जालना जिल्ह्यातील परतूर हे तालुक्याचे छोटे ठिकाण. येथे परंपरागत शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांच्या अंगावर जात्यंध समाजकंटकांनी दगडफेक करून मोठी दंगल घडवली. त्यामध्ये अनेकांची डोके फुटली, तर पन्नास लाखाहून अधिक मोठया रकमेची मालमत्ता जळून राख झाली. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या मनोवृत्तीचाच परतूरमध्ये हा एक अंक बघायला मिळाला.

जालना जिल्ह्यातील परतूर हे तालुक्याचे छोटे ठिकाण. येथे परंपरागत शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांच्या अंगावर जात्यंध समाजकंटकांनी दगडफेक करून मोठी दंगल घडवली. त्यामध्ये अनेकांची डोके फुटली, तर पन्नास लाखाहून अधिक मोठया रकमेची मालमत्ता जळून राख झाली. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या मनोवृत्तीचाच परतूरमध्ये हा एक अंक बघायला मिळाला.
परतूर शहराचे ढोबळमानाने दोन भाग आहेत. यात मोंढा हा व्यापारी भाग रेल्वे स्थानकापासून लगत, तर पुढे थोडया अंतरावर जुने गाव आहे. परतूर शहराला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पानिपताच्या लढाईचा बेत मराठा सैन्याने येथेच आखला होता व येथूनच पुढे उत्तरेकडे कूच केले होते.
मोंढा भागातून शिवजयंती मिरवणुकीचा शुभारंभ झाला. शिवप्रतिमा असलेला रथ मध्यभागी ठेवून मिरवणूक थाटामाटात चालली होती. मिरवणुकीतील तरुण उत्साहाने घोषणा देत होते. या जिल्ह्यातील सर्व प्रमुख गावांतून शिवजयंतीच्या मिरवणुका निघालेल्या होत्या.
साधारणपणे रात्री साडेआठच्या सुमारास परतूरची मिरवणूक मोढयांतून गाव भागाकडे पोहोचली. वाटेत लागणाऱ्या पोलीस स्थानकाच्या समोरून ही मिरवणूक पुढील चौकापर्यंत मोठया उत्साहाने गेली. परतूर पोलीस स्थानकांपासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या दसमले चौकात ही मिरवणूक पोहोचली आणि येथेच ही घटना घडली.
काँग्रेसची सत्ता असलेल्या नगर परिषदेच्या माध्यमातून या दसमले चौकाचे 'मंगलशहा चौक' असे नामांतर करण्यात आले. अर्थातच विशिष्ट गठ्ठा मतांच्या राजकारणातून हे नामांतर करण्यात आले. मात्र नामांतर झाल्यापासून या भागात दहशतवादी तत्त्वांची चिन्हे दिसू लागली. अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या इमारती आणि त्यात लटकणाऱ्या हिरव्या फराऱ्या आणि जागोजागी लोंबकळत असलेल्या हिरव्या रंगाच्या पताकांनी हा परिसर कायमचा वेढलेला असतो.
शिवजयंती मिरवणूक दसमले चौकात पोहोचली. मिरवणुकीतील ध्वज लागून लोंबकणाऱ्या काही फराऱ्या तुटल्या, एवढेच काय ते निमित्त झाले. त्यानंतर मात्र काय होतेय ते क्षणभर कुणाच्याही लक्षात आले नाही. काही जात्यंध समाजकंटकांनी रस्त्याच्या कडेला बांधकामासाठी पडलेल्या विटा आणि दगड मिरवणुकीतील सहभागींच्या अंगावर फेकणे सुरू केले. या वेळी मिरवणुकीत अवघे दोन पोलीस होते. सगळीकडे अचानक पळापळ सुरू झाली. चार ते पाच जणांचा कपाळमोक्ष झाला. काही सावध तरुणांनी मात्र छातीचा कोट करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला समाजकंटकांना हात लावू दिला नाही. त्यांनी अंगावर दगड झेलले आणि शिवरायांच्या रथाला सुरक्षितपणे पोलीस स्थानकामध्ये आणले. या सर्व दंगलीत शिवप्रतिमेला जर काही धक्का बसला असता, तर पुढे काय अनर्थ झाला असता, याची कल्पना न केलेली बरी.
दरम्यानच्या काळात दगडफेक करणाऱ्या अतिरेक्यांनीच जोरदार हल्लाबोल सुरू केला व येथूनच गोंधळाला सुरुवात झाली. बघता बघता दुकाने पेटली. रस्त्याच्या कडेला उभी असलेली काही वाहने पेटली. शिवजयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी दिली होती. मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. शिवभक्तांच्या अंगावर पहिल्यांदा दगडफेक करण्यात आली. मिरवणुकीत वाद निर्माण करणारे अचानक समोर आले. असा अचानक उद्रेक शक्य नाही. या दंगलीची निश्चितच पूर्वतयारी झाली असावी. त्याबाबत नेमका शोध घेण्याची गरज आहे.
दसमले चौक ते पुढच्या भागातील वसाहतीत नेमक्या कोणत्या अराष्ट्रीय तत्त्वांचा संचार आहे, हेदेखील शोधण्याची आवश्यकता आहे. परतूरमध्ये झालेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवरील हल्ल्याचे खरे सूत्रधार याच राजकारणाचा एक भाग आहेत, असे स्पष्टपणे दिसत आहे.
शिवजयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांचा बंदोबस्त तुटपुंजा असल्याची दंगलग्रस्तांना जाणीव झाली होती. परतूर नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे मिरवणुकीच्या मार्गावरील बांधकाम साहित्य - ज्यात विटा आणि दगड रस्त्यावरच होते, ते समाजकंटकांनी आयते वापरले. मिरवणुकीचा मार्ग मोकळा असणे आवश्यक असते. रस्त्यात जागोजागी लोंबकळत असलेल्या फराऱ्या तुटल्यामुळे अचानक एवढा मोठा उद्रेक कसा झाला ते समजत नाही. या सर्व दंगलीत शिवप्रतिमेला लक्ष्य करण्यासाठी निश्चितच काही हात सरसावले होते. पण जागृत शिवभक्तांच्या तत्परतेमुळे ही भयंकर घटना घडली नाही.
परतूरमध्ये सध्या तरी शांतता आहे. समाजविघातक तत्त्वांच्या एकगठ्ठा मतांसाठी वेगळाच उदोउदो करणाऱ्या राजकीय शक्तीचा संचार सुरू झाला आहे. दंगलग्रस्तांना कठोर शासन करण्याची गरज आहे. अन्यथा परतूरमध्ये आज जे काही घडले, ते असेच दडपून टाकले, तर अशा घटना यानंतरही घडतच राहतील.
रात्रीचे साडेआठ ते साधारणपणे दहा या दीड तासात दंगल झाली. पोलीस अधीक्षक ज्योती प्रिया सिंह यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जालन्याहून त्या परतूरमध्ये पोहोचल्या आणि दंगल आटोक्यात आली. अतिशय किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादानंतर परतूर शहरातील सर्व राजकीय पक्षनेत्यांनी परस्परांचे अभिनिवेश बाजूला ठेवून पहिल्यांदा तणावाचे वातावरण लगेच हलके करण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवसेनेचे माधवराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी एकत्र येऊन लोकांना धीर दिला. सर्वांना सामंजस्याने एकत्रित केले आणि वातावरण शांत केले.
शिवजयंती मिरवणुकीत झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. परतूर शहराची बदनामी करणारी ही घटना असून यापुढे असे प्रकार कदापिही घडता कामा नयेत, यासाठी विशेष काळजी घेऊ. या प्रसंगी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत आणि दंगलग्रस्तांना मदत मिळेल यासाठी आपण स्वत:च प्रयत्न करणार आहोत, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रतिपादन केले. परतूर तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार बंडू जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योती प्रिया सिंह उपस्थित होत्या.
परतूरची घटना दुर्दैवीच असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आणि शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासोबत भेट घेऊन दंगलग्रस्तांना निश्चित सकारात्मक मदत मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कय्युमखान पठाण, परवेज देशमुख, अखिल काजी, जोहर हाजी, आर.के. खतीब, श्यामसिंग ठाकूर, बाबासाहेब तेलगड, भगवान मोरे आदी स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे व सामाजिक सलोख्याचे आवाहन केले आहे
9423731480