मोगी - एकचाकी सुधारित कोळपे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Jun-2020
|

पिकाच्या उत्पादनात आंतरमशागतीस फार महत्त्व आहे. साधारणत: पीक उगवणीनंतर ४०-५० दिवस पीक स्वच्छ व तणविरहित ठेवणे गरजेचे असते. तण पिकाशी पाणी, अन्नद्रव्ये तसेच सूर्यप्रकाश या बाबतीत स्पर्धा तर करीत असतेच, तसेच किडींच्या वाढीसही कारणीभूत असते. या तणांमुळे पिकाचे साधारणत: ३५-४५ टक्के आर्थिक नुकसान होते. यासाठी तणांच्या बंदोबस्ताकडे वेळीच आणि पुरेसे लक्ष दिले पाहिजे.


Mogi - one-wheeled modifi

पिकांच्या योग्य वाढीसाठी मुळांना हवेचा पुरवठा असावा लागतो, तसेच जमिनीतील ओलावा टिकून राहावा इत्यादीसाठी आंतरमशागत - कोळपणी करावी लागते. एकाच कामात तणनियंत्रण आणि आंतरमशागत साध्य झाली, तर मजुरी, श्रम, आणि वेळेत होते. त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. पिकांना मातीची भर देणेही आवश्यक असते. त्यामुळे पिकांना आधार मिळतो. जुन्या मुळ्या तुटून नवीन मुळ्या फुटतात. एकंदरीत भर दिल्याने पिकांची वाढ जोमदार होते. पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असते. पाण्याच्या योग्य वापरासाठी शेतकरी सरी पद्धतीने पाणी देतात. यासाठी सऱ्या ओढाव्या लागतात.

निंदणी, खुरपणी, कोळपणी, मातीची भर देणे, पाण्यासाठी सऱ्या ओढणे अशी सर्व कामे सहजपणे करणारे एकचाकी सुधारित मोगी कोळपे

 

उपयोग -

१) १५, २० आणि ३० से.मी. रुंदीचे पाते असल्यामुळे वेगवेगळ्या पिकांमध्ये तणनियंत्रण आणि आंतरमशागत यांसाठी वापरता येते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, कांदा, भुईमूग, मिरची, भाजीपाला पिके इ.

२) हलक्या व मध्यम जमिनीत ओळीत लावलेल्या पिकांसाठी उपयुक्त.

३) कोळप्याचे वजन ७ किलो असल्याने कोळपे सहज उचलून नेता येते.

४) पिकांना मातीची भर देण्यासाठी रिजर जोडता येतो.

५) दोन जणांच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्यासाठी सऱ्याही ओढता येतात.

६) पात्याचा आकार इंग्लिश ‘V’प्रमाणे असल्याने वारंवार पाते स्वच्छ करण्याची आवश्यकता नसते.

 

जयंत उत्तरवार

कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार.