संतांची रामोपासना

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Apr-2020
|

***धनश्री साने***

भारतात फार पूर्वीपासून रामोपासना चालत आली आहे
. प्रभू रामचंद्र हिंदू संस्कृतीचा, धर्माचा आत्मा आहे. प्रत्येक हिंदूचे अंतरंग बालपणापासून संस्कारित होते ते रामकथेमुळेच. श्रीरामाच्या उत्तुंग आदर्शामुळे, पराकोटीच्या स्वार्थत्यागामुळे त्याच्या चरित्राची उंची व महत्ता हिमालयासारखी आणि खोली महासागरासारखी झाली आहे. रामाचा पराक्रम, शौर्य, नीती, धर्माचरण, विवेक, औदार्य, वचनपालन, एकपत्निव्रत इ. श्रेष्ठतम गुणांची मोहिनी श्रेष्ठ-कनिष्ठ, सान-थोर, सामान्य-असामान्य, निरक्षर-पंडित सर्वांवर आहे. श्रीराम-सीता हा हिंदू कुटुंबसंस्थेचा आदर्श आहे.

 

jay shree ram_1 &nbs 
 
श्रीरामकथेचा आणि रामभक्तीचा मूळ स्रोत वाल्मिकी रामायण आहे. राम, सीता, दशरथ, रामाचे पूर्वज यांचे उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, तैतरीय ब्राह्मणे यात आला आहे. देशी-विदेशी अनेक भाषांत वाल्मिकी रामायणाचे भाषांतर झाले आहे.

महाभारताच्या नारायणी उपाख्यानात रामाचे नाव आले आहे. भास या नाटककाराने रामकथेवर प्रतिमानाटक लिहिले, तर भवभूतीने महावीरचरित्रउत्तररामचरित्रही नाटके लिहिली. कालिदासाने रघुवंशमहाकाव्य लिहून रामाचा गौरव गायला आहे. बहुतेक सर्व देशी भाषांमध्ये रामकथेचे एखादे तरी नाटक आढळतेच.

jay shree ram_1 &nbs

भारतीय संतपरंपरेतील अनेक संतांनी आपल्या उपास्य दैवताच्या बरोबरीने श्रीराममाहात्म्य वर्णिले आहे. तुलसीदास, समर्थ रामदास या संतांचे तर श्रीराम हेच उपास्य दैवत. संत सूरदासांनी सूर रामायणामध्ये रामभक्तीच्या अनंत लीला गायल्या आहेत.

रामचरितमानसया ग्रंथाचा कर्ता, महाकवी, श्रेष्ठ रामभक्त तुलसीदासजी यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित श्रीरामचंद्रांचा गौरव गाणारी अलौकिक कथा अवधी भाषेतील महाकाव्यात शब्दबद्ध केली. या रामचरितमानसाचे स्थान विश्ववाङमयात अजोड आहे.

सर्व प्रकारच्या भवदु:खांवर एकमेव रामबाण औषध म्हणजे रामनामच होय, असे सांगून या महाकाव्यात श्रीराम आरती, श्रीराम नामवंदना, श्रीरामस्तुती, श्रीरामवंदना या पदांमधून रामनामाची महती सांगितली आहे.

श्रीरामचंद्र कृपालू भजुमन हरण भवभय दारुणं।
नवकंज-लोचन, कंंज-मुुख कर-कंज, पद कंजारूणं ।।१।।

सन्मुख उभा भीम कपीन्द्र। वज्रदेही ।।