शेअर बाजार - अल्प मुदतीचे सौदे धोकादायक

विवेक मराठी    12-May-2020
Total Views |


short  investment_1 

‘शेअरटेल्स’ : दि. मे ते ८ मे

सध्याच्या घडीला शे बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक अल्प मुदतीच्या (short term) सौद्यांमध्ये स्टॉप लॉस ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच अल्प मुदतीमध्ये सौदे करताना प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता बघितली पाहिजे. जो माणूस शे बाजारामध्ये अल्प मुदतीसाठी सौदे करताना जोखीम, लक्ष्य आणि स्टॉप लॉस या तीन गोष्टी अंमलात आणू शकत असेल, त्यानेच अल्प मुदतीसाठी शेयर बाजारात सौदे करावेत, असं मी सुचवेन.

----------

निफ्टी ५० : ९२५१.५० (-६०८.४०)

निफ्टी बँक : १९३५२.४० (-२१८१.६०)

निफ्टी मिडकॅप ५० : ३७२२.४० (-१८४.९०)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३६१५.७५ (-१३६.२५)

या आठवड्यात निफ्टी ६०८ अंकांनी खाली घसरला तसेच बाकीचेही निर्देशांक घसरले आहेत. पहिल्या लेखामध्ये निफ्टीमधील ही वाढ फक्त रिलीफ रॅली आहे, असं मी म्हटलं होतं. त्याप्रमाणे ही रॅली बरोब्बर ५०% पर्यंत गेली (मागील लेखातील चार्ट आठवा) आणि तेथून पुढे जायला निफ्टीला अडथळा यायला लागला. मागील लेखात १०००० हा निफ्टीसाठी मोठा अडथळा असेल असे सांगितले होते ९४०० हा स्टॉप लॉस ठेवून निफ्टी खरेदी करण्याचाही सल्ला दिला होता. परंतु, यावेळी स्टॉप लॉस हिट झाला. आता पुढील काळात काय होऊ शकतं याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. निफ्टी अजूनही डाऊन ट्रेंड (DOWN TREND) मध्येच आहे. त्यामुळे ९७०० चा स्टॉप लॉस ठेवून ९००० आणि ८८०० हे लक्ष्य ठेऊन आपण निफ्टी विकू शकतो.short  investment_1 

वरील चार्ट मध्ये जो रंगवलेला गोल काढलेला आहे त्याला तांत्रिक विश्लेषणामध्ये Island Reversal म्हणतात. तसेच हा Island Reversal Pattern निफ्टी ५०% Retracement ला असताना आला त्यामुळे या Island Reversal Pattern ला खूप महत्व आलं आहे. वरील चार्ट मधील ९६०५ ९७३० ह्या लेव्हलवर निफ्टीला अडथळा असेल कारण या लेव्हल्स याच Island Reversal Pattern चा महत्वाचा भाग आहे. आता निफ्टी बँकचा चार्ट काय म्हणतो ते बघू.

short  investment_1 

वरील चार्ट हा निफ्टी बँक या Sectoral Index चा आहे. याही आपण बघू शकतो की Price ही २० DSMA तोडत नाही तसेच Price ने Ascending Triangle या Price Pattern ला खालील बाजूस तोडलेले आहे RSI हा Indicator ही ५० च्या लेव्हलला स्पर्श करून खाली येत आहे. त्यामुळे इथेही तुम्ही निफ्टी बँक २०३३२ चा Closing Basis वर स्टॉप लॉस ठेवून विकू शकता. परंतु, निफ्टी बँकमध्ये सौदा करताना खूप काळजी घ्या, कारण निफ्टी बँक हा निर्देशांक खूप Volatile असतो.

आता काही शेअर्सबद्दल बोलू.

विका :

SBI - CMP 166.65, TGT 150, Stop Loss 180

खरेदी करा :

Dr Reddy's Lab - CMP 3984, TGT 4300, SL 3800

ALLEMBIC PHARMA - CMP 767.30, TGT 900, SL 700

सध्याच्या घडीला शे बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक अल्प मुदतीच्या (short term) सौद्यांमध्ये स्टॉप लॉस ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच अल्प मुदतीमध्ये सौदे करताना प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता बघितली पाहिजे. जो माणूस शे बाजारामध्ये अल्प मुदतीसाठी सौदे करताना जोखीम, लक्ष्य आणि स्टॉप लॉस या तीन गोष्टी अंमलात आणू शकत असेल, त्यानेच अल्प मुदतीसाठी शेयर बाजारात सौदे करावेत, असं मी सुचवेन.

@अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

--------------------------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाज व मते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)


pasting