“घड्याळाच्या बंधनात न अडकता वेळेचे नियोजन कौशल्य शिका” - कांचन दीक्षित

विवेक मराठी    16-Mar-2020
Total Views |

पुणे : घड्याळाच्या काट्यांच्या बंधनात अडकता, एखाद्या कामासाठी द्यायचा वेळ निश्चित ठरवून ते पूर्ण कसे होईल, यावर लक्ष केंद्रित कराअसा सल्ला कांचन दीक्षित यांनी विवेकतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात दिला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ..सो. मुलांचे भावे हायस्कूलच्या डॉ. प्र.. गावडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात, मेंद्ू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकच्या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळीसवयी बदला, आयुष्य बदलेलया विषयावर वेळ व्यवस्थापन सल्लागार कांचन दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


mahila din_1  H
 
या व्याख्यानातून वेळेची बचत आणि वेळेचे कौशल्यपूर्वक नियोजन कसे करायचे हा मंत्र कांचन दीक्षित यांनी उपस्थितांना दिला. एखादी चांगली सवय आपल्यात रुजवण्यासाठी संयमाची आणि सातत्याची गरज असते, नेमका त्याचाच अभाव आपल्यात असतो, हे निदर्शनास आणून देत त्या पुढे म्हणाल्या, “वेळेचे नियोजन करण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या, तर आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. जेव्हा एखाद्या कृतीविषयी बाह्यमन आणि अंतर्मन यांचे एकमत होते, तेव्हा ती कृती सहज शक्य होते.” अतिशय परिणामकारक अशा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या आधारे त्यांनी केलेले मार्गदर्शन दिशादर्शक होते.

 

डॉ. श्रुती पानसे यांनी आपल्या भाषणातून मेंदूसंदर्भात सध्या चालू असलेले संशोधन आणि त्याचे महत्त्व श्रोत्यांसमोर मांडले.


सा. विवेकचा यंदाचा महिला दिन विशेषांक हा महिला संशोधिकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा होता. डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते या संशोधिकांचा सत्कार करण्यात आला.

 

जागतिक महिला दिनानिमित्त सा. विवेकने आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात झाले. या वेळी स्पर्धेच्या एक परीक्षक विनीता तेलंग यांनी मनोगत व्यक्त केले.


पुणे आणि बाहेरगावाहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या वाचक-हितचिंतक-संशोधक-पारितोषिक विजेते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. विवेक समूहाचा प्रवास, तसेच महिला दिन विशेषांकामागची भूमिका त्यांनी प्रास्ताविकातून मांडली. शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी प्रमुख अतिथींचा, तसेच प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. स्वाती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.