***सुकांत चक्रदेव***
रत्नाग्ािरी जिल्ह्यातील गणपतीपुळे देवस्थान हे पेशवेकालीन बांधणीचे आहे. या सिध्दिविनायकाच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणातदेखील आढळतो. हिंदुस्थानच्या आठ दिशांना आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळे येथील द्वारदेवता ही पश्चिम द्वारदेवता आहे. आज जेथे स्वयंभू गणेश मंदिर आहे, तेथे मोगलाईच्या काळात केवडयाचे बन होते. तेथे गणपती प्रकटल्याची आख्यायिका सांगण्यात येते.

बाळंभट भिडे हे त्या काळी गावाचे खोत होते. त्यांच्यावर एक संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चियी होते. आलेले संकट निवारण झाले, तरच आपण अन्नग्रहण करू, असा त्यांनी निश्चय केला. आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी त्यांनी केवडयाच्या बनात मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य केले. भिडेंची तपश्चर्या सुरूच राहिली. एके दिवशी त्यांना दृष्टान्त झाला की, मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामनार् पूण करण्यासाठी आगरगुळे येथून येऊन दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. डोंगर हेच माझे निराकार स्वरूप आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा-अर्चा कर, तुझे संकट दूर होईल. खुद्द मंगलमूर्तीने हा दृष्टान्त दिला. त्यानंतर भिडे सावध झाले.
त्याच काळात भिडे खोत यांची गाय दूध देत नव्हती. गुराख्याने लक्ष ठेवल्यावर, ती डोंगरातील विश्ािष्ट श्ािलेवर दुधाचा अभिषेक करत असल्याचे दिसले. त्यांनी खोतांना ही माहिती सांग्ाितली. त्या वेळी शोध घेण्यात आला. दृष्टान्तात सांग्ाितली गेलेली गणेशाची मूर्ती भिडेंना तेथे आढळली. त्याच ठिकाणी गवताचे छप्पर घालण्यात आले. हळूहळू छोटेसे मंदिर उभारण्यात आले. भिडे गुरुजींनी सारी धार्मिक कृत्य सुरू केली आणि पुढे गणपतीपुळयाचा गणेश सगळीकडे प्रसिध्द झाला.
गणपतीपुळयाच्या स्थानाचे माहात्म्य श्ािवरायांच्या कानी गेले. त्यांच्या दरबारातील एक प्रधान अण्णाजी दत्तो यांनी देवस्थानकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. त्यांनी त्यासाठी गणपतीपुळयाचा दौरा केला. या ठिकाणी गाभाऱ्याची घुमटी बांधण्याचे नक्की केले. पुढे आराखडा नक्की करण्यात आला. गवंडी वगैरे कलाकार बोलवून घुमटीची बांधणी झाली. यामुळे देवस्थानला राजाश्रयातून चांगली घुमटी बांधली गेली. या स्थानाचा विकास करण्यासाठी राज्याच्या त्यानंतरच्या सर्वच मराठी सत्ताधीशांनी आपापल्या परीने योगदान दिले.
प्रामुख्याने पेशवे दरबारातून या स्थानाला मोठी मदत दिली गेली. गोविंदपंत खेर बुंदेले, सांगली, मिरज, तासगाव, कुरुंदवाड इत्यादी संस्थानांचे पटवर्धन सरदार हेही या गणेशासमोर नतमस्तक होत असत. या सर्व सत्ताधीशांनी आपापल्या परीने स्थानाच्या विकासाला मदत केली.
गणपतीपुळे हे नाव कसे पडले, याचीही एक कथा सांगण्यात येते. पूर्वी त्या गावात फारशी वसती नव्हती. गावाच्या पश्चिम भागाला समुद्रकिनारा आहे. बराच भाग पुळणीचा आहे. गणपतीने गावाच्या पश्चिम किनारी निवास केला आहे. समुद्राच्या पुळणीच्या भव्य मैदानात गणपती महास्थान असल्यामुळे 'गणपतीपुळे' म्हटले जाऊ लागले.
र्निगुण व गणेशस्वरूप मानल्या गेलेल्या मंदिराच्या मागच्या डोंगराचे क्षेत्रफळ सुमारे 20 एकराचे आहे. पेशवाईच्या पूर्वी - म्हणजे सुमारे 400 वर्षांपूर्वी त्या वेळच्या वास्तुश्ािल्पाच्या प्रचलित पध्दतीनुसार 8#8 फूट आकाराचे चिऱ्याचे बांधकाम चुन्यामध्ये करण्यात आले. हाच गाभारा झाला. आतमध्ये गणेशाचे गंडस्थळ व उदररूप असणारी श्ािला व मागे हिरव्यागार वनराईने नटलेले टेकडीस्वरूप मस्तक अशा टेकडीला गणपती मानून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा येथे आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना पश्चिम द्वार आहे. हे चार फूट उंचीचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे नतमस्तक होऊन गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. प्रत्येक वर्षात बारा संकष्टी चतुर्थी, दिवाळी, दसरा, पाडवा, माघ शुध्द चतुर्थी, भाद्रपद शुध्द चतुर्थी अशा सतरा वेळा पेशव्यांनी अर्पण केलेल्या चांदीच्या गणेशमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. या वेळी सनई-चौघडा, भालदार-चोपदार, निशाणकरी, भटजी, पुजारी, पुराण्ािक, गुरव असे विविध मानकरी अठरापगड जातीतील भाविक सहभागी होत असतात. सर्वसमावेशक असा हा आनंददायी सोहळा असतो. टाळ-मृदुंगाच्या गजरात 'मंगलमूर्ती माझे आई, मजला ठाव द्यावा पायी' अशी गणेशाची विविध भजने म्हणून प्रदक्षिणार् पूण करण्यात येते. प्रदक्षिणार् पूण झाल्यावर पालखी मंदिरात येते. तेथे आर्थिक मंत्रपुष्प प्रसादवाटप झाल्यावर सोहळार् पूण होतो.
मात्र भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 6.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत - म्हणजे सूर्योदयापासून सुमारे 6 तास विशेषर् दशन योग असतो. वर्षभर गणपतीच्या गाभाऱ्यात केवळ सोवळे परिधान केलेल्यांना प्रवेश दिला जातो. तथापि भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गावातील सर्वांना नागरी वेषात गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. गणपतीपुळे पंचक्रोशीमध्ये घरोघरी गणपती आणण्याची प्रथा नाही. गणपतीपुळयाप्रमाणेच जी जी गणेशस्थाने आहेत, तेथील परिसरात पार्थिव गणेशमूर्ती घरी आणून उत्सव साजरा करण्याची प्रथा नाही. मंदिरातील गणेशमूर्तीची सेवा करणे, त्याचाच उत्सव करणे या परंपरा पाळल्या जातात. गणपतीपुळे पंचक्रोशीतही अशीच प्रथा पाळली जाते.
सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी भाविक लोक रांगेने गणेर्शदशनासाठी उभे राहतात. गणपतीपुळे परिसरात यार् दशनासाठी स्थानिक रहिवासी मोठया प्रमाणात येत असतात. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्व जणर् दशनाला आवर्जून येत असतात. गणपतीपुळे परिसरातून मुंबई, पुणे आदी परवागी नोकरी-उद्योगधंद्यानिमित्ताने गेलेले लोक भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गावाकडे आवर्जून येतात. हे सर्व जण चतुर्थीच्या गणेर्शदशनासाठी वेळेवर उपस्थित असतात.
गणेशमूर्तीजवळ तीर्थाचे स्थान आहे. देवळाच्या ईशान्य कोपऱ्यात डोंगरात मोठे काळे दगड आहेत. त्यातून पाणी वाहत असते, त्याला नाभी गंगोदक म्हणतात. पूर्वी हे गंगोदक वर्षभर उपलब्ध असे असे म्हणतात. अलीकडे मात्र केवळ पावसाळयात ते उपलब्ध असते. भाद्रपदातील गणेश चतुर्थीलार् दशन घेणारे अनेक भाविक हे तीर्थ भरून घेतात. हे तीर्थ घरी नेले जाते. भाविक लोक पुढील दीड दिवस अथवा पाच दिवस गणेशस्वरूप असलेल्या तीर्थाचे पूजन करत असतात. त्यानंतर तीर्थ विसर्जित केले जाते. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरून आलेले बरेच भाविकर् दशनासाठी रांगेत असतात. त्याश्ािवाय गणपतीपुळे पंचक्रोशीतील लोक मोठया प्रमाणात गाभाऱ्यापर्यंत प्रवेशासह होणाऱ्यार् दशनाला उपस्थित असतात.
भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा थेट गाभाऱ्यात जाऊनर् दशन घेण्याचा वर्षातील एकमेव योग आहे. हा योग चुकू नये म्हणून नेवरे, निवेंडी, मालगुंड, गणपतीपुळे पंचक्रोशीतील स्थानिक लोक प्रयत्नशील असतात. श्रध्दावान त्यासाठी योग्य नियोजन करतात. ज्यांना चालणे शक्य नाही असे लोक वाहनाद्वारे मंदिरापर्यंत येत असले, तरी अनेक जण गणेर्शदशनासाठी घरापासून मंदिरापर्यंत चालत जात असतात. मंदिरातीलर् दशनाबरोबर टेकडीस्वरूप असलेल्या गणपतीला प्रदक्षिणा घालण्याचे कार्य हातून घडावे, म्हणून कित्येक भाविक भाद्रपदातील चतुर्थीचा मुहूर्त साधत असतात. प्रदक्षिणा र्माग सुमारे एक किलोमीटरचा आहे.
भाद्रपदातील गणेश चतुर्थीला संध्याकाळी 4 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेला निघते. या वेळी भाविक मोठया प्रमाणात उपस्थित असतात. सकाळी सूर्योदयापासून पुढच्या 6 तासात धुतलेल्या कपडयानिशी गाभाऱ्यात जाऊन देर्वदशन आणि संध्याकाळचा पालखी सोहळा याचा लाभ भाविक घेत असतात.
भाद्रपद शु. प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत श्रींचा उत्सव चालतो. त्यामध्ये पाच वेळा आरती व रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाला विशेषत: स्थानिक ग्रामस्थांचा प्रतिसाद असतो. वर्षभरातील उत्सवांना स्थानिकांसोबत बाहेरगावाहून आलेले भक्तगण सहभागी असतात. तथापि भाद्रपदातील उत्सवाला स्थानिक लोक सहभागी झालेले असतात.
नेहमी येणारे भक्तगण समुद्रस्नान करून नंतर साध्या पाण्याने स्नान करतात. सोवळे नेसून श्रींची पूजा, अभिषेक, आरती पुजाऱ्यांमार्फत करतात. येथील समुद्रस्नान विशेष पुण्यप्रद असल्याचे मानण्यात येते. तथापि हा समुद्र धोकादायक असल्याचा प्रशासनाचा इशारा आहे. केवळ किनाऱ्यावर आंघोळ करून यावे अशा सूचना आहेत.
दर वर्षी फेब्रुवारी व नोव्हेंबर या महिन्यांच्या 2 ते 8 तारखांच्या कालावधीत सूर्यकिरण गणेशाच्या स्वयंभू मूर्तीला सर््पश करतात. हा एक विशेष योग मानण्यात येतो. त्या वेळी गणेर्शदशन घेण्याची पर्वणी भाविक साधत असतात.
पुराणामध्ये गणपतीपुळे स्थानाचा उल्लेख पश्चिम क्षेत्राची देवता म्हणून केला आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपेक्षा देशभरातील वेगळे अष्टविनायक सांगण्यात आले आहेत. मद्रास-चेन्नई येथील वक्रतुंड, केरळमधील एकदंत, रामेश्वरमजवळ महोदर, तंजावर येथील गजानन, गणपतीपुळे येथील लंबोदर, काश्मीर येथील विकट, हिमालयातील विघ्नराज, तिबेट येथील धूम्र्रवण ही गणपतीचे आठ स्थाने सांगण्यात आली आहेत. गणपतीपुळयाच्या लंबोदराचे स्थान पाचवे आहे.
पुराणातील या उल्लेखामुळे देशभरात पसरलेल्या अष्टविनायकांची पूजा होत असते. त्यासाठी काही जण देशभराची भ्रमंती करत असतात. गणपतीपुळे हे 775 हेक्टर क्षेत्राचे गाव असून 2011च्या जनगणनेनुसार या गावात 304 कुटुंबे राहतात. गावची लोकसंख्या 1236 आहे. हे गाव रत्नाग्ािरी शहरापासून 25 किलोमीटरवर, तर मुंबईपासून ते सुमारे 350 किलोमीटरवर आहे.
अर्वाचीन काळामध्ये फेब्रुवारी 2003मध्ये जगद्गुरू जयेंद्र सरस्वती यांच्या हस्तेर् जीणोध्दारानंतर मंदिराचे कलशारोहण झाले. त्या वेळी राज्याचे नेते शरद पवार उपस्थित होते. सध्या दररोज दुपारी 12 ते 2 या वेळात मंदिर संस्थानतर्फे खिचडी प्रसाद, तर सायंकाळी 7.15 ते 8.15 या वेळात पुलाव-श्ािरा असा प्रसाद देण्यात येतो. दररोज सरासरी 800हून अधिक भाविक त्याचा लाभ घेत असतात. दर वर्षी मंदिरात सुमारे 18 ते 20 लाख भाविकर् दशनाचा लाभ घेत असतात. मंदिरापासून जवळच राजवाडी भगवतीनगर येथे भक्तनिवास उभारण्यात आला. यामुळे मोठया प्रमाणात भक्तांची निवाससोय होत आहे. त्या ठिकाणी 70 हजार चौ.फुटाचे बांधकाम झाले असून एकाच वेळी 500 भाविकांची रहिवासाची सोय करण्यात आली आहे.
देवस्थानने नव्याने नक्षत्र उद्यानाची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरवले आहे. 27 नक्षत्रांचे वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे जीवविविधता व पर्यावरण संरक्षणास मदत होत आहे.
गणपतीपुळे येथे जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महार्मागावर संगमेश्वर-हातखंबा दरम्यान निवळी येथून रस्ता आहे. निवळी ते गणपतीपुळे असे 35 किलोमीटर अंतर आहे. किंवा रत्नाग्ािरी शहरातून आरेवारे र्मागे पर्यायी रस्ता आहे. रेल्वेने रत्नाग्ािरी स्थानकावर उतरून खासगी वाहनाने किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मंदिरापर्यंत पोहोचता येऊ शकते. मंदिर संस्था अल्प दरात निवास व्यवस्था करू शकते. त्याश्ािवाय गणपतीपुळे व शेजारच्याच मालगुंड गावात अनेक घरांमध्ये निवास व्यवस्था करण्यात येते. या परिसरात अनेक लोक घरचे पाहुणे म्हणून आलेल्या भाविकांचे आतिथ्य व्यावसायिक पध्दतीने करतात. याश्ािवाय वेगवेगळी हॉटेल्स राहण्या-जेवण्याची व्यवस्था करतात.
- प्रतिनिधी, रत्नाग्ािरी