
गावातील नागरिकांच्या संपर्कात आर्ट ऑॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आले आणि मग या सर्व गावांना दररोज सकाळी नित्यनेमाने जाऊन गाठीभेटी आणि त्यातूनच परस्पर समन्वयाचा नवा अध्याय या सर्व साधकांनी सुरू केला. या प्रत्येक गावातील दोन तरुण निवडून त्यांना बंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर हे तरुण आपल्या गावी परतले ते परिवर्तनाचा विडा उचलूनच... आणि सुरुवात झाली - शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि शेती. आज ही सगळी गावे संपूर्णपणे स्वत:च्या प्रयत्नाने उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर झाली आहेत.
हात फिरवला तिथे लक्ष्मी वास करते ...अशी मराठवाडयात एक म्हण आहे. परंतु प्रत्यक्षात उघडयावर शौचास बसण्याची फार मोठी अन् जुनी अंगवळणी पडलेली एक सवय इकडे लोकांना जडली आहे. आजच्या घडीला ग्रामीण भागात जवळपास सर्वच गावांत जाणाऱ्या पांदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्षरश: नरक पसरलेला दिसतो, याचे कारण म्हणजे उघडयावर सगळया कार्यक़्रमालाच सगळयांचे प्रथम प्राधान्य असते. मग काय करणार? सरकारच्या स्वच्छता मोहिमेच्या फेऱ्या एकीकडे चालू, तर दुसरीकडे आपली लोटा परेड झिंदाबाद!
अशा या सर्व परिस्थितीमध्ये बदल घडवायचा असेल, तर केवळ सरकारच्या त्या दूरदर्शनवर चाललेल्या जाहिरातींनी आणि बारा हजार रुपयांच्या अनुदानाने फार काही फरक पडत नाही. अनुदान उचलून घरात शौचालय बांधायचे, त्यात शेळया-मेंढया बांधायच्या नाहीतर कापसाच्या पळाटया, सरपण साठवायला जागा करून पुन्हा आपल्या मोकळया हवेच्या कार्यक्रमालाच लोक पहिली पसंती देतात, ही वस्तुस्थिती आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑॅफ लिव्हिंग या उपक्रमाने जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सहा गावांत शौचालयातून ग्रामीण विकासाची एकत्र सांगड घातली आहे आणि हेच असे आध्यात्मिक उपक्रम मराठवाडयातील गावागावांत खेडयापाडयापर्यंत लोकांच्या मानसिक परिवर्तनाची नांदी ठरतील असे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील एकंदरीत नऊ आणि त्यातूनच पाच जालना जिल्ह्यातील गावे या शौचालय उभारणीतून ग्रामविकास या संकल्पनेवर काम करण्यासाठी निवडण्यात आली. याच गावातील नागरिकांच्या संपर्कात आर्ट ऑॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आले आणि मग या सर्व गावांना दररोज सकाळी नित्यनेमाने जाऊन गाठीभेटी आणि त्यातूनच परस्पर समन्वयाचा नवा अध्याय या सर्व साधकांनी सुरू केला. या प्रत्येक गावातील दोन तरुण निवडून त्यांना बंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर हे तरुण आपल्या गावी परतले ते परिवर्तनाचा विडा उचलूनच... आणि सुरुवात झाली - शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि शेती. आज ही सगळी गावे संपूर्णपणे स्वत:च्या प्रयत्नाने उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर झाली आहेत.
सरकार हे लोकांच्या भावनेचे प्रतिबिंब असते. आपल्या मानसिकतेच्या बदलातूनच विकासाच्या कामांना विशेष गती मिळेल आणि त्यातूनच प्रगतीचा मार्ग विस्तारेल. दर्जेदार, चांगले, नावीन्यपूर्ण शिक्षण आणि त्याला भारतीय आध्यात्मिक विचारांच्या संस्कारांची जोड हाच आमच्या भारताला महासत्ता बनविण्याचा महामंत्र आहे. संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी श्री श्री रविशंकर, स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रेरणेने या सर्व संदर्भात चाललेल्या ग्रामीण भागातील परिवर्तनाच्या कामांची आज खूप मोठी आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. परतूर तालुक्यातील एदलापूर येथे शौचालय उभारणीतून ग्रामविकास या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
''आपल्या देशात प्रगतीचे वारे निश्चितपणे सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी, आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी सगळयांनीच अतिशय आवर्जून मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. परिवर्तनाची लाट आली आहे. केवळ सरकारच्या विकासाच्या योजना आणि त्यातूनच मला त्याचा काय फायदा होतो? याचा विचार करत बसू नका. खाजगी क्षेत्रातील कारखानदारांनी पुढे येऊन चालवलेल्या या सर्व उपक्रमाची आज खूप मोठी गरज आहे. तरच संपूर्ण समाजाला निश्चितपणे सकारात्मक एकात्मतेचे वळण मिळेल'' असे बागडे यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षांचा वर्गपाठ
''केंद्र व राज्य सरकारच्या विविध समाजकल्याणाच्या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना आपण माहिती करून दिली पाहिजे आणि त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे, हीच खरी समाजसेवा आहे. बाकी दुसऱ्या काही भानगडीत जाऊ नका. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या सर्व योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी पूर्णवेळ काम करा'' असे कार्यकर्त्यांना सांगून बागडे यांनी पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, किशोरी विकास योजना, पीक विमा योजना, शौचालय अनुदान, उज्ज्वला गॅस योजना या सर्व संदर्भात सगळी माहिती देत उपस्थित ग्रामस्थांचा अक्षरश: एक वर्गपाठ घेतला.
''स्वच्छता या विषयात महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशभरात सर्वप्रथम क्रमांकावर आहे आणि श्री श्री रविशंकरजी, स्वामी रामदेवबाबा आणि याच अशा अनेकविध थोर समाजसुधारक संत-महात्मे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनानुसार चाललेल्या प्रबोधन चळवळीला मोठया प्रमाणात याचे श्रेय आहे'' असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रतिपादन केले.
''शौचालये बांधण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू आहे. मात्र शौचालय वापरण्याची मानसिकता समाजाला शिकवण्यासाठी अशाच जोरदार सामाजिक समरसतेच्या उपक्रमाची आणि प्रत्यक्ष चळवळीची गरज आहे'' असे ते म्हणाले.
आयएएचव्ही आणि गुडइयर या खाजगी क्षेत्रातील टायर निर्माण करणाऱ्या कंपनीच्या सीएसआर फंडातून परतूर तालुक्यातील खांडवीवाडी 55, खडकी 48, नांद्रा 62, यदलापूर 69, जायगाव जिल्हा सातारा 77, अहमदनगर जिल्ह्यातील सिरसगाव 84 आणि पिंपळगाव 60, वाशिम जिल्ह्यातील हिवरा रोहीला 75 व धानोरा 130 अशा एकूण 660 शौचालय उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ शौचालय बांधून प्रत्येक घरातील सगळे त्याचाच वापर करतात. गावातील परिसरातील घाण संपली आहे. आता नव्या समृध्दीचा महामार्ग शौचालयातून असा विकसित झाला आहे.
श्रीश्री रविशंकरजी यांच्या ग्रामीण विकास योजनांच्या माध्यमातून चालणाऱ्या परिवर्तन प्रकल्पाचे मराठवाडा समन्वयक प्रा.डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी गुडइयर कंपनीचे अधिकारी पंकज गुप्ता, आयएएचव्ही कंपनीच्या अधिकारी रुक्मिणी प्रभाकर, मिलिंद बसोले, दर्शक हाथी, अंकुश भालेकर, अंकुर गुप्ता, सोमनाथ सोनवणे, परमेश्वर राजबिंडे, प्रभंजन महातोळे, पूजा पुंदीर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, ज्येष्ठ उद्योजक घनश्याम गोयल, किशोर अग्रवाल, माजी आमदार अरविंद चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते.
हजार लोकवस्ती असलेले एदलापूर हे छोटे खेडेगाव खूपच सुंदर पध्दतीने सजले होते. स्वच्छतेचा आणि प्रसन्नतेचा वर्षाव होता. प्रत्येक घरावर गुढया आणि मंगल तोरण बांधून सडा आणि प्रचंड मोठया अतिशय सुरेख रांगोळया काढून गावातील प्रत्येक महिला व पुरुष, लहान मुले रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ''ज्ञानदेव तुकाराम'' असा जयघोष करत होते आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमास परतूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक आणि विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी त्यांचे एक परंपरागत नृत्य या वेळी सादर केले. अतिशय रेखीव आणि प्रेरणादायी हा कार्यक्रम झाला
श्री श्री रविशंकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांनी आश्रमात विशेष प्रशिक्षण घेतले आणि त्यातूनच ग्रामीण भागातील परिवर्तनाच्या कामांची जवाबदारी स्वीकारली आहे.
9423731480