आरोग्य विमा

विवेक मराठी    11-Mar-2020
Total Views |

 
LIC_1  H x W: 0

असे म्हटले जाते कीशहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये आणि त्याच्यावर रुग्णालयाची पायरी चढायची वेळ येऊ नये.’ कोर्टाची पायरी चढणे एकवेळ आपण ठरवू शकतो, पण योग्य ती जीवनशैली अवलंबूनही रुग्णालयाची पायरी चढावी लागणारच नाही याची काही खात्री देता येत नाही, तेव्हा या अघटित समस्येवरचा उपाय म्हणजे आरोग्य विमा घेण्यावाचून पर्याय नाही.
 
 

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला अन् मोठ्या प्रमाणावर नागरिक आरोग्य विमा योजना घेण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावू लागले. चीन सरकारने विमा कंपन्यांना आदेश दिला की, ‘कोरोना व्हायरसची लागण झालेल्या प्रत्येकास तुम्ही विमा द्या. तुमचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई सरकार देईल.’ आणि खरोखरीच त्यानुसार चीन सरकारने तिथल्या विमा कंपन्यांना बरीच मोठी रक्कम भरपाईपोटी दिल्याचे समजते.


मुदतीचा विमा (टर्म इन्शुरन्स) घेतल्यानंतर कुठला विमा प्रकार घ्यायचा? तर तो म्हणजेआरोग्य विमा’. पर्याप्त रकमेचाफॅमिली फ्लोटरप्रकाराचा आरोग्य विमा घेणे कुटुंबप्रमुखाला गरजेचे आहे. रोगनिवारणाचा खर्च मागील काही वर्षांत झपाट्याने वाढला. माझ्या लहानपणी बहुतेक जण शस्त्रक्रिया उपचार सरकारी रुग्णालयात घेत असत. पण आता खासगी रुग्णालये बरीच झाली. खासगी रुग्णालयात डॉक्टर्ससुद्धा केवळ स्पेशलायझेशन नाही, तर सुपर स्पेशलायझेशन केलेले उपलब्ध झाले. योग्य निदान होण्यासाठी विविध परीक्षा (टेस्ट्स) उपलब्ध झाल्या आणि महत्त्वाचे म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ झाली, क्रयशक्ती वाढली, म्हणून सरकारी रुग्णालयांकडून मध्यमवर्गीयांचा ओढा खासगी रुग्णालयांकडे वळू लागला. रुग्णालयातील उपचार दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चीक होऊ लागला.

असे म्हटले जाते कीशहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये आणि त्याच्यावर रुग्णालयाची पायरी चढायची वेळ येऊ नये.’ कोर्टाची पायरी चढणे एकवेळ आपण ठरवू शकतो, पण योग्य ती जीवनशैली अवलंबूनही रुग्णालयाची पायरी चढावी लागणारच नाही याची काही खात्री देता येत नाही, तेव्हा या अघटित समस्येवरचा उपाय म्हणजे आरोग्य विमा. तो घेण्यावाचून पर्याय नाही.

 

मी गेली 10 वर्षे सातत्याने मेडिक्लेमचा रु. 10,000चा हप्ता भरतोय, पण एक रुपयाचा कधी क्लेम केला नाही. लाखभर रुपये नुसते वाया गेले. यंदापासून मी मेडिक्लेमचा हप्ता भरणे बंदच करणार आहे.” साठी ओलांडलेला माझा एक मित्र माझ्यापुढे आपली कैफियत मांडत होता.

खरे आहे, असा विचार फक्त माझ्या त्या मित्राच्याच मनात येतो असे नाही, तर हा प्रातिनिधिक विचार आहे. मागील दहा वर्षांत आपल्याला हॉस्पिटलची पायरी चढावी लागली नाही, ही आनंदाची गोष्ट की दु:खाची? खचितच आनंदाची, पण 1 रुपयाचा क्लेम करावा लागला नाही हे दु:! आहे की नाही विरोधाभास!


पुढे मी त्याला म्हणालो, “अरे, दर वर्षी तुला जर मी 10,000 रुपयाचा दानधर्म कर म्हणालो, तर करशील का? बरं, समजा तू तयारही झालास, तरी अनोळखी व्यक्तीला दान करायला मन सहसा तयार होत नाही.”

 

या माझ्या मित्राने दर वर्षी दिलेले 10,000 रुपये कुणातरी अभागी व्यक्तीच्या कामी आलेले असतात. हा भाग्यवान की याला मेडिक्लेमच्या रु. 10000च्या वार्षिक प्रीमियमच्या मोबदल्यात, आजारपण आल्याने दहा वर्षांत एकदाही क्लेम करण्याची वेळ आली नाही. पण असा कुणीतरी तर असेलच, ज्याला त्याच्या 10000च्या प्रीमियमच्या मोबदल्यात विमा कंपनीने दोन लाखांचा क्लेम दिला असेल. हे वरचे किंवा अधिकचे रु. 1,90,000 विमा कंपनी कुठून आणणार? रिझर्व बँकेसारखी नोटा छापायची तर त्यांना परवानगी नाही. उत्तर सोपे आहे - अशा इतर 19 भाग्यवान विमाधारकांकडून जमा झालेले 1,90,000 त्या गरजू आजारी इसमास मिळू शकले. तुमचे 10,000 कुणाला मिळाले हे गुपित आहे. गरजू व्यक्तीचा धर्म, जात याचा विचार करता तुमची मदत त्याला मिळाली.

 

असे म्हटले जाते की, दान असे करावे की उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळता कामा नये. इथे तर तुमची मदत कोणाला झाली, तो हिंदू होता की ख्रिश्चन, मुसलमान होता की बौद्ध, ब्राह्मण होता की वाणी याचा विचार करता तुम्ही दान दिलेय. मग याचे वाईट का बरे वाटावे? तुम्ही गरजू व्यक्तीच्या कामी आलात याहून दुसरा आनंद तो कोणता?

 

दुसरे असे की एका अभ्यासात असे दिसून आलेय की, सामान्यत: मरणापूर्वीच्या दोन वर्षांत हॉस्पिटलायझेशन, औषधोपचार यावर जेवढा खर्च होतो, तेवढा आधीच्या संपूर्ण आयुष्यात झालेला नसतो. माझ्या मित्राला अजून हा खर्च करावा लागला नाही, म्हणजे तो खचितच भाग्यवान आहे. शिवाय वय वाढते तशी आजारपणाची शक्यता वाढते. त्यामुळे मागील 10 वर्षांत मला काही झाले नाही म्हणजे पुढील 10 वर्षे काही होणार नाही, मी ठणठणीत, निरोगीच राहीन याची खात्री कोण बरे देणार? त्यामुळेच एकदा घेतलेला आरोग्य विमा मरेपर्यंत सुरू ठेवणे शहाणपणाचे.

 

आरोग्य विम्याचे महत्त्व सांगितल्यावर आता आरोग्य विम्याचे प्रकार आणि नियम याबद्दल बघू या.

 

सर्वप्रथम मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स यातील फरक जाणून घेऊ या. मेडिक्लेममध्ये प्रामुख्याने रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते रुग्णालयातून मुक्त (डिस्चार्ज) होईपर्यंतचा खर्च मिळतो, ज्यात रूम चार्जेस, सर्जरीचा खर्च, त्या दरम्यान दिलेल्या औषधांचा खर्च सम्मीलित असतो. मात्र हेल्थ इन्शुरन्समध्ये या खर्चांव्यतिरिक्त रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, आजारपणातील रजेमुळे उत्पन्नात झालेली घट अशा अनेक बाबी सम्मिलित करता येतात.

 

आजमितीस केवळ मेडिक्लेम/हेल्थ इन्शुरन्स देणार्या 6 विमा कंपन्या भारतात कार्यरत आहेत. याशिवाय वाहन विमा, प्रवासी विमा, गोदामामधील मालाचा विमा वगैरे देणार्या 26 साधारण विमा कंपन्याही मेडिक्लेम/हेल्थ इन्शुरन्स देतात. क्वचित काही विमा कंपन्या 75 वर्षांवरील व्यक्तींना आरोग्य विमा देतात, मात्र एकदा आरोग्य विमा घेतला असल्यास त्या पॉलिसीचे नूतनीकरण (रिन्युअल) कोणी नाकारू शकत नाही. वेळच्या वेळी नूतनीकरण करत गेल्यास अगदी शतायुषी होऊनही मृत्यू येईपर्यंत आरोग्य विमा सुरू ठेवता येतो.

 

काही विमा कंपन्या काही विशिष्ट व्याधींमुळे होणार्या खर्चाचा आरोग्य विमा देतात - उदा., कॅन्सर, हृदयरोग, मूत्ररोग असे विशिष्ट रोगांमुळे होणारे खर्च अशा विशिष्ट विमा पॉलिसीमध्ये सम्मीलित असतात.

 

दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचा विमा किंवा कुटुंबातील पती, पत्नी, आई, वडील या सर्वांचाफॅमिली फ्लोटरया प्रकारचा आरोग्य विमा. ‘फॅमिली फ्लोटरया प्रकारात सर्व सदस्यांची मिळून जेवढी विमा रक्कम होईल, तेवढी एका किंवा अधिक व्यक्तींना वापरता येते. विशिष्ट रकमेची प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी विमा पॉलिसी घेण्यापेक्षाफॅमिली फ्लोटरघ्यावी. त्याचा विमा हप्ता कमी येतो.

 

एखाद्या रोगातून बरे झाल्यावर किंवा अपघातातून सुखरूप बाहेर आल्यावर किंवा अगदी हृदयरोगाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यावर किंवा मधुमेही व्यक्तीसही काही अटींवर आरोग्य विमा मिळतो. आयुर्विमा देणार्या 24 विमा कंपन्या, ज्यात एल.आय.सी. येते, त्यांना मात्र अशा प्रकारचा आरोग्य विमा देता येत नाही. त्या गंभीर आजारांचा अंतर्भाव असलेले रायडर्स मूळ पॉलिसीबरोबर देऊ शकतात. अशा रायडरमुळे विमाधारकास गंभीर आजार झाल्यास विम्याची 10% रक्कम त्याचा खर्च किती झाला याची विचारणा करता दर वर्षी पॉलिसीची मुदत संपेपर्यंत दिली जाते. अशा प्रकारचे विविध आजारांसाठी विविध रकमेचे रायडर्स विमा पॉलिसीला जोडून घेता येतात.

 

सांगता येणारे गंभीर आजार आणि आपल्या चुकीमुळे वा चूक नसतानाही होणारे अपघात यांच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे.

 

लेखक इर्डाचे (IRDAचे) माजी सदस्य आहेत.