महिला दिनानिमित घेतलेल्या लेखन स्पर्धेचा निकाल

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Feb-2020

 

mahila din_1  H

 
साप्ताहिक विवेकने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेला दर वर्षीप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून -मेल, पोस्ट, कुरिअरद्वारे आलेल्या लेखांच्या संख्येने शंभरी ओलांडली. अगदी अंतिम मुदत संपल्यानंतरही लेखांचा वर्षाव सुरूच होता. ‘मी कृतज्ञ आहे’, ‘आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय’, ‘जगण्यावर परिणाम करणारा संस्मरणीय निर्णयआणिमला भावलेली स्त्री व्यक्तिरेखाअसे चार विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

   या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारीविवेकच्या लेखक परिवारातील विनीता तेलंग आणि शैलेंद्र कवाडे यांच्यावर सोपवली. खरे तर एवढे लेख वाचून, आपली विवेकबुद्धी जागृत ठेवत ठरवलेल्या निकषांच्या आधारे आणि परस्परांशी समन्वय साधत या लेखांमधून पारितोषिकप्राप्त लेखांची निवड करणे हे त्यांच्यासाठी नक्कीच आव्हान होते. तसेच विवेकच्या महिला दिन विशेषांकात विजेत्या लेखांचा समावेश करायचा असल्याने अत्यल्पावधीत त्यांना हे परीक्षणाचे काम पूर्ण करायचे होते, हे आणखी एक आव्हान. ही सर्व आव्हाने पेलत आमच्या परीक्षकांनी स्पर्धेचे निकाल वेळेत दिले


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
क्रमांक
१ अंजली बापट
२ अक्षय वाणे
३ परशुराम माळी
 
उत्तेजनार्थ
१ प्राची तोडणकर
२ अस्मिता देशपांडे
३ सुलेखा पांडे
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 
विशेष उल्लेखनीय
१ प्रसाद कुलकर्णी
२ संध्या यादवाडकर
३ गौरी भागवत
४ शोभा वळसंगकर
५ प्रसाद कुलकर्णी
६ नेहा सोमण
७ ऋतुजा पूरकर
८ कमल सोनजे
९ हर्षा झोपे
१० प्रीतम सेलमोकर
११ ऋतुजा नर्‍हे
१२ स्वानंद जोशी
१३ ऋतुजा गवस
१४ सुवर्णा जगताप
१५ कपिल सहस्रबुद्धे
२० वृंदा टिळक
 
२१ कविता नवरे
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 
२२ स्नेहा लाडसावंगीकर
 
२३ हेमंत पोहनेरकर
 
 
सहभागी झालेली विशेष मंडळी
 
राजेश मंडलिक
 
मोहिनी लिमये - मोडक
 
ऋचा मायी
 
पूजा ढेरिंगे
 
कौस्तुभ केळकर नगरवाला
 
   गंमत म्हणजे या लेखन स्पर्धेत अनेक अनुभवी लेखकांनीही सहभाग घेतला असल्याचे जेव्हा लक्षात आले, तेव्हा आमची संभ्रमावस्था झाली होती. एकीकडे या मान्यवर लेखकांनी या लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेची उंची वाढवल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे अन्य नवोदित/हौशी लेखक सहभागींवर आपल्याकडून अन्याय होऊ नये ही प्रामाणिक भावना होती. त्यामुळे या मंडळींचा एक विशेष गट करून त्यांना स्पर्धेतून बाजूला ठेवण्याचा आणि वेगळ्या रूपात त्यांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय आम्ही (विवेक टीम आणि परीक्षक) घेतला. त्यानंतरही परीक्षकांना पहिल्या तीन क्रमांकांबरोबरच एक नव्हे, तर तीन उत्तेजनार्थ पुरस्कारांची निवड करावी लागली, यावरूनच या स्पर्धेच्या काठीण्यपातळीचा अंदाज येऊ शकेल. शिवाय 19  लेखांना विशेष उल्लेखनीय म्हणून निवडण्यात आले. या सगळ्यांचेच खूप खूप अभिनंदन!
 ज्यांचे या निकालात नाव नाही, त्यांचेही खूप कौतुक. परीक्षकांनी जे निकष ठरवले होते, त्यानुसार त्यांचे लेख बक्षीसप्राप्त लेखात समाविष्ट नसले तरी त्यांच्या लिहिण्याच्या उत्साहाने आम्हालाही बळ दिले. आमच्या वाचकांना लिहिते करणे, त्यांच्या मनातील भावनांना, आठवणींना शब्दात उतरवण्याची संधी उपलब्ध करून देणे हाच तर या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता आणि तो उत्तम प्रकारे साध्य झाला, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे.