मदतीची बेटं - मोफत मास्क वाटप

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Apr-2020
|
‪#काहीचांगलेहीघडतेआहेआसपास

maharashtra yashwant sena 

शक्ती फाऊंडेशन संस्था नवी मुंबई व महाराष्ट्र यशवंत सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना वायरस बद्दल नवी मुंबईत रेल्वे स्टेशन, बसस्थानक यांसह विविध ठिकाणी जनजागृती आणि मोफत मास्क वाटप कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही संस्था धनगर समाजातील नागरिकांच्या व मुख्यत: युवकांच्या सहभागाने विविध सामाजिक उपक्रम करत असतात. धार्मिक कार्यक्रम, क्रीडा, उद्योजकता विकास, महिला संमेलने असे विविध उपक्रम करत असतात. तीन आठवड्याची संचार बंदी होण्याच्या आधी जेव्हा Social Distancing चे महत्व प्रशासन व माध्यमे आग्रहाने सांगत होती तेव्हा म्हणजे १५ मार्च च्या सुमारास कोरोना विषयातील जनजागृतीचा व मास्क वाटपाचा कार्यक्रम ह्या संस्थांतील युवकांनी केला. त्यांचे अभिनंदन.

- शरदमणी मराठे
 
‪#काहीचांगलेहीघडतेआहेआसपास