श्री टेंब्ये स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने...

स्रोत: विवेक मराठी    दिनांक04-Jul-2019

आज श्री.  परिव्राजकाचार्य परमहंस श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ योगिराज श्री टेंब्ये स्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी.

श्री. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज  हे स्वभावाने अत्यंत निःस्पृह व निग्रही, कमालीचे सोशिक, श्रीदत्तार्पित मनोवृत्तीचे, कोमल मनाचे, परमदयाळू, अमानी, (मनानेही कीर्तीची व प्रतिष्ठेची अपेक्षा न करणारे) परम विरक्त, कठोर धर्मकर्माचरणी व वरकरणी रागीट होते. 

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

श्री महाराज  हे उत्तम वैद्य, मंत्रसिद्ध, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयातील प्रतिभावान व परतत्त्वस्पर्शी सिद्ध कवी  व वक्ते, सिद्ध  हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रेयस्वरूप होते. त्यांच्या चरित्रातून व प्रासादिक दैवी वाङ्मयातून, त्यांचे अत्यंत मृदू, कोमल, हळुवार, अनन्य भक्ताचे अंतरंग व्यक्त होते; कधी वेदधर्मविहित, कर्तव्यकठोर, नियमबद्ध , तप:पूत जीवन, तर कधी सर्वशास्त्रापरत्या, निखळ मुक्तावस्थेच्या उत्तुंग शिखरावरील, स्वानंदसम्राटाचे अनिर्बंध, सर्वव्यापी अस्तित्व अनुभवास येते.

स्वामीजी हे अनेक गुणवैशिष्टयांनी संपन्न व समृद्ध  होते. त्यांनी नवविधा भक्तीचे प्रत्येक प्रकार यशस्वीपणे व पूर्णांशाने अनुसरले आहेत. ते नवविधा भक्तिप्रकाराचे अनुभूतिसंपन्न परमाचार्य आहेत. हे त्यांच्यातील महान गुणवैशिष्टय आहे, म्हणून त्यांच्या चरित्रामध्ये नवविधा भक्तीचा परमोच्च परिपाक दिसतो.

मानवी जीवनाचा भवसागर पार पाडण्याचे सामर्थ्य स्वामीजींच्या साध्या, सरळ आणि समर्पित जीवनात आहे.

त्याच समर्पित जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या वाङ्मयीन संपदेत आढळते.

सा. विवेकने प्रकाशित केलेला अमृताचा अथांग महासागर

हा चरित्र ग्रंथ म्हणजे या समर्पित जीवनावर आधारित एक अमृतानुभव.

या ग्रंथात श्री महाराजांवरील  अप्रकाशित लेख, त्यांची शिष्यपरंपरा, त्यांच्या साहित्यातील लोकसंग्रह, स्त्रीयांविषयीचा त्यांचा दृष्टीकोण, स्वामीजींची शिकवण, वैद्यकशास्त्र, आचारधर्म, भक्तीरहस्य अशा साधकांनी लिहिलेल्या उत्तमोत्तम लेखांचा समावेश आहे.

यातील शब्दनशब्द म्हणजे अमृतकण आणि हे कण कण एकत्र येउन तयार झालेला हा अमृताचा अथांग महासागर.

प्रत्येक भाविकाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ...

किंमत - कुरिअर खर्चासहित ४५०/- रुपये

नोंदणीसाठी संपर्क

सा.  विवेक  - ०२२-२७८१०२३५/३६, ९५९४९६१८५८

Hindustan Prakashan Sanstha-Pustak vibhag

The thane janata sahakari bank

Branch - Vashi A/C no. 012120100001216

IFSC no. TJSB0000012

या खात्यात पैसे भरून आपली प्रत आजच नोंदवा...