विचारांचा 'रेशीम'गोफ

विवेक मराठी    08-Jun-2018   
Total Views |


 

वंदे मातरम!!

 हजारो वर्षांची परंपरा असणारी आपली भूमी.

अनेक शासक बदलत गेले.

अनेक आक्रमणं झाली.

इथे अनेक संस्कृती मिसळल्या. समरस झाल्या.

भिन्न भाषा. भिन्न भूषा.

भिन्न श्रध्दा. भिन्न आस्था.

भिन्न चेहरे. भिन्न मते.

आक्रमकांनाही सामावून घेतलेली,

साऱ्या जगासाठी ज्ञानद्वारं खुली असलेली,

काळानुसार बदलत गेलेली,

तरीही मूल्यांचा गाभा शाश्वत असलेली ही भूमी.

अनेक क्रांती, अनेक स्थित्यंतरं,

अनेक विचारधारा, अनेक कलाप्रकार, अनेक साहित्यप्रवाह यांनी समृध्द होत गेलेला हिचा प्रवाह.

आज का इतका प्रदूषित? संकुचित?

विरोध हवा विचारांचा. लढाई फक्त तत्त्वाची.

 

'We may agree we may not,

dialogue is necessary.

We dont want violance

not physical

not verbal '

 

.लोकशाही व संविधान मानत असू,

तर संवादाला का नाकारावं?

'समाजहितैषी लोकांची संख्या वाढवणं हे ध्येय, जे व्यापक राष्ट्रहितासाठी व्यक्तिहिताची आहुती देतील..

आम्ही संस्कृती म्हणून विचाराने उच्च आहोत

पण आचाराने अजून मागे आहोत.'

 

...समाज बदलतो. मूल्यं बदलतात.

देश, माणसं, विचारधारा सतत उत्क्रांत होतच असतात. या बदलाला संधी द्यायची की नाही?

'हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून'

असं करण्यासाठी प्रयत्न करायचेत की नाही?

आपल्याला नक्की काय साधायचंय?

महापुरुषांची कार्यं पाहायची की जात?

उभं केलेलं उत्तुंग काम पाहून प्रेरणा घ्यायची

की एखादंच सुटं विधान नाचवून विखार पेरायचा?

केवळ वाद घालायचेत

की खरंच संवाद वाढवायचेत?

 

 'सबके प्रति स्नेह, किसीका विरोध नही'

 

We want peace, harmony, happiness

We want our people to have a

healthy, happy and productive life

OUR MOTHERLAND

is asking for this

she deserves this ...

We need to increase our

National Happiness Index

What we need is

one flag, one constitution, one identity

BHAROTIYO!!

 

'तेरा वैभव अमर रहे मां

हम दिन चार रहे ना रहे ...'

 

'वोशुधैव कुटुम्बकम यह हमारी परंपरा ..'

 

'वसुंधरा परिवार हमारा हिंदु का यह विशाल चिंतन .. '

 

ही भूमी सर्वांची.

सर्वांचं मंगल व्हावं ही कामना करणारी.

'शोर्बेपि शुखिनो शोन्तु'

म्हणणारी

'अखिल विश्व मे सुख शान्ती हो जनमानस का यह सन्कीर्तन..'

 

...दोन्हीकडून अपेक्षा आहे सौहार्दाची.

दोघांनाही खात्री आहे विविधतेतल्या एकत्वाची.

आमच्यात मतभिन्नता जरूर असेल,

पण आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो आहोत. एकमेकांचे विचार समजून घेत आहोत. त्यातूनच सहकार्याचं वातावरण निर्माण होईल.

Nation first

यावर आम्ही सहमत आहोत.

आम्हाला भारतीय म्हणून एकदिलाने चालायचं आहे. आमचा इतिहास एक आहे. संस्कृती एक आहे. एकाच सहिष्णू परंपरेचे आम्ही वाहक आहोत. आम्हाला हवं आहे सौहार्द. या भूमीला मातृभूमी मानणाऱ्या सर्वांचं कल्याण झालं तरच हा देश विश्वनेतृत्वाला पात्र ठरेल, ही आमची धारणा आहे. आम्हाला या देशाला समृध्द प्रगत झालेलं पाहायचं आहे.

आणि आमचा मंत्र एक आहे ...

 'वंदे मातरम्!'

 आज एक शुध्द मराठीचा ठसा असलेली हिंदी

'परं वैभवं नेतु मेतत् स्वराष्ट्रं'

म्हणत असलेली,

आणि एक रसगुल्ल्याची मिठास असलेली इंग्लिश

'आमार भारोतमाता' म्हणत असलेली

ऐकताना आठवलं,

 

'मराठी साथी आजी हे बंगाली

एक साथे चले महोत्सव काजी..'

 

हीच आहे आमची खरी परंपरा.

समन्वयाची.

मायभूमीसाठी सारे भेद विसरण्याची.

हे भेद विसरून एक पाऊल पुढे येणाऱ्या कुणाचंही स्वागतच असेल!

ते पाऊल जुनं, जाणतं, अनुभवी,

स्वच्छ असेल तर काय ..

आनंद तर होणारच!!

-9890928411

***वाचकांना आवाहन ***
नागपूर इथे संघ शिक्षा वर्ग - तृतीय वर्षचा समारोप भारताचे माजी राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या सन्मान्य उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमानंतर एका संवेदनशील लेखिकेच्या मनात उमटलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे हा लेख. अनेकांच्या मनात या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया उमटल्या असतील. त्या त्यांनी विवेककडे पाठवाव्यात. विवेकच्या नेट एडिशनवर त्यातल्या निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल.
vivekedit@gmail.com