मुख्यमंत्री महोदय, ‘वाचा आणि स्वस्थ बसा..!’

विवेक मराठी    13-Feb-2020
Total Views |

बाळासाहेबांनीमार्मिकसाप्ताहिक सुरू केल्यावर त्यातवाचा आणि स्वस्थ बसानावाचं सदर चालवलं. या सदराच्या शीर्षकाप्रमाणेच वागायचं, असं सध्याची शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ठरवलेलं दिसतं. म्हणूनच, आजवर ज्या सावरकरांना मानत असल्याचं शिवसेनेने भासवलं, त्या सावरकरांवर इतकी उघड चिखलफेक सुरू असतानाही, शिवसेना शांतपणे मूग गिळून गप्प बसली आहे.गॅंग्स ऑफ वासेपूरचित्रपटात फैजलची (नवाजुद्दीन सिद्दिकी) आई (रिचा चढ्ढा) फैजलला संतापून विचारते, “तेरा खून कब खौलेगा रे फैजल..” आज हा सगळा नंगानाच उघडपणे सुरू असताना गप्प बसलेल्या सेनानेतृत्वाला सामान्य हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्तदेखील असाच प्रश्न विचारत आहेत.

 Chief Minister, 'Read an

माझं नाव राहुलगांधीआहे, राहुलसावरकरनाहीअसं राहुल गांधी मध्यंतरी एका भाषणात जोरजोरात ओरडून सांगत होते. राहुल यांच्या या वक्तव्यावर त्यावेळी आपल्यापैकी अनेकांनी टीका केली असेल, तोंडसुख घेतलं असेल. परंतु आता मात्र राहुल गांधी जे बोलत होते, ते सत्यच होतं, असं वाटू लागलं आहे.. कारण हा नेहरू-गांधी परिवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष आज ज्या हीन पातळीवर पोहोचलाय, ते पाहता राहुल गांधी हे राहुल सावरकर असूच शकत नाहीत. इतक्या दशकांची परंपरा सांगणारा, या देशाला पहिले तीन आणि एकूण सहा पंतप्रधान देणारा, स्वातंत्र्योत्तर भारताच्या ७२ पैकी साधारणपणे ५४-५५ वर्षं केंद्रीय सत्तेत असलेला एक जबाबदार राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस. हा काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय स्वार्थापायी आणि आपल्या पक्षाच्या मालकांना खूश करण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा मोठेपणा या लेखातून नव्याने सांगण्याची गरज नाही, सव्वाशे कोटींच्या या देशातील प्रत्येक राष्ट्रभक्तवि. दा. सावरकरहे नाव आणि त्यामागील तेज, त्याग आणि तपश्चर्या जाणतोच. परंतु, अलीकडे हेच सावरकर पुन्हा एकदा काँग्रेसच्या डोळ्यांत सलू लागले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या पुढाकाराने स्वतः राहुल आणि त्यांच्या काँग्रेसी चेल्यांनी सावरकर बदनामीची एक खास मोहीम सुरू केली आहे. यातूनच सावरकरांनामाफीवीरम्हणवून त्यांना हिणवण्याची, बदनाम करण्याची मोहीम पद्धतशीरपणे राबवली जाते आहे. परंतु, यातून काँग्रेसला अपेक्षित असलेला परिणाम घडण्याऐवजी उलटाच परिणाम घडत असून देशभरात सावरकर जाणून घेण्याची, सावरकरांचे साहित्य वाचण्याची मागणी अधिकच वाढलेली दिसते. थोडक्यात, सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न साफ अपयशी ठरताहेत. ते ठरणारच कारण शेवटी तो सूर्य आहे, त्याचं तेज आणि दाह इतका प्रखर की त्यापुढे हे असले किरकोळ प्रयत्न नगण्य ठरणारच. तरीही, कॉंग्रेसजनांचं समाधान झालेलं दिसत नाही. आता महाराष्ट्र काँग्रेसही अधिकाधिक हीन पातळी गाठण्याच्या आपल्या वरिष्ठांच्या स्पर्धेत उतरली आहे.जनमानसाची शिदोरीनावाचं मासिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं मुखपत्र आहे. या मुखपत्राच्या ताज्या म्हणजे फेब्रुवारी, २०२० च्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत दोन लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. एका अंकात स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीरहा एक लेख असूनअंधारातील सावरकरहा दुसरा लेख आहे. सदर दोन्ही लेखसाम्ययोग साधनानामक मासिकातून साभार घेण्यात आल्याचं यामध्ये म्हटलंय. यातील माफीवीर शीर्षकाच्या लेखात सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसून कसे माफीवीर आहेत, हे इतर कुणा तथाकथित अभ्यासकांनी तोडलेल्या अकलेच्या तार्यांतून उसने तारे घेऊन मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हे सर्व काँग्रेसच्या गेल्या दोन-तीन वर्षांतील षड्यंत्राला साजेसंच. परंतु, याही पुढे जाऊनअंधारातील सावरकरअशा नावाचा लेख छापण्याचा हलकटपणा या मासिकाने केला असून यामध्ये सावरकरांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशी काही चिखलफेक केली आहे की कुणाही सुजाण सुसंस्कृत, सुशिक्षित आणि देशप्रेमी नागरिकाच्या संतापाचा कडेलोट व्हावा. सावरकरांनाबलात्कारीठरवण्यापासून ते सावरकरांच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत व सावरकरांच्या वंशजांबाबत वाट्टेल ते आणि अत्यंत हीन दर्जाचे आरोप करण्यापर्यंत या लेखकाची मजल गेली आहे. संजीव चिंबुलकर असं याअंधारातील सावरकरलेखाच्या लेखकाचं नाव. या लेखातील तपशीलही अशाच कोणत्याही आधार नसलेल्या किरकोळ पुस्तकांतून घेतलेले असून ते इथे उल्लेख करण्याच्याही योग्यतेचे नाहीत.

 
 Chief Minister, 'Read an

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते रत्नाकर महाजन हे या मासिकाचे संपादक असून दत्तात्रय उर्फ सुनील खांडगे हे कार्यकारी संपादक आहेत. रत्नाकर महाजन हे काँग्रेसमधील एक ज्येष्ठ, अभ्यासू व जुनं-जाणतं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला परिचित आहेत. अनेक टीव्ही चॅनेल्सवरील चर्चांमध्ये आपण त्यांना त्यांच्या पक्षाची बाजू मांडताना पाहतो. अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या संपादकाच्या देखरेखीखाली वा मान्यतेने हे घाणेरडे चाळे सुरू आहेत असं म्हणायचं का? यामागील बोलवते धनी कोण? मग पं. नेहरू वा अन्य कुणाबाबत असे काही आरोप करण्याचा प्रयत्न कुणी केला तर हे प्रवक्ते कोणत्या तोंडाने त्यावर टीका करतात? त्यांच्यात आणि यांच्यात फरक काय राहिला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. बरं, आपल्या सर्वोच्च मालकांना सोनिया व राहुल गांधींना खुश करण्यासाठी हे असले उद्योग करण्यापूर्वी याशिदोरीवाल्यांनी राहुल गांधींच्याच आजीबाई, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींनी सावरकरांबाबत काय म्हणून ठेवलंय, कोणत्या शब्दांत सावरकरांचा गौरव केलाय, हे तरी पाहायला हवं होतं. किमान, अशी अभ्यासू माणसं संपादकपदावर असताना तरी एवढी अपेक्षा करायला हरकत नव्हतीच. असो, ‘जैसा राजा वैसी प्रजात्यामुळे पक्षाचे सर्वोच्च नेते जसे वागतील, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चेलेदेखील वागणार, यात काही शंका नाही. आजच्या ताज्या माहितीनुसार, मुंबई, पुणे वगैरे ठिकाणच्या काँग्रेस मुख्यालयांतशिदोरीच्या प्रती संपल्या असल्याची उत्तरं आता मिळू लागली आहेत. तथापि, या मासिकाच्या पीडीएफ स्वरूपातील प्रती हाती लागलेल्या आहेतच, ज्यात काँग्रेसची ही कुकर्म उघड झाली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा एखाद्या मुखपत्रात कुणाचा सटरफटर लेख आल्याने सावरकरांची महती अर्ध्या टक्क्यानेही कमी होत नाही, उलट अधिकाधिक लोक सावरकरांबाबत वाचतात, जाणून घेतात. आजवर कधी यथोचित गौरवल्या न गेलेल्या आणि त्यामुळे देशभरात तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या सावरकरांच्या कार्याची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे सूर्य आहे तिथेच राहतो, तितक्याच तेजाने तळपत राहतो, उघडे पडतात ते हे असे क्षुल्लक काजवे..

 
 Chief Minister, 'Read an

तथापि, अशी बदनामीची कुटील मोहीम सातत्याने चालवली जाते, जबाबदार म्हणवणारेदेखील त्यात आपले हात धुवून घेतात आणि जाणीवपूर्वक अधिकाधिक हीनतेची पातळी गाठण्याची स्पर्धा सुरू होते, तेव्हा प्रश्न असा पडतो की मग आपण काय करणार? कुणीही यावं आणि टपली मारून जावं, आपल्या प्रतीकांची श्रद्धास्थानांची विटंबना करावी, वर आपल्यालाच अक्कल शिकवावी, हे किती काळ चालणार? तिकडे मध्य प्रदेशात याच काँग्रेसचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने पाडतं, इकडे महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र सावरकरांवर बलात्काराचे आरोप करणारे लेख छापतं. मग आम्ही काय करतो? आम्ही शांतपणे बघत बसतो. आज हाच काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात सत्तेत आहे आणि एकेकाळी जाज्वल्य हिंदुत्वाची वगैरे भाषा करणा-या शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून राज्य करतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेमाझा कडवट शिवसैनिकअसं आपल्या कार्यकर्त्यांबाबत अभिमानाने म्हणायचे. एकेकाळी स्वतः बाळासाहेबांनी सावरकरांचा अवमान करणा-या मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला जोडे मारले होते. आज तो कडवटपणा जाऊन नुसता मिळमिळीतपणा, पचपचीतपणाच उरलाय की काय, अशी शंका आहे. किंबहुना, तो कडवटपणा कुणी शिवसेनेवर टीका केल्यास त्याचं मुंडन करताना, त्याला मारहाण करतानाच जागा होतो आणि एरवी शिवसेनेचा वाघम्यावम्हणत काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर बनून शांत बसतो.शिदोरीत छापून आलेल्या लेखात शिवसेनेलाही चार डोस पाजण्यात आले आहेत.स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीरलेखातकोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे आणि वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असलेल्या शिवसेनेलाही सावरकर तेवढेच प्रिय आहेत’, ‘शिवसेनेसारख्या पक्षाने केवळ उथळ भावनिक राजकारण करू नयेअशा आशयाच्या शेलक्या शब्दांत शिवसेनेचे वाभाडे काढण्यात आले आहेत. अर्थात, जिथे या राज्य सरकारातील काँग्रेसचे मंत्रीआम्ही शिवसेनेकडून अमुक काही लिहून घेतलं आणि मगच पाठिंबा दिलावगैरे जाहीरपणे सांगतात, तिथे या वाभाड्यांचं काय घेऊन बसलात?

 
 Chief Minister, 'Read an

बाळासाहेबांनीमार्मिकसाप्ताहिक सुरू केल्यावर त्यातवाचा आणि स्वस्थ बसानावाचं सदर चालवलं. या सदराच्या शीर्षकाप्रमाणेच वागायचं, असं सध्याची शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ठरवलेलं दिसतं. म्हणूनच, आजवर ज्या सावरकरांना मानत असल्याचं शिवसेनेने भासवलं, त्या सावरकरांवर इतकी उघड चिखलफेक सुरू असतानाही, शिवसेना शांतपणे मूग गिळून गप्प बसली आहे.गॅंग्स ऑफ वासेपूरचित्रपटात फैजलची (नवाजुद्दीन सिद्दिक) आई (रिचा चढ्ढा) फैजलला संतापून विचारते, “तेरा खून कब खौलेगा रे फैजल..” आज हा सगळा नंगानाच उघडपणे सुरू असताना गप्प बसलेल्या सेनानेतृत्वाला सामान्य हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्तदेखील असाच प्रश्न विचारत आहेत. असो, झोपलेल्यांना जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री महोदय कधी जागे व्हायचे ते होतील परंतु, आपण सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रभक्त नागरिकांनी आपआपल्या स्तरावर महाराष्ट्र काँग्रेस आणिशिदोरीच्या या हीन कृत्याचा योग्य त्या मार्गाने निषेध करायलाच हवा आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवून या हीन, कुटील कारवायांचा पर्दाफाशदेखील करायलाच हवा.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/