सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’ गीत गायन

विवेक मराठी    28-Jan-2020
Total Views |

नाशिक : एकाचवेळी तब्बल 11 हजार, 500 उपस्थितांनी सामूहिकरीत्या वंदे मातरम्हे राष्ट्रीय गीत गात नाशिककरांनी शनिवारी नव्या विक्रमाला गवसणी घातली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिककरांनी केलेल्या या विक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.


Vande Mataram The Nationa

राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत समिती
, नाशिक यांच्याद्वारे वंद्य वंदे मातरम्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. याला नाशिककरांनी तुफान प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंद्य वंदे मातरम् संयोजन समितीचे अध्यक्ष शेडुराम रुंग्ठा, उपाध्यक्ष अविनाश आव्हाड, डॉ. मुकेश अग्रवाल, सचिव सुधीर मुतालिक, सहसचिव अ‍ॅड. सुयोग शहा, ‘नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश दरगोडे, राजेंद्र (नाना) फड, आसावरी धर्माधिकारी, सुरेश पटेल, रुपा मालपुरे, जयंतराव गायधनी, क्षेत्रिय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जयेश क्षेमकल्याणी, मनोज कुलकर्णी आदी असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. समाजात राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्य निर्माण करणे, नवयुवकांमध्ये राष्ट्र अभिमानाची जागृती, ‘वंदे मातरम्या राष्ट्रीय गीताची माहिती व्हावी, तसेच मातृभूमीसाठी आत्मबलिदान करणार्‍या वीरांचे स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार आणि श्रीमद्भगवद्गीता प्रवचनकार विनय पत्राळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Vande Mataram The Nationa