संघर्ष मानवतेच्या लढ्याचा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक19-Apr-2020   
|


china_1  H x W:


'एका दलदलीच्या जवळच दोन बैलांची  झुंज चालू होती' इसाप गोष्ट सांगतो आहे. 'जवळच बेडकांची वस्ती होती. बैलांच्या  झुंजीचा आणि बैलांच्या आवाजाचा ते  अनुभव घेत होते. बेडकांच्या मानाने बैल हा अजस्त्र प्राणी होता. डोळे विस्फारून  ते बैलांची झुंज पाहत होते.

 

एक बेडूक दुसाऱ्याला विचारतो 'आता काय होईल रे? बैलांच्या या लढाईचा  आपल्यावर काय परिणाम होईल का?'  दुसरा  म्हणतो, 'या बैलांच्या लढाईत  आपण पडण्याचे कारण नाही. या  दोघांपैकी एक विजयी होईलतो गाईंच्या  कळपाचा स्वामी  होईल. त्यांच्या लढाईचा  आपल्यावर काहीच परिणाम होणार  नाही. '

 

तिसरा बेडूक म्हणाला, 'तुम्ही दोघेही  चुकता आहात. ज्याचा या लढाईत पराभवहोईल, तो आपल्या पाणथळीच्या जागेवर येईल, त्याच्या अजस्त्र पायाखाली सापडूनआपण मरू. तसेच त्याचा माग काढून  विजयी बैलदेखील येण्याची शक्यता आहे.त्याच्याही पायाखाली आपण चिरडले  जाण्याचा धोका आहे. दोन बैलांच्या  लढाईत  आपला काही संबंध  नसला तरी  त्याचा  परिणाम आपल्यावर  झाल्याशिवाय  राहणार नाही.'

 

इसापची कथा येथे, कथा म्हणून संपतेपरंतु मानवी इतिहासाची कथा म्हणून ती निरंतर चालूच असते. सद्याचेच उदाहरण घेऊया. चीन आणि अमेरिका यांच्यात  जगातिक प्रभुत्वासाठी संघर्ष चालू आहेत्याचा परिणाम म्हणून कोरोना व्हायरसचा उदय झाल्याचे अनेकांचे मत आहे. दोन  महासत्तांच्या या लढाईत (इसापच्या  शब्दात दोन बैलांच्या लढाईत) इतर दुर्बल देशांचा काही संबंध  नाही. पण या युद्धाचे परिणाम त्यांना  भोगावे लागत आहेत.

 

भारताचेच उदाहरण घेतले तरदीर्घकाळासाठी लॉकडाऊनचा सामना  आपल्याला करावा लागला आहे, कोरोना विषाणूंमुळे  अनेकांना आपले  प्राण  गमवावे लागले आहे. भांडण दोन  बड्यांचे आहे आणि त्याचा परिणाम  आपल्याला भोगावा लागत आहे.

 

 वर्चस्वाची लढाई हा मानवी संस्कृतीचा  स्थायिभाव आहे. इसापच्या कथेतील बेडूक समुदाय म्हणजे आपल्यासारखी  सामान्य माणसे होय. त्यांना लढाईमारपीट, हिंसाचार नको  असतो. शांततेत  जीवन जगणे हीच त्यांची माफक अपेक्षा  असते

 

पण राजा, सेनापती, हुकूमशहा, पुढारी  यांना वर्चस्व निर्माण  करायचे असते, आपली सत्ता निर्माण करायची असतेम्हणून तो पुढाकार घेतो  आणि  संघर्ष  करतोविरोध करणाऱ्यांचा काटा   काढतो.

 

असे नेते नेहमीच सांगतात की, माझा  संघर्ष सामान्य माणसाला  न्याय मिळावागरिबांना चांगले दिवस यावेत, समतेचे  राज्य  निर्माण व्हावे, म्हणून  चालला  आहे. अन्याय, अत्याचार आणि  गरिबीची  शिकार झालेले याला भुलतात. ते त्या  नेत्याच्या संघर्षातसामील होतात. संघर्ष चालू असताना बेडकांप्रमाणे पायाखाली  तुडविले जाऊन मरतात. नेता विजयी  झाला की, तो स्वतःचीस्वतःच्या  परिवाराचीत्याला एकनिष्ठ  असलेल्यांची गरिबी दूर  करण्याच्या मागे  लागतोसामान्य माणूस पूर्वी जेथे होता तिथेच  राहतो. चिरडले जाण्याची भयछाया त्याच्या  डोक्यावर  सतत  राहते.

 

आफ्रिका खंडातील देश १९५० नंतर  स्वतंत्र होत गेलेवसाहतवादाचा  अंत होत  गेला. स्वतंत्र झालेले  कांगो, झिम्बावे, नायजेरिया, घानायुगांडा  अशा  देशांत राजकीय  वर्चस्वाचा जीवघेणा संघर्ष सुरू  झाला. यात जे नेते  विजयी झाले ते मानवी इतिहासातील क्रूर हुकूमशहा झाले. लिबियाचा गडाफ़ी असो की, कांगोचा मोबूटो असो की, झिम्बावेचा मुगाबे असो, की  युगांडाचा  ईडीअमीन  असो या  सर्वांनी सामान्य माणसाच्या  सुखाचा राग आळविला आहे. या सर्वांची राजकीय कारकीर्द  विरोधकांच्या  कत्तली करण्याच्या आहेत. त्याचबरोबर  अगडबंब भ्रष्टाचार  करण्याची आहे. प्रत्येक हुकूमशहा  इसापच्या कथेतील तगडा बैल आहे.

 

अशा दोन उन्मत्त बैलांच्या लढाया  शांतपणे पाहत राहणे आणि  त्याचा  आपल्यावर  काहीही परिणाम होणार नाही, असे समजून  निर्धास्त राहणे  शहाणपणाचे नाही. इतिहास एक धडा  देतोब्रिटनने आरमारी युद्धात  प्रथम स्पेनच्या आरमाराचा पराभव  केला. त्यानंतर फ्रान्सच्या आरमाराचा  पराभव केला. या लढाया तर भारतापासून हजारो मैल सागरात झाल्या, ब्रिटनचे  सागरावर वर्चस्व निर्माण झाले. समुद्रमार्गे ते आपल्या देशात आले. पुढचा  इतिहास आपल्याला माहीत आहे.

 

प्रेषित मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर खिलाफतसुरू झालीइस्लामच्या प्रचारासाठी  लढाया सुरू झाल्या. प्रथम रोमन  साम्राज्याचा पराभव झाला. त्यानंतर  पर्शिअन साम्राज्य  रसातळाला गेले. दोन  सशक्त बैलांच्या झुंजी मध्य आशियातअरबस्तानात चालू राहिल्या शेवटी  विजयी  इस्लामी  सेनेचे भारतावर  आक्रमण सुरू झाले.

 

खिलाफत आणि इतर साम्राज्ये यांच्या  युद्धांशी म्हटले तर आपलाकाहीच संबंध  नव्हता, पण शेवटी विजयी बैलांच्या टाचेखाली आपण तुडवले गेलो.

 

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे  म्हणतात. आपल्याला ही म्हण खोटी  ठरवावी लागेल. अमेरिका आणि  तिचे युरोपातील  मित्रदेश चिनी व्हायरसने  ग्रासलेले आहेत. गोऱ्या माणसांचा  इतिहास हे सांगतो की , जीवन मरणाचा संघर्ष सुरू झाल्यास  त्यांचे ब्रीद वाक्य  असते, 'मी जगणारयासाठी तुझी कत्तल  करावी लागली तरी हरकत नाही.' चिनी माणसाचाही  हा  स्वभाव आहेमाणसं  मारण्यात त्यांना काही  सोयरसुतक नसतं. आज गोरी माणसे  मरतायतउद्या काय होईल हे  सांगता  येत  नाही. म्हटला तर हा वर्चस्वाचा संघर्ष आहे. आपल्याला  वर्चस्वाचा नाही  तर  मानवतेचा संघर्ष लढायचा आहेहजारो  वर्षांपासून आपण जे तत्त्वज्ञान  जगत आलो आहोत, ते तत्त्वज्ञान सांगतं की मी माझ्या  वास्तवरूपात  अव्यक्त, अजर, अमर आहेजे तत्त्व  माझ्यात, तेच विश्वात, तेच  सर्व मानवाततेच सर्व  चराचरसृष्टीत आहेआताचा  कालखंड स्वस्त बसण्याचा नसून आपल्याजीवनमूल्यांच्या आधारे मानवसेवा करण्याचा आहे. दुसऱ्याची वैगुण्ये काढण्यात  आपल्या शक्तिशय करण्याऐवजी  आपले  विचार आणि जीवनमूल्ये जगून  शक्तिमान होण्याचा आहे.

 

बैलांच्या झुंजीत एक विजयी होणार, असे इसाप सूचित करतो . इसाप जर आज  हयात असता तर, त्याने सांगितले असते की, दोन बैलांच्या झुंजीत दोघेही नष्ट  होणार आहेत. इतिहास हा चक्राकार असतो, त्याची पुनरावृत्ती होते. तो खूप महत्त्वाचा आहे, हे इतिहासाचे दोन सिद्धांत. आपण इतिहास विसरलो तरच त्याची पुनरावृत्ती होते. म्हणून इतिहास विसरून चालणार नाही. हेच खरे इतिहासाचे महत्त्व आहे.

- रमेश पतंगे