हे राज...!!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Oct-2019   

पक्ष संघटन हे नकला करून, घरात बसून इतरांना उपदेशामृत पाजून उभं राहत नाही. लोकप्रतिनिधी निवडून येणं तर लांबची गोष्टलोकांची मतं ही ना नुसत्या गर्जना करून मिळतात, ना अशा विनवण्या करून. ती जनतेपुढे काही ठोस कार्यक्रम ठेवून, तो तळागाळात नेणार्या कार्यकर्त्यांचं संघटन उभारून, त्यात सातत्य ठेवून, प्रसंगी टक्के-टोणपे खाऊन, तावून-सुलाखून निघाल्यावर मगच मिळतात.  राज ठाकरे अजूनही हे करता बाकी सर्व अनावश्यक ते करत बसणार असतील, तर राज ठाकरे आणि मनसे यांची कालबाह्य होण्याकडेच वाटचाल सुरू आहे, एवढं मात्र निश्चित. 

 
केवळटायमिंगचुकणं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वच चुकणं यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी नुकतीचमाझ्या पक्षाला प्रबळ विरोधी पक्ष बनवाअशी हाक दिली. मनसेचा गेल्या काही वर्षांतील प्रवास हा केवळ अधोगतीच्याच दिशेने जाणारा असल्यामुळेरोज मरे, त्याला कोण रडेया म्हणीप्रमाणे राज यांच्या या हाकेला यंदा माध्यमांमधून पूर्वीसारखीस्पेसमिळाली नाही. परंतु एकेकाळचे माध्यमांचे लाडके असलेल्या राज यांची ही भूमिका अगदीच दुर्लक्षितदेखील झाली नाही. गेली अनेक वर्षंमला एकहाती सत्ता द्याअशा शब्दांत जनतेपुढे पदर पसरणार्या राज ठाकरेंना आता प्रबळ विरोधी पक्ष बनायचं असल्याने याचं दोन्ही बाजूंनी उलटसुलट विश्लेषण झालं. माध्यमकर्मी, पत्रकार, विश्लेषकांतून आणि समाजमाध्यमांतून सर्वसामान्य नेटकर्यांकडूनही. यामध्ये राज यांच्याबद्दल आजही थोडीफार सहानुभूती असणार्यांनीराज यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु त्यांचं टायमिंग चुकलं आहेअशी सावध प्रतिक्रिया दिली. काहींनी हळहळदेखील व्यक्त केली. परंतु एकदा झालेल्या चुकीचं समर्थनटायमिंगची चूकम्हणून करता येऊ शकतं, वारंवार केलेल्या चुकांना मात्र हा टायमिंगचा मुलामा लावता येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.


वास्तविक
राज ठाकरे हे आधी बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीत वाढल्याने बाळासाहेबांच्या प्रभावाखाली, बाळासाहेबांसारखी वक्तृत्वशैली, देहबोली असल्यामुळे प्रसिद्ध झाले, लोकांना आवडू लागले. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यावर अन्याय वगैरे झाल्याची सहानुभूती निर्माण करण्यात राज यांना यश मिळालं. नारायण राणे वगैरे अनेकांनी त्याआधी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका केली होतीच, त्यात राज यांची भर पडली. त्यामुळे उद्धव यांच्या कार्यक्षमतेवर, नेतृत्वावर शंका घेत राज हेच कसे बाळासाहेबांचे खरे वारसदार, हे रंगवण्याची त्या वेळी लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. पुढे काय झालं, हे आज आपणा सर्वांसमोर आहेच. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांचा झालेला राजकीय प्रवास पाहिला, तर राज ठाकरे म्हणजे कुटुंबकलहातून सहानुभूती मिळवूनलार्जर दॅन लाइफबनलेले आणि त्या प्रतिमेचा फायदा करून घेण्यात वारंवार अपयशी ठरलेले एक सर्वसाधारण नेते आहेत, हे स्पष्ट होतं. राज ठाकरे यांचे वर उल्लेखल्याप्रमाणे थोडेफार उरलेले चाहते राज हे कसे अपयश येऊनही खचून गेले नाहीत, सातत्याने प्रयत्न करत राहिले वगैरे चित्र इतिहास-वर्तमानातील अन्य थोरा-मोठ्यांची उदाहरणं देऊन सांगत असतात. परंतु या भाबड्या चाहत्यांना कुणीतरी जाऊन समजावलं पाहिजे की ती महान माणसं घडलेल्या चुकांमधून काही धडा घेतात, आत्मपरीक्षण करतात, आवश्यक त्या सुधारणा घडवून आणून पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे ते किमान प्रयत्न तरी करतात. आपल्या चुकांचं खापर कायम दुसर्यावर फोडत आलेले, शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायला आलेल्यालाही उडवून लावणारे आणि या अशाच घमेंडीत सतत वावरणारे राज ठाकरे या गटात मोडत नाहीत.


पक्ष
संघटन हे नकला करून, घरात बसून इतरांना उपदेशामृत पाजून उभं राहत नाही. लोकप्रतिनिधी निवडून येणं तर लांबची गोष्ट. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या दृष्टीने खलनायक आहेत. मोदी-शाह या जोडीमुळेच देशाचं बरं-वाईट होत असल्याचं आता राज म्हणत आहेत. मोदी, शाह, फडणवीस किंवा एकूण भाजपाची धोरणं जी काही बरी-वाईट असतील, त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. परंतु यातील कुणीही नेता ना नकला करून निवडून आलाय, ना आडनावावर. त्याला कारणीभूत ठरलेत ते केवळ त्यांचे अमाप कष्ट. 2014पूर्वी राज जेव्हा मोदींच्या प्रेमात होते, तेव्हा तेकाँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी मोदींच्या पायाचं पाणी प्यावंअसं सगळीकडे सांगत होते. राज गुजरातेत गेले असताना हेच पाणी प्यायले असते, तर कदाचित आज ही वेळ आली नसती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात प्रचलित राजकारणाला कंटाळलेल्या जनतेतील एका वर्गाला राज यांनी काही आशा दाखवली होती. ‘यांना सुतासारखा सरळ करून दाखवतोम्हणत स्वप्नं दाखवली होती. या आशांचा आणि स्वप्नांचा स्वतः राज यांनीच चक्काचूर केला. ईव्हीएमचा मुद्दा निकाली निघाला, मोर्चा बारगळला, आता तर याच ईव्हीएमची शिडी करून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होण्याची दिव्यास्वप्नं पडू लागली आहेत. या वाक्यातून विद्यमान राजकारणात मला काहीतरी स्थान शिल्लक ठेवा, अगदीच कालबाह्य करून टाकू नका, असंच राज लोकांना विनवत आहेत. परंतु लोकांची मतं ही ना नुसत्या गर्जना करून मिळतात, ना अशा विनवण्या करून. ती जनतेपुढे काही ठोस कार्यक्रम ठेवून, तो तळागाळात नेणार्या कार्यकर्त्यांचं संघटन उभारून, त्यात सातत्य ठेवून, प्रसंगी टक्के-टोणपे खाऊन, तावून-सुलाखून निघाल्यावर मगच मिळतात. राज ठाकरे अजूनही हे करता बाकी सर्व अनावश्यक ते करत बसणार असतील, तर राज ठाकरे आणि मनसे यांची कालबाह्य होण्याकडेच वाटचाल सुरू आहे, एवढं मात्र निश्चित.