प्रमिलाताई मेढे व साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांना डी.लिट.

विवेक मराठी    28-Jan-2020
Total Views |

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
मुंबई : राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ संचालिका प्रमिलाताई मेढे व अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना 18 जानेवारी 2020 रोजी डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
 
aruna tai_1  H

सर नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या 69व्या पदवीदान सोहळयात प्रमिलाताई मेढे व डॉ. अरुणा ढेरे यांना या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी चित्रकूट येथील उद्यमिता विद्यापीठाच्या संचालिका डॉ. नंदिता पाठक, कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, प्र-कुलगुरू विष्णू मगरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या पदवीदान सोहळयात 13,904 विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली.

 

aruna tai_1  H  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, ''महिलांमधील आत्मविश्वास, धाडस हे त्यांना कायम पाठबळ देत असते. महिलांनी कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुखाच्या भूमिकेतून स्वतःला अधिक सक्षम केले पाहिजे. उच्च ध्येय ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे.''

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/