अस्थिर निर्देशांकांच्या पार्श्वभूमीवर...

स्रोत: विवेक मराठी    दिनांक16-May-2020
|

शेअरटेल्स : दि. ११ मे ते १५ मे

निफ्टीची या आठवड्यातील उलाढाल आपल्याला एक Range दाखवते आहे. ही रेंज म्हणजे, ९५८६.२५ जो त्या रेंजचा Resistence आहे आणि ९०४८.१३ जो त्या रेंजचा Support आहे. म्हणजे, ही रेंज ज्या दिशेला तोडली जाईल, त्या दिशेला आपला सौदा असला पाहिजे. म्हणजे ९५८६.२५ हा स्तर तोडला तर खरेदी ९०४८.१३ तोडला तर विक्री केली पाहिजे. या स्तराच्या मधल्या काळात काहीही करता शांत राहावं, असं मी सुचवेन..


share market Unstable ins

निफ्टी
: ९१३६.८५ (- ११४.६५)

निफ्टी बँक : १८८३३.९५ (- ५१८.९५)

निफ्टी मिडकॅप ५० : ३६१८.५० (+ ८१)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३४५८.८० (+ ५.४०)

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात निफ्टीमध्ये Volatality दिसून आली आहे. याला अर्थातच कारण ठरली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची केलेली घोषणा. या एका गोष्टीमुळे निफ्टी दुसऱ्या दिवशी ३८७. ९५ अंकांनी उघडला त्याच दिवशी ९३८३.५५ वर बंद झाला. एकाच दिवशी निफ्टीने २००.९५ अंकांची
Volatality दाखवली. आता आपण निफ्टीचा चार्ट काय सांगतो ते बघू.


share market Unstable ins

इथे हा जो निफ्टीचा चार्ट दिसतो, तो आपल्याला एक Range दाखवत आहे. ही रेंज म्हणजे, ९५८६.२५ जो त्या रेंजचा Resistence आहे आणि ९०४८. १३ जो त्या रेंजचा Support आहे. म्हणजे, ही रेंज ज्या दिशेला तोडली जाईल, त्या दिशेला आपला सौदा असला पाहिजे. म्हणजे ९५८६.२५ हा स्तर तोडला तर खरेदी ९०४८.१३ तोडला तर विक्री केली पाहिजे. या स्तराच्या मधल्या काळात काहीही करता शांत राहिलं पाहिजे.

आता आपण काही शेअर्सच्या चार्टकडे वळू. मागील लेखात ALLEMBIC PHARMA या शेअरमध्ये ७६५ रूपयांना खरेदी करण्यास मी सुचवलं होतं ९०० हे त्याचं लक्ष्य (Target) दिलं होते. हा शेअर ८८७.३५ पर्यंत जाऊन ८७३.१५ वर क्लोज झाला. सदर Stock मी या लेखमालिकेच्या पहिल्या लेखात दीर्घ मुदतीसाठी खरेदी करा, असंही सुचवलं होतं. अद्यापही या कंपनीचे शेअर्स आपल्या भागभांडारात दीर्घ मुदतीसाठी ठेवा, असंच मी सुचवेन.

share market Unstable ins
वरील
चार्ट हा Torrent Pharma या कंपनीचा आहे. या चार्टमध्ये शेअरची किंमत Symetrical Triangle नावाच्या Price Pattern मध्ये फिरताना दिसते. म्हणजेच ती Consolidation करत आहे. जर २५०० च्या वर भाव गेला तर पुढील काळात रू. ३००० पर्यंतही आपल्याला हाच भाव गेल्याचं पाहायला मिळेल. या शेअरची खरेदी करायची झाल्यास २३५० हा Stop Loss ठेवून करावी.

अन्य काही शेअर्सबाबत सल्ला :

Torrent Pharma - खरेदी करा : २५००+, लक्ष्य : ३०००, स्टॉप लॉस : २३५०

Glenmark Pharma - खरेदी करा : ३७० +, लक्ष्य : ४००, स्टॉप लॉस : ३४०

SBI - विका : १६६ च्या खाली, लक्ष्य : १५०, स्टॉप लॉस १८०

----------

- अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)