जागल्या

स्रोत: विवेक मराठी    दिनांक16-Jun-2020   
|


eknath maharaj_1 &nb

जागल्या
कोण? याचे दोन अर्थ होतात - जो स्वतः जागा आहे तो जागल्या आणि जो दुसर्यांना जागवितो तोही जागल्या. जो स्वतः जागा राहून दुसर्यांनाही जागवितो तोच खरा पारमार्थिक जागल्या.

संत एकनाथ महाराज सांगत आहेत - मी जागल्या आहे. संपूर्ण गाव झोपलेला आहे. पण मी जागा आहे. ‘हुशारया शब्दाचा अर्थ बुद्धिमान असा आता जरी करीत असले तरी त्याचा जुन्या काळातसावध’, ‘सावधानअसाच घेतला जात असे. जुन्या काळात जागता पाहारा देणारा पाहारेकरीपाहारा हुश्शारअशीच दुसर्या पाहारेकर्याला हाळी देत असे.

सर्वजण या मायामय संसाराच्या मोहात गुंतून भ्रमात सापडले आहेत. त्यामुळे ते जागे नाहीत, झोपलेले आहे. आपल्या मानवजन्माचे सार्थक कसे होईल याचीसोयकरावी असे कुणाच्याच मनात येत नाही.

ही सोय कुठली? ‘सद्गुरुवाचोनी सापडेना सोय।या अभंगात वर्णन केलेली ही सोय आहे!

मी जी जागतो गाव निजला सारा

कोणी हुशार नाहीत घरा

अवघे निजले भ्रमले संसारा

काही तरी पुढीलाची सोय धरा 1

नाथमहाराज येथे जागल्याचे कर्तव्य उलगडून दाखवित आहेत.

नको नको मना गुंतू मायाजाळी

काळ आला जवळी ग्रसावया

अशा प्रकारे संत हाकारे घालून प्रापंचिक जीवांना सावधान करण्याचा प्रयास करीत आहेत. पण लोक सावधान होत नाहीत! याचे कारण काय आहे?

मुक्त होता परि बळे झाला बद्ध

घेऊनिया छंद माझे माझे

माणसालामीआणिमाझेया दोन गोष्टींचा गर्व फार असतो. यातून दुर्जन सुटले नाहीत आणि सज्जनही सुटले नाहीत!

काजी मरे मुल्ला मरे मर गए पंडित जोसी

इस से कोई नहीं बच पाया बुरी काल की फांसी

हे जाणत नसल्यामुळे अहंकारानेच या सर्व जिवांचा खरा घात झाला आहे.

मी जागुनी जागवितो लोका

निजेने व्यापिले काळ ग्रसील देखा

यासी कोठवर मारू तरी हाका

कैसे भुलले म्हणती माझे माझे देखा 2

मनुष्य जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हाच चोर घाला घालतात. मध्यरात्रीनंतर झोपेचा अंमल सर्व जगावर पसरतो. जसा गृहस्थाश्रमी जीव सर्व काही आपणच करीत आहोत असा आव आणतो आणि परमेश्वराला विसरून जातो. अशा नाजुक क्षणी काळाचा हल्ला होतो आणि सर्व गाठोडी घेऊन तो चोर पसार होतो. मग तो चित्रपट क्षेत्रातील उभरता सितारा का असेना! असा अर्ध्या वाटेवरच घात होत असतो. फक्त हे आपण ओळखले आणि सावधान राहिले की आपला जीव वाचलाच!

रात्र झाली दोन प्रहर सारी

आता येईल बा चोराची फेरी

जिवाजीपंत तुम्ही जतन करा निर्धारी

नाही तरी हिरोनी नेतील गाठोडी सारी 3

पण संत हा आपला नश्वर जीव वाचावा म्हणून त्यांचा जीव तोडून आपल्याला उपदेश करीत नाहीत.

बहुत जन्मा अंती जन्मलासी नरा

देव तो सोयरा करी आता

करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ

अनर्थाचा अर्थ सांडी परता

म्हणजे आपल्यालास्व-हिताचा स्वार्थ करायचा आहे. स्वहित म्हणजे थोडक्यात सांगायचे तर, या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होणे! ‘पुनरुपि जननं, पुनरुपि मरणंया रहाटगाडग्यातून मुक्ती होण्यासाठी संतजन जीवाचा आटापिटा करून उपदेश करीत आहेत. मनुष्यदेहाला येऊन जर परमार्थ साधला नाही तर मग अन्य योनीत मुक्तीचा मार्ग मुळीच नाही! त्यामुळे हा जन्ममरणाचा फेरा चुकविण्यासाठी सद्गुरूचे पाय धरा आणि त्यांना शरण जा! म्हणजे ते तुमचा मुक्तिमार्ग प्रशस्त करतील! एका अर्थानेसद्गुरूम्हणजेच पारमार्थिक जागल्या आहे!

तुमचे हित वो तुम्ही करा

जागाल तरी चुकेल फेरा

सुखे निजताना चोर नागवतील घरा

एका जनार्दनी सद्गुरु पाय धरा 4

आपण नाथमहाराजांचा उपदेश मनावर घेऊ या आणि सावध म्हणजेहुशारहोऊ या!

**