इंटरस्टेशिअल लंग डिसीज (Interstitial lung disease (ILD)

07 Apr 2018 15:31:00

शहरात दिवसेंदिवस वाढणारं प्रदूषण आणि त्यातून होणारे श्वासाचे विविध आजार Iinterstitial lung disease  ला जन्म देतात. फुफ्फुसात झालेल्या जखमा भरून येताना जर तो भाग जाळीदार न होता, घट्ट मांसल झाला तर हवेच्या वहनाला त्रासदायक ठरते. हीच या रोगातली मुख्य स्थिती असते.

Interstitial lung disease  ची कारणे-

   या विविध कारणांनी हा आजर होऊ शकतो. फुफ्फुसांमधील जाळीदार भाग कमी होऊन घट्ट मांसल भाग वाढल्यानं, प्राणवायू रक्तात मिसळण्याची प्रक्रिया कमी होते. शरीराला प्राणवायू कमी पडतो. त्यामुळं रुग्णाला थोड्याही श्रमानं दम लागतो. काही वेळा तर बोलण्याची क्रिया देखील कष्टाची वाटते. प्राणवायूच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि निरुत्साह वाटतो. रुग्ण कितीतरी दिवस आजारी आहे असं वाटतं. त्याच्या दैनंदिन हालचाली कमी होतात.

फुफ्फुसाची क्ष-किरण प्रतिमा (x-ray) किंवा lung biopsy केल्यास आजाराचं योग्य निदान होतं. अर्थात आधीच्या आजारांचा इतिहास, रुग्णाच्या आहार-विहारातील हेतूंचा विचार, लक्षणं बघून डॉक्टर योग्य त्या तपासण्या करायला सांगतातच!

    पाश्चात्य वैद्यकात उपलब्ध चिकित्सेनुसार, तज्ज्ञ डॉक्टर्स या आजारात आवश्यकतेनुसार स्टीरॉईडसचा वापर करतात. काही वेळा immunosuppressants म्हणजे रोगप्रतिकारक्षमता कमी करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. अर्थातच हे उपचार योग्य डॉक्टरकडूनच करून घ्यावे. प्राणवायूची फारच कमतरता जाणवली तर रुग्णाला रुग्णालयात भरती करून प्राणवायू द्यावा लागतो. परंतु या सगळ्या गोष्टी तात्पुरता आराम देणाऱ्या असतात. एक नवीन औषध बाजारात आलं आहे परंतु ते खूपच महाग आहे. 

     रुग्णाच्या शरीर अवयवांना कमी प्राणवायूवर जगता यावं आणि श्वास घेणाऱ्या स्नायूंना योग्य काम करता यावं यासाठी रुग्णाला काही व्यायाम शिकवले जातात. उदा. शरीराला/ पाठीला/ श्वासाच्या स्नायूंना ताण देणारे व्यायाम, एरोबिक व्यायाम इ. मात्र कुठलाही व्यायाम हा श्वासाचा वेग वाढवणारा असल्यानं, या रुग्णांनी तो तज्ज्ञ व्यक्तीच्या देखेरेखीखालीच करावा हे उत्तम.

      शास्त्रीय भाषेत सांगायचं तर हा आजार असाध्य या सदरात मोडतो. रुग्णाचा श्वासाचा त्रास वाढत जाऊ शकतो.

    आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून या आजाराचा विचार कसा करता येईल हे आपण पुढील भागात बघू.

Powered By Sangraha 9.0