सेक्युलर गोंधळाला उघडे करणारे पुस्तक

विवेक मराठी    25-Jan-2020
Total Views |

***प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे***

 

सेक्युलर या शब्दाचा आपल्या सोयीने अर्थ लावून आणि त्यावर आपली पोळी शेकविण्याचे काम भारतात अनेकजण करीत असतातच. याच दहशतवादी कारवायांना उघडे पाडण्याचे काम 'सेक्युलर दहशतवाद' या पुस्तकातून केले आहे. या संब्रमाच्या वातावरणात तरुण पिढीला दिशादर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि नेमके याच भूमिकेतून लेखक अशोक राणे यांनी आपल्या पुस्तकाचे लिखाण केले आहे. 


book_1  H x W:  

 

भारतात 'सेक्युलर' हा शब्द अतिशय गुळगुळीत बनला आहे. ऊठसूट कोणीही या शब्दाचा आपआपल्या सोयीसाठी वापर करीत असल्याचे दिसत आहे. सेक्युलरच्या नावाखाली आपली पोळी शेकण्यात राजकारणीत अग्रभागी आहेत. आता तर स्वत:ला सेक्युलर म्हणणविणाऱ्यांनी देशात दहशतवाद पसरविणे सुरू केले आहे. अशा या सेक्युलर दहशतवाद्यांना उघडे पाडण्याचे काम लेखक अशोक राणे यांनी 'सेक्युलर दहशतवाद' या पुस्तकातून केले आहे. केवळ 64 पानांच्या या छोटेखानी पुस्तकात त्यांनी आठ प्रकरणांमधून सेक्युलरवाद्यांचा खोटेपणा उघड केला आहे. आज देशात सर्वत्र अराजक पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. यामध्ये स्वत:ला सेक्युलर म्हणविणारे आघाडीवर आहेत. युवा पिढी तर यामध्ये अक्षरश: भरडली जात आहे. अशा वेळी या पिढीला दिशादर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि नेमके याच भूमिकेतून लेखक अशोक राणे यांनी आपल्या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

 
आपल्या देशात 2014 मध्ये राजकीय परिवर्तन झाले. दीर्घ काळानंतर कोण्या एका पक्षाचे सरकार बहुमताने सत्तास्थानी बसले. संपूर्ण जगासाठीच ही बाब तोंडात बोटे घालणारी होती. हे सरकार लोकशाही पध्दतीने सत्तेवर आले. एक वेळा नाही, तर सलग दुसऱ्यांदा लोकशाही मार्गाने पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक जागा घेत हे सरकार निवडून आले. हे विरोधकांसाठी चीड आणणारे होते आणि त्यांची आगपाखड सुरू झाली. यातूनच सेक्युलर दहशतवाद जन्माला आला. हिंदुत्व विचारांची कास धरणारे हे सरकार असल्यामुळे सहाजिकच त्यांच्याविरुध्द सर्व विरोधक एकत्र येणे अपेक्षित होते आणि अपेक्षेप्रमाणे विरोध सुरू झाला. यासाठी विरोधकांनी हाताशी घेतले ते विद्यार्थ्यांना. विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून विरोधकांनी सेक्युलर दहशतवादाची पेरणी केली, अशा पध्दतीने राणे यांनी आपल्या पुस्तकातून मांडणी केली आहे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

पहिल्या प्रकरणात सेक्युलर विचारांची उत्पत्ती कशी झाली याची अभ्यासपूर्ण मांडणी राणे यांनी केली आहे. दुसऱ्या प्रकरणात वरवर सर्व धर्म समान असे मानणाऱ्या सेक्युलरवाद्यांना मुंबईतील मुस्लीम आमदार वारीस पठाण यांनी कशा पध्दतीने चपराक लगावली होती, याची सुंदर मांडणी राणे यांनी केली आहे. एरवी मुस्लिमांच्या रमजान उत्सवात इफ्तार पाटर्या आयोजित करून स्वत:ला सेक्युलर म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाचे मात्र कसे वावडे असते, हे तिसऱ्या प्रकरणात राणे या दाखवून दिले आहे. अनादिकाळापासून आपल्या देशात हिंदू संस्कृतीची जपणूक केली जाते आहे. मात्र या देशात सेक्युलरच्या नावाखाली हिंदूंना सतत दडपणात ठेवले जात आहे, याचा प्रचंड राग राणे यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांनी अतिशय त्वेषाने 'हो, हिंदुस्थान... हिंदूंच्या बापाचा...!' अशा शीर्षकाखाली चौथ्या प्रकरणाची मांडणी केली आहे. पाचव्या प्रकरणात राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर केवळ राजकारणासाठी एमआयएमसोबत जातात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशभक्त संघटेच्या विरोधात सातत्याने आगपाखड करतात, असा आरोप करताना प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसोबत प्रतारणा तर करीत नाही ना? असा प्रश्न केला आहे. सहाव्या प्रकरणात राणे यांनी मीडियाविरोधात आगपाखड केली आहे. एकीकडे कठुआ घटनेची चर्चा करीत असताना दुसरीकडे सीरिअल रेपिस्ट रेहान कुरेशी व ख्रिश्चन पाद्री यांच्यावर गप्प का होतात? असा सवाल राणे यांनी केला आहे. मॉब लिंचिंगचा प्रपोगंडा हा हिंदुत्ववादी संघटना विरुध्द सेक्युलरांचे सुनियोजित षड्यंत्र तर नाही ना? असा सवाल राणे यांनी सातव्या प्रकरणात केला आहे. शेवटच्या प्रकरणात राणे यांनी लोकशाहीने फुलनदेवी, कन्हैया यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे, तर मग साध्वी प्रज्ञा यांना का नाही? असा प्रश्न उभा केला आहे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

एकूणच हिंदुत्ववादी विचारसरणी विरुध्द सेक्युलर म्हणविणाऱ्यांचा संघर्ष अशोक राणे यांनी आपल्या पुस्तकातून उभा केला आहे. त्यांनी अनेक प्रश्न उभे केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे समाजाकडून अपेक्षित आहेत. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित या पुस्तकाला साप्ताहिक विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांची प्रस्तावना लाभली आहे. सेक्युलरच्या नावाखाली दहशतवाद पसरविणाऱ्यांना उघडे पाडण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न अशोक राणे यांनी केला आहे. एकांगी विचार करणाऱ्यांनी दुसऱ्या बाजूचा विचार केला पाहिजे, जणू हा संदेशच अशोक राणे यांचे हे पुस्तक देत आहे. सर्वानी वाचावे असे हे पुस्तक आहे.