रा.स्व. संघाकडून कल्याण – डोंबिवलीमध्ये डॉक्टर्स, पोलीस यांना संरक्षक गाऊनचे वितरण

स्रोत: विवेक मराठी    दिनांक15-Apr-2020
|

डॉक्टर्स आणि अन्य पॅरामेडिकल स्टाफसाठी आणि पोलिसांना ८०० संरक्षक गाऊनचे वितरण करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस २०० किट्सचे वितरण केले तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे २०० किट्स सुपूर्द केले. पोलिसांना वापरण्यासाठी हे किट्स देण्यात आले. कल्याण पूर्व भागात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना २५०; तसेच तीन ते चार इस्पितळांना प्रत्येकी १० ते १५ किट्स देण्यात आले. यातील २० किट्स भिवंडीमधील स्वयंसेवकांनी आपल्या आणि अन्य कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी दिले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, नाकाबंदीसाठी पोलिसांना मदत करण्याचे कार्य. कल्याण, डोंबिवलीमधील २०० कार्यकर्त्यांची सूची पोलिसांना देण्यात आली आहे.

कल्याण - डोंबिवली महापालिकेकडून चालविण्यात येत असलेल्या कम्युनिटी किचनमध्ये मदत. रोज दोन वेळा १० स्वयंसेवक या कार्यात मदत करीत आहेत.

प्रातिनिधिक फोटो


corona kits nurse_1  
RSS