लघुग्रंथ, आद्य शंकराचार्यांच्या 'पांडुरंग अष्टक'सारख्या साहित्यरचना, धनगरी लोकगीते, लोकमानसात रुजलेल्या कहाण्या, लोककथा आणि लोकगीते, ओव्या अशा विविध प्रकारच्या साधनांमधून वेगवेगळया काळातील विठ्ठलरूपांचेर् दशन आपणास घडते. एवढेच नव्हे, तर एकेकाळचा गोपजनांचा लोकदेव सांस्कृतीकरणाच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर अभिमनांचा इष्टदेव कसा झाला? सकल संतांचा प्राणसखा कसा झाला? आणि महाराष्ट्राच्या सत्त्वधारेचा अधिष्ठान कसा बनला? या उन्नयनाची भावरम्यकथा वा अद्भुत कहाणी या विविध साधनांतून आपणास दिसून येते. संस्कृत भाषेतील
1) स्कंदपुराण 2) पद्मपुराण आणि 3) विष्णुपुराण यामध्ये 'पांडुरंग माहात्म्य' वर्ण्ािलेले आहे. स्थलपुराण-तीर्थक्षेत्र पुराण म्हणून या पुराणार्ंतगत कथांना विशेष महत्त्व आहे. या पुराणार्ंतगत पांडुरंग कथांना विशेष महत्त्व आहे. या पुराणार्ंतगत पांडुरंग माहात्म्याचा आधार घेऊन मराठीमध्ये संत प्रल्हादमहाराज बडवे आणि 'पांडवप्रताप' 'हरिविजय' ग्रंथाचे लेखक श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी 'पांडुरंग माहात्म्य' ओवीबध्द लिहिलेले असून भाविकांमध्ये त्या पोथ्या प्रसिध्द आहेत. आधुनिक महिपती म्हणून सुपरिचित संतकवी दासगणू महाराज यांनीही विठ्ठलस्तोत्र - पांडुरंगस्तोत्र लिहिलेले आहे. या सर्व संस्कृत-मराठी साहित्यातून भक्तराज पुंडलिक भेटीस आलेल्या परब्रह्म विठ्ठलाचे म्हणजेच अभिजनांच्या विठ्ठलदेवतेचेर् दशन घडते. पुंडलिक भेटीस आलेला देव खुद्द गोकुळीचा गोपाळ श्रीकृष्ण आहे. तो गोकुळीचा बाळकृष्ण आहे, तसाच तो द्वारकेचा राणा, रुक्मिणीवल्लभसुध्दा आहे. संतांच्या असंख्य अभंगांतून या दोन्ही कृष्णरूपांचेर् वणन विठ्ठलरूपात केलेले आढळते. अनेक संतांच्या अभंगगाथेमध्ये 'बाळक्रीडेचे अभंग' असे स्वतंत्र प्रकरणच दिसून येते. उदाहरण म्हणून आपण संत नामदेव महाराजांची अभंगगाथा पाहू, त्यामध्ये 'बाळक्रीडा' नावाची सलग तीन प्रकरणे असून बालकृष्णाच्या क्रीडर्ावणनाचे 68+76+64 असे एकूण 208 अभंग आहेत. त्याश्ािवाय 'श्रीकृष्णलीला' नावाच्या स्वतंत्र प्रकरणात 79 अभंग वेगळे आहेत. अशा प्रकारे सर्वच संतांच्या अभंगांतून आपणास 'गोकुळीचा बाळकृष्ण' व 'द्वारकेचा यदुराजा श्रीकृष्ण' अशा दोन्ही रूपांचे विठ्ठल म्हणूनर् दशन घडते.

भगवान श्रीकृष्ण गोकुळ वा द्वारका सोडून श्रीक्षेत्र पंढरपूरला येण्याची दोन प्रमुख कारणे सांग्ाितली जातात - 1) भक्त पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीच्या गौरवासाठी, 2) द्वारकेतून रुसून गेलेल्या धर्मपत्नी रुक्मिणीदेवीच्या शोधासाठी. या दोन्ही कारणांच्या कथा प्राचीन साहित्यात आहेत. पद्मपुराणातील 'पांडुरंग माहात्म्यात'  दिंडीरवनाची ही कथा आहे. ती वाचकांनी मुळातून पाहावी. पंढरपूरात विद्यमान विठ्ठल मंदिर प्राकारात रुक्मिणीदेवीचे एक स्वतंत्र मंदिर आहे. पण पद्मपुराणातर् वणन केलेले दिंडीरवन आजही विद्यमान असून तेथील लखूबाई मंदिर म्हणजेच रुसून बसलेल्या रुक्मिणीचे स्थान असे मानले जाते. सध्या वन नष्ट झाले असून मंदिर व मंदिरातील तांदळारूप मूर्ती मात्र श्ािल्लक आहे. जिज्ञासू वाचकांनी पंढरपूर भेटीत या स्थळाला आवर्जून भेट द्यावी.

ज्याच्यासाठी देव पंढरीस आला, त्या भक्त पुंडलिकाचेर् वणन व कथा पुराणात आणि संतसाहित्यात मोठया गौरवाने कथन केल्या गेल्या असल्या, तरी अभ्यासकांच्या-संशोधकांच्या मते पुंडलिक ही ऐतिहासिक व्यक्ती नसून भक्तभाविकांच्या भावविश्वातून-भक्तीतून निर्माण झालेले भक्तचरित्र आहे. पण विठ्ठलभक्त वारकरी समाजाने व सकल संतांनी भक्त पुंडलिकाला ऐतिहासिक मानूनच त्याच्या कार्याचा कृतज्ञतेने गौरव केलेला आहे. संत जनाबाई एका अभंगात म्हणतात - 1) जनी म्हणे पुंडलिका। धन्य तूचि तिही लोका॥ 2) पुंडलिक भक्तबळी। विठो आणिला भूतळी॥ अनेक संतांनी अनेक अभंगांतून भक्त पुंडलिकाचा असाच गौरव केलेला आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

गोपजनांचा लोकदेव

विदुषीर् दुगा भागवत, डॉ. रा.चिं. ढेरे, डॉ. दलरी, डॉ. सोन्थायमर यांच्यासह अनेक विद्वान संशोधकांच्या मते पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा वारकरी संतांच्या आधी महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र या दक्षिण भारतातील गाई-मेंढया पाळणाऱ्या गोपजनांचा लोकदेव आहे. या लोकदेवाचे सांस्कृतीकरणाद्वारे उन्नयन झाले आणि तो भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण अवताराच्या विठ्ठलरूपात परिवर्धित झाला, असे या संशोधकांचे मत आहे. तर डॉ. तुळपुळे, सोन्थामयर यांच्या मते विठ्ठल हे गोरक्षक गोपालक वीराच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्माण केल्या गेलेल्या वीरगळ स्मृतिश्ािलेचेच उन्नत रूप आहे. अर्थात वारकरी समाजाच्या व वारकरी संतांच्या भावविश्वात विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच रूप आहे. त्याची धारणा 'जे जे बोला। ते ते साजे या विठ्ठला।' अशी उदार आहे.

काहींच्या मते विठ्ठल हे वेदकालीन गोपजनांच्या 'पूषन' या देवतेचे सांस्कृतिक उन्नयन झालेले दैवतरूप आहे. पूषन देवतेचे खाद्य 'करंभा' आणि वारकरी संप्रदायातील 'काला' यामध्ये विलक्षण साम्य हा या मताच्या संशोधकांचा एक मुख्य आधार आहे. वारकरी सांप्रदायिक 'हरिनाम सप्ताह' आणि 'पंढरीची वारी' यांची सांगता ही गोपाळकाल्यानेच होते. गोपाळकाला हे वारकऱ्यांचे वैश्ािष्टय आहे. पर्ौण्ािमेच्या दिनी सर्व वारकरी आपापल्या दिंडया घेऊन भजन करीत पंढरपूरपासून दोन-तीन कि.मी.वरील 'गोपाळपूर' या ठिकाणी जाऊन तेथील गोपाळकृष्ण मंदिरात गोपाळकाल्याच्या सोहळयाने पंढरीच्या वारीची सांगता करतात. 'तुका म्हणे काला। तो हा वैकुंठी दुर्लभ।' जगद्गुरू संत तुकोबांनी 'वैकुंठी दुर्लभ' अशा शब्दात काल्याचेर् वणन केलेले आहे. हा गोपाळकाला म्हणजे दही-ज्वारीच्या लाह्या-मीठ-मिरची या पदार्थापासून बनविलेला असतो. यमुनेकाठी बालश्रीकृष्णाने सवंगडयांसमवेत क्रीडा करून अंती सर्वांच्या श्ािदोऱ्या एकत्र करून जी 'सामूहिक न्याहारी' केली, तद्वतच वारकरी काल्याची संकल्पना आहे. 'तुम्ही आम्ही खेळीमेळी आनंदे।' असा हा गोपाळकाल्याचा सोहळा साजरा होऊन वारकरी एकमेकांच्या मुखात काला प्रसादभावाने भरवितात. र्'वण अभिमान विसरली जाती' असा हा जातिर्-वण भेदाभेदाचे उच्चाटन करणारा काला, वारकरी विचारधारेतील समतेचे-समरसतेचेर् दशन घडवितो. असो. 'पूषण' देवतेच्या 'करंभा' खाद्यपदार्थाचा अनुमानजन्य परिचय व्हावा, म्हणून वारकऱ्यांच्या काला सोहळयाची माहिती पूरक ठरावी.

धनगरी लोककथा व लोकगीत

धनगर समाजात विठ्ठल व त्याची पत्नी पदू गवळण यांची लोककथा प्रसिध्द आहे. धनगरी गीतांमध्ये ही कथा आजही प्रचलित आहे. पदू गवळण म्हणजेच रुक्मिणी होय, अशी धनगरांची परंपरा मानते. पण पंढरपूरमध्ये पदूबाईचे उर्फ पद्मावती देवीचे स्वतंत्र मंदिर सध्याच्या विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेस 1 कि.मी. अंतरावर विद्यमान आहे. काही संशोधकांच्या मते पदू गवळण-रुक्मिणीचे स्थान दिंडीरवनातील 'लखुबाई' हे असावे. लखुबाई हे स्थान पंढरपूर नगरीच्या उत्तर भागात आहे. तेथे गंगादशहरा पर्वकाळी दहा दिवसांचा मोठा उत्सव आजही साजरा होतो. 'लखुबाई' हे रुक्मिणीदेवीचे पंढरपुरातील मूळस्थान असून सध्याच्या विठ्ठलमंदिर प्राकारातील रुक्मिणीमातेचे स्वतंत्र मंदिर नंतरच्या काळात निर्माण केले गेले असावे, असे काही संशोधकांचे मत आहे.

धनगर मेंढीपाळ समाजात 'बिरोबा' हे लोकदैवत प्राचीन काळापासून परंपरेने प्रसिध्द आहे. या विरोबाला वीरदेव म्हणूनही धनगरांमध्ये पूजले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्रमध्ये जेथे जेथे या बिरोबाची ठाणी (उपासना केंद्र) आहेत, तेथे तेथे बिरोबाचा अनुचर म्हणून 'विठोबा' (विठ्ठल-पांडुरंग) विराजमान असल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली हे बिरोबा-विठोबाचे संयुक्त ठाणे (उपासना केंद्र) आजही प्रसिध्द आहे. येथे वारकरी परंपरेप्रमाणेच धनगर लोक 'बिरोबा-विठोबा'ची भजनी दिंडयांसह पालखी काढतात. धनगर समाजाचा बिरोबा समवेतच विठाबाशी असलेला भावबंध विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाकडे दिशानिर्देश करणारा आहे. महाराष्ट्रात आपण धनगर मेंढपाळ म्हणून ज्या समाजाला ओळखतो, त्याला कर्नाटकात-आंध्र प्रदेशात 'गोल्ल व कुरूब' म्हणून ओळखले जाते. या गोल्ल-कुरूब समाजाच्या कर्नाटक-आंध्र प्रदेशातील उपासना ठाण्यांमध्येही वेगळया रूपात विठ्ठलाचेर् दशन घडते. कर्नाटक-महाराष्ट्र-आंध्र प्रदेशातील या धनगरी समाजातील प्रचलित लोककथा व लोकगीतांच्या प्रकाशात घडणाऱ्या पंढरीच्या विठ्ठर्लदशनाबद्दल विदुषीर् दुगा भागवत म्हणतात - ''कर्नाटक आणि महाराष्ट्र, त्याचप्रमाणे आंध्र यांच्या एकात्म संस्कृतीचेर् पूण प्रतीक म्हणजे पंढरीचा विठोबा होय.'' या तीन प्रांतांच्या भाषा भिन्न भिन्न असल्या, तरी त्यांची भावसंस्कृती एक आहे. संस्कृतीच्या जगातले हे एक मोठे नवल आहे.

श्रीविठ्ठलाविषयी लिहितानार् दुगा भागवत यांच्याप्रमाणेच, नुकतेच निधन झालेले थोर व्यासंगी संशोधक, लेखक डॉ. रा.चिं. ढेरे यांचे नाव व लेखन एक अपरिहार्य गोष्ट आहे. त्यांनी वेळोवळी व वेगवेगळया अंगांनी 'विठ्ठल'विषयक लेखन केलेले आहे.र् दुगा भागवतांनी गोपजनांचा लोकदेव म्हणून ज्या विठ्ठलाच्या संशोधक अभ्यासाचा श्रीगणेशा केला, डॉ. रा.चिं. ढेरे यांनी 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' याद्वारे त्यावरर् पूणत्वाचा कळस चढविला. डॉ. ढेरे आपल्या विठ्ठलप्रेमाबद्दल सांगताना म्हणतात - ''खरे तर श्रीविठ्ठल हा कळू लागल्याच्या वयापासून माझ्या प्रेमाचा, कुतूहलाचा अन् ओढीचा विषय. ज्या गावात अन् घरात माझे लहानपण गेले, ते गाव अन् घर श्रीविठ्ठलाच्या भक्तीने भारलेले होते.'' आपल्या 'विठो पालवित आहे' या प्रकरणात डॉ. ढेरे पुढे म्हणतात - ''गेली आठ शतके लक्षावधी मराठी मनावर प्रेमाने अधिराज्य गाजवणारा पंढरपूरचा श्रीविठ्ठल जसा भक्त-भाविकांना पालवतो आहे, तसाच तो शोधक-अभ्यासकांनाही पालवतो आहे. ज्ञानदेवांनी त्याला विश्वसौंदर्यातून अनुभवले आहे, नामदेवांनी त्याला प्रेमरूप मानले, तर तुकोबांनी त्याला रंजल्यागांजल्या जिवांचा सखा-सोयरा म्हणून स्वीकारले. साऱ्या भारतीय धर्मदृष्टीला कर्मठतेतून मुक्त करून तिला जीवनसन्मुख रसिकता प्रदान करणारा लोकसखा कृष्णच विठ्ठलरूपाने पंढरपुरात नांदतो आहे, अशी सकल संतांची धारणा आहे.''

थोडक्यात, दक्षिणेतील गोपजन, धनगरांचा एक देव लोकप्रियतेच्या श्ािखरावर जाता जाता श्रीविष्णूंचा अवतार श्रीकृष्णरूप कसा झाला आणि संतांच्या अभंगसाहित्याचा केंद्रबिंदू होऊन महाराष्ट्राच्या सत्त्वधारेचा मुख्याधार झाला, हे सांस्कृतिक जगतातील एक नवल म्हणजे श्रीक्षेत्र पंढरीचा श्रीविठ्ठल होय!

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल। देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल॥

9881909775

vidyadhartathe@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0