रज्जू भैयांचे साधेपण

विवेक मराठी    29-Jan-2020
Total Views |

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


rajju bhai_1  H

रज्जू भैया अनेकदा प्रभात शाखेनंतर स्वयंसेवकांकडे भेटायला जाण्याचे ठरलेले असायचे. एकदा दयानंद नगरात प्रभात शाखेनंतर दत्ता साठे यांच्या घरी चहापानाला रज्जूभैयांना नेले होते. आपल्या घरी एवढी मोठी व्यक्ती आली आहे. याचे साठेंच्या घरातल्यांनाही अप्रूप होते. त्यांचे देवघर मोठे होते. घरातील सगळे कुटुंबीय देवघरात गोलाकार करून बसले आणि त्यांनी रज्जूभैयांना थोडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली. रज्जूभैय्या म्हणाले की, ''मै तो सामाजिक कार्यकर्ता हूँ्। धार्मिक तथा आध्यात्मिक मार्गदर्शन नही करत सकता।'' नंतर त्यांनी जीवनमान आणि कौटुंबिक जीवन यावर मार्मिक विवेचन केले.
 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

(सदर आठवण पुणे संघसरितामधील रज्जू भैया आणि पुणे या लेखातील आहे.)