राज्यपालपदाला सक्रियतेची जोड देणारे राम नाईक

विवेक मराठी    20-Jul-2019   
Total Views |

**दिलीप अग्निहोत्री**

सहसा राज्याच्या राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना विशेष स्वारस्य नसते. मात्र राम नाईकांच्या सक्रियतेने ही धारणा बदलली.22 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. राम नाईकाच्ची सक्रियता उल्लेखनीय आहे. त्यांनी राजभवनाचे दरवाजे; सर्वसामान्य जनतेसाठी उघडण्याचे कार्य केले. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेशी त्यांचा कायम संवाद होत राहिला. संविधानिक मर्यादेत राहूनही त्यांनी आपल्या जबाबदार्या कौशल्याने पूर्ण केल्या. त्यांनी हे दाखवून दिले की राज्यपाल पद हे केवळ आरामासाठी नाही. याच धारणेमुळे ते राज्यपालपदाला नवीन आयाम देण्यात यशस्वी झालेे. संविधानात तसेच राज्य शास्त्राच्या पुस्तकात त्यांच्या या कामाची नोंद होईल. त्यातून विद्यार्थ्यांना राज्यपालांचे अधिकार आणि कर्तव्य यांविषयी खूप माहिती मिळेल.
 राम नाईक यांच्याचरैवति चरैवतिया पुस्तकात एक रंजक प्रसंग आहे. त्यातून राम नाईक यांच्या कार्यतत्परतेचा अंदाज येऊ शकतो. राम नाईक यांनी 2009 मध्ये राजकीय संन्यास घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपली पत्नी कुंदा नाईक यांना सांगितले होते की, आता ते कुटुंबाला वेळ देऊ शकतील. पण त्या राम नाईकांना पुरेपूर जाणून होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या पायांना चाकं लावलेली आहेत. त्यामुळे वाटत नाही तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकाल.’’ कुंदाताईंचे ते अनुभवाचे बोल खरेच झाले. निवडणुकीच्या राजकारणापासून जरी ते दूर झाले तरी समाजसेवेपासून दूर नाही राहू शकले आणि त्यासाठीच वेळ देऊ लागले. काही काळानंतर ते राज्यपाल झाले. पण हे कामही त्यांनी एका मर्यादेत राहून केले नाही.

त्यांनीचरैवति चरैवतिया पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. खरंतर हे पुस्तक म्हणजे त्यांच्या खासगी आयुष्याचे दर्शन आहे, जे त्यांनी नेहमी जपले. याच कारणामुळे त्यांनी राजभवनातील प्रचलित मान्यतांना फाटा दिला. त्यांचा हा कार्यकाळचरैवति चरैवतिया ओळीच अधोरेखित करणारा होता.

संविधानाशी संबंधित पुस्तकांमध्ये राज्यपालांचा विभाग वाचनीय असतो. यात संवैधानिक परिस्थितीबरोबरच राज्यपालांच्या अनुभवाचेही विवरण असते. यात अनेकदा विवादित मुद्यांचाही समावेश असतो. अपवाद वगळता बहुतेक राज्यापाल याच श्रेणीतले आढळतात. संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असेल तर वेगळी बाब असते, अन्यथा राज्यपाल आपला कार्यकाळ आरामात घालवू शकतात. राज्यातील सामान्य नागरिकांशी राजभवनाचा विशेष संपर्क नसतो. मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी आपल्या कार्यकाळात एक आदर्श घालून दिला आहे. या दरम्यान अनेक उदाहरणे घडली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाईकांच्या कार्यकाळात राजभवनाचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुले झाले. त्यांनी राज्यपालांनामहामहीमअसे संबोधण्याचेही बंद करायला लावले. त्यांच्या या मानसिकतेमुळेच योग्य बदल होऊ लागले.

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सक्रियता आहे. ‘चरैवति चरैवतित्यांच्या जीवनशैलीत आणि कार्यशैलीत आहे. राज्यपाल पदाची जबाबदारीही त्यांनी याच मानसिकतेतून सांभाळली. त्यांच्याच सूचनेवरून उत्तर प्रदेशने पहिल्यांदा आपला स्थापना दिन साजरा केला. खरं तर मागच्या समाजवादी पक्षाच्या सरकारला त्यांनी ही सूचना केली होती. मात्र त्यांनी तिला महत्त्व दिले नाही. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सूचनेची अंमलबजावणी केली. त्याला या राज्याच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाशी जोडण्यात आले. यापूर्वी नाईकांनी राजभवनात महाराष्ट्र दिनाचे आयोजन केले होते. सलग दुसर्यांदा या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. योगायोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याला कोणत्याही एका राज्याशी विशेष सांस्कृतिक संबंध जोडण्याचा आग्रह केला होता. योगी आदित्यनाथ यांनी त्यासाठी महाराष्ट्राची निवड केली होती. लखनऊ राजभवनातील महाराष्ट्र दिन सोहळ्यापासून या अभियानाला गती मिळाली. लोकमान्य टिळकांनी लखनऊमध्येस्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहेही ऐतिहासिक घोषणा केली होती, तीही लखनऊ अधिवेशनात. हे घोषवाक्य प्रत्येकालाच माहीत आहे, पण राम नाईकांचं लक्ष गेलं ते त्याच्या शताब्दी वर्षाकडे. हे शताब्दी वर्ष भव्य स्वरूपात साजरा करण्याचा सल्लाही राम नाईकांनी दिला होता आणि योगी आदित्यनाथांनीही तो मानला. विशेषकरून तरुणांना अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून प्रेरणा मिळते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजनही राजभवनात करण्यात आले होते. असे आयोजन करणारे हे देशातील एकमेव राजभवन आहे. यावर्षीही 21 जून रोजी राजभवनात पूर्ण उत्साहात योग दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह हजारो लोकांनी योग केला.


 

 लखनऊमध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात तोडफोड झाल्याप्रकरणी राम नाईक यांनी सरकारला तपास करण्याविषयी पत्र लिहिले हातेे. त्यांची इच्छा होती की सरकारी संपत्तीचे नुकसान करण्याचा संदेशही लाकांमध्ये गेला पाहिजे. या आधीही राम नाईकांनी अनेक उदाहरणाबाबत सक्रियता दाखवली आहे.

राम नाईक यांनी विधानपरिषदेसाठी निवडल्या गेलेल्या सदस्यांसंदर्भात संविधानात उल्लेखलेल्या योग्यतेला महत्त्व दिले आहे. हेदेखील एक उदाहरण म्हणून कायम समोर राहील. याचप्रकारे लोकायुक्तांच्या नियुक्तीतही त्यांनी सजगपणे प्रक्रियेचे पालन केले होते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या विचारांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं.

उच्च शिक्षणातील सुधारणांच्या दृष्टीनेही राम नाईकांनी अनेक प्रयत्न केले. सर्व विद्यापीठांमध्ये सत्र नियमित करण्यात आले. परीक्षांचा दर्जा राखण्यात आला. प्रत्येक विद्यापीठात दीक्षांत सोहळ्याचे आयोजन होऊ लागले. कुलपतींच्या वार्षिक संमेलनाची सुरुवातही राम नाईकांनी केली आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. विशेष म्हणजे ते लोकांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधतात आणि तो त्यांचा सहजस्वभावच आहे. मुंबईतील त्यांच्या सक्रीय राजनीतीच्या काळापासून त्यांच्या दिनचर्येत जनभेटींचा समावेश होता. तेव्हा लोकांना माहीत असे की राम नाईक जर मुंबईत असतील तर सकाळी त्यांची भेट होईल. ते केवळ लोकांच्या समस्या ऐकत नसत, तर पूर्ण क्षमतेने त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. राज्यपाल झाल्यावर राजभवनातही त्यांच्या या स्वभावात बदल झाला नाही. ‘चरैवति चरैवतिमध्येही त्यांनी लिहिले आहे की, त्यांना सर्वसामान्य जनतेत रहायला आवडते, लोकल ट्रेन हे आजही त्यांचे आवडते वाहन आहे, कारण त्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक भेटतात. पहिले वर्ष पूर्ण झाल्यापासून दरवर्षी 22 जुलै रोेजी ते राजभवनातराम नाईकया शीर्षकाखाली आपला कार्यवृत्त अहवाल प्रसिद्ध करत असत. त्याचीही सुरुवात मुंबईतील त्यांच्या सक्रीय राजकारणादरम्यान झाली होती. ते तीन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्या काळातही ते दरवर्षी आपला कार्यवृत्तांत प्रसिद्ध करत असत. काही काळ असाही होता जेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही सदनाचे सदस्यत्व नव्हते. तेव्हाही सामाजिक क्षेत्रातील त्यांची सक्रीयता जराही कमी झाली नव्हती. त्यावेळीही ते सामान्य जनतेसमोर आपल्या कामाचा अहवाल ठेवत असत.

राज्यपालांना राज्याच्या बाहेर कार्यक्रमांना जाण्यासाठी एका वर्षात 73 दिवस स्वीकृत असतात. राम नाईक नेहमीच या मर्यादेपेक्षाही मागे राहिले. त्यांना आपल्यावरील जबाबदारी पूर्ण करण्यातच अधिक आनंद मिळत असे.

त्याचबरोबर राज्यपालांना वर्षातून 20 दिवसांची रजा घेण्याची अनुमती असते. मात्र राम नाईकांनी तीही कधी पूर्णपणे घेतली नाही. हे पाहता कुंदाताईंच्या त्यांच्याविषयीच्या म्हणण्याचा प्रत्यय येतो. एकदा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे फिरण्यासाठी त्यांनी काही दिवसांची रजा घेतली होती. मात्र तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ते लखनऊमध्ये परत आले. 2017-18 या वर्षात त्यांनी एकही सुट्टी घेतली नव्हती. सार्वजनिक कामातही ते रजा घेत नसत. आतापर्यंत 32 हजार लोकांना वेळ देऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. राज्यपाल म्हणून केलेल्या कामांबद्दल ते समाधानी आहेत.

त्यांच्यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदानाचा अनुबंध निर्माण झाला. त्याअंतर्गत उत्तर प्रदेशात वाराणसी, आगरा, मेरठ आणि लखनऊ या शहरांमध्ये गीत रामामायणाचे आयोजन करण्यात आले.

उत्तर प्रदेशातील पद्म पुरस्कारप्राप्त दिग्गजांचा राजभवनात सन्मान करण्याची सुरुवात राम नाईकांनीच केली होती. आता तर ती उत्तर प्रदेशची परंपराच बनली आहे. कारगील दिनी कोणतेही निमंत्रण नसताना मध्य कमान येथील स्मृतिस्थानी जाऊन कारगीलमधील हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करणे, राज्यातील परमवीर चक्राने सन्मानित वीर सैनिकांची भित्तीचित्रे तयार करून घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव योग्य प्रकारे लिहिण्याबाबत आग्रही राहणे, आमदार, खासदार, मंत्री आणि राज्यपाल कोणत्याही पदावर असताना आपला वार्षिक कार्यवृत्त अहवाल प्रकाशित करणे, लोकमान्य टिळकांच्या अजरामर घोषवाक्याची 101वी जयंतीचे आयोजन करणे, 68 वर्षानंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या स्थापना दिवसाचे आयोजन करणे, कुंभमेळ्यापूर्वीअलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्याची सूचना करणे, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये अधिक मतदान हेणार्या मतदारसंघातील प्रतिनिधी आणि कर्मचारी यांचा सन्मान करणे, कुष्ठरुग्णांसाठी भत्ते वाढवण्याची तसेच त्यांना पक्की घरे देण्याची सूचना करणे अशा त्यांच्या अनेक कामाच्चा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याचरैवति चरैवतिया पुस्तकाचा दहा भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.

राम नाईक यांनी राज्यपालांच्या संवैधानिक दायित्वाचा नवा अध्यायच लिहिला आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, राज्याचा कारभार निवडून आलेली सरकारच करत असली तरी राज्यपाल पद हे आरामासाठी नसते, तर खूप काही करून दाखविण्यासाठी असते. त्यासाठी राजभवनातील वैभवाविषयी अनासक्ती असण्याची गरज असते, तरच सामान्य जनता दिसू शकते. राम नाईकांनी हेच केले. ते लिहितात की, राजभवनाची भव्यता त्यांना फक्त कार्य करण्याची प्रेरणा देते. अशा प्रकारे राम नाईकांनी केवळ कृतीलाच नव्हे, तर विचार आणि मानसिकतेलाही महत्त्व दिले आहे. त्यामुळेच ते एक आदर्श निर्माण करू शकले. भविष्यात राज्यपाल होणार्यांना त्यातून प्रेरणा मिळेल.

9450126141 

अनुवाद : सपना कदम-आचरेकर