साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मांतराची बुवाबाजी?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Jan-2020
|


sahitya sammelan_1 &

अशाच साहित्य संमेलनात प्रा. शेषराव मोरेंसारख्या खऱ्या सेक्युलर माणसाला हिंदूंची बाजू घेतो म्हणून विरोध करणे आणि फादर दिब्रेटोसारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला पाठिंबा देणे हा पुरोगामी अजेंडयाचा भाग आहे. फादर दिब्रेटो या पुरोगामी कंपूत राहून मोठया चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आलेले आहेत. हिंदुत्वाला शिव्या देण्यात हा फादर दिब्रेटो कायम अग्रास्थानी राहिलेले आहेत. पण फादरने कधी ख्रिस्ती धर्मछळ
, अंधश्रध्दा यावर टीका केली आहे काय?

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्री यांची नेमणूक होत आहे. हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे. या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय? त्याला काय म्हणून अध्यक्ष केले? फादरने कोणती पुस्तके लिहिली आहेत? फादरच्या पुस्तकांची नावे काय आहेत? - फादरची पुस्तके पुढीलप्रमाणे : - ख्रिस्ताची गोष्ट, ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल, आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, सुबोध बायबल - नवा करार, परिवर्तनासाठी धर्म, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, मुलांसाठी बायबल! फादर फ्रान्सिस दिब्रेटोची ही मराठी साहित्यसेवा आहे? की ख्रिस्तसेवा आहे?

समलैंगिकता आणि गर्भपात यावर या ख्रिस्ती पाद्रयाची काय मते आहेत? याने वेळोवेळी विज्ञानाला विरोध करत ख्रिस्ती अंधश्रध्दांना खतपाणी का घातले? कुमारी माता हे काय प्रकरण आहे? कोणी पुरोगामी माईचा लाल हे प्रश्न विचारणार आहे की नाही?

हे फादर दिब्रेटो पांढऱ्या पायघोळ झग्यात गावभर हिंडून व्याख्याने देत असतात. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भाषण करतील तेव्हाही पाद्रयाचा पांढरा झगा घालून भाषण देणार काय? हिंदू धर्मातले दोष दाखवून ख्रिश्चन व्हायचे आवाहन करणार काय? अशा प्रकारच्या ख्रिस्ती धर्मांतराला साहित्य संमेलन पाठिंबा देणार काय? देणार असेल, तर साहित्य संमेलनाचा हा बैलबाजार कायमचा बंद करून टाकायला हवा.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

वागळे, चौधरी यांच्यासारखे हिंदूंच्या मुळावर उठलेले पुरोगामी याचे स्वागत करतील, यात शंका नाही. अशाच साहित्य संमेलनात प्रा. शेषराव मोरेंसारख्या खऱ्या सेक्युलर माणसाला हिंदूंची बाजू घेतो म्हणून विरोध करणे आणि फादर दिब्रेटोसारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला पाठिंबा देणे हा पुरोगामी अजेंडयाचा भाग आहे. फादर दिब्रेटो या पुरोगामी कंपूत राहून मोठया चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आलेले आहेत. हिंदुत्वाला शिव्या देण्यात हा फादर दिब्रेटो कायम अग्रास्थानी राहिलेले आहेत. पण फादरने कधी ख्रिस्ती धर्मछळ, अंधश्रध्दा यावर टीका केली आहे काय? मनुवाद, गोडसेवाद, फॅसिझम असे पुरोगामी पठडीतले शब्द वापरत ख्रिस्ती धर्माचा आणि ख्रिश्चन अंधश्रध्दाचा प्रसार करणे - ख्रिस्ती धर्मांतर करणे हेच फादर दिब्रेटोचे जीवनध्येय आहे. फादरने तसे ध्येय ठेवण्यात काही गैर नाही. पण अशा धर्मांध लोकांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करणे ही लाचारीची हद्द आहे.

मे.पु. रेगे या ज्येष्ठ विचारवंतांनी फादर दिब्रेटोंचे वस्त्रहरण आधीच केलेले आहे. फादरच्या अनेक लेखांत त्यांचा ख्रिस्ती कावा उघड झाला आहे. उदाहरणार्थ, फादर कधीच सांगणार नाहीत की इन्क्विझिशन काय होते? विच हंट म्हणून हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारणारे ख्रिस्ती चर्च समतावादी कधी झाले? हा ख्रिस्ती पाद्री मनुवाद फॅसिझम अशा खास पुरोगामी शब्दांचा कायम वापर करत असतो आणि हिंदूंना हीन लेखत असतो. फादरला कोणीतरी सांगितले पाहिजे की फॅसिस्टांचा औरस बाप म्हणजे बेनिटो मुसोलिनी. त्याने ख्रिस्ती चर्चच्या पायस पोपशी 1929मध्ये युती करून व्हॅटिकन हे स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. या व्हॅटिकनमध्ये बसूनच आजचे पोप जगाला ख्रिस्ती करण्याची स्वप्ने पाहत असतात. आणि चर्चचा 1929पर्यंत फॅसिझमला तत्त्वतः विरोधही नव्हता. या चर्चने जगभर अत्याचार केले आहेत. विच हंट म्हणून स्त्रियांना जिवंत जाळले आहे. गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञाशी गुंडगिरी केली आहे. जगभरातल्या क्रूर पाशवी हुकूमशहांशी युती करत हे ख्रिस्ती म्हणजे जगातले सर्वात मोठे रियल इस्टेटचे मालक आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

आता फादर दिब्रेटो संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाषण देतील आणि समाजवाद्यांच्या भाषेत 'भूमिका' घेतील. ही 'भूमिका' अर्थातच हिंदुत्वाचे राजकारण आणि हिंदूंचा धर्म यांच्या विरोधी असेल. त्या वेळी ख्रिस्ती धर्म कसा समतावादी आहे - हिंदू मनुवादी आहेत, ख्रिस्ती धर्म कसा सुधारलेला आहे - हिंदू अंधश्रध्द आहेत, असे तारे तोडत ख्रिस्ती अंधश्रध्दांचा सरकारी खर्चाने प्रचार होईल... आणि हिंदू षंढासारखे बघत राहतील.

- डॉ. अभिराम दीक्षित

(डॉ. अभिराम दीक्षित यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/