एकशे तीस कोटींचा विचार

विवेक मराठी    06-Jan-2020
Total Views |

डॉ. श्रीपती शास्त्री हे इतिहासाचे प्राध्यापक आणि रा.स्व. संघाचे केंद्रिय कार्यकर्ते होते. सेमेटिक धर्माचा सखोल अभ्यास असलेल्या श्रीपती शास्त्री यांनी 1984 साली दिलेल्या भाषणाचा संपादित अंश.

 130 Crore India As Hindu

'सद्यःस्थितीच्या संदर्भात ख्रिस्तमताचे भारतातील स्थान' या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन मांडण्यासाठी आज मला येथे बोलावण्यात आले आहे. आपणाला ठाऊकच असेल की हिंदुत्वाच्या समान आधारावर हिंदू लोकांना संघटित करण्याचे कार्य संघाने अंगीकारले आहे. हिंदुत्व म्हणजेच हा देश आणि त्याची संस्कृती यासंबंधी उत्कट प्रेम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने 'हिंदू' या शब्दाचा आशय राष्ट्रीय आहे, धार्मिक नाही. वस्तुतःच, ज्या अर्थाने इस्लाम आणि ख्रिस्ती हे धर्म समजले जातात, त्या अर्थाने 'हिंदू' हा धर्म नाही. हा मुद्दा मी आणखी स्पष्ट करतो.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


हिंदू - अनेक संप्रदायांची संसद

भारत हे एक प्राचीन राष्ट्र आहे. कदाचित सर्वात प्राचीन राष्ट्र ते असेल. क्रूर इतिहासाने दिलेले अनेक धक्के सोसून भारत प्रदीर्घ कालपर्यंत एक सुसंस्कृत जीवन जगला आहे. एका समान संस्कृतीने त्याला एकात्मता प्रदान केली आहे आणि कालौघातील विलक्षण सातत्य हे या संस्कृतीचे खास वैशिष्टय ठरले आहे. इतिहासाच्या या महान आणि सुदीर्घ ओघात येथे अनेक संप्रदाय निर्माण झाले आणि विविध प्रकारचे उपासनामार्ग उत्क्रांत झाले. बहुसंख्य लोक वेदांना आपल्या धर्माचे मूळ मानतात. ते हिंदू आहेत. पुष्कळ लोक वेदांचे प्रामाण्य नाकारतात. तेही हिंदूच आहेत. या देशातील फार मोठी जनसंख्या मूर्तिपूजक आहे. अर्थात ते हिंदू आहेत आणि आर्यसमाजी लोकांसारखे काही लोक मूर्तिपूजा तर्कदृष्ट असल्याचे म्हणतात, त्यांचाही समावेश हिंदूंतच होतो. जे स्वतःला अज्ञेयवादी म्हणवितात ते हिंदूच गणले जातात. चार्वाक नामक एका प्राचीन हिंदू ऋषीने एक दर्शन प्रचलित केले. हे दर्शन ईश्वराचे अस्तित्वच नाकारते. चार्वाक-दर्शन पूर्णतः जडवादी आहे, पण ते मानणारे हिंदूच होत. हिंदू हे कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट उपासना-पध्दतीचे नाव नाही, तर अनेक उपासना-पध्दतींचा तो समवाय किंवा संघ आहे. परंतु या भूमीसंबंधीचे प्रेम आणि तिचा इतिहास व तिची संस्कृती यांचा वारसा मानणारी सर्वांची समान भूमिका आहे. भारतातील ख्रिस्ती संप्रदायाने अद्याप या संघस्वरूपाशी संलग्नता स्वीकारलेली नाही. सुदूर भविष्यकाळात ख्रिस्ती संप्रदायदेखील या उपासनापध्दतींच्या संघाशी संलग्न होईल, असे दृश्य माझ्या मनश्चक्षूंपुढे तरळत आहे. ख्रिस्त्यांचा परमेश्वर, मुसलमानांचा परमेश्वर, बुध्दांचा परमेश्वर अथवा जैनांचा परमेश्वर या नात्याने हिंदू माणूस परमेश्वराकडे पाहत नाही. देव म्हणजे देव अशी हिंदूची साधी व सरळ भावना असते. एक देव आणि दुसरा देव यांत खरा आणि खोटा असा भेद तो करीत नाही. किंवा विशिष्ट ईश्वरकल्पना सर्व मानवजातीसाठी समान असली पाहिजे असे तो मानीत नाही. माणूस प्रगतीच्या अनेक कमी-अधिक पायऱ्यांवरून आणि अनेक दिशांनी आपल्या ईश्वररूप ध्येयाचा शोध घेत असतो, ही उघड दिसणारी वस्तुस्थिती तो स्वीकारतो. या शोधाच्या प्रत्येक अवस्थेसंबंधी त्याला सहानुभूती वाटते व सर्व धार्मिक कल्पना सत्य असल्याचे तो समजतो.

म्हणून, संप्रदायांची भरपूर विविधता येथे दिसते आणि हिंदू या नात्याने ही विविधता आम्हाला अभिमानास्पद वाटते. उद्या जर आमच्या एखाद्या देशबांधवाला एखाद्या विशिष्ट पध्दतीने परमेश्वराची उपासना करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी त्याला वाव मिळाला नाही, तर तेवढया प्रमाणात देश करंटा ठरला असेच एक हिंदू या नात्याने मला वाटेल. पण आमच्या पूर्वजांना असे मात्र कधीच वाटले नसेल की ज्या संप्रदायांचे येथे आपण स्वागत केले, तेच संप्रदाय या देशाची एकता, एकात्मता आणि सुखसमाधान यांना भयप्रद आव्हान उभे करतील.

देशविच्छेदनाची भयानकता

1947 साली जे देशविच्छेदन झाले, त्याचे स्मरण करा. घोर यातना आणि कधी झाली नसेल एवढी माणसाची विटंबना यांना त्यातून जन्म मिळाला. आपण घडवून आणलेल्या 'रक्तहीन राज्यक्रांती'चे पोवाडे गाईले जात असतानाच स्त्रिया, पुरुष आणि मुले यांच्या रक्ताचे पाट वाहत होते. प्रेम, सद्भाव आणि बंधुभाव यांतून साकारलेल्या स्वतंत्र आणि सुखसंपन्न भारताचे स्वप्न, अनेक पिढयांनी जोपासलेले दिव्य स्वप्न, केवळ सांप्रदायिक अभिनिवेशामुळे छिन्न-विच्छिन्न होऊन गेले! महात्मा गांधी आणि येथील सर्व थोर देशभक्त यांनी केलेले कार्य क्षणात धुळीला मिळून गेले. म्हणून, राष्ट्राच्या संदर्भात उपासनापध्दतीचे स्थान ठरविताना अतिशय काळजी घ्यावयास पाहिजे.

स्वातंत्र्यानंतरही, धार्मिक अल्पसंख्याकांचा प्रश्न हा सध्याच्या भारतातील एक अत्यंत प्रक्षोभक आणि गुंतागुंतीचा प्रश्न म्हणून कायम आहे. देशातील लोकांची मनोवृत्ती आणि देशविभाजनाचा भयानक अनुभव या गोष्टी लक्षात घेऊन घटना समितीने अल्पसंख्य गटांच्या प्रश्नाचा विचार केला. 'अल्पसंख्याकांचे अधिकार' घटनेच्या कलमात तपशीलवार नमूद असून सर्वांना आपआपल्या श्रध्देनुसार उपासना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. वस्तुतः, अन्य कोणत्याही देशाच्या राज्यघटनेत अल्पसंख्याकांसंबंधी एवढा औदार्याने विचार केलेला नाही. 'भारत म्हणजे अल्पसंख्याकांचा स्वर्ग' असे म्हणण्याचा मोह व्हावा, एवढया सवलती त्यांना आहेत आणि तरीही, भारतातील सुखी आणि सुसंवादी जीवनावर येथील सांप्रदायिक गटांनी जेवढे आपत्तिजनक अतिक्रमण केले आहे, तेवढे अन्यत्र कोठेही झालेले नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

ख्रिस्ती संप्रदाय हा या समस्येचाच एक भाग आहे. उपासना-संप्रदाय या नात्याने तो शेकडो वर्षे भारतात नांदलेला आहे आणि ख्रिस्ती मतानुयायी हे एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के असलेले धार्मिक अल्पसंख्य आहेत. केरळ आणि ईशान्य भारत यांसारख्या प्रदेशांत त्यांचे संख्याबळ अधिक आहे. आंध्र आणि तामिळनाडू अशा काही प्रदेशांत ख्रिस्ती संख्याबळ उपेक्षणीय नाही. गोव्यासारख्या काही छोटया विभागांत त्यांचा नुसता प्रभावच नाही, तर त्यांचे मत पुष्कळदा निर्णायकदेखील ठरते.

पार्श्वभूमी

प्रारंभी, ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकर्त्यांनी धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये विशेष रुची दाखविली नाही. धर्माच्या बाबतीत भारतीय जनतेच्या भावना विशेष नाजूक आहेत ही जाण त्यांनी ठेवली होती. 1781 साली कॉमन्स सभागृहाच्या एका समितीपुढे आलेल्या पुराव्यावरून सर्वसंमतीने असा निष्कर्ष निघाला की, 'स्थानिक लोकांच्या धर्मात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केल्यास परिणामतः ब्रिटिश साम्राज्यसत्ता भारतातून पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.' क्रमशः, धार्मिक बाबतीत कोणताच पक्ष न घेण्याचे एक धोरण उत्क्रांत झाले. पण गव्हर्नर्स आणि गव्हर्नर्स जनरल यांची खाजगी सहानुभूती मात्र ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कारवायांना असे. इंग्लडमधील इव्हॅन्जेलिकल (धर्मप्रचारक) पक्षाचे बळ हळूहळू वाढत होते आणि 'भारताचे ख्रिस्तीकरण' करण्याच्या धोरणाला लोकमताचा पाठिंबा मिळविण्याच्या दिशेने या पक्षाने आपले प्रयत्न केंद्रित केले होते. त्यांना या प्रयत्नात यश आले. इ. स. 1813च्या जुलै महिन्यात चार्टर ऍक्टमध्ये एक कलम समाविष्ट करण्यात येऊन सर्व संप्रदायांच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना भारतात प्रवेश करण्याची अनुमती देण्यात आली. ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या प्रयत्नांना कायदेमंडळाची मान्यता लाभली आणि या हालचालींना चांगलीच गती मिळाली.

हा उलटसुलट वाद आणि 'दि पार्टी ऑफ सेंट्स'ला लाभलेले अंतिम यश यामुळे, भारतात ख्रिस्ती धर्मप्रचाराच्या कामासाठी मोकळया असलेल्या कुरणाकडे इतरही पाश्चात्त्य देशांचे लक्ष वेधले आणि सर्व प्रकारच्या जातीय प्रतिनिधित्वाला मूठमाती द्यावी, अशी सूचना करणारे वक्तव्य त्यांनी 1928 साली प्रसिध्द केले. वाय.एम.सी.ए. आंदोलनाचे के.जे. पॉल यांनी असे मतप्रदर्शन केले की, ''सरकारी नोकऱ्यांतील लोकांची गुणवत्ता, चारित्र्य आणि कार्यक्षमता यांची प्रशंसा करणे किंवा सार्वजनिक नेतृत्वातील नीतिमत्तेचा आग्रह धरणे आणि त्या वेळी जातीवरून भांडत बसणे हे मुळीच सुसंगत ठरणार नाही.''

 

सद्भावना ख्रिस्ती मतानुयायांची संख्या बरीच आहे व त्यांच्या सद्भावनेला हिंदूंनी योग्य प्रतिसादही दिला आहे. भारतातील ख्रिस्ती संप्रदायाचा ब्रिटिश सत्तेशी आणि काही प्रमाणात पोर्तुगीज सत्तेशी गुंता झाला होता. भारतीय ख्रिस्तीजन या जाणिवेने अस्वस्थ होते की त्यांचे हेतूच मुळी संशयास्पद बनू पाहत आहेत. ख्रिस्ती समाजाचे एक अग्रगण्य नेते एच.सी. मुखर्जी यांनी मान्यच केले की, ''वेगळया संप्रदायामुळे आमच्या भारतीयत्वात बिगर ख्रिस्ती बांधवांच्या तुलनेने मुळीच उणेपणा निर्माण होत नाही, हे आम्ही आपल्या प्रत्येक शब्दाने आणि कृतीने दाखवून दिले पाहिजे. संपूर्ण देशाच्या भल्यासाठी अंगीकारण्यात येणाऱ्या प्रत्येक कामांत आपली भूमिका पार पाडण्यास आणि जबाबदारीचा आपला वाटा उचलण्यास आम्ही मागे राहत नाही, हे सिध्द केले पाहिजे.''

 

येशू ख्रिस्त आणि चर्च

ख्रिस्ताविषयी माझा पूज्यभाव आहे. हा भाव असण्याचे एक कारण म्हणजे मी हिंदू आहे. ख्रिस्ती संप्रदायात स्पृहणीय अशा अनेक गोष्टी आहेत. येशू ख्रिस्ताचे जीवनचरित्र, प्रेषितांच्या उक्ती, बोधप्रद कथा आणि त्यांतील उच्च नैतिक आदर्श वगैरेंचे मोल निस्संशय मोठे आहे. 'समर्न ऑन दि माउंट'मधील शिकवणीचा खोल ठसा मनावर उमटून राहतो. पण असे असले, तरीही परंपरेशी जखडलेला ख्रिस्ती संप्रदाय आणि चर्च यांच्याशी समरस मात्र होता येत नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


धर्मांतराचे राजकारण

ख्रिस्ती-हिंदू संबंधात जो काही तणाव दिसतो, त्याचे प्रमुख कारण म्हणजे ख्रिस्त्यांनी चालविलेली धर्मांतराची प्रचंड मोहीम. सर्व बाजूंनी परिस्थिती अनुकूल असलेला एखादा मनुष्य ज्या वेळी आपली ईश्वरविषयक आणि जगतासंबंधीची कल्पना प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्यावर बळजबरीने लादू पाहतो, जेव्हा कोणी मनुष्य दुसऱ्याच्या अंतःकरणातील सखोल आणि अत्यंत मूल्यवान भावनांवर आघात करतो, तेव्हा तो प्रतिकार ओढवून गेत असतो.


भारतातील ख्रिस्ती लोक हे एक तर धर्मांतरित आहेत किंवा पूर्वी केव्हातरी ज्यांचे बळजबरीने वा फसवून धर्मांतर करण्यात आले
, अशा लोकांचे वंशज आहेत. हृदयपरिवर्तनाने घडवून आणलेली धर्मांतरे विरळाच. आध्यात्मिक समाधानासाठी स्वेच्छेने करण्यात आलेल्या धर्मांतराला कोणी आक्षेप घेत नाही. रेव्ह. टिळक आणि पंडिता रमाबाई ही अशा प्रकारची उदाहरणे होत. भारताच्या सांस्कृतिक परंपरेसंबंधीचे त्यांचे प्रेम धर्मांतरामुळे मुळीही कमी झाले नाही. पण संपूर्ण गावेची गावे पाहता पाहता ख्रिस्ती कशी बनविली जातात? या सामूहिक धर्मांतरामागे काही आध्यात्मिक प्रेरणा असते काय? ज्या वेळी माणूस स्वेच्छापूर्वक आपला संप्रदाय बदलतो, त्या वेळी आधी त्याच्यामध्ये एक मोठे मानसिक परिवर्तन घडून येत असते. असा प्रकारे हिंदू धर्माचा त्याग सामूहिक धर्मांतराच्या प्रकारात कोणी केलेला नसतो. धमक्या, प्रलोभने, आर्थिक ओढाताण, अज्ञान, वंचना आणि छळवाद यांचाच बळी हे बहुतेक धर्मांतरित लोक झालेले असतात. ख्रिस्ती पंथासाठी नवे अनुयायी मिळविण्यात पाशवी बळाचा उपयोग कसा करण्यात आला, यासंबंधी कमी बोललेलेच बरे. तो मोठा विद्रूप असा भूतकाळ आहे.

 
आशिया खंडाचा बराच मोठा भाग इस्लाममय झाला आहे आणि तसाच एक मोठा भाग साम्यवादी बनला आहे. तिथे घुसण्यास ख्रिस्ती प्रचारकांना मोकळीक नाही, म्हणून त्यांच्या दृष्टीने भारत हे एक सुपीक कुरण ठरते. आमच्या समाजातील लोकांना, विशेषतः वनवासींना (ट्रायबल्सना) बाटविण्यासाठी सध्या ख्रिस्त सांप्रदायिक रात्रीचा दिवस करीत आहेत. आपला हेतू सिध्दीस नेण्यासाठी संपन्न गोऱ्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या संस्था या देशातील दारिद्रयाचे व सामाजिक दोषांचे भांडवल करीत आहेत. धर्मांतरे घडवून आणण्यासाठी प्रलोभन दाखविण्यासारखे महत्पाप त्यांच्याकडून होत आहे. उदाहरणार्थ, ईशान्य भारतातील बॅप्टिस्ट मिशनरी धर्मांतरास सिध्द होणाऱ्या वनवासींना पॉलिएस्टरच्या विजारी बक्षीसादाखल देतात. जर त्यांनी धर्मांतरास इतर वनवासींनाही प्रवृत्त केले, तर मोटरसायकली भेटीदाखल दिल्या जातात. नियोगी कमिशनने नमूद केल्याप्रमाणे, मध्य प्रदेशात वनवासींना पाच ते दहा डॉलर्सचे कर्ज व्याजाने दिले जाते. हे कर्ज सहजासहजी फिटणे शक्य नाही, हे मिशनऱ्यांना ठाऊक असते. पण कर्जदाराने जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर कर्जाची माफी देण्यात येते.

 

अधिक दिखाऊ व आकर्षक पातळीवर, ते शाळा आणि दवाखाने, निराधारांसाठी आश्रम आणि अनाथालये चालवितात. तथाकथित सामाजिक कार्याचा डोलारा उभा करतात. पण मूळ उद्देश धर्मांतरे घडवून आणणे अथवा धर्मांतरासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हाच असल्यामुळे ही सगळी सेवा कार्ये कलंकित आणि विषाक्त ठरतात.

 

समाजकार्य हा आता एक मोठा किफायतशीर व्यवसाय बनला आहे. हे मानवकल्याणाचे काम निरपेक्ष उरलेले नाही. वरवर पाहणाऱ्यांना ही ख्रिस्ती केंद्रे केवळ निरुपद्रवीच नव्हे, तर मानवी प्रेम आणि सहानुभूती यांची साक्षात प्रतीके वाटतात. 'सेवा', 'मानवाची मुक्ती' यांसारखे शब्द त्यांच्या भाषणांतून अखंड वापरले जातात. अंतिम उद्देश मात्र येथील लोकांचे अ-हिंदूकरण करण्याचा असतो. हिंदू जनता भोळीभाबडी आणि अंतःकरणाने सरळ असल्यामुळे या सगळया देखाव्यास बळी पडते. जेवढे बोलणे गोड असते, तेवढेच दात अधिक तीक्ष्ण असतात. औध्दत्याने सौजन्याचे सोंग आणावे, तसेच हे नाही काय? हे पाहून मला पूतनामावशीच्या गोष्टीचे स्मरण होते. कृष्णाला स्तनपान करविण्याची पूतनेची इच्छा होती. पण तिच्या स्तनांत दूध नव्हते तर विष होते!


 130 Crore India As Hindu

ख्रिस्ती पंथ आणि राष्ट्रीय एकता

ख्रिस्ती धर्मपरिवर्तनामुळे एखाद्या पाश्चात्त्य देशासंबंधी भलतेच प्रेम का वाटू लागावे, ही मोठी विलक्षण गोष्ट वाटते. काही काळपर्यंत साम्यवादी लाट थोपविण्याच्या नावावर याचे समर्थनही केले जात असे. धर्मांतरित पाश्चात्त्य राष्ट्रांविषयी एक मानसिक जवळीक निर्माण करण्यात येत असे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रीय समाजापासून त्यांना तोडण्यात येत असे. भाषा, लिपी, पोशाख, राहणीची एक शैली, मेजवान्या आणि समारंभ, नावे आणि नावे देण्याच्या पध्दती वगैरे सर्वच गोष्टींत बदल घडविण्यात येतो. ख्रिस्ती संप्रदायाच्या या पैलूमुळेच आज राष्ट्रीयत्वाशी त्याचा संघर्ष निर्माण झाला आहे आणि राष्ट्रीय समाज त्याच्याकडे जबर संशयाच्या दृष्टीने पाहू लागला आहे. यावरुन स्पष्ट होईल की एखाद्याने ख्रिस्ती संप्रदायाचा स्वीकार केला, म्हणजे तो केवळ उपासना पध्दतीतील बदल ठरत नाही तर त्याच्या निष्ठांच्या अग्रक्रमांतील बदल ठरतो. ख्रिश्चन म्हणजे संभाव्य पंचमस्तंभ असे अनेकांना का वाटते, यावरही या वस्तुस्थितीने प्रकाश पडतो.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परंपरागत हिंदू धर्माचे कठोर टीकाकार होते. आपण धर्मांतर करू अशी घोषणाही त्यांनी केली होती. पण निमंत्रणे आणि प्रलोभने यांना दाद न देता पर्यायी पंथ ख्रिस्ती किंवा इस्लामी संप्रदायाची निवड करण्यास त्यांनी स्वच्छ नकार दिला. हा नकार त्यांनी का दिला? ते म्हणाले, ''माझे लोक मुसलमान झाल्यास ते राष्ट्रीय भावना गमावतील आणि ख्रिस्ती झाल्यास ब्रिटिश शासनाला बळकटी येईल.'' या ख्रिस्ती पंथानुयांची संख्या वाढल्यास ब्रिटिश सत्तेला मजबूती येईल याचा अर्थ काय? ब्रिटिश परराष्ट्रमंत्री लॉर्ड हॅलिफॅ क्स यांचे असे उद्गार आहेत की, '' प्रत्येक नवा ख्रिस्ती माणूस म्हणजे या देशाशी एकत्वाचा नवा बंध होय आणि साम्राज्यसत्तेच्या शक्तीचा नवा स्रोत होय.''
 

'नागालँड'ची निर्मिती हे या दृष्टीने मोठे ठळक आणि चपखल उदहारण आहे. नागा टेकडयांत सुरू झालेल्या उघड बंडाचे सूत्रधार ख्रिती मिशनरी असल्याचे पं. नेहरूंनीदेखील मान्य केले होते. भारतीय सेनेविरुध्द नागांशी परकीय शस्त्रे वापरली. ती अमेरिकन शस्त्रे होती. आपली विमाने खाली पाडण्यात आली. झुंडगिरी करणाऱ्या या टोळयांचा बंडखोर नेता देशातून पळून गेला आणि आणि मायकेल स्कॉट या नामवंत मिशनऱ्याने त्याला आश्रय दिला. भारताची बदनामी करणारी अनेक वक्तव्ये या मायकेल स्कॉटच्या चिथावणीनेच संबंधित नागा नेत्याने प्रसिध्द केली होती. आंतरराष्ट्रीय दडपणासंबंधी आपले भारत सरकार वाजवीहून अधिक नाजूक आहे. नागालँडच्या बाजूने हे आंतरराष्ट्रीय दडपणासंबंधी आपले भारत सरकार वाजवीहून अधिक नाजूक आहे. नागालँडच्या बाजूने हे आंतरराष्ट्रीय दडपण ख्रिस्त्यांनीच उभे केले. त्यांनी 'शांततेच्या वाटाघाटी सुरू केल्या आणि हे सद्गृहस्थ - मायकेल स्कॉट - हे 'शांतता समिती'त होते. ख्रिती धर्मांधांनी भरलेले व त्यांच्याच प्रभुत्वाखालील वेगळे राज्य नागालँडमध्ये निर्माण करावे, हा खरे स्वप्स आहे. आज जेव्हा एखादा ख्रिस्ती नागा शिलाँगला जातो तेव्हा तो म्हणतो, '' मी भारतात जात आहे'' जणू काही तो भारताबाहेरचाच आहे!

 

'वेगळया झारखंड'चे बिहारमधील आंदोलन, शबरीमलाईसह अनेक प्राचीन हिंदू मंदिरांची केरळात झालेली विटंबना, कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाच्या जागी करण्यात आलेला उपद्रव, केरळातील निलक्कलचे ताजे प्रकरण आणि खंडखोर मिझो, भारतीय सेनेबरोबर ठाण मांडून करीत असलेल्या लढाया आदी सर्व ख्रिश्चनांच्या देणग्या आहेत. एक उपासना पंथ या नात्याने भारतातील ख्रिस्ती संप्रदायाचे स्वरूप लोप पावत असून एका साम्राज्यवादी विचारप्रणालीचे स्वरूप त्याला प्राप्त होत आहे. त्यांचे धार्मिक प्रमुख हे धर्मोपदेशकांपेक्षा अधिक काही तरी असतात. एका आफ्रिकन राष्ट्रवाद्याने म्हटल्याप्रमाणे , '' जेव्हा ते ( ख्रिती मिशनरी) प्रथमत: आले, तेव्हा भूमी आमच्याजवळ होती आणि बायबल त्यांच्याजवळ होते. आज मात्र बायबल आमच्याकडे आहे आणि आमची भूमी त्यांच्याकडे आहे.''


परकीय मिशनऱ्यांनो
, कृपा करून परत जा!

मोठया संख्येने आलेल्या मायकेल स्कॉट आणि फादर फेरर यांच्यासारख्या अनाहूत पाहुण्यांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यासंबंधी येथील लोकांना काय वाटते हे मुद्दाम स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकात नाही. 'पाखंडी' लोकांना 'दुर्गती' पासून वाचविण्यासाठी ते भारतात आलेले आहेत, दयाबुध्दीने प्रेरित होऊन ते आले आहेत, यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला सांगण्यात येते.

कोणत्याही मुस्लीम देशात एकादेखील मुसलमानाला ख्रिती धर्माची दीक्षा देण्याचा कोणा ख्रिस्ती धर्मप्रचारकाने प्रयत्न करून पाहावा. राज्ययंत्रणेची हालाचाल होऊन त्यांचा व्हिसा जप्त होण्यापूर्वी आणि त्यांच्यावर हद्दपारीची आज्ञा जारी होण्यापूर्वीच, मुस्लिमांचे जमाव तडकाफडकी त्यांचे हालहाल करतील व त्यांचा जीव घेतील, यात मुळीच शंका नाही. 'साम्राज्यवाद्यांचा हस्तक म्हणून पकडला जाऊन एखाद्या मजुरांच्या छावणीत रवानगी झाल्याविना कोणीतरी मिशनरी कम्युनिस्ट देशांत कोणाला आपल्या धर्माची दीक्षा देऊ शकेल काय? आग्ेय आशियातील काही देशांत अनेक मिशनरी 'राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तुरुंगांत खितपत पडलेले नाहीत काय? ब्रह्मदेशासारख्या बौध्द देशातदेखील मिशनऱ्यांना प्रवेशास मनाई आहे. बॉक्सर्सनी चीनमध्ये मिशनऱ्यांची काय अवस्था केली या विचारानेही अंगावर शहारे येतात. अशा प्रकारच्या घटनांनी भरताचे नाव कलंकित होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. बांगला देश आणि पाकिस्तान येथे गेल्यास मिशरींची कशा प्रकारे संभावना होईल. हे पोरासोरांनाही कळते. भारताच्या बाबतीत त्यांनी निर्धास्त न राहणे इष्ट होईल. त्यांनी स्वत:च भारतातून स्वदेशी निघून जाण्याची ही वेळ आहे. जोवर सारे सुरळीत आहे तोवरच त्यांनी परतणे, काढता पाय घेणे शहाणपणाचे, प्रत्येक परकीय ख्रिस्ती मिशनऱ्याने सुखरूप आपल्या ठिकाणी पोहोचावे व भारताच्या मधुर स्मृती मनात बाळगाव्या अशीच माझी भावना आहे. महात्मा गांधींचे शब्द निस्संदिग्ध आहेत - जर तुम्हाला वाटत असेल की, जगाला देण्यासाठी भारताजवळ काही संदेश आहे, भारतातील उपासना मार्गदेखील सत्य आहेत आणि तुम्ही त्यांचे साहाय्यकर्ते आणि सत्याचे सहअन्वेषक म्हणून तुम्ही आला असाल, तर तुम्हाला येथे स्थान आहे. पण तुम्ही जर 'खऱ्या धर्मोपदेशा'चा (true gospelचा) प्रचार अज्ञानांध:करात भटकणाऱ्या लोकांत करण्यासाठी येथे येत असला, तर माझ्यापुरते तरी मी म्हणेन की, तुम्हाला येथे स्थान मिळू शकत नाही. म्हणून भारतीय ख्रिस्ती संप्रदायाची आंतरराष्ट्रीय बैठक ताबडतोब नाहीशी करण्याची आवश्यकता आहे.

 

भारतीय ख्रिस्त्यांच्या हातात येशू आणि त्याची शिकवण ही अगदी सुरक्षित आहेत. त्यांच्यातून बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल्सदेखील निपजले आहेत. भारतीय भाषांत ख्रिस्ती पंथावर भरपूर साहित्यही त्यांनी प्रकाशित केले आहे. ड्डया पाश्चात्त्य देशांनी ख्रिश्चन धर्म झिडकारला, ते भारताकडे निर्यातीसाठी त्याचा उपयोग करीत आहेत. परकीयांच्या धर्मविषयक खास ज्ञानाची येथे मुळीही आवश्यकता नाही. म्हणून परकीय धर्मप्रचारकांनी परत जाणे आवश्यक आहे. जेवढया लवकर ते परततील तेवढे बरे. परदेशांतील माणूस येते विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक, खेळाडू, या किंवा अन्य कोणत्याही नावाने येऊ शकतो. सत्ताधारी किंवा धर्मप्रचारक या नात्याने मात्र तो येऊ शकत नाही. कारण तसा तो आल्यास येथील लोकांवर काही तरी 'लादण्यास' येतो. हिंदू प्रतिकार करतात तो या 'लादण्यास'. फादर फेरर यांच्या कारवायांसंबंधी हिंदूंची प्रतिक्रिया काय झाली, याचे मी आपणास स्मरण करून देण्याची आवश्यकता नाही. तो केवळ साधा उद्रेक नव्हे, तर भविष्यकाळातील काय वाढून ठेवलेले आहे. त्याचेच ते गमक आहे.

 

हरिजन ख्रिस्ती

चार ख्रिस्ती संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांचा आग्रह होता की, हिंदू हरिजनांना ज्या सवलती मिळतात त्या ख्रिस्ती मतांचा अंगीकार केलेल्या हरिजनांनाही मिळाव्या. जाचातून सुटण्याचा मार्ग म्हणून हिंदू हरिजनांपुढे ख्रिस्ती बनण्याचा पर्याय ठेवण्यात आला. पण एकदा ते ख्रिस्ती बनले की, जुन्याच आधाराची पुन्हा उसनवारी करण्यात येते. ख्रिस्ती झालेल्या हिंदू हरिजनांचा कोणताही लाभ होत नाही, त्यांची आर्थिक दु:स्थिती सुधारत नाही आणि धर्मांतर हे वाईटांतून चांगल्याकडे स्थित्यंतर नव्हे, याचीच ही स्पष्ट कबुली आहे. पूर्वी ख्रिस्ती झालेल्या आणि आता हिंदू समाजात पुन्हा प्रविष्ट होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यांना ख्रिस्ती संप्रदायाकडेआकृष्ट करताना समानतेचे जे अभिवचन तुम्ही देता, ती समानता प्रत्यक्षात त्यांना लाभत नाही. पण दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त लाभ घेण्याची तुमची प्रवृत्ती दिसते.

1981च्या जून महिन्यात, मदुरेपासून केवळ 40 कि.मी अंतरावरील कुरायूर सुमारे 200 हिंदूंनी आणि 50 ख्रिस्त्यांची इस्लामचा स्वीकार केला. हरिजन हिंदू आणि हरिजन ख्रिश्चन यांना सारख्याच अडचणींना तोंड द्यावे लागते, हे या धर्मपरिवर्तनाचे कारण. जातिभेदाचे तथाकथित दुष्परिणाम दूर करण्यासख्रिस्ती पंथ असमर्थ ठरला आहे. सामाजिक अभिसरण नसलेले स्पष्ट गट ख्रिस्ती मिशनरी सेक्युलॅरिझमसंबंधी तावातावाने बोलतो, कारण त्यामुळे त्यांच्या धर्मांतराच्या व येथील लोकांचे अराष्ट्रीयीकरण घडवून आणण्याच्या कारवायांना साहाय्य होत असते. तो अन्य सगळया संप्रदायांचा समान आदर करण्यास तयार आहे काय आणि सर्वधर्मसमभावावर श्रध्दा व्यक्त करण्यास सिध्द आहे काय, असे त्याला विचारा. तो आपली अगतिकता व्यक्त करून म्हणेल, ''छे, माझी धर्मश्रध्दा मला तसे करू देत नाही.'' त्याच्या मते, इतर सर्व संप्रदायांचे लोक 'पाखंडी' असून 'सैताना'पासून त्यांना 'वाचवायाचे' आहे. यासाठी एका 'ईश्वराच्या त्या एका लेकराच्या एका शब्दावर' विश्वास ठेवण्यास त्यांना शिकवावयाचे आहे. त्याच्या सेक्युलॅरिझमचे बंड अशा प्रकारे फुटते. वरील उल्लेखलेल्या मुलाखतीत मदर तेरेसा यांना विचारण्यात आले. ''चर्च विरुध्द गॅलिलिओ या जुन्याच पेचात सापडल्यास आपण कोणाची बाजू घ्याल?'' आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले - 'चर्च'! अंधश्रध्देपासून विवेकबुध्दीला मुक्त करण्यासाठी युरोपने शतकानुशतके केलेला संघर्ष वायाच गेला म्हणावयाचा! पवित्र ख्रिस्त्यांत जे जे चांगले आणि उदात्त आहे, जे एरवी स्पृहणीय ठरते, ते सारे चर्चचा प्रश्न येतो तेव्हा बाजूला पडते. त्यांच्या मनाची कवाडे बंद असल्याचा प्रत्यय येतो.

 
 130 Crore India As Hindu

यातून मार्ग कायरा.स्व. संघाचा मार्ग

रा.स्व. संघाचे दिवंगत सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि त्यानंतरचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या मते, एखाद्या देशाचे राष्ट्रीयत्व ठरविताना धर्म हा अपरिहार्य घटक मानण्याचे काही कारण नाही. बराच काळपर्यंत युरोपमध्ये धर्म ही ऐक्यनिर्मितीची समर्थ शक्ती मानली जात असे. रहिवाशांत धार्मिक ऐक्य निर्माण करण्यासाठी अनेक देशांनी सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'राष्ट्र'कल्पनेत मात्र तो राष्ट्रीयत्वाचा अत्यावश्यक घटक नाही. धर्माचा संबंध मुख्यत: आपल्या अंत:प्रवृत्तींशी (Conscienceशी) पोहोचतो अणि उपासना पध्दतीमुळे लोकांच्या सामाजिक व राष्ट्रीय दृष्टीकोनावर परिणाम होता कामा नये. समान उपासना पध्दतीपेक्षा समान जीवनपध्दती हा हिंदू राष्ट्रीय जीवनाचा ठळक विशेष राहत आला आहे. ऐक्य किंवा एकात्मता यांची हिंदू कल्पनाच सुसंवाद अशी आहे. बाह्य समानता या कल्पनेत निश्चितच अभिप्रेत नाही. माणसाचे राष्ट्रीयत्व हिंदू असूनही त्याच वेळी तो सनातनी आर्यसमाजी, मुसलमान अथवा ख्रिस्ती, शीख आणि बौध्द असू शकतो.

श्री. गोळवलकरांच्या हिंदुत्वात येशू ख्रिस्तासाठी भूरपूर जागा आहे. तसेच महमंद, झरथुष्ट्र आणि मोझेस यांच्यासाठीही स्थान आहे. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना इतरांपेक्षा कमी अधिकार असावेत असे कुणी सुचविले असते, तर त्यांना धक्काच बसला असता. केवळ धर्मश्रध्देच्या आधारावर कोणत्याही दोन व्यक्तींत भेदभाव करणे हे हिंदूपणाशी विसंगत आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी ते पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहे..

''जो कोणी हिंदू या देशात राहत असेल त्याला एक राष्ट्रधर्म असतो, एक समाजधर्म असतो, एक कुलर्धम असतो आणि केवळ व्यक्तिधर्म म्हणूनच तो आपली आध्यात्मिक ओढ शांत करू शकेल अशा एखाद्या उपासना-पध्दतीचा स्वीकार करू शकतो. जर सामाजिक जीवनातील सारी कर्तव्ये पार पाडल्यानंतर कोणी म्हणत असेल की, मी कुराण शरीफचा किंवा बायबलचा अभ्यास केला आहे आणि भगवंताची आणि त्या मार्गने तो अधिक चांगली उपासना करू शकतो, तर त्याला आमचा अजिबात आक्षेप नाही.''
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/