लॉकडाऊनमध्ये श्री गजानन महाराज संस्थानद्वारा ‌ विविध सेवा कार्ये

विवेक मराठी    20-May-2020
Total Views |


shree gajann mahraj_1&nbs

जगभरात थैमान घालणा
-या कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. शिवाय देशभरात सद्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. विशेषतः गर्दीची मर्मस्थळे लक्षात घेऊन राज्यातील धार्मिक स्थळांसह सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आलेली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही कोरोना रुग्ण आढळून आले असून यासाठी जिल्हा प्रशासन त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहे. सदैव सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर असणारे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानही आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सेवाकार्ये राबवित आहे.

बुलडाणा जिल्हा मुख्यालयासह मलकापूर, मोताळा व शेगांव येथे, तसेच श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, ओंकारेश्वर येथील शाखांच्या माध्यमातून परप्रांतिय, बेघर, निराधार, गोरगरीब व गरजू बांधवांना भोजन पॅकेट्सचे वितरण करण्यात आले.

दि.२ एप्रिल ते दि. १७ मे २०२० या कालावधीत संस्थानाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज भोजन पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. प्रशासनाने सुरक्षित अंतरासाठी जाहीर केलेले सर्व नियम पाळत वयोग्य खबरदारी बाळगत हे वितरण करण्यात आल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात येते.

तसेच शेगांव येथील विसावा भक्तनिवास संकुलात 500 बेडचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट उभारण्यात आले आहे. या परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचबरोबर फिलीपिन्स येथे शिक्षण घेत असलेल्या आणि आता भारतात परतलेल्या काही विद्यार्थ्यांनादेखील या वार्डात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे दोन वेळचे जेवण, न्याहरी, चहाची व्यवस्था करण्यात येते. तसेच शेगांव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर्स, नर्स व कर्मचारीवृंद आदींकरिताही सदर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.


shree gajann mahraj_1&nbs

तसेच कोरोना विषाणूपासून बचावासाठी संस्थानाकडून शेगाव परिसर आणि संस्थानच्या शाखा परिसरात जनजागृतीही करण्यात येत आहे.