त्वचाविकारावर औषधाशिवाय उपचार

स्रोत: विवेक मराठी    दिनांक04-Feb-2020
|

पंचमहाभूतात्मक उपचार व ऍक्युपंक्चर याद्वारे त्वचाविकार बरे करता येतात.कोणतेही औषधोपचार न करता फक्त ऍक्युपंक्चरद्वारे आपण त्वचाविकार बरे करू शकतो. ऍक्युपंक्चर उपचाराने शरीरातील विशिष्ट बिंदूवर विशिष्ट पध्दतीने सुया टोचून, शिवाय आजार किती जुना आहे, त्याप्रमाणे ऍक्युपंक्चर उपचाराचा कालावधी ठरवला जातो.

 

Moxibustion in Acupunctur
 
त्वचाविकारावर ऍक्युपंक्चर, ऍक्युप्रेशर व मॉक्सीबक्शनद्वारे उपचार केले जाऊ शकतात.पंचमहाभूतात्मक उपचार व ऍक्युपंक्चर याद्वारे त्वचाविकार बरे करता येतात. यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.कोणतेही औषधोपचार न करता फक्त ऍक्युपंक्चरद्वारे आपण त्वचाविकार बरे करू शकतो.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 
  त्वचाविकाराचे प्रकार - चेहऱ्यावरील मुरमे, काळे डाग (पिगमेंटेशन), सर्व अंगाला सतत कंड सुटणे (अर्टिकेरिया), एक्झिमा, सोरायसिस, ल्युकोडर्मा.
  

पण यासाठी प्रत्येक व्यक्तीचा आहार, त्याचे मानसिक स्वास्थ्य, त्याचे काम, राहणे या सर्वाचा विचार केला जातो. 

 तसेच नेहमी असणारा पित्ताचा त्रास (ऍसिडिटी), नेहमी असणारी सर्दी, खूप तेलकट पदार्थ तसेच जंक फूड याचे परिणाम त्वचेवर येतात. ऍक्युपंक्चर उपचाराने शरीरातील विशिष्ट बिंदूवर विशिष्ट पध्दतीने सुया टोचून (या सुया आपल्या केसांपेक्षाही पातळ व लवचीक असतात.) रुग्णाचा आजार किती जुना आहे, त्याप्रमाणे ऍक्युपंक्चर उपचाराचा कालावधी ठरवला जातो.
 

 आजार जुना असेल तर बरे होण्यास जास्त दिवस लागतात. संपूर्ण शरीराचा व मनाचा विचार केल्यामुळे त्वचाविकार तर बरा होतोच, त्याचबरोबर रुग्णाला असलेली सर्दी, ऍलर्जीचा त्रास हेसुध्दा बरे होतात.

 

ऍक्युपंक्चर उपचारात त्वचेवरील आजार कशा प्रकारचा आहे. त्याप्रमाणे - म्हणजे फुप्फुस तसेच यकृत यांचा आपल्या शरीरातील प्रवाहातील अडथळा, तसेच पंचमहाभूतात्मक कोणते तत्त्व वाढले अथवा कमी झाले आहे याचा विचार केला जातो. तसेच शरीराबरोबर मनाचाही विचार (काही दडपण, टेन्शन, भीती) यांचा उपचारात समावेश असतो.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

सतत खूप स्ट्रेस, टेन्शन असेल तर त्वचेवर त्याचा त्रास दिसून येतो. वातावरणातील हवा दूषित असेल, खूप कोरडे तसेच खूप बाष्प वातावरणात असेल, तर त्याचा त्रास शरीरावर होतो. आता ऍक्युपंक्चरमुळे या सर्वांवर उपचार शक्य झाले आहे. शरीरातील व मनातील बदल होण्यास वेळ लागतो. पण आजार मुळापासून बरा होतो. बदलापूरचे ऑर्डनन्स कंपनीचे एक अधिकारी सोरायसिसच्या विकाराने आजारी होते. शरीरावर सोरायसिसचे डाग होते. खूप कंड होत असे. त्यांना बरे होण्यास 3 महिने लागले. पण सोरायसिस पूर्ण बरा झाला.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 त्यांना झालेला आनंद हेच ऍक्युपंक्चरचे यश होय. आणखी एक होणारी जादू म्हणजे, चेहऱ्यावर येणारे (पिंपल्स) मुरमे यासाठी हातावरील विशिष्ट बिंदूमधून (फुप्फुसाचा पॉइंट) 2 CC रक्त काढून कमरेवरील विशिष्ट पॉइंटवर त्याचे इंजेक्शन दिले असता दुसऱ्या दिवसापासून चेहऱ्यावरील फरक दिसण्यास सुरुवात होते. त्वचाविकारात उपचाराचे सातत्य मात्र ठेवावे लागते.

 

असे अनेक रुग्ण बरे झालेले आहेत. ऍक्युपंक्चरवर विश्वास व उपचाराचे सातत्य यामुळे ही किमया होते.

- डॉ. वीणा महाबळेश्वरकर

8104345829