हे सोशल मीडिया प्लॅटफर्ॉम्स माहीत आहेत का?

10 Jan 2018 17:44:00

सोशल मीडियावर आजची तरुणाई मोठया प्रमाणात अवलंबून आहे. मात्र यात फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, यूटयूब हे प्रसिध्द प्लॅटफर्ॉम्स वगळता अन्य मजेशीर आणि उपयुक्त सोशल मीडिया प्लॅटफर्ॉम्स आपणास माहीत आहेत का?

 सोशल मीडिया आजच्या युगाचे अगदी हक्काचे ठिकाण आहे. जेथे व्यक्तीला पूर्णपणे व्यक्त होता येते, जेथे सर्जनशीलतेला पूर्णपणे वाव मिळतो, जेथे जगाशी स्वत:ला जोडून घेणे अत्यंत सोपे आहे, तसेच विविध क्रिया-प्रतिक्रियांचे जे माहेरघर आहे, अशा सोशल मीडियावर आजची तरुणाई मोठया प्रमाणात अवलंबून आहे. मात्र यात फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, यूटयूब हे प्रसिध्द प्लॅटफर्ॉम्स वगळता अन्य मजेशीर आणि उपयुक्त सोशल मीडिया प्लॅटफर्ॉम्स आपणास माहीत आहेत का? त्याबद्दल जाणून घेऊ या.

LinkedIn (लिंक्डइन) - व्यवसायिक सोशल मीडिया म्हणून प्रसिध्द असलेले लिंक्डइन आज अनेक व्यवसायांसाठी मोठया प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. एकाच व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना जोडणारे हे माध्यम नोकरी शोधण्यासाठी, उत्तम उमेदवार मिळविण्यासाठी, प्रोजेक्ट्स, विविध व्यावसायिक माहितीसाठी वापरले जाते. जवळपास 40 कोटी यूजर्स याचा वापर करतात.

Pinterest (पिन्ट्रेस्ट) - इमेजेस, जी.आय.एफ. इमेज, लिखाण आणि व्हिडिओ या तिघांची एकत्रित माहिती व्यावसायिक स्वरूपाकरिता करण्यासाठी पिन्ट्रेस्ट या सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. मनात येणाऱ्या सर्व कल्पनांचे एकत्रित व्यासपीठ म्हणजेच पिन्ट्रेस्ट होय. यात ब्लॉगच्या, व्हिडिओच्या व इमेजेसच्या स्वरूपात कल्पनांचा साठा करता येतो. जवळपास 20 कोटी यूजर्स महिन्याभरात पिनट्रेस्टचा वापर करतात.

Tumblr (थंब्लर) - तुम्हाला कमी शब्दात लिहायचे असेल, तसेच SEO, ब्लॉगिंग साइट यांबद्दल अवघड वाटत असेल, तर एकदा थंब्लर जरूर वापरून पाहा. मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया अशी थंब्लरची ओळख आहे. यात सर्व मल्टिमीडियाचा वापर करण्याची मुभा आहे, त्यामुळे अनेक ब्लॉगर थंब्लरकडे आकर्षित होऊ  लागले आहेत. 2007 साली सुरू झालेल्या या सोशल मीडियात जवळपास 20 कोटी यूजर्स नोंदणीकृत आहेत.

Quora (कोरा) - प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मानवी जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबाबत चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणजेच कोरा होय. कोरा हे एखाद्या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर मिळविण्याचे मोठे माध्यम बनले आहे. साधारणत: उच्चशिक्षितांचे चर्चेचे ठिकाण म्हणून कोराकडे बघितले जाते. एका माजी फेसबुक कर्मचाऱ्यांद्वारे सुरू केले गेलेले हे माध्यम आज मोठया प्रमाणात प्रसिध्दी मिळवत आहे.

Vine (वाईन)- 40 कोटी यूजर्स असलेले वाईन, व्हिडिओ शेअरिंगसाठी अत्यंत प्रसिध्द सोशल मीडिया म्हणून नावलौकिक मिळवत आहे. लहान-लहान व्हिडिओद्वारे यात यूजर्स आपली सर्जनशीलता प्रकट करत असतात. हे यूटयूबसारखे सोशल मीडिया असले, तरीदेखील यात व्हिडिओची वेळ हा वेगळेपणा आहे. अधिकतम व्यावसायिक वापरासाठी वाईनचा उपयोग केला जातो.

Flickr (फ्लिकर)- फोटो शेअरिंग साइट म्हणून सुप्रसिध्द असलेले फ्लिकर आज जगभरातील फोटोचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. ड्राइव्ह म्हणून साधारणत: याचा वापर केला जातो, जेथे सर्व फोटो साठवता येतात. एम्बेड करण्याची सुविधा असल्यामुळे एकत्रितपणे ही सर्व छायाचित्रे वेबसाइट, मोबाईल ऍप अशा ठिकाणी फ्लिकरद्वारे दाखवता येऊ शकतात. 10 कोटीपेक्षा अधिक यूजर्स असलेले फ्लिकर 60पेक्षा अधिक देशांत प्रभावीपणे वापरले जाते.

याशिवायदेखील अनेक सोशल मीडिया प्लॅटफर्ॉम्स जगभरात विविध कारणांसाठी वापरले जातात. भारतात त्यापैकी काहीच प्रसिध्द आहेत. मात्र आपण वरील सर्व सोशल माध्यमे एकदा नक्कीच वापरून बघाल, अशी आशा करतो.

  9579559645

 

Powered By Sangraha 9.0