विमा का? किती? व कधी?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Feb-2020
|

***निलेश साठे ***

या सदराच्या पहिल्या लेखात गुंतवणुकीचे महत्त्व आणि आयुर्विमा म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेतल्या. आयुर्विम्यात गुंतवणूक का करावी आणि आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर किती रकमेचा आयुर्विमा काढला पाहिजे हे या लेखात जाणून घेऊ या.

Life Insurance_1 &nb 

एखादा अपघात झालेला बघितल्यावर तिथे उपस्थित असलेला कुणीतरी जितक्या सहजतेने जखमी व्यक्तीलाकाय रे, विमा आहे का?” असा प्रश्न विचारतो, तितक्या सहजतेने अपघातापूर्वी त्या व्यक्तीने स्वत:लासुद्धा हा प्रश्न कधीही विचारलेला नसतो. चरज्ञश हरू Make hay while the sun shines हे शालेय शिक्षणात आपण शिकतो, पण त्याची जीवनात अंमलबजावणी करण्याकडे काणाडोळा करतो, ही वस्तुस्थिती आहे. डोळ्यांसमोरून गाडी निघून गेल्याची खंत जशी दोन मिनिटे उशिराने रेल्वे स्टेशनवर पोहोचलेल्या प्रवाशास असते, तशीच खंत योग्य वयात योग्य वेळी आणि योग्य रकमेचा विमा घेतलेल्याला असते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/


आयुर्विम्याचे
महत्त्व

विम्याची गरज काय? आपल्या कुटुंबाच्या आजच्या गरजा भागवणे हे तर घरातील कर्त्या व्यक्तीचे आपल्या कुटुंबाप्रति उत्तरदायित्व असतेच, तसेच भविष्याची तरतूद करणे हेही असते. एक लहानसे उदाहरण घेऊ. समजा, आपल्याला महिन्यासाठी कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जायचे आहे. जाण्यापूर्वी आपण पत्नीला विचारतो, “तुला घरखर्चासाठी किती रक्कम ठेवून जाऊ?” विमा किती रकमेचा घेतला पाहिजे हे ठरवताना या प्रश्नाचे उत्तर काय हे फार महत्त्वाचे आहे. समजा, ती म्हणाली, “10,000 रु. पुरतीलतर याचा अर्थ आपल्या पश्चात कुटुंबाला मासिक किमान 10000 रुपये मिळतील एवढी तरतूद आपण करायला हवी. आजचा 8% व्याजाचा दर लक्षात घेता 12,50,000 बँकेत ठेवले, तर त्या रकमेच्या व्याजातून आजचा घरखर्च भागू शकेल. पण एवढी मोठी रक्कम बँकेत असणे कठीण असते. शिवाय यात सतत वाढत जाणार्या महागाईचा विचार केलेला नाही. तसेच मुलांचा शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च, आजारपणाचा खर्चही विचारात घेतला नाही. त्याचा विचार करता आपल्या पश्चात जर पत्नीस महिना 10,000 लागत असतील, तर आपला विमा किमान 15 ते 20 लाख रकमेचा असायला हवा. ढोबळमानाने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 100 ते 200 पट किंवा वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट रकमेचा विमा असणे प्रत्येकास गरजेचे असते.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

विमा घेताना आपल्याला आयुष्यातील कुठल्या टप्प्यावर किती रक्कम लागण्याची शक्यता आहे - उदाहरणार्थ, आज आपले मूल जर समजा 5 वर्षांचे आहे, तर त्याच्या कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च 10-12 वर्षांनी उभा राहील, त्या रकमेचीही तरतूद विमा घेतांना लक्षात घेतली पाहिजे. विम्यासाठी आपण आपल्या उत्पन्नाच्या 10% ते 20% रक्कम जरी बाजूला काढली, तरी आपल्याला पुरेशा रकमेचा विमा मिळू शकतो.

 
Life Insurance_1 &nb

आयुर्विम्याचे फायदे

आयुर्विम्याला आपल्या कुटुंबीयांवर असलेल्या आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हटले, तर गैर होणार नाही. आयुर्विमा मृत्यूच्या जोखमीपासून पूर्ण संरक्षणाची हमी देतो. आयुर्विमा आणि बचतीच्या इतर योजना यांमधील मूलभूत फरक असा की, विमेदाराचा मृत्यू झाल्यास विम्याची संपूर्ण रक्कम (बोनससहित) मिळण्याची हमी असते. मात्र इतर बचत योजनांमध्ये बचतीची रक्कम व्याजासहित देय होते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

थेंबे थेंबे तळे साचे - आयुर्विम्यामुळे अनिवार्यपणे आपली बचत होत जाते. विम्याचा हप्ता पगारातून वळता करायची सोय बर्याच कार्यालयात असते. अशा वेळी ही रक्कम वजा होऊनच उरलेला पगार हातात पडल्यामुळे अजाणतेपणे काटकसरीला प्रोत्साहन मिळते. दीर्घकालीन बचतीचे लाभही अधिक असतात. महागाई वाढत जाते, पण विम्याचा हप्ता मात्र विम्याची मुदत संपेपर्यंत तेवढाच असतो. तो काही महागाई वाढली की वाढत नाही. त्यामुळे विमा पॉलिसीचा हप्ता सुरुवातीच्या काळात उत्पन्नाच्या 20% असला, तरी उत्पन्न वाढत राहते पण विमा हप्ता तेवढाच असल्याने विमा सुरू झाल्यावर काही वर्षांनी हप्ता भरणे विशेष काटकसर करताही शक्य होते. सातत्याने बचत झाल्याने मुदतीशेवटी भलीमोठी रक्कम हाती येते.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

तरलता - बहुतेक सर्व विमा योजनांत (टर्म इन्शुरन्स सोडून) काही काळानंतर पॉलिसीवर कर्ज मिळण्याची तरतूद असते. ढोबळमानाने 5-7 वर्षांनंतर आपण जेवढी रक्कम विमा हप्त्यापोटी भरलेली असते, तेवढी रक्कम एलआयसी कर्जापोटी देते. अडचणीच्या वेळी पॉलिसी तारण ठेवून कर्ज घेता येते. त्यावर व्याजाचा दरही बराच कमी - म्हणजे सध्या 9% आहे.

आयकरात सवलत - आयकर कायद्यातील 80 या कालमानानुसार आयुर्विम्यात केलेली दीड लाखापर्यंतच्या वार्षिक बचतीचा फायदा आयकर वाचवण्यात होतो. अर्थात, हा फायदा दुय्यम आहे. केवळ आयकरात सूट आहे म्हणून विमा घेणे चूक आहे, पण जर बचतही होत असेल आयकरात सूटही मिळत असेल तरसोने पे सुहागा’, नाही का?

विमा कधी घ्यावा? नोकरी लागल्यावर किंवा स्थायी उत्पन्न सुरू झाल्यावर लवकरात लवकर विम्याला सुरुवात करावी. लहान वय असल्यास विम्याचा हप्ताही कमी असतो. चाळिशीनंतर विमा घेतल्यास विमा हप्ता वाढतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, विमा करार अमलात येताना जेवढा वार्षिक विमा हप्ता ठरलेला असतो, तो विमा मुदत संपेपर्यंत तेवढाच राहतो. वय वाढले तरी त्या हप्त्यात वाढ होत नाही. सबब कमी वयात योग्य रकमेचा विमा घेणे नेहमी श्रेयस्कर.

 

विम्याचा प्रकार विम्याच्या विविध योजना यांविषयी पुढील लेखात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/  

 

(माजी सदस्य, इर्डा)

9892526851