कोरोना व्हायरस जागतिक संकट

विवेक मराठी    10-Feb-2020
Total Views |

***डॉ. अशोक माळी***

 

कोरोनो व्हायरस विषाणू प्राणघातक आहेत. त्यांची बाधा झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन टक्के रुग्ण या आजाराने प्राण सोडतात. एकदा का या विषाणूची माणसाला लागण झाली की हा आजार संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये झपाटयाने प्रसारित होतो. कोरोना व्हायरसची संसर्गक्षमता खूपच जास्त आहे.
 
corona_1  H x W
 
माणूस नवनवीन शोध लावून जसजसा प्रगती करत आहे, तसतशी नवनवी संकटे त्याच्यापुढं अकराळविकराळ स्वरूपात उभी ठाकत आहेत. माणूस जुन्या घातक आजारांचे उच्चाटन करायच्या प्रयत्नात असताना नवनवे आजार त्याच्यापुढे आव्हान म्हणून उभे राहत आहेत. अनेक प्रयत्न करून आपण देवी या विषाणूजन्य आजाराचे उच्चाटन करण्यात यशस्वी झालो. पोलिओचे निर्मूलन नजरेच्या टप्प्यात आहे. गोवर, रेबीज या आजारांवर आपण प्रतिबंधात्मक लस शोधून काढण्यात यशस्वी झालो. एचआयव्ही या आजाराचे विषाणू आपली जनुकीय संरचना आणि गुणधर्म वेळोवेळी बदलत असल्यामुळे या आजारावर लस शोधून काढण्यात मात्र माणसाला यश आले नाही आणि अशातच आता कोरोना व्हायरस...

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

कोरोना व्हायरस हे एका विशिष्ट गटातील विषाणू आहेत. कोरोना या विषाणूंचा शोध 1960मध्ये लागला. त्यांचा आकार काटेरी मुकुटाप्रमाणे असतो. विषाणूंच्या आकारामुळेच कोरोना हे नाव. कोरोना विषाणूंच्या गटामध्ये अनेक जीवघेणे विषाणू येतात. यामध्ये SšRS (Severe šct Resparity Syndrome), MERS (Middle East Resparity Syndrome) आणि आताचा Unhealthy food Habbit हे अतिशय जीवघेणे ठरले आहेत.

सरस

कोरोना व्हायरस हे खरे तर काही प्राण्यांच्या शरीरांमध्ये जीवनकाल व्यतीत करतात. काही प्रसंगाने ते या प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित होतात आणि मनुष्यामध्ये आजार उत्पन्न करतात. कुत्रा, मांजर, वटवाघूळ, उंदीर अशा पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हे विषाणू राहत असतात आणि अपघाताने माणसांमध्ये त्यांचे संक्रमण होते.

आता सध्या 2019-nCoV हा कोरोना व्हायरस माणसांमध्ये या प्राण्यांमार्फतच आलेला असावा असे सकृतदर्शनी दिसते. ज्या ठिकाणाहून हा विषाणू प्रसारित झाला, ते ठिकाण आहे चीनमधील 'वुहान' हे शहर. या शहरामध्ये पूर्वी मच्छी मंडई होती, पण आता या मंडईमध्ये कुत्रा, मांजर, साळिंदर, वटवाघळे, उंदीर, साप अशा सर्व प्रकारचे प्राणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. प्राण्यांची ही खरेदी-विक्री अर्थात खाण्यासाठीच. आपल्याला माहीतच आहे की चीनमध्ये कुठलाही प्राणी खाण्यासाठी वर्ज्य नाही. कुत्रा, मांजर, उंदीर, बेडूक, साप, कासव, साळिंदर असा कोणताही प्राणी तिथले लोक खातात. प्राण्यांच्या शरीरात काही रोग असू शकतात आणि आपल्यालाही ते होऊ शकतात हे चिनी लोकांच्या गावीही नसते. एक स्त्री वटवाघळाचे सूप पितेय अशी एक क्लिप सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होतेय. आपण ती पाहिलीच असेल. काहीही खाण्याची ही णहिशरश्रींहू षिवि करललळीं हीच 2019-nCoV या कोरोना विषाणूच्या प्रसारास कारणीभूत ठरली असावी, असे सध्यातरी दिसत आहे.

या विषाणूंच्या प्रसाराबद्दल आणखीही एक कारण सांगितले जाते. चीनच्या वुहान या शहरातच चीनची एक भव्य अशी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत हा व्हायरस चीनने विकसित केलेला असावा आणि चीनला तो व्हायरस इतर देशांमध्ये बायलॉजिकल व्हेपन (जैविक अस्त्र) म्हणून वापरावयाचा असावा. जैविक बाँब म्हणून चीनने तो वापरण्यापूर्वीच तो व्हायरस बाहेर पडला. हे कितपत खरे आहे देव आणि तो चीनच जाणे! चीनच्या इतर भागातही हा रोग आता झपाटयाने पसरत आहे. चीनच्या हुबेई प्रांतात सापडलेल्या रुग्णांची संख्याही आता हजारावर गेलेली आहे.

कारण काहीही असले, तरी हा विषाणू प्राणघातक आहे. एकेण बाधा झालेल्या रुग्णांपैकी दोन टक्के रुग्ण या आजाराने प्राण सोडतात. एकदा का या विषाणूची माणसाला लागण झाली की हा आजार संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये झपाटयाने प्रसारित होतो. शिंकणे, खोकला या क्रियांमधून मानवी स्रावाचे जे सूक्ष्म थेंब उडतात (droplate infection) त्याद्वारे हा आजार पसरतो. सर्दी, खोकला ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. ताप येणे, घसा सुजणे, ब्राँकायटिस, न्यूमोनिया हे नंतर. यातला न्यूमोनिया हा आजार विषाणूजन्य असू शकतो किंवा जीवाणूजन्यही. रुग्णामध्ये घशामध्ये दुखणे, डोकेदुखी, ताप ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात. या तापाचे एक वैशिष्टय म्हणजे हा ताप बरेच दिवस टिकेन राहतो. न्यूमोनिया, ब्राँकायटिस हे आजारही रुग्णांमध्ये असू शकतात. या आजारामध्ये रुग्णाची श्वसनसंस्था पूर्णपणे निकामी होऊ शकते. किडनी आणि यकृत यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊन हे अवयवही निकामी होतात.

 

खोकणे, शिंकणे, एकमेकांशी हस्तांदोलन करणे यामुळे या आजाराचा सर्वत्र प्रसार होतो, हे आधी सांगितले आहेच. हा आजार एवढया गतीने वाढत आहे की हा वेग पाहून वैद्यकीय तज्ज्ञही चक्रावले आहेत. केवळ रुग्णच नाहीत, तर वरकरणी निरोगी दिसणारे रुग्णही या आजाराचे वाहक ठरले आहेत. या विषाणूजन्य आजारावर अजूनपर्यंत कोणतीही लस निघालेली नाही. चीनच्या वुहान शहरामध्ये सुरू झालेल्या या आजाराने आज संपूर्ण जगाला चिंताग्रास्त करून टाकलेले आहे. देशाची आरोग्यव्यवस्था जेवढी अविकसित, अर्थव्यवस्था जेवढी कमकुवत तेवढा प्रसार जास्त, या न्यायाने विकसनशील किंवा अप्रगत देशात जर या रोगाची साथ आली, तर होणाऱ्या मनुष्यहानीची कल्पनाच न केलेली बरी. चीनमध्ये आजपर्यंत जवळपास पंचवीस हजार संशयित रुग्ण आहेत, तर मृतांचा आकडा पाचशेच्या वर गेलेला आहे. हा अधिकृत आकडा आहे. अनधिकृत आकडा आणखीही खूप मोठा असू शकतो. चीन हा खूप उद्योगी आणि मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे बरेच चिनी नागरिक परदेशामध्ये कामासाठी किंवा व्यवसायासाठी विखुरलेले आहेत. नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशात असलेले अनेक चिनी लोक मायदेशी परतलेले होते. ते ज्या वेळी पुन्हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जातील किंवा गेले असतील, तिथे तिथे या रोगाचा प्रसार होणे साहजिकच आहे. आतापर्यंत जगातल्या चोवीस देशांमध्ये या रोगाचा फैलाव झालेला आहे. ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, थायलंड, फिलिपाइन्स, श्रीलंका, भारत, अमेरिका, फ्रान्स हे काही देश आहेत, जिथे 2019- उितिचे रुग्ण सापडलेले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तानातही या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. या रोगाचा प्रसार असाच होत राहिला, तर चीनच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे. अनेक कंपन्यांनी चीनमधील आपले व्यवसाय थांबवलेले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी चीन प्रवासबंदी लागू केलेली आहे. या देशांच्या पावलावर पाऊल टाकून जपान, ब्रिटन, जर्मनी, इटली, सिंगापूर, मंगोलिया या देशांनीही चीन प्रवासावर बंदी घातलेली आहे. व्हिएतनामने चीनमधून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर तात्पुरती बंदी घातलेली आहे. सध्या कोरोना रोगामुळे चीन एकटा पडलेला आहे. सध्या चीनचे औद्योगिक क्षेत्र थंडावलेले आहे!

प्रतिबंध

कोरोना विषाणूवर अजूनतरी कोणतेही औषध निघालेले नाही. लस कधी निघेल हेही सांगता येत नाही. लस तयार होण्यासाठी सहा महिने किंवा त्याहून जास्त काळही थांबावे लागेल! रोगाला प्रतिबंध हाच सध्याचा उपाय आहे. लवकर निदान (early diagnosis) आणि रुग्णाला वेगळे ठेवणे (Isolation) हे दोनच मार्ग सध्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. किमान दहा ते पंधरा दिवस कोरोनाच्या रुग्णाला बाजूला ठेवणे गरजेचे असते.

रोगापासून बचाव करण्यासाठी, किंबहुना या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी काही उपाय -

कोठेही बाहेर जाऊन आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

खुले हस्तांदोलन आणि चुंबन कटाक्षाने टाळावे..

कोणत्याही प्राण्यांचे मांस खाणे टाळावे.

शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.

मित्रहो, आशा करू या की कोरोना व्हायरसचे हे संकट लवकरच आटोक्यात येईल आणि हे जग पूर्ववत होईल!

भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

वुहान विद्यापीठात शिकणारा केरळमधील एक विद्यार्थी भारतात परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. केरळमध्येच या रोगाचे आणखीही दोन रुग्ण सापडलेले आहेत. भारतावर हे संकट गडद झाले तर काय करावे, याचा मास्टरप्लॅन केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी आतापासूनच तयार केला पाहिजे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य सचिव आणि कॅबिनेट सचिव यांची या संदर्भात बैठक झाली, ही दिलासा देणारी बाब आहे. या निमित्ताने आरोग्य मंत्रालयाने एक हेल्पलाइन सुरू केलेली आहे. 91-11-23978046 हा तो टेलिफोन क्रमांक. आठवडयातले सातही दिवस चोवीस तास हा क्रमांक चालू राहणार आहे. आपल्याला एखाद्या रुग्णात सर्दी, खोकला, न्यूमोनिया किंवा तत्सम काही लक्षणे दिसली आणि आपल्याला कोरोना व्हायरसच्या संसर्गाची थोडीही शंका आली, तर नागरिकांनी या फोनवर फोन करावयाचा आहे.

या आजाराने भारतात पाय पसरले, तर आधीच मंदीच्या लाटेत असलेल्या या देशाला खूप मोठा धोका निर्माण होईल हे आता सांगण्याची गरज नाही. रुग्णाला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेलेला नातेवाईक तिथून आजार घेऊन येतो की काय, अशीच काहीशी आपल्या सरकारी आरोग्यसेवेची स्थिती आहे... तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी हे संकट गांभीर्यानंच घ्यायला हवे!

विशेष सूचना:

या 2019-nCoV या आजाराचं मूळ चीनमध्ये आहे! त्यामुळे या देशातून आलेल्या लोकांशी संपर्क आलेला असेल तरच आपण घाबरायला हवे! आपल्या आजूबाजूला चीनमधून कुणी आलेले नसेल तर आपल्याला घाबरायचे कारण नाही! तिकडून कुणी आलेले असेल तर मात्र नक्कीच सावध राहायला हवे, कारण या आजाराची संसर्गक्षमता खूपच जास्त आहे!