''आर्थिक स्वातंत्र्यासाठी लघु-मध्यम उद्योग महत्त्वाचे'' ः सरसंघचालक

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Sep-2019

लघुउद्योगांची अखिल भारतीय संस्था - लघु उद्योग भारती या संघटनेच्या स्थापनेला या वर्षी 25 वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने 2018-19 रजत जयंती वर्षाची सांगता झाली. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य असे की, या 25 वर्षांच्या संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी देशभर प्रचार-प्रसार व्हावा, या दृष्टीने लघु उद्योग भारतीच्या सर्व पदाधिकार्यांनी वर्षभर कार्यबद्ध कार्यक्रम निश्चित करून सर्व आयामांना प्राधान्य देत, या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी केली होती त्यामुळेच या राष्ट्रीय अधिवेशनात 23 राज्यांमधून 1550 प्रतिनिधी 14 राज्यांमधून 80 राज्य औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लघुउद्योजकांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी 25 एप्रिल 1994 रोजी नागपूर येथेच लघु उद्योग भारतीची स्थापना झाली होती. त्यामुळे रजत जयंती वर्षाचा समारोप समारंभ नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करून, एक औचित्य साधण्यात आले.


उद्घाटनात सरसंघचालकांचे चिंतन
 

16 ऑगस्ट 2019 रोजी रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उद्बोधनाने राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या वेळी लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता, राष्ट्रीय सरचिटणीस गोविंद लेले विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते.

 

आपल्या उद्बोधनात सरसंघचालक म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण मनुष्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचे जतन, तसेच समाजाला समृद्ध बनविण्यासाठी सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगांचा तसेच कारागिरीचा विकास अनिवार्य आहे. उद्योगाचे स्वरूप जितके विकेंद्रित होईल, तितके त्याचे स्वातंत्र्य वाढते. उद्योगाचे स्वरूप जितके छोटे असेल तितक्या क्षेत्रातील तेथील समाजाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उत्पादन सीमित योग्य प्रमाणात होते. त्या क्षेत्राचा आपल्या उत्पादनाचा उपयोग सर्वांना व्हावा म्हणून सर्व तेथे राहावे याचीसुद्धा चिंता तेथे होते. पर्यावरणाच्या दृष्टीने, मनुष्याच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने समृद्ध बनविणार्या आर्थिक धोरणांच्या दृष्टीने सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगांची सुदृढ वाढ यासाठी आवश्यक आहे की, खूप मोठे केंद्रित उद्योग उभे झाले, तर काही दिवसचार दिन की चांदनीप्रमाणे ते चमकतात. परंतु, काही वर्षांनंतर पुन्हा इकडून-तिकडून कर्ज घेऊन आपला पैसा दुसरीकडे ठेवून तेथील व्याजाच्या आधारे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांशी खेळत, त्याला कायम ठेवले जाऊ शकते. त्यातून व्यक्तीचे स्वातंत्र्य समाप्त होते.

 

लघुउद्योजक समाजात एक सन्मानित व्यक्ती असते. ती समाजमनाला प्रभावित करणारी व्यक्ती होऊ शकते. त्याचे एक स्थान असते. त्याचा एक प्रभाव असतो. सामाजिक समरसता निर्माण करणे हीसुद्धा त्याची जबाबदारी आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.

 

वैशिष्ट्यपूर्ण चर्चासत्रे

राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता यांनी आपल्या प्रास्ताविकात, “लघुउद्योग क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहेअसे सांगितले. लघुउद्योगांसंबंधी स्वतंत्र कायदा तयार व्हावा, स्वतंत्र धोरण असावे. उत्पादन कमी होतेय, तसेच स्वयंरोजगार कमी होतोय याची संघटनेला चिंता आहे. त्यासाठी अगदी खेडोपाडी जाऊन लहान-लहान उद्योगनिर्माणासंबंधी लघु उद्योग भारती प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

उद्योजकांच्या कार्यपद्धतीत नावीन्यपूर्ण बदल व्हावा या दृष्टीने

 

1. पर्यावरण/कचर्यापासून संपत्ती निर्माण

 

2. स्वप्रेरणा

 

3. शोध विकास

 

या विषयांवर 17 ऑगस्ट रोजी तज्ज्ञ अनुभवी व्यक्तींची चर्चा आयोजित केली होती.

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय संसदीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचीदेखील प्रामुख्याने उपस्थिती होती. या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित उद्यमी संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रा.स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी उपस्थित होते.

 

आर्थिक महासत्तेसाठी लघुउद्योगांचेही महत्त्व - मा. गडकरी

 

अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी, म्हणजे 17 ऑगस्ट रोजी दुसर्या सत्रातसूक्ष्म, लघु मध्यम उद्योग : समग्र नीतीया विषयावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रबोधन केले.

 

जगात भारतीय अर्थव्यवस्थेला शक्तिशाली बनविण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल आणि त्यासाठी सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

 

देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची बनवायची असेल, हिंदुस्थानला शक्तिशाली अर्थव्यवस्था (सुपर इकॉनॉमिक पॉवर) करायची असेल तर काय करायचे, हे महत्त्वपूर्ण लक्ष्य आपल्या सर्वांसमोर असायला हवे. आपल्या देशाच्या जीडीपी वाढीत सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग क्षेत्राचे सुमारे 29 टक्के निर्यातीत 40 टक्के योगदान आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात 6 कोटी सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग असून 2 कोटी नोंदणी झालेली नाही. सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग क्षेत्राने देशातील आर्थिक वाढीत 50 टक्के योगदान दिले तरी ते मोठे ठरेल. यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त भांडवली गुंतवणूक आणि रोजगारही वाढवावा लागेल. ग्रामीण भागात गरिबी, उपासमारी बेरोजगारी आदी गंभीर समस्या आहेत. कृषी क्षेत्रातही अनेक गंभीर संकटे आहेत. शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. गावात रोजगार नाही. गावातून तरुण शहराकडे धाव घेत आहेत. या स्थलांतरणामुळे शहरातही अनेक समस्या वाढत आहेत. याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगांबरोबरच कृषी त्यावर आधारित उद्योग वाढीकडे लक्ष देण्याचे मंत्रालयाला सांगण्यात आले आहे.

 

लघुउद्योजकांपुढील नव्या संधी नवी क्षेत्रे याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, टाकाऊतून संपत्ती निर्माण करणे हा नव्या युगाचा मंत्र ठरणार आहे. आज देशाला 7 लाख कोटी रुपयांची इंधन आयात करावी लागत आहे. देशाला लागणारे इंधन देशातील उद्यमी तयार करू शकतात. ग्रामीण भागात हे होऊ शकते. तणांपासून इथेनॉल तयार होऊ शकते त्यावर वाहने चालू शकतात. रतनज्योत, मोह, साल, करंज, टोली यांच्या तेलापासून इंधन तयार करता येते. लघुउद्योजकांनी याबाबत पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

- भूषण वैद्य

(राष्ट्रीय उपाध्यक्ष, लघु उद्योग भारती) वर्धा

9923795833