तत्त्वज्ञ मे. पुं. रेगेकृतफादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वस्त्रहरण

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Jan-2020
|

**प्रा. शेषराव मोरे**

फादर दिब्रिटो यांच्या धर्मांतराविषयीची भूमिका मांडणार्या एका लेखाचा मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रमुख संपादक मे.पुं. रेगे यांनी घेतलेल्या समाचारावर आधारित शेषराव मोरे यांचा पूर्वप्रकाशित लेख


rege_1  H x W:

प्रथमदर्शनी स्वातंत्र्यवादी उदारमतवादी भासणारे हे फादर किती कडवे धर्मवादी धर्मप्रचारक आहेत, हे सर्वसामान्याच्या लवकर लक्षात येत नाही. प्रत्येक भाषणातून वा लेखनातून ते आपले खरे मन अंतरंग प्रकट होऊ देत नाहीत. त्यांच्या लाख गोडगोड उदात्त शब्दांच्या बोलण्यामुळे अनेक हिंदू त्यांचे चाहते बनले आहेत. यात मोठे विचारवंतही आहेत, पुरोगामी विचारवंत तर त्यांचा चाहताच बनलेला असतो.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

ते सारे दिब्रिटो यांच्या धर्माच्या बाजूने होऊन त्यांच्या विरोधकांवर कठोर प्रहार करीत असतात. त्यांच्यावर वा त्यांच्या धर्मावर किंवा धर्मप्रसारावर ते कधीही टीका करत असलेले आपल्याला दिसणार नाहीत. परंतु या पुरोगामी सिद्धान्ताला महाराष्ट्रात एक सन्माननीय अपवाद सापडला आहे, तो अपवाद म्हणजे थोर तत्त्वज्ञ, नवभारत मासिकाचे संपादक, वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाचे अध्यक्ष, .रा. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रमुख संपादक असलेले मे.पुं. रेगे हे होत. (ते डिसेंबर 2000मध्ये वारले.) प्रकांडपंडित पुरोगामी असूनही ते त्याची पर्वा करता ख्रिश्चन संबंधात निर्भीडपणे सत्य कथन करीत असतात.

नवभारत मासिकाच्या ऑगस्टच्या अंकात फादर दिब्रिटो यांच्या काही युक्तिवादाविषयी हा त्यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झालेला आहे. या मासिकाचा खप अतिशय मर्यादित निवडक विचारवंतांपुरता सीमित असल्यामुळे तो लेख सर्वसामान्य वाचकांना वाचण्यास मिळत नाही. त्यामुळे या लेखात त्यांनी मांडलेली सत्य विचार सर्वसामान्य वाचकांसाठी माहिती होणे आवश्यक आहे.

 

अमृत आणि विष

त्याच अंकात फादर दिब्रिटो यांचाधर्मांतर : काही मूलभूत प्रश्ननावाचा टिपणवजा लेख प्रसिद्ध झाला आहे. धर्मांतराविषयी खूप चर्चा होत आहे, यानिमित्ताने मंथन होत आहे, अमृताबरोबरच विषही बाहेर येत आहे, धर्मांतराविषयी काही मूलभूत प्रश्नांची चर्चा करण्याचा अल्प प्रयत्न आहे असे त्यांनी पहिल्याच प्रस्ताविक परिच्छेदात म्हटले आहे.

म्हणजे धर्मांतराची चर्चा करताना या लेखात वाचकांना अमृत दिले जाणार आहे हे आश्वासन आहे, तर विरोधक असलेले हिंदुत्ववादी यांच्या मतप्रदर्शनातून विष बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे, असे तेथे वेगळ्या भाषेत सांगत आहेत. त्यांच्या या लेखातील काही अमृतकणांना रेगे यांनी त्याच अंकात उत्तर देण्यासाठी लिहिलेला तो लेख होय. रेगे यांनी आपल्या लेखाच्या समारोपात वरील आश्वासनाला उद्धृत करून त्यावर निष्कर्ष मांडला आहे की, त्यांच्या टिपणातून कालकूट (विष) पाझरत आहे, हे त्यांना (दिब्रिटो) दिसत नाही. मूलभूत प्रश्न म्हणून दिब्रिटो यांनी जे विचारमंथन केले आहे, हे त्यातून अमृताऐवजी विष कसे बाहेर आले आहे हे त्यांनी आपल्या लेखात अतिशय परखडपणे पुराव्यांनिशी दाखवून दिले आहे.

दिब्रिटो यांचा लेख म्हणजे प्रत्यक्ष उघडपणे नाव घेता हिंदुत्वनिष्ठांवर ठेवलेले आरोपपत्रच होय. त्यांच्यासाठी दिब्रिटो यांनी आपल्या पाच-सहा पृष्ठांच्या लेखात वापरलेली पुढील विशेषणे पाहिली, तर या लेखाची दिशा कळून येईल - फॅसिस्ट प्रवृत्तीचे, धर्मांध, कट्टर, हिंदुत्ववादी विषमतावादी, वर्णवर्चस्ववादी, मनूवादी, गोडसेवादी, मूलतत्त्ववादी, जीर्णमतवादी, स्वातंत्र्यविरोधक, गांधीजींचे मारेकरी, ख्रिश्चनांवर हल्ले करणारे, विरोधकांचे निर्दालक, संहारक, साक्षरताविरोधक ही विशेषणे लेखात अनुक्रमे चार पाच वेळा पुनरावृत्त झालेली आहेत.

आपला ख्रिश्चन धर्म कसा सर्वश्रेष्ठ मानवी मूल्याधारित आहे, हे जागोजागी सांगितलेले आहे. त्या धर्मात संपूर्ण मतस्वातंत्र्य आहे. त्यात मतपरिवर्तन आत्मपरिवर्तन या मार्गानेच धर्मस्वीकार होत असतो. ती एक आध्यात्मिक वाट आहे. धर्मस्वीकारापूर्वी सहा महिने अभ्यासक्रम घेतला जातो. सक्तीच्या धर्मांतराला ख्रिस्ती धर्मात स्थान नाही. स्वातंत्र्य, समता बंधुता ही मूल्ये देणारा हा धर्म आहे. दीनदुबळ्यांची सेवा हा त्यांचा अविभाज्य भाग आहे. या धर्मामुळे वर्ण-धर्माची इमारत जमीनदोस्त होऊन एकवर्णी समाज निर्माण होत असतो. उच्चवर्णीयांनी पायदळी तुडवलेल्यांना त्यात आधार आहे... अशा प्रकारे त्यात धर्मगौरव आला आहे. रेगे यांनी फादरचे हे मत, युक्तिवाद निष्कर्ष निव्वळ निराधार असत्य अप्रामाणिक आहेत ते आपल्या धर्माचे राजकारण करीत आहेत असे दाखवून दिले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 


दिब्रिटो
यांच्या वकिली चलाख्या

वस्त्रहरणास प्रारंभ करताना रेगे म्हणतात, ‘दिब्रिटो यांचे टिपण वाचल्यावर मनावर जो पहिला ठसा उमटतो तो असा की हे वकिली पद्धतीने लिहिलेले टिपण आहे. आपल्या पक्षाचा बचाव करताना त्याच्याविरुद्ध जाणारा पुरावा वकिलाला माहीत असला, तरी तो पुरावा तो स्वतः होऊन पुढे आणीत नाही, इतकेच नव्हे, तर झाकण्याचा प्रयत्नदेखील करतो.’ याचा एक पुरावा ते लगेच सादर करतात. यासाठी ते दिब्रिटो यांच्या लेखातील पुढील विधाने उद्धृत करतात -

असहिष्णुतेला जागतिक वारसा आहे. जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्यात आले. मनूवाद्यांनी तुकाराम, ज्ञानेश्वर यांचा छळ केला. युरोपमध्ये लोकांनी इन्क्विझिशन चालून लोकांचा छळ केला.’ या विधानातील वकिली खोच सामान्य वाचकांना कळणार नाही. ती कळण्यासाठी रेगेंसारख्या तर्कशास्त्राचा पंडित लागतो. यावरील त्यांचे भाष्य पाहा -

जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्यात आले हे वाक्य कर्मणी प्रयोगात आहे. कर्ता कोण, ‘जोनला कोणी जाळले हे याच्यात निर्दिष्ट केलेले नाही. (त्या)पुढचे वाक्य कर्तरी प्रयोगात आहे. मनूवाद्यांनी तुकाराम, ज्ञानेश्वर यांचा छळ केला. जोन ऑफ आर्कला कोणी जाळले ही गोष्ट दिब्रिटो यांनी मोठ्या चलाखीने लपवून ठेवली आहे.’ ती गोष्ट रेगे यांनी उघड केली, ती अशी - रोमन कॅथलिक ख्रिश्चन चर्चच्या अधिकृत न्यायसभेने तिला पाखंडी म्हणून दोषी धरले आणि जिवंत जाळले. म्हणजे दिब्रिटो ज्या धर्माचे फादर आहेत, त्याच धर्माच्या न्यायसंस्थेने तिला जिवंत जाळले होते. पण वकिली पद्धतीने फादर ही गोष्ट लपवून ठेवतात स्वतःच्या धर्माला सहिष्णू म्हणून गौरवितात.


आता
त्यापुढचे वाक्य -

लोकांनी इन्क्विझिशन म्हणजे शिक्षा यंत्रणा चालवून अनेकांना छळले.’ आता हे चालविणारे लोक कोण, हे दिब्रिटो सांगत नाहीत. रेगे तपशील उघड करतात - ‘इन्क्विझिशन ही कॅथलिक चर्चची अधिकृत यंत्रणा होती. पोप 9वा ग्रेगरी यांनी 1230मध्ये पाखंडी लोकांना हुडकून काढून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी इन्क्विझिशनची स्थापना केली. 1478मध्ये चौथा सिक्स्टन यांनी स्पॅनिश इन्क्विझिशनला अधिकृत मान्यता दिली. पोप पाचवा पायस यांनी पाखंड आणि असत्य चुकीची धर्ममते यांचा बीमोड करणे हे आपले कर्तव्य राहील असे जाहीर केले. त्यासाठी आजन्म कैद मालमत्ता जप्त करणे या कठोर शिक्षा होत्या, पण देहांताचीही शिक्षा होत असे. टॉमस डी टँर्कीमाडा यांनी निदान 2000 लोकांना जिवंत जाळले. 1908मध्ये दहाव्या पायस यांनी इन्क्विझिशन हा शब्द काढला आणि श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी पवित्र कार्यालय (केश्रू ेषषळलश) सुरू केले.’ म्हणजे इन्क्विझिशन चालवून कॅथलिक नसणार्यांना छळणारे, मारणारे, जाळणारे गुन्हेगार दिब्रिटो ज्या धर्माचे आहेत त्या ख्रिश्चन धर्माचेच धर्मगुरू होते. मात्र दिशाभूल करण्यासाठी त्यांनी लोकांनी असे मोघम लिहिलेले आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

रेगे सांगतात की, ‘इतिहासात लोकांनी अनेक गुन्हे केले आहेत. मात्र इन्क्विझिशन संघटित करण्याचा गुन्हा त्यांनी केलेला नाही. हा गुन्हा असेल तर तो चर्चने केलेला आहे. असेच प्रकार ख्रिश्चन काळात गोव्यातही घडलेले होते.’ मे.पुं. रेगे हे दिब्रिटो यांना सुनावतात की, गोव्यात इन्क्विझिशन जो हाहाकार माजविला, त्याचे स्मरण दिब्रिटो यांना असायला हवे होते. दिब्रिटो यांच्या लपवालपवीला चलाखी म्हणावे का आणखी काही म्हणावे, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.


ख्रिश्चनांची
स्वातंत्र्यबंदी

दिब्रिटो यांच्यामते ख्रिस्ती धर्मस्वातंत्र्यवादी, समतावादी आहे. परंतु वास्तविक मनूवादी प्रवृत्तीचा मूलभूत स्वातंत्र्याला विरोध आहे. स्त्रियांना शूद्रांना त्यांनी स्वातंत्र्य नाकारले आहेच, तसेच एकूण स्वातंत्र्य (श्रळलशीीूं) आणि मानवी हक्क (र्हीारप ीळसहीीं) या गोष्टी त्यांनी खुल्या मनाने स्वीकारल्या आहेत का? हा खरा प्रश्न आहे. यास उत्तर देताना रेगे म्हणतात, ‘आता हा प्रश्न इन्क्विझिशनवादी कॅथलिक धर्मगुरूंनाही विचारता येईल. त्यातली चर्च धार्मिक आणि नैतिक क्षेत्रात विचारस्वातंत्र्य नाकारते, हे प्रसिद्ध आहे. पोप धर्माच्या नावावर अधिष्ठित झालेला असताना देव, शास्त्र आणि नीती याविषयी जे आदेश देतो ते प्रमाण म्हणून सर्व कॅथलिकांना स्वीकारावी लागतात. येथे मतभेदाला, चर्चेला जागा नाही... मग कुठे आहे विचारस्वातंत्र्य?’

आणि मग रेगे ख्रिश्चन चर्चने जनतेच्या स्वातंत्र्याची कशी गळचेपी केलेली आहे हे उदाहरणांनी दाखवून देतात. या संबंधात चर्चने निषिद्ध म्हणून ज्या ग्रंथांवर बंदी घातली, त्या ग्रंथांच्या यादीचा उल्लेख करतात. या संबंधीच्या चर्चच्या धोरणाविषयी ते लिहितात - ‘ज्या ग्रंथांच्या वाचनाने कॅथलिकांची धार्मिक श्रद्धा किंवा नीती भ्रष्ट होईल असा धोका होता, त्यांची यादी अधिकृत सेन्सॉरकडे तयार करीत असे आणि मग त्या ग्रंथाचे वाचन कॅथलिकांना निषिद्ध असे... पुस्तके प्रकाशनापूर्वी अधिकृत संस्थांकडून तपासून घेतली जात.’ ही प्रथा अजूनही चालू आहे. दुसरा प्रकार म्हणजे अपायकारक ठरतील अशा प्रकाशित ग्रंथांवर बंदी घालणे. तेव्हा रोमन कॅथलिक चर्च व्यक्तिस्वातंत्र्याच्या किती आदर करतो हे यावरून स्पष्ट होईल. दिब्रिटो यांची अफाट मिथ्या विधाने रेगे यांनी अशा प्रकारे अर्थशून्य असत्य असल्याचे दाखवून दिले आहे.

 
 130 Crore India As Hindu


श्रेय
उपटण्याचा खोटेपणा

मे.पुं. पुढे लिहितात - ‘दिब्रिटो यांनी कहर केला आहे तो पुढील वाक्यात. ते लिहितात - स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्व ही त्रिसूत्री फ्रेंच राज्यक्रांतीतून (आणि पर्यायाने नवीन करारातून) झिरपत आलेली असल्यामुळे, म्हणजे ही मुले परदेशी वाटल्यामुळे जीर्णमतवादी यांना ती स्वीकारावी वाटत नसावीत का?’

येथे दिब्रिटो यांनी फ्रेंच क्रांती आणि नवा करार म्हणजे ख्रिश्चनांचे बायबल एकच मानले आहे त्या प्रत्येकातून मूल्य त्रिसूत्री झिरपत असल्याचे म्हटले आहे. यातून खोटेपणा दाखवून देताना रेगे लिहितात - ‘पहिली गोष्ट म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचे जे विचारवंत होते, त्यांचा हल्ला दोन संस्थांवर केंद्रित झाला होता. एक म्हणजे धर्मसंस्था किंवा रोमन कॅथलिक चर्च. फ्रान्समध्ये तेव्हा प्रस्थापितांचे अंगभूत भाग होते. आणि दोन म्हणजे राजेशाही. वॉल्टेअर चर्चचा उल्लेख कुख्यात (ढहश ळपषर्रोीी) असा करत असे आणि चर्चला चिरडून टाकावे हे त्यांचे घोषवाक्य होते. डीदेरो, रुसो इत्यादी फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रमुख वैचारिक नेते चर्चचे प्रभावी टीकाकार होते. ख्रिस्ती श्रद्धेचा त्यांनी अव्हेर केलेला होता. स्वातंत्र्य समता ही मूल्ये जरी रोमन कॅथलिक चर्च दृष्टीने स्वदेशी होती, परदेशी नव्हती, तरी चर्चला स्वीकारार्ह वाटली नाहीत.’ फ्रेंच क्रांतीला अभिप्रेत मानवी समतेची मूल्ये चर्चला मुळीच मान्य नव्हती. उलट चर्च संघर्ष करूनच ती मिळालेली आहेत असे सांगूनत्याचे श्रेय चर्चने घेऊ नये,’ असा सल्ला मे.पुं. देतात.

ख्रिश्चन धर्माची गुलामगिरी

ख्रिश्चन धर्मात आध्यात्मिक समता असली, तरी (ऐहिक) मानवी जीवनातील समता नाही, हे मे.पुं. दाखवून देतात. ते लिहितात - ‘ह्या धर्मसंस्थातील धर्मगुरू शोषक वर्गातील होते.... प्राचीन काळात गुलामगिरीची पद्धत बहुसंख्याक समाजात होती. आधुनिक काळात ख्रिस्ती धर्मानुयायांनी तिचे पुनरुज्जीवन केलेले आहे. इतिहास येथे देण्याचे कारण नाही, तरीही ख्रिश्चनांनी वेळोवेळी किती लोकांना गुलाम केले, याची काही आकडेवारीही मे.पुं.नी सादर केलेली आहे. माणसांना गुराढोरांसारखे वागविलेले दिब्रिटो यांना आवडत नाही असे दिसते, असे शक्यतेच्या भाषेत ते लिहितात, कारण दिब्रिटो यांच्या धर्माने मनुष्यांना गुराढोरांसारखे वागविले आहे, हे रेगे यांना माहीत आहे. ‘या देशात आदिवासी आहेत याची जाणीव मनूवाद्यांना नव्हती. गुराढोरांपेक्षा हलाखीचे जीवन त्यांना जगावे लागत आहे याची त्यांनी कधी पर्वा केली नाहीया दिब्रिटो यांच्या आरोपाला उत्तर देताना रेगे म्हणतात, ‘ज्यांच्या श्रमावर दक्षिण अमेरिकेतील श्रीमंती आधारलेली आहे, त्या काळ्या आफ्रिकन गुलामांचा दर्जा गुराढोरांच्या दर्जासमानच होता आणि त्यांचा वापर करणारे त्यांचे धनी असलेले लोक ख्रिस्ती होते. त्यांना मनूवादी म्हणणे दिब्रिटो यांना कठीण होईल.’ अशा प्रकारे रेगे यांनी दिब्रिटो यांचे धार्मिक नैतिक वस्त्रहरण केलेले आहे. पण हे वस्त्रहरण अर्धेच आहे.

सागराप्रमाणे एरवी शांत असणारा तत्त्वज्ञही दिशाभूल, लबाडी, अप्रामाणिकपणा, खोटेपणा यामुळे संतापून जाऊन किती उग्र होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे रेगे त्यांचा, फादर दिब्रिटो यांच्या ख्रिस्ती युक्तिवाद यांचा सत्याच्या बुद्धिवादाच्या धारदार तलवारीने खांडोळी करणारा लेख (नवभारत मासिक, ऑगस्ट 99) होय. अमृताच्या नावाखाली दिब्रिटो देत असलेल्या विषाचा अर्धा पंचनामा वर आलाच आहे, आता उरलेला.


दिब्रिटो
यांची कार्यक्रम पत्रिका

रेगे लिहितात - ‘दिब्रिटो यांच्या टिपणात एखाद्याला छुपी कार्यक्रम पत्रिका दिसू शकेल.’ अर्थात ती पत्रिका म्हणजे दिशाभूल करून धर्मांतर करण्याची होय. ते पुढे म्हणतात - ‘ख्रिस्ती धर्म समतावादी आहे. उलट हिंदू धर्माने तुम्हाला (म्हणजे खालच्या जातींना) गुराढोरांसारखी वागणूक दिली आहे, असा प्रचार करून त्यांना आपल्या धर्माकडे आणता येईल. उच्च जमातींवर मनूवादी छापा मारला की खालच्या जाती त्यांच्यापासून आणि त्यांच्या धर्मापासून दूर राहतील, अशी ही छुपी कार्यक्रम पत्रिका आहे. म्हणूनच दिब्रिटो उच्चवर्णीयांना मनूवादी, गोडसेवादी असे संबोधित असतात.’ या संबोधनासंबंधात दिब्रिटो यांना उघडे करताना ते म्हणतात -

आतापर्यंत मनूवाद हा शब्द राजकीय विवादात नालस्तीचा शब्द म्हणूनच वापरण्यात येत होता.... (पण) ते (दिब्रिटो) म्हणतात - आपल्या देशात काही लोक पराकोटीचे असहिष्णू आहेत. विचारवंत त्यांना मनूवादी किंवा गोडसेवाडी म्हणतात, दिब्रिटो हे स्वतः विचारवंतांचे अनुयायी दिसतात. आता हे विचारवंत कोण, जे पराकोटीच्या असहिष्णू व्यक्तीला मनूवादी गोडसेवाडी म्हणतात? ही गोष्ट दिब्रिटो स्पष्ट करीत नाहीत. पण समजा, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती माणूस पराकोटीचा असहिष्णू असला तर त्याला हे विचारवंत मनूवादी किंवा गोडसेवाडी म्हणणार काय? याचे उत्तर दिब्रिटो देणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते पुढे म्हणतात - आता असे म्हणता येईल की, हा प्रश्न उद्भवतच नाही. कारण या देशातील एकूण एक मुसलमान आणि एकूण एक ख्रिस्ती हे सहिष्णू असतात, किंबहुना पराकोटीचे सहिष्णू असतात आणि जे असहिष्णू असतात त्यांना मनूवादी किंवा गोडसेवादी म्हणायला हरकत नाही. तत्त्वज्ञ पुरुषाने यापेक्षा अधिक काय लिहावे? आता दिब्रिटो त्यांचे सहकारी विचारवंत रेगे यांना मनूवादी गोडसेवादी म्हणणार, हे उघड आहे.

पण रेगे हे फक्त तत्त्वज्ञ नाहीत, तर समाजप्रबोधक आहेत. ते आणखी पुढचा प्रश्न विचारतात - “जे पराकोटीचे असहिष्णू आहेत, त्यांचे वर्णन ते पराकोटीचे असहिष्णू आहेत असे करता ते मनूवादी आहेत असे दिब्रिटो का करतात?”


या
मार्मिक प्रश्नाचे उत्तर स्वतः मे.पुं. देतात - ‘मनूवादी त्यांचा असा निर्देश केल्याने काही गोष्टी सूचित होतात. मनू हा हिंदू परंपरेचा श्रेष्ठ स्मृतिकार आहे. मनू आणि सर्व श्रुती स्मृती चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करतात. चतुर्वर्ण विषमतावादी आहेत, तेव्हा हिंदू धर्म विषमतावादी आहे. तो अन्यायी आहे. आता दिब्रिटो हे पराकोटीचे समतावादी आहेत. त्यांनी या संबंधात कडक भाषा वापरली आहे. ‘वर्णव्यवस्था हा आजच्या समाज जीवनावरील कलंक आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘ख्रिस्ती धर्म मूलतः समतावादी आहे,’ येथे हा संदेश सूचित केला आहे की हिंदू राहून तुम्हाला समतावादी असता येणार नाही. तुम्ही समतावादी असाल आणि तुम्हाला धर्म हवा असेल, तर तुम्हाला ख्रिस्ती झालेच पाहिजे. तेव्हा त्यांची छुपी कार्यक्रम पत्रिका ही अशी आहे. मनूवादी विशेषण वापरण्याचा अंत:स्थ हेतू उघड संदेश असा आहे!

मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांची कोणती लक्षणे सांगितले आहेत खर्या ब्राह्मणाचा जीवनक्रम कसा असतो याची माहिती सादर करतात. अहिंसा, सत्य, चोरी करणे, देहाने मनाने निर्मळ राहणे, इंद्रियनिग्रह, ज्ञानसंपादन, राग येणे, दुसर्यावर अन्याय करणे, दुसर्या दिवशीपुरताही निर्वाहसामग्रीचा संचय ठेवणे अशा कितीतरी लक्षणांचा त्यात समावेश आहे. ही लक्षणे सांगून म्हणतात - “तेव्हा मनूने ब्राह्मणांना अपरिग्रहाचे कठोर व्रत सांगितलेले आहे. मनूवादी ब्राह्मण म्हणून जगणे सोपे नाही, मनुवादी ब्राह्मणापेक्षाकॅथलिक धर्मगुरूम्हणून जगणे खूपच सोपे आहे.”

 

ख्रिस्ती धर्म विषमतावादाचे!

ख्रिस्ती धर्म मूलतः समतावादी आहे. समताधिष्ठित ख्रिस्ती धर्माला होणार्या विरोधामागे केली हे एक मुख्य कारण आहे, ही दिब्रिटो यांची विधाने मअफाटफ आहेत असे सांगून रेगे मार्मिक प्रश्न विचारतात, भारतीय ख्रिस्ती समाजात जातीपाती आहेत, त्या विकृत हिंदू शिकवणीमुळे आणि संसर्गामुळे आहेत हे मान्य करू या. पण त्यातील चर्च (हिंदू नसणार्या) जगभर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित केली नाही? ख्रिश्चनांच्या नव्या करारात - म्हणजे बायबलमध्ये वर्णभेद सांगितलेला नाही हे खरे, पण सामाजिक विषमतेची अनेक रूपे, प्रकार आहेत असे सांगून अनेक शतकांच्या ख्रिश्चनांच्या विषमतेचा काळाकुट्ट इतिहास समोर मांडतात, सरंजामी समाजव्यवस्थेला आकार देण्यात चर्चचा मोठाच भाग आहे हे दाखवून देतात, रोमन कॅथलिक पंथ तरी समताधिष्ठित नाही हे उघड आहे असा निष्कर्ष ते मानतात. ते पुढे म्हणतात, समता हे जर ख्रिस्ती धर्माचे पायाभूत तत्त्व असते, तर सर्व ख्रिस्ती समाजात समता प्रस्थापित झालेली आढळून आली असती. युरोपमध्ये सर्व देशांत जेथे कॅथलिक प्रोटेस्टंट धर्मपंथ प्रभावी होते. पहिल्या महायुद्धापर्यंत ॅरिस्टॉक्रॅसी हा खराखुरा सत्ताधारी वर्ग होता. तो निर्वेधपणे सत्ता वापरत होता. त्याचे भांडवलदारांची संगनमत होते. (तेथे) प्रचंड आर्थिक विषमता होती आणि समाजाचे उच्च-नीच वर्गात कठोरपणे झालेले विभाजन कडकपणे पाळण्यात येत होते.

शिवायनव्या करारामध्येही समता आलेली नाही, हे दाखवून दिब्रिटोंवर टीका करताना रेगे म्हणतात - ‘ख्रिस्ती धर्म समतावादी आहे असे जो म्हणतो, त्याला बायबल आणि ख्रिस्ती परंपरा याचे ज्ञान नाही असे म्हणावे लागेल. ज्ञान असेल तर ते म्हणणे अप्रामाणिकपणाचे आहे असे म्हणावे लागेल.’ ख्रिस्ती धर्म समाजही वाईट अर्थाने मनूवादी आहे हे दाखवून देऊन दिब्रिटोंना रेगे जाणीव करून देतात की मनूवादी शोधण्यासाठी त्यांना हिंदू समाजाकडे लक्ष केंद्रित करायला नको किंवा स्वतःपासून दूर जायला नको. अशा प्रकारे फादर दिब्रिटो त्यांच्या धर्मावरील समतेची धमक खोटी वस्त्र उतरून रेगे त्यांची खरीमनूवादीवस्त्रे उघड करतात.

ख्रिश्चनांचा फॅसिझम

दिब्रिटो यांना फॅसिस्ट प्रवृत्तीचे वावडे आहे असे दिसतेअसे म्हणून रेगे त्यांची पुढील विधाने उद्धृत करतात - फॅसिस्ट प्रवृत्तीचा निवडीच्या स्वातंत्र्याला विरोध असतो. त्यांना एक विचारप्रणालीचा, एका धर्माचा, एका राजकीय विचारसरणीचा समाज हवा असतो. निराळा विचार हा विद्रोह मानला जातो. अशा विद्रोहाचा नाश करणे हा मग फॅसिस्टांचा एक कलमी कार्यक्रम ठरतो. दिब्रिटो यांनी हे हिंदुत्वनिष्ठांना उद्देशून लिहिलेले आहे. पण रेगे दाखवून देतात की हे वर्णन ख्रिस्ती धर्माला समाजाला चपखलपणे लागू होते. मग ते पुरावे सादर करतात - ‘फॅसिस्टांचा मेरुमणी म्हणजे बेनिटो मुसोलिनी. पोप अकरावे पायस यांनी मुसोलिनीशी 1929मध्ये (लेटरन) करार केला. या करारानुसार व्हॅटिकन सिटी हे स्वतंत्र राज्य म्हणून मान्य करण्यात आले. उलट पोपने इटलीच्या राज्याला मान्यता दिली. रोमन कॅथलिक पंथ हा इटलीचा एकमेव धर्म म्हणून स्वीकारण्यात आला. चर्चचा फॅसिझमला 1929पर्यंत तत्त्वतः विरोध नव्हता आणि इटलीच्या लोकांना धर्माची निवड करण्याचे अधिकार 1985 झाली बहाल केले.’ रेगे सांगतात की, ख्रिस्ती धर्माने सबंध युरोपभर अमेरिकेत ऑस्ट्रेलियात तेथील मूळच्या संस्कृतीचा उच्छेद करून स्वतःची तेथे स्थापना केली. विविधता नष्ट करणारी ही समानता असल्याचे रेगे स्पष्ट करतात.

 

दिब्रिटो म्हणतात - कॅथलिक ख्रिस्तसभा आपल्या अधिकृत शिकवणीत म्हणते, कुणावरही ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती केली जाऊ नये. हे विचार उद्धृत करून रेगे प्रश्न विचारतात - दक्षिण अमेरिकेतील पोर्तुगीज स्पॅनिश साम्राज्याचा, गोव्यात रोमन कॅथलिक पंथाचा जो प्रसार झाला तो लोकांनी स्वेच्छेने त्याचा स्वीकार केला म्हणून झाला, असे दिब्रिटो यांचे म्हणणे आहे का? चर्चचा सिद्धान्त काय आहे आणि चर्चचे आचरण काय आहे? आणि मग ते चर्चच्या फॅसिस्ट आचरणाचा पुढील लख्ख पुरावा सादर करतात. ख्रिश्चन राजा पिझारोने पेरू देश जिंकल्यानंतर तेथील पराभूत सम्राट इन्का यांना भेटीस बोलावले. तेथे ख्रिश्चन धर्मगुरूने इन्कापुढे एक धार्मिक प्रवचन झोडले. तेव्हाचे पोप अलेक्झांडर यांनी नव्या जगातील सर्व प्रदेश ख्रिश्चन राजाला बहाल केलेले असल्यामुळे इन्काने त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, असा सल्लाही दिला. हे सारे स्पॅनिश भाषेत चालले असल्यामुळे त्याला काहीही समजले नाही. मग त्याच्या हातात बायबल देण्यात आले, ते त्याने जमिनीवर फेकून दिले. लगेच धर्मगुरूने संतापून आदेश दिला, ‘ईश्वराच्या शब्दाचा अपमान झाला आहे! ख्रिश्चनांनो, शस्त्रे चालवा.’

 

इन्काच्या सोबत्यांची कत्तल करण्यात आली. इन्काला कैद करण्यात आले. नंतर त्याच्या प्रजननांकडून 22167 फूट इतक्या घनफळाचे सोने घेऊन त्याची (तूर्त) मुक्तता करण्यात आली. मात्र त्याच्यावर खटला भरण्यात आला. जिवंत जाळण्याची शिक्षाही करण्यात आली. त्याला सांगण्यात आले की जर त्याने आताही ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला जाळण्याऐवजी गळा दाबून मारण्याची सौम्य शिक्षा देण्यात येईल. इन्काने धर्मांतर केले. मग त्याला जिवंत जाळण्याऐवजी गळा दाबून मारण्यात आले. हे सारे धर्मगुरूंच्या आज्ञेने झालेले होते. ख्रिश्चन धर्म क्षमाशील दयाळू असल्यामुळेच ही शिक्षेत सवलत मिळाली होती. अशा अनेक घटनांचाधर्म की तलवार (वा अग्नि)’ अशा पर्यायाचा आपला क्रूर इतिहास असणार्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी धर्माची सक्ती नसते असा सिद्धान्त सांगावा, हे त्यांच्या दांभिकपणाशी सुसंगतच आहे.


आम्ही
आधी ख्रिस्ती तत्त्वज्ञान समजावून सांगून, त्यासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम, त्यानंतर धर्म समजला की नाही याची कसून परीक्षा घेऊन, मनपरिवर्तन झाल्यावरच धर्मांतर करून घेतो या दिब्रोटोंच्या दाव्याविषयी मे.पुं. विचारतात - ‘प्रश्न असा की मनूवादी हिंदूंमुळे गुराढोरांपेक्षा हालाखीचे जीवन (किंवा ख्रिस्ती देशातील गुलामापेक्षाही हालाखीचे अप्रतिष्ठेचे जीवन) जगणारे आदिवासी जेव्हा ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेल्या नि:स्वार्थी प्रेमळ सेवेमुळे प्रभावित होऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारतात, तेव्हा त्या सर्वांचे असे मनपरिवर्तन झालेले असते का?... (सहा महिन्यांच्या अभ्यासक्रम, नंतर कसून परीक्षा) हे सर्व या आदिवासींच्या बाबतीत घडते का? त्रिनिटी, पोपची अप्रमादशील इत्यादी गूढगहन तत्त्वे त्यांना समजलेली असतात का?’ अशा प्रकारे फादरच्या खोट्या प्रचाराचा रेगे पर्दाफाश करतात.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

ख्रिश्चन हे केवळ स्वतःचाच धर्म सत्य, श्रेष्ठ मुक्तिदाता मानतात, यासंबंधी म्हणतात अँथनेशिअनक्रीडचा (एक ख्रिश्चन सिद्धान्त) प्रारंभच असा आहे - ‘आपले तारण व्हावे (मुक्ती मिळावी) अशी ज्याला इच्छा असेल, त्याने सर्वप्रथम कॅथलिक श्रद्धा स्वीकारली पाहिजे. संत सिप्रिअनने म्हटल्याप्रमाणे चर्चच्या बाहेर तारण (मुक्ती) नाही. ज्याचे तारण होत नाही ते चिरकाल नरकात जातात.’ असा हा धर्म सर्वधर्मसमभावी सहिष्णू आहे असे दिब्रिटो सांगतात! वरवर दिसायला साध्या सरळ वाटणार्या मायावी भाषेत ख्रिस्ती धर्मगुरू इतर धर्मांची कशी निंदानालस्ती बदनामी करतात, हे रेगे पुढीलप्रमाणे दाखवून देतात - ‘आपल्याकडे सत्य आहे अशी त्यांची खात्री आहे. तेव्हा त्यांच्या मते सर्व हिंदू संप्रदाय यांकडे, इस्लामी संप्रदाय यांकडे असत्य असणार! मआपल्याकडे सत्य आहे अशी खात्री असली, तरी ते सत्य सौजन्याने आणि प्रेमाने सांगायचे असते.’ हा आपला धर्मबांधवांना त्यांनी केलेला उपदेश आहे. आपला धर्म सर्वश्रेष्ठ आहे हेही त्यांनी सूचित केले आहे. तुझा धर्म खोटा आहे, तुला नरकात नेणारा आहे असे म्हणणे त्या धर्माची निंदानालस्ती बदनामी होय, हेच ख्रिस्ती धर्मगुरूंना कळत नाही, मान्य नाही.

 

दिब्रिटो म्हणतात की, ‘ख्रिश्चन धर्माच्या काही धारणा आहेत. त्यांच्यासाठी धर्म देव्हार्यापुरता मर्यादित नाही. जो धर्म देव्हार्यापुरता मर्यादित असतो, त्याचे रूपांतर अफूच्या गोळीत व्हायला वेळ लागत नाही.’ याचा खरा मथितार्थ सांगताना रेगे म्हणतात, ‘यात असे अभिप्रेत आहे की उदाहरणार्थ हिंदू धर्म देव्हार्यापुरता मर्यादित आहे, म्हणून तो अफूची गोळी आहे. म्हणजे अफूची गोळी असणारा मनूवादी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करा, असा संदेश आहे!’


दिब्रिटोकृत
धर्माचे राजकारण

दिब्रिटो म्हणतात - ‘भारतीय संस्कृतीचे महावस्त्र अनेक धर्मांच्या धाग्यांनी विणलेले आहे. त्यातला एक जरी धागा उसवला, तर संपूर्ण वस्त्राच्या चिंध्या होण्यास वेळ लागणार नाही.’ या युक्तिवादाच्या चिंध्या उडवताना रेगे म्हणतात - ‘आजचे जे पाकिस्तान बांगला देश आहे, हे दोन देश पन्नास वर्षांपूर्वी भारताचे भाग होते. भारतीय संस्कृतीचे महावस्त्र या देशांमध्येही आहे. हे दोन्ही देश त्यांनी स्वीकारलेल्या राज्यघटनेप्रमाणे स्वतःला इस्लामी राष्ट्रीय म्हणवितात. पण उर्वरित भारत, जेथे हिंदू बहुसंख्य आहेत, ते सेक्युलर राज्यघटना स्वीकारतात. भारतीय संस्कृतीचे महावस्त्र जेथे हिंदू बहुसंख्य आहेत तेथे शाबूत आहे. पण जेथे बहुसंख्य (राहिले) नाहीत तेथे (मग) त्याच्या चिंध्या होतात. असा फरक का पडतो? याचा काही संबंध हिंदू मानसिकतेशी आहे का? इतरांचे वेगळेपण मनापासून मान्य करणार्या आणि त्यांच्याशी सुसंवादाने (पण अलिप्तपणे) जगण्याची परंपरा जिने स्थिर केली, या हिंदू मनोवृत्तीशी यांचा काही संबंध आहे का?’ अर्थात दिब्रिटो हे समजण्यापलीकडे गेलेले आहेत. कारण रेगे म्हणतात त्याप्रमाणे,

 

आपला धर्म जो आहे तेवढाच सद्धर्म आहे, अशा श्रद्धेत वाढलेल्यांना ते समजणे कठीण आहे. शेवटी रेगे दिब्रिटोंना ही विनंती करतात - बखेडे होतात ते धर्माचे राजकारण करण्यामुळे. आपण असे करीत तर नाही ना, असा विचार दिब्रिटो यांनी करावा अशी विनंती आहे.’ धर्माचे राजकारण करणार्या दिब्रिटोंचे समतेचा नि श्रेष्ठतेचा टेंभा मिरवणार्या ख्रिश्चन धर्माचे रेगे यांनी केलेले हे वस्त्रहरण हिंदूंना खडबडून जागे करणारे आहे!

(‘अप्रिय पण...’ या संकलित लेखांच्या पुस्तकातून साभार)